मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

हिंदू कोण – ४७

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
६४. हल्ली हिंदू बर्याच कारणांने उपवास करतात. त्यात अनेक वार येतात व कांहीं तिथी येतात. आयुर्वेदात तसेंच इतर अधिकृत साहित्यातून (योगशास्त्र, वैदिक मार्गदर्शन, मनुस्मृती वगैरे) असें उपवास करण्यास सांगितलेले नाही मग आजचे हिंदू असें उपवास कां करतात? असा प्रश्र्न उत्पन्न होतो. त्याचे कारण पहावे लागेल.
हिंदू साधारणपणे पुरोहितांच्या सल्ल्याने आपली धार्मिक कामे करीत असतात. त्याचा असा विश्र्वास असतो किं, भटजी त्याला योग्यतोच सल्ला देत आहे. परंतु, वस्तुतः भटजी त्याच्या स्वताच्या सोयीचा सल्ला देत असतो. हे सर्व उपवास विनाकारण असतात. आयुर्वेदांत आरोग्यासाठी अधून मधून पोटाला आराम देण्यासाठी उपवास करण्याचा सल्ला दिला आहे पण आज जे अनेक वारांचे शाकाहार, तिथींना उपवास करण्यास भटजी लोक सांगतात त्याला कोठेही आधार नाही. मुख्य म्हणजे, हिंदूंचे सर्व देव मांसाहारी असतांना त्यांचा नैवेद्य शाकाहारी कां? ह्या प्रश्र्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही. तरीसुद्धा ह्याला ब्राह्मणांचा सल्ला हेंच कारण आहे. कांहीं लोक शाकाहार केला म्हणजे धर्माचे पालन केले असे उगाचच समजतात तत्त्वतः आहाराचा धर्मपालनाशी कांहीही संबंध नसतो. हिंदूधर्म पालनाचा संबंध फक्त पाप-पुण्य व्यवस्थापनाशीच असतो बाकीच्या गोष्टी ऐच्छीक असतात. ह्या निरर्थक उपासतापासाचे एकमेव कारण ब्राह्मणधर्म हा जैनधर्माचे अनुकरण करीत असतो व भाबड्या अज्ञानी हिंदूंनासुद्धा ते सर्व करावयास भाग पाडत असतो. उदाहरणार्थ, श्रावण महिन्यातील सर्व उपासतापास जैनांच्या पर्युषण काळाची नक्कल असते. आता आपण पहावयाचे आहे किं, वेदकाळांत गोमांसाहार करणारे हे ब्राह्मण आज शाकाहारी कां झाले?
ब्राह्मणांत शाकाहाराची सुरुवात शंकराचार्याच्या काळी झाली. त्या मागील इतिहास पहावा लागेल. तो असा, आदि शंकर समस्त भारतात अद्वैत विचाराचा प्रचार करतांना अनेक इतर विद्वानांना वादासाठी बोलवत असत. वादात जर तो विद्वान पराजित झाला तर शंकर त्याला जीवंत जाळत (ह्याला "अग्निकाष्ठ भक्षण करणे", असं म्हणत) असे. अशारितीने अनेक बुद्ध धर्मिय, जैन धर्मिय विद्वानांचा नाश करून उन्मत्त झालेल्या आदि शंकराचार्यानी गुजरात मधील मंडण मिश्र नांवाच्या जैन विद्वानास वादासाठी आव्हान दिले. वादाची जागा मंडण मिश्राचे घर ठरले. वाद आठ दिवस चालला व अखेरीस मंडण मिश्र हरला. आता त्याला जाळण्यासाठी शंकराचे अनुयायी पुढे सरसावले. त्यावेळी घरातून मंडण मिश्राच्या अर्धांगिनीनी आवाज दिला किं, शंकराने फक्त अर्धा मंडण मिश्र हरवलेला आहे, अजून अर्धा मंडण मिश्र, अर्थात् त्याची पत्नी हरलेली नाही. हे ऐकून शंकारांने तिचे आव्हान स्वीकारले. त्या वादाच्या अटी अशा ठरल्या किं, जर शंकर हरला तर तो व त्याचे अनुयायी जैन धर्म स्वीकारतील व जैनांचे प्रभुत्व व शाकाहार स्वीकारतील व मांसाहाराचा संपूर्ण त्याग करतील व इतर हिंदू जे त्याचे ऐकतात त्यानांसुद्धा शाकाहार करावयास लावतील. दुसरी अट अशी किं, वादाचा विषय मंडण मिश्राची पत्नी निवडेल. तिसरी अट अशी किं, वादांत शंकर एकटे भाग घेतील व त्यांना त्यांचा कोणीही सहकारी मदत करणार नाही. चौथी अट अशी कीं, आधीच्या फेरीत जो सरशी करील तोंच पुढच्या फेरीचा प्रश्र्न विचारेल. ह्या सर्व अटी शंकराने मान्य केल्या कारण त्याचा आत्मविश्र्वास त्याला सांगत होता कीं, तो कधीच हरू शकत नाही, वादास सुरुवात होणार होती. शंकराला आत्मविश्र्वास होता किं इतर वेळेप्रमाणे ह्यातसुद्धा तो त्या गृहीणींस सहजपणे हरवेल. आता वाद अद्वैतापुरता मर्यादीत राहीला नव्हता हे शंकराच्या लक्षात आले नव्हते. त्याचा अहंकार एवढा वाढला होता किं, आतापर्यंत एवढे रथी महारथी विद्वान मी हरवले त्यापुढे ही गृहीणी काय टिकणार, अशा उन्मादात तो राहीला होता. त्यातच तो मस्त झाला होता. अशा परिस्थितीत वादांस सुरुवात झाली.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २०-२१
जेव्हां अनेक साक्षीदारांच्या समक्ष एकदी गोष्ट (जंगम, हलवता येण्यासारखी) खरेदी होते तेव्हां तो व्यवहार वैध समजला जातो. २०१
जर मुळ विक्रेता हजर करणे शक्य नसेल तर खरीददार निर्दोष ठरेल व राजा त्याला सोडून देईल. परंतु, मुळ मालक ज्याची वस्तु हरवली त्याला खरीददाराकडून ती परत दिली जाईल. २०२
एक चिज दुसरीत मिसळून विकू नये. वाईट गोष्ट सांगली सांगून विकू नये. वजनात मापात खोटेपणा करू नये. खोटे दावे करून वस्तु विकू नये. २०३
जर एक मुलगी दाखवून दुसरी बोहल्यावर उभी केली तर मनु सांगतो, त्या दोनही मुली नवरदेवाला द्याव्या लागतील. २०४
जर वधूचे सगळे गुणदोष प्रामाणिकपणे सांगून ते लग्न केले तर तो रास्त व वैध व्यवहार होतो. २०५
जर मुख्य पुरोहित यज्ञ मध्येच सोडून गेला तर त्यांने जेवढे कार्य केले तेवढ्याचा पैसा त्याला इतर पुरोहित देण्यास बांधलेले आहेत. २०६
परंतु, जर यज्ञाची दक्षिणा आगोदरच दिली गेली असेल तर त्याच्या शिवाय इतरा पुरोहितांना तो यज्ञ पुरा करावा लागेल. २०७
जेव्हां एकाद्या यज्ञाच्या अनेक अंगांचे वेगळे दर दक्षिणेचे ठरले असतील तर जो ज्या भागाचे काम करील त्याला त्या कामाचे पैसे मिळतील हे योग्य कां, सगळ्या यज्ञाची एकंदर दक्षिणा एकत्र करून त्याची समान वाटणी करळें योग्य? २०८ टीपः मनुस्मृतीत हा प्रश्र्न विचारलेला आहे व त्याचे उत्तर पुढे दिले आहे.
अर्ध्वर्यु पुरोहित रथाचा मालक होईल, ब्राह्मण जो अग्नी तयार करील तो घोडा घेईल, होत्री पुरोहित सुद्धा घोडा घेईल, आणि उद्गत्री, गाडी घेईल जो सोम आणण्यासाठी वापरला गेला होता. २०९
सोळा पुरोहितांपैकीं, चारजण जे अर्धा हिस्सा घेण्याचे अधिकारी आहेत ते दक्षिणा पैशाच्या स्वरुपात घोतील, त्यानंतरचे चारजण उरलेल्या रकमेचा चौथा भाग घेतील, त्यानंतरचे चारजण त्याचा चौथा हिस्सा घेतील. शेवटी उरलेले पुरोहित उरलेली दक्षिणा वाटून घेतील. २१०
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा