शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

हिंदू कोण – ५७

मागील भागातून पुढे –
१४. मनांची माहिती –
७०. अध्यात्म साधनेत आपल्याला आपल्या मनाबद्दल विशेष माहिती करून घ्यावी लागेल. आपण आधी पाहिले आहे किं, देह, जीव, लिंगदेह व आत्माराम अशा चार घटकांनी आपण बनलो आहोत. त्यातील देह जीवाबरोबर असतो. उरलेल्या पैकी जीव व लिंगदेह ह्याना मन असते आणि आत्म्यास बुद्धि असते. मन म्हणजे विचार करण्याची क्षमता. म्हणजे आपल्यामध्ये दोन मने असतात. ह्या दोन मनांचे नियमन करणे ह्यालाच माणसाची अध्यात्म साधना असे म्हणता येईल. जीवाचे मन देहाच्या चार गरजांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यात असलेल्या उपजत बुद्धीने विचार करीत असते. त्यासाठी साधारणपणे त्याचे विचार हितकारक असतात. परंतु, त्यात जेव्हां लिंगदेहाचे मन हस्तक्षेप करू लागते तेव्हां गडबड होऊ लागते. सामान्य माणसाच्या जीवनातील बेचैनी ह्या जुगलबंदीशी निगडीत असते. अशा परिस्थितीत आत्म्याची बुद्धि हस्तक्षेप करून जीवाच्या मनांस ताकद देऊन त्याची क्षमता सुधारू शकते. आत्म्याची बुद्धि जीव व लिंगदेह ह्यांच्या मनांच्या कामाचे नियमन करण्यासाठी असते. लिंगदेहाचे मन त्यात साठवलेल्या पूर्व जन्माचा अनुभव वापरून त्यानुसार सुचवत असते. आत्म्याच्या बुद्धीला त्याचा सारासार विवेक करून त्यानुसार काय करावे ते ठरवावयाचे असते. जीवाचे मन देहाच्या गरजेप्रमाणे तेवढेच काम देहा कडून करण्याचे सुचवत असते, त्या उलट लिंगदेहाचे मन पूर्वजन्मांच्या वासनांनी प्रेरीत होऊन कांहीं जास्त करून घेण्याचा आग्रह करीत असते. येथे ही जुगलबंदी चालू रहात असते. खरा साधक तो, जो ह्या दोन मनांचे संतुलन योग्य रीत्या करुन आपली अध्यात्म साधना यशस्वी करतो. सामान्य माणूस (म्हणजे त्याचा आत्मा) मात्र बर्याच वेळा लिंगदेहाच्या आग्रहास बळी पडून जीवावर नको त्या गोष्टी करण्यासाठी दबाव आणतो असें दिसते. आणि असें झाले किं, असा माणूस त्यात अडकून जातो. बर्याच प्रयत्नानंतर आत्मा जीवाची बाजू कशी घ्यावयाची व लिंगदेहाच्या मनांस कसें आवरावयाचे ते शिकतो. ते करीत असतांना लिंगदेहाकडून कांहीं उपयुक्त सुचनासुद्धा तो स्वीकारत असतो. बुद्धि म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता. तिचा वापर करून तो आत्मा हे सर्व साध्य करीत असतो. जीव व लिंगदेह ह्याची दोन मनं व आत्म्याची बुद्धि ह्यातील विचारांची आंदोलने कशी नियंत्रित करावयाची हे हिंदूंच्या योगशास्त्रात आपण शिकतो. वासनांचे दमन करावयाचे कीं, त्यांबद्दलची उदासिनता वाढवावयाची हे बुद्धि ठरवत असते. मनांतील विचार व बुद्धिचे विचार ह्यात फरक असतो. मनाचे विचार जास्त करून भावनांवर आधारित असतात म्हणून तर्कविसंगत असतात. त्या उलट बुद्धिचे विचार तर्कावर आधारित असतात. सामान्य माणूस व साधक ह्यांतील फरक असा किं, सामान्य माणूस जास्त करून भावनाविवशतेंने प्रेरीत होतो त्या उलट साधक सातत्यांने तर्कांने प्रेरीत होत असतो. भावना व तर्क ह्यांचे संतुलन साधकाला साधावयाचे असते. हा विषय मोठा असून ह्या लेखाच्या आवाक्या बाहेरचा आहे म्हणून ह्या विषयावरील अधिक माहिती तंत्रांतील योगशास्त्राच्या ग्रंथांत असते ती पहावी. ह्या लेखात आपण फक्त प्रत्येक मुद्याचा परिचय करून घेणार आहोत.
क्रमशः पुढे चालू
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ३०१ -३१०
अशारितीने सर्व हल्ल्या बद्दलचे व मारामारीचे गुन्हे व त्याच्या शिक्षा पाहिल्या. आता मी सांगतो, चोरीच्या गुन्ह्याबद्दलचे नियम काय आहेत. ३०१
राजाने सर्व प्रकारच्या चोरांवर शिक्षा देऊन आपली ख्याती वाढवावी कारण, त्यामुळें त्याचे नांव सर्वत्र पसरते व त्या राजाचा विकास होण्यास मदत होते. कारण, जेथे चोर्या होत नाहीत ते राज्य समृद्ध होते. ३०२
जो राजा त्याच्या प्रजेच्या मालमत्तेची राखण करतो तो यज्ञ केल्याप्रमाणे मोठा होतो कारण, प्रजेचे संरक्षण हा एक प्रकारचा यज्ञच आहे. ३०३
जो राजा प्रजेच्या मालमत्तेचे संरक्षण करतो तो त्यामुळें प्रजेच्या अध्यात्मिक सामर्थ्याचा सहावा भाग प्राप्त करतो आणि जर त्याने त्याचे संरक्षण नाही केले तर प्रजेच्या पापाचा सहावा भाग त्याला मिळतो व त्याचे नुकसान होते. ३०४
प्रजेतील लोक वेद वाचनामुळें, यज्ञ केल्यामुळें, दानं केल्यामुळें, गुरू, देव ह्यांची पुजा केल्यामुळें, असें जे पुण्य मिळवत असतात, त्याचा सहावा भाग राजाला मिळतो जर तो प्रजेचे चोरांपासून संरक्षण करील. ३०५
जो राजा पवित्र नियमांप्रमाणे चांगल्यांचे संरक्षण करतो व वाईटांना शिक्षा करतो तो दररोज यज्ञ केल्यासारखे असून त्याची दक्षिणा त्यास एक लक्ष वेळा मिळते ३०६
जो राजा त्याचे कार्य करत नाही परंतु, कर गोळा करतो, अनेक प्रकारे प्रजेकडून पैसे काढतो, जमल्यास निरपराध लोकांना दंड करतो तो राजा मृत्यूनंतर नरकात जातो. ३०७
जो राजा दिलेली आश्र्वासने पाळत नाही परंतु, उत्पन्नाचा सहावा भाग बळजबरीने घेतो तो राजा प्रजेच्या सर्व पापाचा धनी होईल. ३०८
जो राजा पवित्र नियमांचे पालन करीत नाही व नास्तीक आहे, तसेंच अत्याचारी आहे. आपल्या अधिकाराचा गैर फायदा घेतो, प्रजेचे कुकर्म्यांपासून संरक्षण करत नाही. तो मृत्यूनंतर सर्वात खालच्या कुंभ नरकात जातो.
गुन्हेगारांचे नियंत्रण तीन प्रकारे करता येईल. कैदेत टाकून, बहिष्कृत करून व शारिरीक शिक्षा करून. ३१०
क्रमशः चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा