शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

हिंदू कोण – १२

. देवांच्या अस्तित्वा बाबत
१६. जेव्हा ह्याचा तपास केला जातो तेव्हा असे दिसून येते किं, सर्व धर्मांचे आणखीन एक रुप असते. त्या रुपाला आपण पुरोहितांचा धर्म असे नांव देऊया. म्हणजे खरा हिंदूधर्म पुरोहितांनी प्रचार केलेला ब्राह्मणी हिंदूधर्म अशी हिंदूधर्माची दोन रुपे दृष्टोत्पत्तिस येतात. तेंच इस्लाम ख्रिस्ती धर्माबाबत असल्याचे आढळते. असें सांगण्याचे कारण परमेश्र्वर दयाळू, क्षमाशिल, कृपाळु आहे असा प्रचार त्या त्या धर्माचे पुरोहित करीत असतात. अशारितीने हे पुरोहित लोक, भक्तांची दिशाभुल कां करतात? हे समजले पाहिजे. ते समजण्यासाठी आपल्याला ह्या पुरोहित वर्गाच्या लोकांच्या कामाचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी हा पुरोहित वर्ग एकाद्या धर्मांत कसा तयार होतो ते पहावे लागेल. इस्लामच्या प्रेषीतांनेसुद्धा असे सांगितले आहे किं, अल्लाह क्षमाशिल आहे. म्हणजे इस्लामचा देव निसर्ग नाही तर दुसरा कोणी आहे. अल्लाहाला सिद्ध कसें करणार? त्यामुळे इस्लाम मधील देवाची संकल्पना केवळ काल्पनिक आहे त्याच्या भरवशावर रहाणे योग्य नाही. कदाचित् इस्लामचा प्रेषीत त्याच्या काल्पनिक देवाचा प्रचार करत होता कारण, तो एक पुरोहित (हनिफ) होता, असें नाईलाजाने म्हणावे लागते.
१७. माणसाला कांहीं अडले का तो मदतीसाठी अज्ञात शक्तीकडे आळवणी करतो. त्यावेळी ती अज्ञात शक्ति खरोखरच अस्तित्वात आहे कां नाही ह्याचा विचार करण्याच्या मनस्थितीत तो नसतो. त्यातूनच खरे तर देवाची संकल्पना विकसित झाली. पुरोहितांच्या धर्मातील देव हा काल्पनिक देव ह्यांत बरेच साम्य असते. माणसाच्या कल्पनेतून हा देव निर्माण झालेला असल्याने तो माणसाच्या सोईनुसार असतो. म्हणजे असा देव माणसांने कांहींही गैरकृत्य केले तरी तो देव माणसाला क्षमा करतो असे समजले जाते. ह्याचा अर्थ, देवाच्या दोन संकल्पना समाजात प्रचलित असतात. एक विज्ञानाला मंजूर असलेला वैदिक काळापासून प्रचलित असलेला निसर्गसिद्ध देव आणि हा माणसाच्या कल्पनेतून निर्माण झालेला देव. माणसाच्या कल्पकतेतून आणखीन बर्याच गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत जसें, कायदा, शासन, विविध नियम इत्यादि, ह्यांना वास्तविक जगात अस्तित्व नसते पण माणसाच्या जीवनात मोठे महत्व असते. म्हणून आपण म्हणतो, कायदा मानला तर आहे, नाही तर नाही, शासन मानले तर आहे, नाही तर नाही, नियम मानले तर आहेत, नाही तर नाहीत, तसेंच हा काल्पनिक देवसुद्धा मानला तर आहे, नाही तर नाही! निसर्गसिद्ध दैवतांचे तसे नसते, तुम्ही माना अगर माना ते आहेत नेहमी असणार हा काल्पनिक देव हिंदूंचा निसर्गसिद्ध देव ह्यातील फरक आहे. माणूस एका काल्पनिक विश्र्वात नेहमी वावरत असतो. वास्तविक विश्र्व आणि त्याचे काल्पनिक विश्र्व ह्यांचे संयोजन माणसाला करावे लागते.
१८. अगदी प्राचीन काळांपासून असें होत असल्याचे दिसून येते किं, बर्याच पितर पिशाच्च देवता आणि अदृष्य निसर्गामधील देवता गणातील शक्ती, माणसा कडून कांहीं अपेक्षा करीत तो केव्हा अडचणीत येतो आपण त्याला मदत करतो अशा प्रसंगाची वाट पहात असतात. कारण, ह्या देवतांना सुद्धा भक्तांची आवश्यकता असते. अशी अनेक उदाहरणे नोंदली गेली आहेत किं, ही दैवते माणसाला दृष्टांत देऊन अमुक गोष्ट कर म्हणजे तुझे काम होईल असा सल्ला देतात. त्याप्रमाणे कामे झाल्यानंतर उतराई म्हणून तो उपकृत माणूस त्या देवतेला ठरलेला कांहीं प्रसाद देतो. अशा गोष्टी वेळोवेळी होत गेल्यामुळे त्या विषयाचा माणसांने विचार करण्यास सुरुवात केली असावी त्यातूनच पुढे देव त्याची आराधना करण्याच्या विविध रीती निर्माण झाल्या. आणि त्यातून धर्म ही संकल्पना विकसित झाली. धर्म शब्दाचा एक अर्थ आहे कर्तव्य (दुसरा अर्थ, स्वभाव गुण). त्यातून देवांची आराधना करणे हेंच कर्तव्य असा अर्थ प्रचलित झाला असावा. अशाप्रकारची आराधना सकाम असते म्हणजे त्यात कांहीं मतलब असतो. एकप्रकारचा तो धंदा ठरतो. असें असले तरी माणूस ते करीत असतो. कारण, सामान्य माणूस निष्काम आराधना करू शकत नाही. सामान्य माणसाची भक्तिसुद्धा अशीच स्वार्थप्रेरीत असते. अशा भक्तिने परमेश्र्वर जरी मिळणार नसला तरी इतर दैवते मात्र प्रसन्न होत असतात असा अनुभव आहे. हिंदूंच्या बहुतेक प्रार्थना सकाम आराधना ह्या प्रकारात मोडतात. निष्काम आराधना फक्त मोक्षार्थी साधक करतात त्याची विशेष चर्चा होत नाही.

