सोमवार, १२ जून, २०१७

हिंदू कोण – २६

मागील पोस्टवरूनपुढे चालू –
३९. आता आपल्याला खरोखर काय अशुद्ध असू शकते ते पहावे लागेल. प्रत्येक माणसाच्या मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, शरीरात आतड्यात मळ असतो. असे समजतात किं, तो निदान दोनशे ग्राम असतो. तसेंच निदान शंभर मि.ली. मुत्र असते. माणूस कितीही शुचिर्भुत बाहेरून झाला तरी तो त्याच्या शरीरातील ही अशुद्ध द्रव्ये कधीच काढू शकत नाही. म्हणजे तत्वतः कोणतीही व्यक्ति अंतर्यामी खर्या अर्थाने शरीराने शुद्ध असू शकत नाही. केवळ पितांबर वा असे कोणतेही पवित्र वस्त्र नेसल्याने कोणी शुद्ध ठरत नाही. थोडक्यात एवढेच म्हणता येईल किं, एकवीसाव्या शतकात अशा प्रकारच्या शुद्ध अशुद्धतेच्या कालबाह्य विचारांना उत्तेजन देणे बंद केले पाहिजे. उत्क्रांत होणार्या हिंदू परंपरांत अशा मागांसलेपणाला उत्तेजन देता येणार नाही. उपलब्ध ज्ञानानुसार आपण सर्व नेहमीच अशुद्ध असतो तसेंच रहाणार. शुद्धतेच्या गप्पा मारणारा तुमचा पुरोहित सुद्धा सदैव अशुद्धतच असतो! अशा शुद्धतेच्या गोष्टी करणार्यांनी हे लक्षात घ्यावयास पाहिजे किं, ते देवाची पुजा करण्यास बसतात ते हा सर्व मळ मुत्र पोटात असतांना बसतात! पुरुष पुरोहिताबाबत आणखीन कांहीं दोष दिसतात त्याबद्दल नंतर पहावयाचे आहे.
४०. दुसर्या अशुद्धतेच्या गोष्टी आहेत, सुयेर सुतक बाबतच्या. सुयेर हे घरात बाळ जन्मले की पाळतात. सुतक घरातील इसम मृत झाला तर पाळतात. ह्या दोनही प्रसंगी अशुद्धता पाळण्याचे कारण काय? त्यावर निदान मला तरी कोठेही पटण्यासारखे कारण आढळलेले नाही. बाळाला जन्म देण्यामुळे ती स्त्री अशुद्ध कशी होते? बाळंतीणीला बाळाबरोबर रहाणे आवश्यक असतें पण तेवढ्यासाठी तिला अशुद्ध ठरवणे कोणत्या तर्कांत बसतें? कोणी मेला म्हणून घरातील माणसे अशुद्ध कशी होतात? अशा प्रश्र्नांना ब्राह्मणांकडे स्पष्टीकरण नाही. अशुद्धतेच्या ह्या कल्पना अतिरंजित स्वरुपाच्या आहेत. हिंदूंनी मासिकपाळी, सुयेर सुतक ही अशुद्धतेची कारणे निखालस चुकीची असल्यामुळे पाळणे बंद करावीत. मनुस्मृतीत कोठेही ह्या सुयेर सुतकचा उल्लेख नाही. म्हणजे ह्या दोन गोष्टी पवित्र नियमांचा भाग नाहीत. विशेष असें किं, श्राद्ध विधीवर मात्र बरेच पवित्र नियम दिलेले आहेत. मग सुयेर सुतक बद्दल असें कांहीं नियम कां नाहीत? ह्याचा अर्थ, हे दोन रिवाज नंतर कोणीतरी तयार केले आहेत. जीवदानी देवीची पुजा करतांना ह्या अशुद्धता पाळण्याचे संकेत आहेत ते इतर सर्व देवांसाठी लागू केले पाहिजेत. बाळ जन्मले म्हणून त्याकाळात उलट, मुद्दाम देवींची (सटवी, संतोषीमाता, लेकुरवाळी वगैरे) पुजा करून त्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यात त्या बाळाची आई सामील झाली पाहिजे. तसेंच घरातील माणूस देवाघरी गेले म्हणून त्या काळात मुद्दाम पितरांचे श्रांद्ध करावयावे त्यांना मृतात्म्यास शांति देण्याची प्रार्थना करावयांस पाहिजे. मृतात्म्यास मदत व्हावी म्हणून त्याकाळात कुलदैवताची सुद्धा पुजा घरच्या देवघरात नित्य करावयांस पाहिजे. दुर्दैवाने केवळ अज्ञानामुळे आज ते होत नाही.

क्रमशः पुढील पोस्टमध्ये चालू राहील –
मनुस्मृती सातवा भाग सुरू १९१ २१०
तो त्याच्या सैन्याच्या विविध व्युहरचना करून लढाई खेळेल. त्यांत एकेकटे लढणारे असतील, संघटीतपणे लढणारे असतील, सुईसारखी रचना असेल, पसरून चहोबाजूने हल्ला करतील असें अनेक प्रकार असतील.१९१
सपाट रणक्षेत्रात तो रथातून वा घोड्यावरून लढेल. पाण्याच्या क्षेत्रात होडीतून व हत्तीवरून लढेल, वनश्रीने भरलेल्या रणभूमीवर तो धनुष्यबाण, भाले, तलवारी वगैरे अस्त्रे वापरून लढेल. १९२
कुरुक्षेत्रातील, मत्स्य देशातील, पंकल, आणि सुरसेना येथील व इतरही लोक जे उंच व हलके आहेत ते पुढून चढाई करतील. १९३
त्याने सैन्याची जमवाजमव केल्यानंतर तो त्यातील माणसांचे नीट बारकाईने निरीक्षण करील. त्यानंतर त्यांना भाषण देऊन युद्धाची आवश्यकता समजावून देईल. त्यांचा जोर आणि नैतिक बळ वाढवण्याचा तो प्रयत्न करील. १९४
एकदा कां त्याने शत्रूला त्याच्याच नगरात अडकवले किं, तो त्याच्या प्रजेला हैराण करण्याचे सत्र अजमावेल. त्यामध्ये त्यांची खाद्याची रसद, पाणी, खाणे, गवत त्यांना मिळणार नाही असें करेल. १९५
तो चढाई करणारा राजा शत्रुपक्षाचा पाण्याचा साठा करणार्या टाक्या मोडून टाकील. तटबंदी व खड्डे नष्ट करील. ज्यांच्या आधाराने शत्रू प्रतिहल्ला करण्याची शक्यता असते. तसेंच रात्रीसुद्धा चढाई चालूच ठेवील. १९६
राजा त्याच्या हेरांच्या मदतीने शत्रूपक्षातील फूटू शकणारे हेरून त्यांना फोडण्याचे प्रयत्न चालू ठेवतील. त्याचे गुप्तचर शत्रूपक्षाच्या सर्व हालचालींची इत्तंभूत माहिती राजाला देत रहातील. त्यानंतर, शुभ काळ पाहून तो अंतिम विजयासाठी जिंकण्याची लढाई सुरू करील. १९७
हे सर्व जरी करणे राजाला शक्य असले (दंड कारवाई) तरी शक्यतर तो साम (गोड बोलून), दाम (पैसे चारून), किंवा भेद (तोडफोडीचे तंत्र वापरून) निती वापरणे चालू ठेवावे. कारण, ह्या तीन कमी हानिकारक व जीवहानि टाळणारे म्हणजे अहिंसक आहेत. १९८
ह्याचे कारण जेव्हां दोन राजपुत्र एकमेकांशी लढतात तेव्हां जीत कोणाची होईल ते सांगता येणारे नसते. म्हणून नेहमी युद्धाचा मार्ग शेवटचा असावा. १९९
हे तीन (साम, दाम व भेद) तो वापरीत असतांना दुसर्या बाजूस तो चढाईचीसुद्धा तयारी तितक्याच उत्साहात करीत असला पाहिजे. २००
एकदा तो लढाईत जिंकला किं, मग तो प्रथम त्याच्या आराध्य देवाचे आभार मानील. त्यानंतर ब्राह्मणांची पुजा करून त्यांचे आशिर्वाद घेईल. त्यानंतर तो माफीचे आदेश देईल. त्यानंतर तो जिंकलेल्या प्रदेशातील जनतेला अभय दान करून आपलेसे करील. २०१
जिंकलेल्या प्रदेशातील प्रजेची मनोभावनेचा आदर करण्यासाठी हरलेल्या राजाचाच एक जवळचा नातेवाईक आपला मांडलिक म्हणून बसवेल. त्याच्या कडून आपल्या अटी मान्य करून घेईल. २०२
जिंणारा राजा जिंकलेल्या राज्याचे नियम व अटी निश्र्चित करील आणि त्यानंतर नेमलेल्या मांडलिक राजाचा व त्याच्या आमात्यांचा यथोचित सत्कार करील. २०३
जप्त केलेली मालमत्ता जी उपयुक्त आहे तिची विल्हेवाट (वाटणी करण्यात) लावण्यात आनंद आहे तर तसें करावे. हे योग्य वेळ पाहून करावे. २०४
ह्या जगांत जे कांहीं माणसांच्या जीवनांत होत असते ते दोन गोष्टींवर विसंबून असते. त्यातील एक आहे नशीब व दुसरे आहे माणसाचे कर्तुत्व. नशीब अगम आहे त्याचा मार्ग समजणे दुरापास्त असते तर कर्तुत्व माणसाच्या हातातील असते म्हणून कोणतेही नियोजन करतांना आपल्या कर्तुत्वाचाच अंदाज घेऊन नियोजन करावे. २०५
जर जिंकलेला राजा आपल्या विवेकाने, मिळणार्या लुटीवर (सोने, स्त्रीया, मित्र, जमीन इत्यादी) खूष असेल तर, हरलेल्या राजाशी शांततेचा करार करून परत फिरेल. २०६
पाठून हल्ला करण्याची शक्यता असलेला शेजारी राजा व त्याचे मित्र ह्यांची व्यवस्था केल्यावरच जिंकणार्या राजांने आपल्या यशाची फळं चाखण्याचा मानस ठेवावा. त्यात हरलेल्या राजाला मित्रत्वाच्या नात्यांने (मोठेपणा घेऊन) सामील करून घ्यावे. जरी तो मनांत शत्रुत्व धरून असल्याचे माहित असले तरी. २०७
राजाची खरी ताकद त्याच्याकडे किती सोने व मुलूख आहे त्यावर जितकी अवलंबून असते त्यापेक्षा जास्त असते, त्यांचे किती सच्चे मित्र राजे व मित्र राज्ये आहेत. कारम, तो मित्र राजा आज जरी कमजोर असला तरी तो उद्या कधी बलाढ्य होईल ते सांगता येत नाही. २०८
कमजोर राजा किर्तिमान होतो जेव्हां त्याची प्रजा संतुष्ट असते. तो त्याच्या प्रजेच्या क्षेमकुशलतेसाठी सतत प्रयत्नशिल असेल. कारण, अशा राजाला इतर राजेसुद्धा त्याच्या ह्या गुणवत्तेमुळे मानतात. २०९
शहाणा राजा त्या सर्वांना आपला प्रतिस्पर्धी मानतो जे शहाणे, उच्च कुलीन, शूर, चतूर आहेत, स्वतंत्र बुद्धीने काम करतात, रुबाबदार आहेत आणि आपल्या मताशी प्रामाणिक आहेत. २१०
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -

पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा