बुधवार, ३० मार्च, २०१६

महाराष्ट्रात भूजल पातळी कां खालावली आहे?

महाराष्ट्रातील भूजल पातळीचा प्रश्र्न पर्यावरणशास्त्राशी निगडीत आहे. जमिनीत पाणी दोन कारणांनी येत असतें. एक पावसामुळे दुसरे नद्यांच्या प्रवाहामुळे. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर तेथील मातीत मुरते तेथून ते जमिनीच्या आतल्या थरांत मुरत जाते. कांहीं पाणी पृष्ठभागावरून इतरत्र वाहत जाते शेवटी एकाद्या नदीत अथवा नाल्यात जाऊन मिळते.
नद्या मुख्यतः सह्याद्री पर्वतात उगम पावतात पूर्ववाहीनी होऊन पश्र्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा असें करीत राज्याबाहेर निघून जातात. पश्र्चिम महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागांत साधारणपणे कमी पाऊस पडतो सह्याद्री पर्वतावर पडणार्या पावसाने जे पाणी नद्यांत येते हेंच खरे तर मुख्य पाणी असते. महाराष्ट्रात पडणारे ८०% पावसाचे पाणी सह्याद्री पर्वतांत पडते व फक्त २०% पाणी सपाट प्रदेशात पडते. पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन पाणी त्या नदीच्या खाेर्यात पसरत असे. नदींतून वाहतांना ते पाणी तिच्या पात्रात मोठ्याप्रमाणात मुरत असें तेथून ते भुगर्भात शिरून संपूर्ण भुगर्भ पाण्याने भरत असें.
त्याकाळात प्रामुख्याने भुपृष्ठावरील विहीरींतून शेतांना इतर कामासाठी लागणारे पाणी मिळवता येत असें. पाण्याचा उपसा नेमका असें. जरुरीपेक्षा जास्त पाणी शेतकरी उपसत नसत. नेमक्या पाण्यात पिके घेतली जात. अशा परिस्थितीत भुजल पातळी सामान्य राखली जात होती. सर्व विहीरींना भरपूर पाणी मिळत असें. नद्या बारमासी वहात असत. त्यामुळे, सतत नद्यांतील पाणी जमिनीत मुरत असें भुजल पातळी राखली जात असें.
शासनाने त्यांत मोठा बदल केला आता त्या सर्व नद्यांवर भलीमोठी धरणे बांधली गेली. ह्या धरणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. नद्या बारमासी वहाणे बंद झाले त्यांतील बहुतेक जल त्या धरणांत धरून ठेवले गेले. नदीच्या पात्रातून जो पाण्याचा मुरवा जमिनीत होत होता तो कायमचा थांबला आहे. नद्यांना पूर येण्याचे थांबले. त्यामुळे खाेर्यात पाणी पसरणे व जिरणे बंद झाले. धरणांतील पाणी वीज निर्मितीसाठी वापरले गेले त्यानंतर ते पाणी नजिकच्या म्हणजे अरबी समुद्रात सोडले जाऊ लागले. जे पाणी पूर्वी नद्यांतून संपूर्ण महाराष्ट्रात फिरत फिरत नंतर महाराष्ट्रा बाहेर जात असें ते थांबले. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या परिसरांत पडणारे पाणी महाराष्ट्राच्या जमिनीस मिळावयाचे बंद झाले. ते पाणी जमिनीत मुरण्यासाठी मिळावयाचे बंद झाले. हे झाल्यामुळे आज महाराष्ट्रात भुजल पातळी खालावली आहे. ह्यात भरीसभर म्हणून किं काय, वीजेचे उपसा पंप मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. त्यामुळे जे पाणी आहे ते उपसले जाऊन भुजल पातळी आणखीन खालावण्यास कारण झाले. धरणातील पाण्यामुळे वीज निर्मिती झाली त्यातून कांहीं विकास झाला पण त्याची फार मोठी किंमत आज शेतकरी देत आहेत.
अशांत भर म्हणून किं काय, शेताभोवतीची वनराई काढून टाकण्याची शिफारस सरकारी तज्ज्ञांनी (?) करण्यास सुरुवात केली शेतकरी त्या प्रमाणे करू लागले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे जे घडले आहे ते दुरुस्त करणे अशक्य आहे. मी विचारतो, कोयनेचे जे पाणी वीजनिर्मितीनंतर खोपोलीत सोडले जाते ते पुन्हा देशांवर वळवणे शासनाला शक्य आहे कां? उत्तर आहे, नाही. टाटाच्या वीज प्रकल्पातील पाणी खोपोलीत ओतले जाते ते देशाकडे वळवता येईल कां? उत्तर आहे, नाही. येथे मी फक्त दोन प्रकल्पांचा विचार केला आहे. इतर धरणांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या जमिनीतील भुजल पातळी खालावण्याचे कारण अधिक स्पष्ट होईल.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक २०१ - २३० वाचू या.
सप्तर्षींपासून आदिदैवते, पितर, निर्माण झाले, त्यांतून देव दानव निर्माण झाले. देवांपासून सर्व चराचर सृष्टी उत्पन्न झाली असें यथाक्रमांने झाले. २०१
साधे पाणी चांदीच्या भांड्यातून किंवा चांदीचा वर्ख (मुलामा) लावलेल्या पात्रातून पितरांना वाहिले तर त्यामुळे अनंत सुखाचा अनुभव येतो. २०२ टीपः ह्यातूनच पुजेसाठी चांदीच्या पात्रांचा वापर करण्याची प्रथा सुरू झाली.
द्विजाच्या (ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य) श्राद्धासाठी आदिदैवतांच्या मानाचा विधी देवांच्या मानाच्या विधीपेक्षा जास्त महत्वाचा असतो. कारण, श्राद्धाच्या आधी देवांना दिलेले प्रसाद पितरांना प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त असतात. २०३
प्रथम एका ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून देवांच्या सन्मानाचा विधी करावा म्हणजे, देव उपस्थित रहातील श्राद्धविधीस संरक्षण देतील, त्यामुळे राक्षस तेथे येऊन श्राद्धाचा विधी खराब करु शकणार नाहीत. २०४
त्या ब्राह्मणांने श्राद्धाची सुरुवात शेवट देवांना आवाहन करूनच करावी. आदिदैवतांना आवाहन करून होता कामा नये. जर असे झाले तर त्या यजमानाचा वंश नष्ट होईल. २०५
तो ब्राह्मण एक, दक्षिणेकडे उतार असलेली पवित्र अशी जागा जी एकांतात आहे ती निवडेल. तेथे गाईच्या शेणांने सारवेल. २०६
पितर नेहमीच एकांतातील उघडी जागा पसंद करतात. अशा जागा नदीच्या किनारी असतात जेथे कोणीही फिरकत नाही. २०७
कुश गवताच्या पात्यांने मढवलेल्या एका वेगळ्या आसनावर यजमान श्राद्धविधी करणार्या ब्राह्मणाला बसवेल. २०८
अशारितीने सर्व ब्राह्मणांना बसविल्यावर तो यजमान त्यांना सुगंधी फुले असलेल्या हारांने अलंकृत करील. कारण, ते ब्राह्मण देवांचे प्रतिनिधी असतात. २०९
त्यानंतर तो त्यांना पाणी, तीळाचे दाणे कुश गवताची पाती देईल. नंतर हे ब्राह्मण जमलेल्या आमंत्रित इतर ब्राह्मणांच्या परवानगीने पुढील विधी सुरु करतील. २१०
पवित्र नियमांनुसार पुढे श्राद्धविधी सुरक्षित व्हावा म्हणून (पवित्र) अग्नी, सोम यम ह्या वैदिक देवांना अर्ध्य ते वाहतील. त्यानंतर ते आदिदैवतांना प्रसंन्न करण्यासाठी प्रसाद देतील. २११
परंतु जर, पवित्र अग्नी उपलब्ध नसेल तर यजमान त्या वेद जाणणार्या ब्राह्मणांना तो प्रसाद अर्पण करील. त्यावेळी ते ब्राह्मण म्हणतील, "अग्नी काय ब्राह्मण काय सर्व एकच". २१२
ते वेद जाणणारे ब्राह्मण प्राचीन आदिदैवतांचे (पितरांचे) प्रतिनीधी असतात. ज्यांना क्रोध नाही जे सहजपणे संतुष्ट होतात आणि जे माणसाला त्याच्या प्रगतीचा मार्ग दाखवतात. २१३ टीपः हे पितरांचे गुण सांगितले आहेत.
यजमानाने श्राद्धविधी अग्नीला अर्ध्य देऊन उरकावा. असां किं, शेवटचे अर्ध्य दक्षिणेच्या दिशेने होईल, जेथे पिंड ठेवले आहे तेथे पाणी सोडावे. २१४ टीपः अर्ध्य देणे म्हणजे, पाणी सोडणे.
(पिड बनवून) उरलेल्या अन्नाचे तो (यजमान) तीन भाग करील त्यानंतर तो मनाची एकाग्रता करून दक्षिणेच्या दिशेंने ठेवलेल्या कुश गवताच्या पात्यावर ते ठेवून पाण्याचे अर्ध्य देईल. २१५
अशारितीने पिंडदान केल्यावर तो यजमान त्याचे हात त्या कुश गवताच्या पात्यांना पुसेल. त्यामुळे त्याचे तीन पूर्वज त्या पिंडाचा आस्वाद घेतील असें समजले जाते. २१६
आचमन घेऊन तो फिरून उत्तरेकडे तोंड करील, मग तिनदा प्राणायाम करील. त्यानंतर जर तो यजमान पवित्र शास्त्र जाणणारा असेंल तर सहा ऋतु आदिदैवतांना स्मरेल. २१७
त्यानंतर तो सावकाशपणे पाणी त्या पिंडांच्या बाजूस ओतेल, मग तो त्या पिंडांचा, ते ज्या क्रमाने ठेवले होते त्या क्रमांने, दीर्घ वास घेईल. २१८
त्या पिंडाचे बारीक तुकडे करून ते तो जमलेल्या ब्राह्मणांना खाण्यास देईल. त्यानंतर ते ब्राह्मण पवित्र नियमांनुसार जेवण सुरु करतील. २१९
जर यजमानाचे पिता जीवंत असतील तेथे उपस्थित असतील तर त्यांनासुद्धा पिंडाचा तुकडा खाण्यास देईल त्यांना इतर ब्राह्मणां बरोबर पाहुणा म्हणून जेवणास बसवेल. २२०
परंतु, जर पिता वारले आहेत आजोबा जीवंत आहेत असें असेल तर त्यांने पित्याचे नांव उच्चारून मग पणजोबाचे नांव घ्यावयाचे असते. २२१
मनु म्हणतो किं, अशावेळी आजोबा पाहुणा म्हणून जेवावयास बसेल किंवा, नातु (यजमान) ब्राह्मणांच्या परवानगीने श्राद्धविधी उरकू शकेल. २२२
पाहुण्यांच्या हातावर तीळाचे दाणे असलेले पाणी ओतून असें किं, त्यांच्या हातात कुश गवतांची पाती आहेत, तो प्रत्येकाला पिंडाचा भाग खाऊ घालत बोलेल, "हे त्या पूर्वजासाठी". २२३
आदिदैवतांच्या स्मरणांत मग्न असलेल्या ब्राह्मणांच्या पुढ्यात तो यजमान जेवणाचे अन्न असलेले भांडे दोनही हातांने ठेवेल. २२४
जर ते भांडे दोनही हातांत धरलेले नसेल तर वाईट असूर ते त्याच्या हातून हिसकावून घेतील. २२५
तितक्याच सावधानतेने त्यांने इतर तोंडी लावण्याचे खाद्यपदार्थ जसें, वरण, भाज्या, दुध, ताक, मध इत्यादी असलेली भांडी त्या ब्राह्मणांच्या पुढे ठेवावीत. २२६
त्या बरोबर स्वादिष्ट फळे, कंदमुळे, कोशिंबीरी, चवीष्ट मांसांचे पदार्थ, आणि अखेरीस सुगंधी सरबत असें बरेच पदार्थ तो त्या ब्राह्मणांना खाण्यास देईल. २२७ टीपः मनुस्मृतीच्या काळात ब्राह्मण मांसाहारी होते हे ह्यावरून सिद्ध होते.
असें सर्व स्वादिष्ट खाद्यपदार्थ तो त्या ब्राह्मणांना आग्रहपूर्वक खाण्यास पुन्हा पुनः सांगेल. तेव्हां तो यजमान त्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची स्तुती करील. २२८
हे करीत असतांना तो पूर्वजांच्या आठवणीने अश्रु ढाळणार नाही, रागावणार नाही, अपशब्द बोलणार नाही, खोटे बोलणार नाही, त्या खाद्य पदार्थांना पायाचा स्पर्श करणार नाही, आणि त्यांनी भरलेले भांडे जोरांने हिंदकळवणार नाही. २२९
अश्रु ढाळल्यास ते अन्न प्रेतांना मिळते, रागावल्यास शत्रुला मिळते, खोटे बोलण्याने कुत्र्याला मिळते, पायाचा स्पर्श झाल्यास राक्षसांना मिळते आणि हिंदकळवल्यास पापी लोकांना मिळते. २३०

पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.