क्रमशः चालू
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू१५
जरी त्याला भुकेने त्रस्त केले तरी शेतात पिकवलेले खाद्यपदार्थ जरी ते कोणी फेकून दिले असले तरी, तो घेणार नाही, गांवाच्या वेशीत उगवलेले भाजीपाला, फळे, कंदमुळं घेणार नाही. १६
तो खलबत्ता वापरेल अथवा स्वताचे दांत कुटण्यासाठी वापरेल. तो त्याचे जेवण चुलीवर शिजवेल किंवा स्वाभाविकपणे पिकणारे कच्चे खाईल. १७
तो त्याच्या परिस्थितीनुसार दररोज जेवणाचे पदार्थ मिळविले अथवा महिन्याची वा सहा महिन्याची, वर्षाची बेगमी करील. तो त्याची भांडी स्वतः स्वच्छ करील. १८
जेवणाच्या पदार्थांची बेगमी केल्यानेतर तो ते त्याच्या आवश्यकते प्रमाणे दररोज (सकाळी, रात्री) जेवेल अथवा दोन दिवसांतून एकदा जेवेल किंवा चौथ्या, आठ दिवसांने असें केव्हाही जेवण करील. १९
तो चंद्रायनानुसार त्याचे जेवण करील (चंद्राच्या कलाप्रमाणे कमी होत पुन्हा वाढत असें), तो उकडलेले जव किंवा भाताचे आटवले करून दिवसातून एकदाच खाईल. २०
तो परिस्थितीनुसार केवळ फुलं, कंदमुळं फळं जी स्वाभाविकपणे पिकून जमिनीवर पडतात ती घेईल, हे पवित्रनियमानुसार होईल. २१
तो जमिनीवर लोळत अथवा उभे राहून, किंवा एकदा आडवे पडून कधी उभे राहून तपस्या करील. पहाटे आणि संध्याकाळी तो रानांत झर्याखाली आंघोळ करील. २२
तो उन्हाळ्यात सूर्याची उष्णता सहन करील. पावसाळ्यात भिजेल आणि थंडीत ओले वस्त्र नेसून थंडी सहन करील. त्यामुळे त्याची तत्त्वशिलता सिद्ध होईल. २३
तो जेव्हा तीन सवनांत (सकाळ, दुपार रात्री) आंघोळ करील तेव्हां तो पितर, देव ह्यांना अर्ध्य वाहील, अधिकाधिक घोर तपस्या करून तो शरीराने कृश होईल. २४
अशारितीने तीन अग्नी त्याच्यात प्रवेश करतील त्यानंतर त्याला घराची, अग्नीहोत्राची गरज रहाणार नाही. तो शांतपणे केवळ फळं, कंदमुळं ह्यांवर उपजिवीका करू लागेल. २५
आरामदाय़ी जीवनाचा त्याग केलेले हा बैरागी जमिनीवर झोपेल, त्याला आकाशाचे छप्पर चालेल, तो वृक्षाच्या खाली राहील. २६
तो ब्राह्मणा कडून तसेंच इतर वर्णातील द्विजांकडून (क्षत्रिय वैश्य) जे सुद्धा वनात रहातात, कडून पोटापुरते खाद्य घेईल. २७
किंवा तो वनवासी, नजिकच्या गांवांतून फक्त आठ घास होतील एवढे खाद्य द्रोणात अथवा हाताच्या ओंजळीत येईल तेवढे खाईल. २८
अशारितीने वनात राहून येथे दिलेल्या नियमांनुसार व्रतस्थ राहून तो परमेश्वरास प्राप्त करू शकेल. त्यासाठी त्याला वेळोवेळी उपनिषदाचा अभ्यास करावा लागेल. २९
उपनिषदांबरोबर इतर साहित्यासुद्धा त्याला अभ्यासावे लागेल जे ऋषीमुनी ज्ञानी ब्राह्मणांनी लिहून ठेवले आहे. असें केल्याने त्याचे ब्रह्माबद्दलचे ज्ञान वाढेल त्याला त्यांचे आशिर्वाद मिळतील. ३०
नाहीतर तो असेंही करू शकतो, तो ईशान्य दिशेने चालण्यास सुरुवात करील केवळ पाणी हवा घेऊन मृत्यु येई पर्यंत प्रवास करीत राहील. ३१

मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी