गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

हिंदू कोण – ४६

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
मनुस्मृतीच्या तिसर्या भागात वरील पांच खाटीकखान्यांचा उल्लेख आहे. त्यांना खाटीकखाने असें म्हणण्याचे कारण, त्यात शाक पदार्थ खाण्यासाठी तयार केले जातात. ह्याचा अर्थ मनुस्मृतीच्या काळी शाक पदार्थांत जीव असतो हे माहीत होते असें मानावे लागेल. खाटीकखाने म्हणण्याचे कारण, ह्या साधनांचा वापर करून स्वयंपाक करतांना शाक पदार्थांतील जीव वेदनामय रीत्या मारला जातो. जर विनावेदना हे जीव मारले गेले तर त्यांना खाटीकखाने असें म्हंटले नसते. मांसाहारात प्राणी विनावेदना मारता येतात तसें शाकाहारात करता येत नाही म्हणून, शाकाहार जास्त हिंसक ठरतो. असें असले तरी शाकाहाराचा विशेष प्रचार केला जाते कारण माणसांचे ह्या विषयातील अज्ञान असेंच म्हणावे लागेल.
निसर्गाने माणसास उभय भक्षी केले आहे त्याचा अर्थ माणसांने मांसाहार करणे निसर्ग नियमानुसार उचीत आहे. उलट तसें न खाणे हेंच आक्षेपार्ह असते. निसर्गांने म्हणजेंच परमेश्र्वराने घालून दिलेले पवित्र नियम पाळणे माणसाचे कर्तव्य असते. शक्यतर हत्या विनावेदना करावयाची असली तरी, हिंसा हत्या अशा अयोग्य सबबी पुढे करून मांसाहारास विरोध करणे हे निसर्गाच्या आदेशाची पायमल्ली करण्यासारखे ठरते. जैन विचार अशारितीने निसर्गाच्या आदेशांविरूद्ध असतात म्हणून ते पापकारक ठरतात. जैन म्हणतात मी मारतो, हेंचमुळी गीतेच्या आदेशानुसार चुकीचे आहे. जैन विचार कसा दिशाभूल करणारा आहे ते दुसर्या भागात आपण पहाणार आहोत. म्हणून जैन विचाराची दखल कोणीही हिंदूंनी घेता कामा नये. ह्याला अपवाद असा आहे किं, जर एकाद्याला मांसाहार आवडत नसेल तर तो त्यांने करू नये कारण, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार जे खाद्य आवडत नाही ते खाऊ नये.
६३. हिंदूंना खाण्याबाबत पांच नियम आयुर्वेदात सांगितले आहेत ते असें,
  • जे आवडते ते खावे,
  • जे पचेल ते खावे,
  • पोटापुरते खावे,
  • जे आरोग्यास घातक ते खाऊ नये.
  • दुसर्यास खाण्याचा आग्रह करू नये.

ह्यांत मांसाहार, शाकाहार वगैरे बद्दल कांहींही उल्लेख नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यातील पहिले चार नियम स्वतः पाळावयाचे असतात. पांचवा नियम सामाजिक शिष्टाचाराबाबतचा आहे. त्यांत पहिल्या नियमावर दुसरा व त्यावर तिसरा महत्वाचा असतो आणि त्यावर चौथा महत्वाचा असतो. ते असें, आवडणारा पदार्थ पचत नसेल तर तो खाऊ नये, जर आवडणारा पदार्थ पचतो तरी पोटापेक्षा जास्त खावयाचा नाही. तसेंच जर तो आरोग्यास घातक असेल तर खावयाचा नाही. उदाहरणार्थ, साखर आवडते म्हणून गोड खावेसे वाटले तरी जर मधुमेह असेंल तर गोड खावयाचे नाही. अशा प्रकारे खाण्याबद्दल हिंदूंना आयुर्वेदाच्या नियमानुसार मार्गदर्शन दिले आहे. त्याचे पालन हिंदूंनी करावे.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -२०
जर कांहीं निश्र्चित ठरविणे शक्य नसेल तर ठेव दिल्याची ग्वाही करणारा व ती कधी दिलीच नव्हती असें सांगणारा अशा दोघांना त्या मुल्याच्या एवढी रक्कम दंड करावा. १९१
उघडी ठेव न परत करणारा व बंद ठेव नाकारणारा अशा दोघांना राजा (न्यायाधीश) त्या मुल्या इतका दंड करील. १९२
जो माणूस दुसर्याची गोष्ट खोटे बोलून हडप करतो त्याला व त्याच्या साथीदारांस शारिरीक शिक्षा (फटके मारणे, चटके देणे, काट्यावरून चालावयास लावणे इत्यादी) द्यावी. १९३
अनेक साक्षीदारांच्या साक्षीने एकादी गोष्ट दिली आहे तर त्याचे वर्णन सर्व साक्षीदार एकच करतील, त्याबद्दल जर कोणी खोटे सांगितले तर त्याला दंड होईल. १९४
परंतु, जर एकादी गोष्ट खाजगीत दिली असेल तर ती परत करतांनासुद्धा खाजगीतच केली पाहिजे. १९५
अशारितीने, राजा विशेष दक्षता न बाळगता अशा मैत्रीपूर्ण ठेवींच्या बाबतचे निर्णय घेईल. १९६
दुसर्याची मालमत्ता मालकाच्या परवानगी शिवाय विकणार्या इसमास, न्यायाधीश चोर ठरविल व जरी तो स्वतःला निर्दोष मानत असला तरी, त्याला इतर खटल्यात साक्षीदार म्हणून मान्यता देणार नाही. १९७
असा चोर जर मालकाच्या जवळचा नातेवाईक असेल तर त्याला राजा दंड करील परंतु, जर तो मालकाशी संबंधित नसेल तर त्याला चोर ठरवून त्याप्रकारची शिक्षा करेल. १९८
न्यायाच्या रिवाजानुसार जर एकाद्याने मालकाच्या परवानगी शिवाय त्याची चीजवस्तु दुसर्यास भेट केली अथवा विकली तर तो व्यवहार अवैध ठरून त्याप्रमाणे त्यावरील कारवाई होईल. १९९
जेथे कब्जा सिद्ध होतो परंतु, मालकी हक्क सिद्ध होत नाही, आणि जेथे मालकी हक्क सिद्ध होतो पण कब्जा नाही तर अशा परिस्थितीत मालकी हक्क जास्त महत्वाचा ठरेल, हा ठरलेला नियम आहे. २००
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा