रविवार, २ सप्टेंबर, २०१८

हिंदू कोण – ५८

मागील भागातून पुढे –
१४. मनांची माहिती –
योगशास्त्राप्रमाणे माणसाच्या चार वाणी असतात. त्या अशा, परा, पश्र्चंति, मध्यमा व वैखरी. आपण जे बोलतो व जी यंत्रात नोंदली जाते ती वैखरी वाणी आहे. इतर तीन वाणी अधिकाधिक सुक्ष्म होत जातात. परा वाणी सर्वात जास्त सुक्ष्म असते व देवतांचे आदेश त्या वाणीत येतात. ती वाणी माणसाला ऐकायला येते पण तीची यंत्रात नोंद होऊ शकत नाही. पश्र्चंति हृदयातून उत्पन्न होते असे समजतात व मध्यमा कंठातून उत्पन्न होते असें समजतात. पश्र्चंति, मध्यमा ह्यांची नोंद साधारण यंत्रात होत नाही. अध्यात्म साधना करतांना जप पश्र्चंति, मध्यमा ह्या वाणींत करावा. विशेष म्हणजे परा वाणी सर्व प्राणिमात्रांसाठी एकच असते. तान्हे बाळ आपल्या आईशी परा वाणीत संभाषण करत असते व आईसुद्धा त्याच वाणीत त्याला साथ देत असते. पिशाच्च, देवता गण, पितर, असें सर्वच माणसाशी परा वाणीत संपर्क करतात. असें सांगतात किं, परा वाणी सर्व भाषांचे मूळ आहे. ह्या सर्व वाणींचा संबंध मनाशी असतो कारण त्यांचे नियंत्रण मनाकडून होत असते. अंतरज्ञान, सुक्ष्म ज्ञान ह्यांचा संबंध परा वाणीशी असतो. आपण विचार परा वाणीत करतो व नंतर त्याची अभिव्यक्ती वैखरीमध्ये होत असते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ३११ -३२०
सज्जनांचे संरक्षण करून व दुर्जनांचे निर्दालन करून राजाचे शुद्धीकरण होत असते. जसें द्विजाचे यज्ञामुळें होत असते. ३११
जो राजा स्वतःचे भले साधू इच्छितो त्यांने नेहमी अर्जदाराचे, लहानांचे, वृद्धांचे, आजारी लोकांचे विशेष लक्ष देऊन संरक्षण केले पाहिजे. नाहीतर त्याला त्याच्या विरोधकांस तोंड द्यावे लागेल. ३१२
जो शक्तीमान माणूस (राजा) अडचणीत असलेल्या व म्हणून वेदनामय जीवन जगत असलेल्यांना त्यांच्या टीकेवर न रागावता उलट मदत करतो, तो स्वर्गात मोठ्या मानाने रहातो. परंतु, जो शक्तीच्या घमेंडीत त्यांच्यावर राग काढून त्यांना त्रास देतो, शिक्षा करतो तो अखेरीस नरकात खितपत पडतो. ३१३
जर एकादा चोर राजाकडे धावत आला आणि त्यांने चोरी केल्याचे कबूल केले व म्हणाला, राजा, मी चोरी केली आहे, मला शिक्षा करा. ३१४
तो चोर त्याच्या खांद्यावर दांडुका अथवा लोखंडी भाला घेऊन असेल, ३१५
अशारितीने राजाला भेटणार्या चोरास राजा सजा करेल अथला क्षमा करेल, तो चोर पापमुक्त झाला असें समजावे. पण जर राजाने त्या चोराला सजा नाही केली तर तो राजा त्या चोराचा भागीदार ठरतो व त्या पापाचा धनी होईल. ३१६
ब्राह्मणाची हत्या करणार्याच्या पापाचे धनी होतात जे त्या खुन्या बरोबर जेवतात. व्यभिचारी स्त्रीच्या पापाचा वाटेकरी होतो तिचा नवरा. विद्यार्थ्याच्या पापाचा धनी होतो त्याचा शिक्षक. चोराच्या पापाचा धनी होतो राजा, जे त्यांना माफ करतात. ३१७
ज्या गुन्हेगारास राजा त्याच्या गुन्ह्यासाठी सजा केली व ती सजा त्या गुन्हेगारांनी भोगली असा गुन्हेगार त्याच्या मरणानंतर स्वर्गात जातो. जसें कांहीं त्यांने मोठे कार्य केले आहे. ३१८
जर कोणी विहीरीचा दोर (पाणी काढण्यासाठी) पळवला अथवा त्याचे मडके चोरले तर त्याला एक मासा दंड राजा करील. त्याशिवाय त्याला त्याची भरपाई करावी लागेल. ३१९
जो धान्याने भरलेले दहा कुंभ चोरेल त्याला शारिरीक शिक्षा होईल. इतर प्रकारच्या गुन्ह्यात त्याला दहापट दंड होईल. त्याशिवाय चोरलेल्या वस्तुची भरपाई करावी लागेल. ३२०

क्रमशः चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी