रविवार, २८ जून, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-८


मागुन पुढे चालू -
अखेरीस पायातून आलेले शुद्र ज्याना कोणतेही कार्य दिलेले नाही ते वर दिलेल्या तीन वर्णाच्या लोकांना मदत करावयाचे कार्य दिले आहे, आणि त्याद्वारा त्यानी स्वताची उपजिविका करावी. ९१
मनुष्य त्याच्या देहाच्या वरच्या भागात शुद्ध स्वरुपात असतो म्हणून त्यातील स्वयंभु (परमेश्वर) तेथे असतो, आणि त्याचे स्थान आहे मुख. ९२
ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न झाले, ते वेदाचे रक्षक असल्यामुळे ते ह्या जगाचे मालक झाले. ९३
स्वयंभुने ब्राह्मण त्याच्या मुखातून तयार केले व त्यांनी वैराग्य पालन करुन, देव आणि पितर ह्यांचे पुजन करुन विश्र्वाचे संरक्षण करावे असे योजले. ९४
ब्राह्मणांच्या मुखातून देव व पितर त्यांना दिलेला प्रसाद ग्रहण करतात म्हणून ते सर्व श्रेष्ठ ठरले. ९५
सृष्टीतील स्वताहून हालचाल करणारे अचलांपेक्षा श्रेष्ठ असतात, त्याहून जास्त श्रेष्ठ असतात बुद्धि असलेले, त्याहून श्रेष्ठ असतात त्यात मानव, ज्याना अधिक श्रेष्ठ समजले जाते व त्यात ब्राह्मण सर्वश्रेष्ठ मानले जातात. ९६
ब्राह्मणात जे वेदाभ्यास करतात, आपले कर्तव्य करतात, अध्यात्म साधना करतात व स्वयंभुला समजतात ते त्यांच्यात श्रेष्ठ असतात. ९७
ब्राह्मणांचा जन्म म्हणजेच पवित्र नियमांचा जन्म असे समजावे. पवित्र नियमांचे रक्षण व पालन करणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य असते. जे ब्राह्मण अशारीतीने आपले कर्तव्य पार पाडतात ते ब्रह्मात विलीन होतोत. ९८-९९
जे काही ह्या जगात आहे ते ब्राह्मणांची मालमत्ता समजावी व त्यांच्या आज्ञांचे सर्वांनी पालन करावे. १००
ब्राह्मण स्वताच्या हाताने स्वताचे अन्न शिजवून खाईल. स्वताचे वस्त्र वापरेल, सर्व स्वताची कामे स्वताच करील, सर्व मर्त्य जग त्यांच्या कृपेवर जगतात असे समजून वागावे. १०१
ब्राह्मणांना त्यांची कामे करणे सहज व्हावे म्हणून ह्या पवित्र नियमांची रचना मनुने केली आहे. १०२

मनुस्मृती पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

शनिवार, २० जून, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा- ७


मागुन पुढे चालू -
नंतर येणार्या युगात (त्रेता, द्वापार कलि) सात्विकता कमी होत जाते मानव अधिकाधिक दुर्गुणी होत जाईल. अन्याय, खोटेपणा, फसवणूक अशा गोष्टी वाढत जातील. त्याप्रमाणे धर्माचा एक एक पाय कमी होत जाईल. ८२
कृतयुगात मानव रोगविरहीत असतो. त्याचे आयुष्य ४०० वर्षे असेल. त्यानंतर येणार्या युगात ते कमी होत जाईल. ८३
प्रत्येक युगाच्या प्रवृत्तिनुसार त्या त्या युगात मर्त्य लोकांचे जीवन, त्याने करावयाची दानं, त्यांची कर्तव्ये, विविध दैवतांचे परिणाम, हे सर्व असेल. ८४
कृतयुगात माणसासाठी एक कर्तव्य असते तर त्रेतायुगात ते वेगळे असेल. असे होत राहिल. ती कर्तव्ये त्या त्या युगानुसार भिन्न असतील. ८५
कृतयुगात वैराग्य हे कर्तव्य असेल, त्रेतायुगात ज्ञान संपादन करणे, द्वापार युगात त्यागाचे कर्तव्य असेल, कलियुगात दान असेल. ८६
सामान्य माणसे म्हणजे शुद्रांसाठी ही कर्तव्ये सांगितलेली आहेत. परंतु, ब्रह्माच्या मुखातून, हातातून, मांडीतून पायातून उत्पन्न झाले त्यांची कर्तव्ये वेगळी असतील. ८७
ब्राह्मणांसाठी जे ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न झाले ते वेदांचे अध्यन संरक्षण करतील, भिक्षुकी करून उपजिविका करणे, स्वार्थासाठी त्याग करणे अशी कर्तव्ये असतील. ८८
क्षत्रिय जे हातातून उत्पन्न झाले ते समाजाचे संरक्षण वेदाचे अध्यन करतील, स्वताच्या वासनांवर काबू ठेवतील. ८९
वैश्य जे मांडीतून आले ते पशुपालन, वेदांचा अभ्यास करणे, व्यापार, समाजाचे अर्थकारण सांभाळणे अशी कर्तव्ये करतील. ९०


 
मनुस्मृती पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

बुधवार, १० जून, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-६

मागल्या भागाकडून पुढे चालू
जगाचे एक वर्ष देवाचा एक दिवस असतो. त्यातील ज्या अर्ध्या काळात सूर्य उत्तरेकडे सरकत असतो तो काळ दिवस समजला जातो व नंतरचा अर्धा जेव्हा सूर्य दक्षिणेकडे सरकतो तो रात्र समजला जातो. ६७
ब्रम्हाच्या रात्र व दिवसाची व अनेक युगांची माहिती व त्यांचे क्रम आता थोडक्यात पहा ६८
कृत युग देवांच्या चार हजार वर्षाचे असते, त्याच्या आधीची संध्या अनेक वर्षाची व नंतरची अनेक वर्षाची असते. ६९
त्यानंतरची युगे त्यांच्या संध्याकाळात मिसळून गेलेली असतात. म्हणजे, ही युगे एकमेकात मिसळून येत असतात. ७०
अशी बारा हजार वर्षे माणसाच्या जगाची असतात. ते देवांचे एक युग समजले जाते. अशी देवांची एक हजार युगे ब्रह्माचा दिवस असतो, तितकीच वर्षे ब्रह्माची रात्र असते. ७१-७२
ह्यावरून असे दिसते की, ब्रह्माचा पवित्र दिवस देवांच्या हजार वर्षानंतर संपतो. असे ब्रह्माचे दिवस व रात्र असतात. ७३
ब्रह्माची रात्र संपल्यावर तो जागा होतो. जागा झाल्यावर आधीची सृष्टी नष्ट करतो व नवीन खरी व खोटी सृष्टी तो त्याच्या विचारांतून उत्पन्न करतो. ७४
नवीन सृष्टीचे नियम वेगळे असु शकतात. कारण हे सर्व नियम ब्रह्माच्या विचारानुसार असतात. नवीन सृष्टी उत्पन्न होतांना पहिला आवाज होतो ७५
त्यानंतर वारा सुरू होतो. तो सर्व प्रकारचे गंध पसरवतो. त्यातून स्पर्शाची उत्पत्ति होते. ७६
त्या वार्यातून तेजस्वी प्रकाश उत्पन्न होतो आणि तो सर्व अंधार नाहीसा करतो. त्यातून रंग निर्माण होतात. ७७
त्यातून पाणी व स्वाद (रुची) निर्माण होते. पाण्यातून जमीन व अशा क्रमाने सर्व सृष्टी तयार होत जाते. ७८
जगाच्या बारा हजार वर्षाच्या काळाला एकाहत्तरपट केले कीं मनुचा एक काळ ठरतो. त्याला मन्वंतर म्हणतात. ७९
असंख्य मन्वंतरात निर्मिती व नाश असें सतत होत असते. ८०
कृतयुगात धर्म चार पायांचा असतो, तो पूर्णरुप असतो, त्या काळात मानवाने असत्य कृत्य केले तर त्याचा फायदा त्याला होत नाही. ८१


हल्ली शास्त्रज्ञ बिग बँग थियरी सांगतात त्याचा येथे उल्लेख झाला आहे असे दिसते

मनुस्मृती पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.