मंगळवार, २४ जुलै, २०१८

हिंदू कोण – ५६

मागील भागातून पुढे –
१३. अध्यात्म साधनेच्या विविध पद्धतींबद्दल -
६९. ह्यात आपण "प्रापंचिकाची अध्यात्म साधना", ह्या विषयाची माहिती करून घ्यावयाची आहे. प्रापंचिकाची अध्यात्म साधना व मोक्षार्थीची अध्यात्म साधना ह्यातील मोठा फरक असां किं, प्रापंचिक इसम संसारात गुंतलेल्या अवस्थेत ती साधना करीत असतो व मोक्षार्थी बहुधा प्रपंचापासून मुक्त असे जीवन जगत असतो, त्याला प्रपंचाच्या विवंचना नसतात. प्रापंचिकाच्या अध्यात्म साधनेचा मुळ उद्देश असा असतों किं, जीवाच्या कामापासून आत्म्याने दूर रहावे. ते समजण्यासाठी जीवाचे षड्विकार व आत्म्याचे, ह्यातील फरक प्रथम समजून घ्यावे लागतील. म्हणजे, जीवाचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर अशा सहा प्रेरणा व आत्म्याचे तेंच सहा विकार ह्यातील फरक काय ते लक्षात घ्यावयाचे असते. जेव्हां ते आत्म्याला असतात तेव्हां त्यांना षड्रिपू (सहा शत्रू) असे सांगतात पण जेव्हां ते जीवाचे असतात तेव्हां त्याना सहा शत्रू असें सांगितले जात नाही उलट सहाय्यक समजले जाते. ह्याचे कारण आपल्याला समजून घ्यावे लागेल. क्रोध, मद व मत्सर जीवाच्या संरक्षणासाठी असतात व काम, लोभ आणि मोह देहाच्या संवर्धनासाठी असतात. म्हणजे, प्रापंचिक हिंदूंच्या अध्यात्म साधनेत ह्यांचे व्यवस्थापन हांच मुख्य विषय असतो. देव वगैरे गोष्टी तेवढ्या महत्वाच्या नसतात. कारण, हिंदूमध्ये देव मानणारे व न मानणारे असें दोन प्रकारचे असतात. अशा दोघांनाही आचरणात आणता येईल अशी साधना असावी लागते. ह्यासाठी आपण प्रथम ह्या सहांची सविस्तर माहिती पहावयाची आहे. त्यासाठी हिंदू कोणचा दुसरा भाग पाहा. प्रापंचिकाच्या अध्यात्म साधनेचा उद्देश प्रामुख्याने पापमुक्त व पुण्यकारक जीवन जगण्याचा असतो. जेणे करण पुढचे जीवन सुखमय होवो. मोक्षार्थीचा उद्देश लिंगदेहा पासून मुक्ती मिळवणे असा असतो. तरीसुद्धा दोघांच्या साधनांत बरेच साम्य असते.
क्रमशः पुढे चालू –

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू २९१ -३००
नाकातील वेसण तुटली, जोखड, जोखदेड, जु मोडले, वाहून उलटून पडले, जर आंस मोडला तर अशावेळी जो अपघात होतो २९१
जर चामड्याची वादी, दोर माने भोवतीची बांगडी तुटली, आणि सारथ्याने जोरांने ओरडून सावध केले असेल, आणि असें करूनही अपघात झाला तर त्यासाठी कोणलाही दंड मारता येणार नाही. असें मनु सांगतो. २९२
जर सारथ्याच्या चुकीमुळें रथ उलटला अथवा रस्त्याबाहेर गेला आणि त्यामुळें नुकसान झाले तर रथाच्या मालकास दोनशे पना दंड भरावा लागेल. २९३
जर सारथी अनुभवी आहे असें दिसले व त्याने हलगर्जीपणा केला असें सिद्ध झाले तर सारथ्याला दंड भरावा लागेल. जर सारथी नवशिका असेल तर त्याबरोबर रथातून प्रवास करणार्या उतारूससुद्धा दंड पडेल.२९४
रस्त्याने जाणार्या जनावरांमुळें अथवा दुसरा रथ आडवा आला व म्हणून त्याचा रथ थांबला असेल व त्यामुळें मृत्यू ओढवला असेल तर त्या सारथ्याला निश्र्चितच दंड भरावा लागेल. २९५
जर माणूस मेला तर त्या सारथ्याला चोरी केल्याप्रमाणे दंड व्हावा, तसेंच जर त्याच्या कडून मोठे जनावर, गांव. हत्ती, उंट, घोडा मारला गेला तर त्याच्या अर्धी शिक्षा होईल. २९६
लहान प्राण्यास इजा झाली तर दोनशे पना दंड आहे. सुंदर जंगली पक्षांस मारले व चतुष्पाद मारले गेले तर पन्नास पना दंड पडेल. २९७
गाढव, खेचर, शेळी, मेंढी मारले गोले तर पांच मशल दंड पडेल. कुत्रा, डुक्कर मारले गेलो तर एक णशल दंड आहे. २९८
पत्नी, मुलगा, गुलाम, विद्यार्थी, लहान भाऊ, असें रक्ताचे नातेवाईक त्यात सामील असतील तर त्यांना दोनशे अथवा फाटक्या बांबूने फटके मारण्याची शिक्षा असावी. २९९
फटके पाठीवर मारावेत पण पुढे मारले तर मारणारा सुद्धा त्याच शिक्षेल (चोरीची शिक्षा) पात्र होतो. ३००
क्रमशः चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा