सोमवार, २ जुलै, २०१८

हिंदू कोण – ५५

मागील भागातून पुढे –
१२. शुभ मुहूर्ता बाबत –

६८. हिंदूंच्या बर्याच गोष्टी शुभ व अशुभ मुहूर्तावर अवलंबून असतात. कोणतेही काम करावयाचे म्हणजे त्यासाठी सुमुहूर्त पहाणे हि एक हिंदूंसाठी नित्याची बाब असते. त्यासाठी भटाला बोलावून त्याच्या कडून पंचांग पाहून शुभ मुहूर्त शोधून त्या वेळी ते काम करण्याचा प्रघात आहे. नियोजित काम यशस्वी व्हावे म्हणून हे सर्व करतात. एवढे करूनही बर्याच वेळी काम बिघडते असा अनुभव आहे. मुहूर्त पहाण्या मागील उद्देश असा असतो किं, आपल्या सर्व कामांवर ग्रहांचा प्रभाव असतो व योग्य मुहूर्त पाहून काम केले किं, ग्रह अनुकूल होतात असा समज आहे.
ह्या संदर्भात एक गोष्ट साईबाबांची सांगतात ती अशी किं, एकदा त्या गांवाचा पाटील आपल्या मुलाचे लग्न काढतो. त्यासाठी सुमुहूर्त पहाण्या आधी तो बाबांस भेटतो व आपला मानस त्यांना सांगतो. बाबा त्याला सांगतात किं, मुहूर्त कशासाठी पहावयाचा? करून टाक लग्न लवकर, त्यावर पाटील ते मानत नाही व भटाकडून मुहूर्त काढून मुलाचे लग्न उरकतो. एक वर्षात त्याचा मुलगा मरतो, त्यावर बाबांकडे तो दुःखी अंतःकरणांने जाऊन तक्रार करतो तेव्हां बाबा त्याला सांगतात किं, तू जर मी सांगितल्याप्रमाणे पटकन लग्न केले असतेस तर हे झाले नसते पण तू माझे ऐकले नाही. त्यानंतर बाबांनी जे प्रबोधन केले ते असे कीं, देवाच्या खर्या भक्तांने मुहूर्तासारख्या गोष्टी आपल्या देवावर सोडाव्यात. माणूस जर मुहूर्त पाहून काम करील तर त्यात चुका होतातच. त्याला अनेक कारणे असू शकतात, पंचांग चुकीचे असणे, भटाचे ज्ञान कमी असणे, घडाळ्यातील वेळ चुकीची असणे अशी कितीतरी कारणे असू शकतात. तात्पर्य असें किं, हिंदूंनी आपले काम करीत जावे. जशी वेळ येईल तसे काम करीत जावे. काम प्रामाणिकपणे बिनचुक करण्यावर भर असावा बाकीच्या गोष्टी आपल्या देवावर सोडाव्यात म्हणजे अशी वेळ आली नसती. बाबांच्या मते सर्ववेळा चांगल्याच असतात पण आपले प्राक्तन जर खोटे असेल तर कितीही चांगला मुहूर्त काढून ते काम केले तरी ते फसण्याची शक्यता असते. परंतु, जर देवाची कृपा असेल तर मुहूर्त चुकीचा घेतला तरी कांहीं बिघडत नाही. त्यावर तो पाटील बोलला, तुम्ही आमचे देव, तरी असे कसें झाले? त्यावर बाबा बोलले, अरे वेड्या, मी तुला पटकन लग्न उरकण्यास सांगितले होते पण तू ते (देवाचे) ऐकलेस कां? मी तुला तोच मुहूर्त दिला होता त्यावर तू मुलाचे लग्न केलं नाहीस त्याला मी काय करणार?
तात्पर्य असें किं, आपले काम करीत जा, वेळ देवावर सोडून त्याला स्मरून प्रामाणिकपणे काम करीत जाणे हेंच माणसांचे काम असते. साईबाबांचा हा संदेश हिंदूंनी लक्षात ठेवून आपली कामे करावीत. शुभ मुहूर्त शोधण्यात वेळ घालवू नये. गीतेतसुद्धा तसेंच सांगितले आहे, "कर्मण्ये वाधिकारेस्ते....
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू २८१ -२९०
हलक्या कुळातील माणूस जर वरच्या कुळातील माणसाच्या जागी बसण्याचा प्रयत्न करील तर त्याच्या कुल्यावर तापलेल्या सळींने चटका द्यावा. तसेंच राजा त्याच्या मागच्या भागावर तो बहिष्कृत झाल्याचे डाग देऊन नंतर त्याला गांवातून हाकलून देईल. २८१
उद्धटपणे तर शुद्र वरिष्ठ लोकांशी बोलला अथवा त्यांच्यावर थुकला तर त्याचे दोनही ओठ छाटून टाकावेत. जर त्याने लघवी केली तर त्याचा तो अवयव छाटून टाकावा. जर तो पादला तर त्याचे गुदद्वार कापून टाकावे. २८२
जर त्याने (हलक्या जातीचा) उच्च जातीच्या माणसाचे केस पकडले तर राजाने त्याचे हात छाटून टाकावेत. तसेंच ज्या अवयवाने तो उपमर्द करील तो अवयव कापून टाकावा. २८३
समान जातीच्या माणसाचे रक्त काढले अथवा इजा केली तर त्याला पन्नास पना दंड करावा. स्नेयू कापला तर दंज सहा निष्क असावा. परंतु हाड मोडले तर त्याला बहिष्कृत करावे. २८४
निरनिराळ्या वृक्षांच्या उपयुक्ततेनुसार त्यांना इजा करणार्यास दंड सुचवले आहेत. ते ठरलेले आहेत. २८५
जर कोणी दुसर्याला अथवा प्राण्याला फटका मारला तर तसे करणार्यास त्या फटक्याने किती त्रास धाला त्याप्रमाणे शासन करावे. २८६
जर अवयव दुखावला असेल, जखम झाली असेल, रक्तस्त्राव झाला असेल तर ज्याला त्रास झाला त्याला त्रास देणारा नुकसार भरपाई करील. त्याशिवाय राजा दंड आकारील. २८७
जो कोणी दुसर्याच्या गोष्टीचे नुकसान करील त्याला त्याची भरपाई करावी लागेल. त्याशिवाय नुकसानी एवढा दंड राजा वसुल करील. तो खजिन्यात जाईल. २८८
चामड्याच्या वस्तुचे नुकसान केले असेल तर त्याच्या किमतीच्या पांचपट एवढा दंड भरावा लागेल. त्याशिवाय तशी दुसरी आणून द्यावा लागेल. हाच नियम लाकडाच्या मातीच्या, धातूच्या तसेच फुलं, फळं कंदमुळं ह्यांना लागू होतो. २८९
वाहन, सारथी व मालक ह्यांबाबतच्या बद्दल कांही दहा गोष्टी आहेत कीं, त्यांसाठी कोणतीही भरपाई करावा लागणार नाही. इतर बाबतीत दंड राजाकडून सांगितला जाईल. २९०

क्रमश: पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा