सोमवार, १ जानेवारी, २०१८

हिंदू कोण – ४३

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
ह्या ब्रह्माच्या निर्मात्याने, प्रजापतीने हे सर्व जे उत्पन्न केले आहे ते ब्रह्मतत्त्वाच्या उपजिविकेसाठी, असें मनु सांगतो. म्हणजे सर्व चर व अचर गोष्टी ह्या ब्रह्मतत्त्वाच्या उपजिविकेसाठीच असतात. २८ : , टीपः संत पीटरच्या साक्षात्कारात हेंच सांगितले आहे.
अचर गोष्टी (वनस्पती) चरांच्या उदरनिर्वाहासाठी असतात. दांत नसलेले दांत असलेल्यांचे भक्ष असतात. ज्यांना हात नाहीत ते हात असलेल्यांचे भक्ष असतात. जे भित्रे असतात ते धीटांचे भक्ष असतात. २९ : ५ टीपः पहिल्या कारणांनी शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी खाणार व दुसर्या कारणांनी मनुष्य (हात असलेला) सर्व प्राण्यांना खाऊ शकतो.
खाणारा रोज त्याच्या भक्षास खातो त्यामुळे त्यांस पाप लागत नाही. कारण, विश्र्व निर्मात्यानी खाणारा व खाल्ले जाणारे असें दोनही त्या प्रकारेच उत्पन्न केले आहेत. थोडक्यात असे म्हणता येईल किं, जीव जीवांवर जगतो. ही निसर्गाची रचना आहे तेव्हां त्यांत दोष काढण्याचा प्रयास करणे उचीत नसते. उलट ह्या व्यवस्थेला विरोध करणे म्हणजे निसर्गाला विरोध करण्यासारखे, म्हणून पाप ठरते. ३० :
यज्ञात मांसाहार करणे उचीत आहे. हे देवांनी दिलेल्या नियमांनुसार आहे. त्याशिवाय (खाण्याव्यतिरिक्त) उगाचच प्राणी मारणे हे राक्षसी कृत्य व म्हणून पाप ठरते. ते निक्षून टाळावे. ३१ :
जेव्हां पितरांच्या, देवांच्या नांवाने ब्राह्मण मांस खातो तेव्हां ते पाप ठरत नाही. मग ते मांस त्यांने विकत आणले कां कोणी त्याला भेट दिले हे सर्व महत्वाचे नसते. ३२ :
द्विज जो हे पवित्र नियम जाणतो त्यानी कधीही ह्या नियमांविरुद्ध जाऊ नये. जर त्यांने असें केले तर, त्याच्या मृत्यू नंतर त्याचे शत्रू त्याला खातील. ३३ :
फायद्यासाठी हरीण मारणारा व नियमबाह्य मांस खाणारा (चोरलेले) हे दोघेही सारखेच ठरतात. ३४ :
त्याच प्रमाणे जो द्विज श्राद्धाच्या जेवणांत वाढलेले मांस खाण्यास विरोध करतो तो त्याच्या मृत्यूनंतर एकवीस वेळा बळीचा प्राणी म्हणून जन्म घेतो. ३५ :
द्विजांनी मंत्राने पुनीत केलेले मांस खावे. तसेंच सनातन रिवाजानुसार तो वेदमंत्रानी पुनीत केलेले मांस खाऊ शकतो. ३६ : ५ टीपः मंत्रानी पुनीत करणे म्हणजे, ते मांस प्रथम परमेश्र्वराला अर्पण करावयाचा मंत्र बोलावयाचा असतो. हिंदूंनी सर्वच खाद्य पदार्थ खाण्या आधी ते मनानें परमेश्र्वराला प्रथम अर्पून मग खावे असा संकेत आहे.
स्वयंभूने स्वतः हे सर्व प्राणी यज्ञासाठी निर्माण केले आहेत. यज्ञ विधी सर्व जगाच्या भल्यासाठी असतात म्हणून यज्ञात बळी देणे व एरव्ही मारणे ह्यात फरक असतो. ३९ : ५ टीपः देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जात.
वनस्पती, गुरं, पक्षी व इतर प्राणी यज्ञात बळी दिले जातात त्यामुळे त्यांचा उद्धार होत असतो. ४० :
पितरांच्या सन्मानार्थ व श्राद्धात मध-लोणी यज्ञात देतात तेव्हां जनावरांचा बळी देणे हे शिष्टसंमत आहे. असें मनु जाहीर करतो. ४१ :
वेदांतील आदेशांनुसार बळी देणारा व त्यांने मारलेला प्राणी असें दोघेही स्वर्गात जातात. ४२ :
घरात जणूकाय पांच खाटीकखाने आहेत असें म्हणावेसे वाटते. कारण, त्यात शेगडी, पाटावरवंटा, झाडू, खलबत्ता व पाण्याचे पातेले येतात, ह्यांत शाक पदार्थांना शिजवण्यासाठी तयार केले जाते. मनुस्मृती ६८-
ह्या पांच पापकरक वस्तूंमुळे जे पाप दररोज होते त्याचे निवारण करण्यासाठी पांच विधी सांगितल्या आहेत. त्या विघि त्या गृहस्थाने करावयाच्या असतात. मनुस्मृती ६९-
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -
ठेवी देणार्यास त्याची ठेव त्याने मांगितल्यावर ठेव घेणार्याने दिली पाहिजे, नाही दिली तर न्यायालयात ठेव घेणार्यावर देणार्याच्या गैरहजेरीत खटला चालवता येईल. १८१
साक्षीदाराच्या जबान्या जर न्यायाधीशाचे समाधान झाले तर ठेव घेणार्याचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी न्यायाधीश त्याच्याकडे सोने ठेव म्हणून अशारितीने (गुप्तचराच्या मदतीने) ठेवेल असें कीं, ठेवीदाराला संशय येणार नाही. कालांतराने जर त्याने ते सोने योग्य प्रकारे परत केले तर त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध होईल. १८२
अशारितीने त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध झाल्यावर त्यावरील खटला काढून टाकला जाईल. १८३
परंतु जर ते सोने त्या गुप्तचरास त्यांने परत केले नाही व बहाणेबाजी केली तर त्याच्या वरील आरोप सिद्ध होईल व त्याला सर्व ठेव व हे सोने दंडा सकट परत करावे लागते. हा ठरलेला नियम आहे. १८४
बंद लखोट्यात असलेली ठेव ठेवीदाराच्या नातेवाईकांस परतफेड म्हणून देऊ नये. कारण, जर तो नातेवाईक मेला तर ती ठेव बुडाली असें समजले जाते, पण जर तो जीवंत असेल तर मात्र ती त्याच्या कडून मिळवता येईल. १८५
जर ठेवी घेणारा स्वतःच ती ठेव, ठेवीगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या एका नातेवाईकांस देईल तर त्याला त्याबद्दल राजा ठेवीदाराच्या इतर नातेवाईकांचे गार्हाणे ऐकून त्रास देणार नाही. १८६
जर राजाला त्या व्यवहारात कांहीं काळेबेरे आहे असा संशय (ठेव घेणार्याच्या वागणूकीतून) आला तर तो राजा गोड बोलून सामंजस्याने ती ठेव त्या नातेवाईका कढून काडून घेईल. १८७
हे झाले उघड झालेल्या ठेवी बद्दल, जर त्यांने तो बंद लखोटा उघडून त्यातील कांही काढले असेल तरच बंद लखोट्यात असलेल्या ठेवी बाबत ठेव घेणार्यास दोष लागेल. १८८
ठेव चोरीला गेली असेल, पाण्यात वाहून गेली असेल, आगीत भस्मसात झाली असेल, तर ठेव घेणारी निर्दोष समजला जाईल, व त्याला त्याची भरपाई करण्याची गरज नाही. पण जर त्यांने ती ठेव वापरली असेल (असें होण्या आधी) तर मात्र त्याला भरपाई करावी लागेल. १८९
ठेव घेणार्याने माझी ठेव खाल्ली असा आरोप ठेवीदारावर केला व त्याने कधी ठेव ठेवलीच नव्हती असें ठेव घेणार्याने सांगितले तर खरेखोटे ठरविण्यासाठी वेदात दिलेली शपथ त्यांना घेण्यास सांगून त्या प्रमाणे निर्णय घ्यावा. १९०

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा