सोमवार, ३० मे, २०१६

अरबांची कुत्री – ३

महमदाच्या शेवटच्या प्रवचनात तो पुन्हा सांगतो किं, इस्लाम हा अरबांसाठी आहे अल्लाह हा देवसुद्धा अरबांसाठी आहे. हे महमदाचे प्रवचन त्या भागात सर्वत्र पसरले होते अशा परिस्थितीत अरबेतरांना कसे बाटवता येईल हा प्रश्र्न उथमन अबु बक्रला पडला होता.

अखेरीस महमदाचा अंत झाला. त्याने त्याच्या सर्व चाहत्यात शोकांची कळा पसरली. कांहीं समजून चुकले किं, हा खून आहे त्यां लोकांनी आपापली शस्त्रे बाहेर काढली महमदाचे निष्ठावंत एकाबाजूस उथमन अबु बक्रचे गुलाम दुसर्या बाजूस अशी ह्यांत धुमश्र्चक्री माजली. मदीना हे प्रामुख्याने उमायाद जातीच्या अरबांचे असल्यामुळे शेवटी अबु बक्र उथमन ह्याची सरशी झाली महमदाचे निष्ठावंत जे प्रामुख्याने अलीच्या मार्गदर्शना खाली होते ते गुपचुप बसले. तरी धोका नको म्हणून अबु बक्रने महमदाचे शव अरबांच्या नेहमीच्या स्मशानभूमीत पुरता त्याच्या बायकोच्या म्हणजे आयेशाच्या घरात पुरले.

अरब लोक आरसेनिकचे जहर मुलींना मारण्यासाठी नेहमी वापरत असत त्यामुळे त्या विषाची त्यांना चांगली माहिती असें. जर महमदाचे शव स्मशानभूमीत पुरले असते तर ते प्रतिस्पर्ध्यांनी निश्र्चितच उकरून काढले असते ते त्यांना करतां येऊ नये म्हणून ते शव त्याच्या बायकोच्या घरात पुरले होते हे अली त्याचे साथीदार आणि महमदाची मुलगी अलीची बायको, फतिमा, समजून राहीले. परंतु ते कांहीं करू शकले नाहीत.

महमदाचा वारस कोण ह्यासाठीसुद्धा बराच वादंग झाला त्यात दोनही बाजूंचे अनेक अरब मारले गेले.
जर आपण फक्त अरबांची कागदपत्रं पाहिली तर त्यात ह्यासर्व गोष्टींचा उल्लेख सापडत नाही परंतु, त्याच काळात इतर लोकसुद्धा होते त्यात यहुदी ख्रिस्ती ह्यांच्या नोंदणीत ही माहिती मिळते. शेवटी म्हणतात नां, सबसे बडा रुपय्या, ह्या नात्यांने अबुबक्र उथमनने पैशाच्या जोरावर अली फतिमा सोडून इतरांना शांत केले मामला रफादफा करण्यात त्या दोघांना यश आले.

अशारितीने जरी गोष्टीत सारवासारव झाली तरी जे लेखी पुरावे होते किं ज्यात इस्लाम हा केवळ अरबांचाच केवळ अरबांच्यापुरता धर्म आहे हे कसें पुसून टाकावयाचे असा प्रश्र्न शेवटी उरला होता. जोवर ते आहेत तोवर अरबेतरांचे बाटवणे शक्य नव्हते. त्यासाठी ते सर्व पुरावे नष्ट करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. त्यात उमरचा प्रथम विरोध होता पण तो एक गरीब अरब आणि अबुबक्रचा नोकर होता त्यामुळे मदमदाच्या गैरहजेरीत तोसुद्धा गप्प झाला. त्याशिवाय जे अनेक अरब व्यापारी घरोघरी सामान विकण्यासाठी फिरत असत त्यांच्या तोंडी महमदाच्या अनेक कहाण्या होत्या त्या कशा थांबवायच्या असा प्रश्र्न होताच कारण त्या अरब व्यापार्यांना गप्प करणे केवळ अशक्य होते. अशा कारणांमुळे जरी महमदाचे कुराण उथमनने नष्ट केले तरी सत्य दुनियेतून काढून टाकणे त्याला शक्य झाले नाही.
पुढे काय झाले ते पुढच्या पोस्टमध्ये पाहू.

मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या ४१६०
जो ब्राह्मण ऋतुस्नात स्त्रीशी बळजबरीने समागम करील तो त्याची शक्ती, दृष्टी, आत्मतेज, शहाणपण कायमचे घालवून बसेल. ४१
जर तो संयमाने त्या स्त्रीपासून दूर राहिल तर त्याची शक्ती, दृष्टी, आत्मतेज, शहाणपण असें सर्व वृद्धिंगत होईल. ४२
त्यासाठी तो त्याच्या पत्नी बरोबर जेवणार नाही, ती जेवत असतांना तिच्याकडे पहात बसणार नाही, ती शिंकतांना, जांभई देतांना तिच्यापाशी बसणार नाही. ४३
जो ब्राह्मण सामर्थ्यवान होऊ इच्छितो त्यांने सुरमा डोळ्यात घातलेल्या, गरोदरपणामुळे पोट वाढलेल्या, रंगरंगोटी करून सजलेल्या उघडे शरीर असलेल्या स्त्रीकडे पहावयाचे नसते. ४४
तो एका वस्त्रात जेवण्यासाठी बसणार नाही. नग्न अवस्थेत स्नान करणार नाही. तो रस्त्यात राखेवर गाईच्या गोठ्यात लघवी करणार नाही. ४५
तो नांगरलेल्या शेतात, पाण्यात, रचून ठेवलेल्या वीटांच्या ढीगावर, डोंगरात, पडलेल्या देवळाच्या आवारात आणि वारुळावर सुद्धा लघवी करणार नाही. ४६
तो चालता चालतां, उभ्या उभ्या, प्राण्याच्या बिळावर, नदीच्या काठावर, डोंगराच्या माथ्यावर लघवी करणार नाही. ४७
माणसाच्या मलावर, वार्याच्या दिशेने, आगीवर, ब्राह्मणाकडे बघत, सूर्याकडे बघून, पाणी किंवा गाईकडा बघत असा तो लघवी करणार नाही. ४८
लघवी करतांना तो त्याचा चेहरा झाकेल, काटक्याने पालापाचोळ्याने, गवताने अशा चीजांनी प्रथम माती झाकून त्यानंतर त्यावर बोलता शुद्ध मनाने बसून तो लघवी करील. ४९
शौंचास करावयाचा असेल तर दिवसा उत्तरेकडे तोंड करून रात्री दक्षिणेकडे तोंड करून संधीप्रकाशात (संध्याकाळी अथवा उषःकाळी) जसा असेल तसा तो बसून ते करील. ५०
सावलीत तसेंच अंधारात मग ते दिवस अथवा रात्र असेल किंवा, धोक्याची परिस्थिती असेल तर कसाही बसून शौंचास करू शकतो. ५१
सूर्य, चंद्र, पाणी, ब्राह्मण, गाय, वार्याची दिशा अशाकडे पहात लघवी केली तर तो बरबाद होईल. ५२
ब्राह्मणांने पवित्र अग्नीला तो उजळावा म्हणून फुंकर मारू नये. नग्न स्त्रीकडे पाहू नये. अग्नीत कांहींही टाकून ते जाळू नये. पवित्र अग्नीने स्वताला शेक घेऊ नये. त्या अग्नीकडे पाय करूम बसू नये. ५३
खाटे खाली पवित्र अग्नी ठेवू नये. त्यावरून ओलांडून जाऊ नये. पायाच्या दिशेने तो ठेवू नये. कोणत्याही जीवाचा छळ करू नये. ५४
संधीप्रकाशाच्या सुमारास त्यांने प्रवास सुरू करू नये. त्यावेळी खाऊ नये, तेव्हां झोपू नये, जमीन नखांनी खरवडू नये, त्यावेळी गळ्यातील हार काढू नये. ५५
चांगल्या पाण्यात लघवी करू नये, त्यात हगू नये, थुंकी टाकू नये, अथवा कांहींही खराब वस्तु, विषारी पदार्थ, रक्त असें टाकू नये. ५६
आमंत्रण नसतांना कोणत्याही सोहळ्यास जाऊ नये. निर्जन वास्तुत (घरात) निजू नये. आपल्यापेक्षा वरीष्ठ असणार्या इसमांस तो झोपला असतांना उठवू नये. ऋतुस्नात स्त्रीशी बोलत बसू नये. ५७
पवित्र अग्नी असलेल्या ठिकाणी, गोठ्यात, ब्रह्मणाच्या सानिध्यात, वेदांचे खाजगीत पठण होत असतांना जेवतांना त्याचा उजवा हात उघडा ठेवील. ५८
गाय तिच्या वासराला पाजत असतांना तिला त्रास देऊ नये. त्याबद्दल इतरत्र बोलू नये. शहाण्या माणसांने इंद्रधनुष्याकडे बोट करून ते इतरांना दाखवू नये. ५९
ज्या गांवात पवित्र शास्त्राचा मान राखला जात नाही, जेथे रोगराई पसरली आहे, अशा ठिकाणी जाऊ नये. आणि जावे लागले तर तेथे वस्ती करू नये. एकट्याने प्रवास करू नये. डोंगरावर जास्त काळ वस्ती करू नये. ६०

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी