बुधवार, २१ मार्च, २०१८

हिंदू कोण – ४९

१०. आहारा नंतर विहाराबद्दलचे मार्गदर्शन -

६५. विहार म्हणजे शरीराचे विविध व्यवहार जे मनुष्य त्याचे जीवन जगतांना करीत असतो. त्याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला माणसाच्या शरीराबद्दलची माहिती जी योगशास्त्रात दिली आहे ती पहावी लागेल. हिंदू योगशास्त्रात असे समजतात किं, माणूस चार घटकांचा बनला आहे. त्यात देह, जीव, आत्मा लिंगदेह असे ते आहेत. देह पांच ज्ञानेंद्रिये, पांच भोगेंद्रिये मन असा बनलेला आहे, त्या बद्दल जास्त लिहीण्याची आवश्यकता वाटत नाही. जीव हि देहाची चेतना आहे मन ही जीवाची अभिव्यक्ति असतें. ज्याला हल्ली आपण जनुकद्रव्य अथवा डिएने (DNA) असे म्हणतो त्यातील कार्यकारी व्यवस्था म्हणजे जीव. जीव देहाबरोबर जन्मतो देहाबरोबर मरतो. हल्लीच्या काळात संगणक तंत्रात हार्डवेअर सॉफ्टवेअर असे दोन भाग असतात त्याप्रमाणे देह हार्डवेअर असते जीव सॉफ्टवेअर असते.
देहाच्या ज्या मुलभूत अशा चार गरजा आहेत त्यांचे व्यवस्थापन जीव पहात असतो. ह्या चार गरजा अशा, पोषण, संरक्षण, प्रजनन विश्राम आहेत. तिसरा घटक अतिमहत्वाचा तो म्हणजे आत्माराम म्हणजे आपण स्वतः आणि चौथा आहे लिंगदेह. लिंगदेह म्हणजे आत्म्याच्या असंख्य पूर्वजन्मांत जे कांहीं घडले त्याचा लेखाजोखा. त्याला लिंगदेह असें म्हणण्याचे कारण, त्याला लिंग म्हणजे, पुःलिंग अथवा स्त्रीलिंग असते त्याप्रमाणे त्या आत्म्याच्या देहास ते लिंग प्रदान होत असते. म्हणजे, पुःलिंग असल्यास तो आत्मा पुरुष देह धारण करतो स्त्रीलिंग असल्यास तो आत्मा स्त्रीचा देह धारण करतो. आत्म्याला स्वतःचे लिंग नसते. अशारितीने माणसाचे लिंग ठरत असते. गर्भधारणा झाल्यानंतर कांहीं काळानंतर हृदयाची धडकन सुरु होते. साधारणपणे त्याच सुमारास आत्मा त्याच्या बरोबर असणार्या लिंगदेहासह त्या गर्भात प्रवेश करतो. तेव्हांच त्या देहाचे लिंग निश्र्चित होत असते. आपण ह्यात फार खोल जाता फक्त विहारापुरता ह्यां चारांचा विचार करणार आहोत कारण हा विषय फार गहन आहे ह्या लेखाच्या आवाक्या बाहेरचा आहे. तरीसुद्धा कांहीं माहिती पहावीच लागते, ती दिली आहे.
देहाच्या चार मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जे कांहीं जीव करतो ते सर्व, विहार ह्या प्रकारात येते.
हिंदूंच्या निरनिराळ्या विचारानुसार येथे मर्यादा तत्त्वाचा उल्लेख करावा लागेल. प्रभु रामचंद्राचा उल्लेख मर्यादा पुरुषोत्तम असा केला आहे हे सर्व जाणतात. म्हणजे विहार माणसांने मर्यादा तत्त्वानुसार करावयाचा असतो. ही मर्यादा त्याने ओलांडली कां त्याचे नुकसान होऊ लागते.

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २२१ -२३४
प्रजादक्ष राजा ह्या दंडाच्या नियमांनुसार राज्यात सर्वत्र सर्व जातींच्या लोकांत अंमल करील. म्हणजे कोणताही बेजबाबदारपणे काम करणार नाही. २२१
जर कोणी माणूस व्यवहार केल्यावर तो व्यवहार तोडूं इच्छित असेल तर ते तो दहा दिवसाच्या आत करू शकतो. त्यानंतर तो व्यवहार त्याला बंधनकारक ठरतो. २२२
जर तो व्यवहार त्या संबंधित सगळ्या लोकांनी तो तोडला तर त्या सगळ्यांना राजा शहाण्णव पन्ना दंड करील. २२३
जर सदोष कन्या तिचे दोष लपवून कोणाला लग्नाला देईल तर त्याला राजा शहाण्णव पन्ना दंड लावील. २२४
तसेंच जर कोणी माणूस एकाद्या स्त्रीस म्हणाला किं, "तू कुमारिका नाहीस", तर ते त्याला सिद्ध करावे लागते नाहीतर राजा त्याला शंभर पन्ना दंड लावील. २२५
वेदातील वैवाहिक रचना फक्त खर्या कुमारिकांना वापरावयाची असते. इतर स्त्रीयांनी त्यांचे कौमार्य विवाहीत नसूनही ढळले आहे, त्यांना कोणत्याही धार्मिक विधींत भाग घेता येणार नाही. २२६
वेदांतील वैवाहीक रचना ह्याचा पुरावा समजावयाचा असतो. कीं, ती मुलगी कुमारिका आहे. जी एकाद्याची लग्नाची बायको होऊ शकते. जाणकार समजून आहेत कीं, प्रत्यक्ष लग्नविधी पूर्ण होण्यास पवित्र अग्नी कुंडा भोवती सप्तपदीची आवश्यकता असते. २२७
जर कोणाला पूर्ण झालेल्या व्यवहाराबाबत असमाधान असेल तर राजा त्याला सत्याचा मार्ग (जाऊ द्या, झाले ते झालं, असें सांगेल) समजावून देईल व शांत करील. २२८
खर्या नियमांनुसार जे आहे ते मी आता सांगतो, अशा गोष्टीं बद्दल कीं, जेव्हां जनावराचा मालक व गुराखी ह्यांत मतभेद होईल. २२९
दिवसाच्या काळात जनावरांची जबाबदारी गुराख्यावर असते, रात्रीची मालकावर असते, जर ती जनावरं गोठ्यात गुराख्यानी आणून सोडली असतील तर, नाहीतर रात्रीची जबाबदारीसुद्धा त्या गुराख्याचीत असेल. २३०
जर गुराख्याचे वेतन दुधाचे असेल तर तो दहातील सर्वोत्तम गाईंचे दुध काढून घेऊ शकतो. असें वेतन असेल जेव्हां दुसरे वेतन नसेल,२३१
जनावर हरवल्यास, जखमा झाल्यास, किडीने खाल्ल्यास, कुत्र्याने चावा घेतल्यास, त्याची भरपाई गुराखी मालकाला करील. कारण, ह्या गोष्टी न होण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. २३२
परंतु, जर चोरी होण्या बद्दलची आगाऊ सुचना त्यांने मालकांस दिली असून तेथे मालकांनी दुर्लक्ष केले तर अथवा आरडा ओीड करूनही मालक मदतीला आला नसेल तर तो गुराखी निर्दोष ठरतो. २३३
जर जनावर मेले तर गुराखी त्या जनावराचा कान, चामडी, शेपुट, आंचळ, पित्ताशय असें देऊन जनावराची ओळख देईल. २३४

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा