मंगळवार, ३० मे, २०१७

हिंदू कोण – २५

मागील पोस्ट वरून चालू -
. हिंदूंतील शुद्धते बाबतच्या कल्पना
३८. शुद्धता दोन प्रकारच्या आहेत, एक देहाची दुसरी मनाची. देवाची पुजा करतांना देहाची शुद्धता बाळगण्याची आवश्यकता विशेष महत्वाची समजली जाते. सामान्य शुद्धता केवळ हात, पाय तोंड धुवून साध्या होते परंतु, अभ्यंग स्नान देहाची पूर्ण शुद्धता करते. ह्यात ब्राह्मणांच्या शुद्धतेच्या कल्पना विशेष काटेकोर किंवा फाजिल असतात. मनाची शुद्धता बहुधा गृहीत धरूनच वागतात. इतर हिंदूंत साधारण देहाची बाहेरून शुद्धता असली किं, ते त्यांना पुरेसे असते. स्त्रीच्या शुद्धतेचा बराच बागुलबोवा ब्राह्मणांत केला जातो. स्त्रीस मासिकपाळी असते त्या काळात तिने देवांना स्पर्श करू नये असें संकेत आहेत. त्याबद्दल थोडे पाहावे लागेल. एवढ्याने पुरुषवर्गाचे समाधान झाले नाही म्हणून किं काय विधवेला कायम अपवित्र ठरवण्या इतपत ब्राह्मणांची मजल गेली. जर विधूर अपवित्र होत नाही तर विधवा कशी अपवित्र ठरते? उत्क्रांत हिंदूनी विधवेला अपवित्र मानू नये. विधवेने देवांची स्वताच्या हातांनी पुजा करावी कारण त्यात कांहींही गैर नाही. तसेंच सर्व धार्मिक विधींत सहभाग करावा. लोकांनी तिला त्यात उत्तेजन द्यावे.
हल्ली, स्त्रीने तिच्या मासिकपाळीच्या काळात देवाची पुजा करावी का नाही ह्या प्रश्र्नावर बरीच चर्चा होत आहे. त्यांत तिने पुजा करू नये असे आग्रहाने बोलणारे आहेत इतर कांहीं त्यावर कारणमिमांसा पहाण्याचा आग्रह धरतात. त्याशिवाय सुयेर सुतक असें आणखीन दोन प्रकार शुद्धतेच्या दृष्टीने विचारात घ्यावे लागतील. मासिकपाळीच्या काळात स्त्री अशुद्ध असते असे ब्राह्मण धर्मातील लोक समजतात. म्हणून तिने देवांची पुजा करू नये असे सांगितले जाते. मनुस्मृतीत मात्र ह्यांवर कांहींही मार्गदर्शन केलेले नाही. दुसरे कारण असें सांगतात किं, त्या काळात तिला विश्रांतीची सक्त गरज असतें म्हणून तिने पुजा इतर गृहकृत्यात भाग घ्यावयाचा नसतो. विश्रांतीचे जर कारण असेल तर त्यासाठी धर्मांत नियम करण्याची काय गरज? म्हणजे, हे दुसरे कारण स्त्रीला अशा गोष्टींपासून दूर ठेवण्याचे असू शकत नाही. निदान धर्मशास्त्रात तरी विश्रांतीसाठी स्त्रीस अशुद्ध ठरवणे कसे योग्य असेल ते पटत नाही. तिला विश्रांतीची गरज असते असें कारण सांगणे शक्य असतांना अशुद्धतेचा खोटा हेत्वारोप करण्याचे काय कारण? ह्याचा अर्थ, स्त्रीस पुजाविधी करण्यास विरोध करण्यामागील उद्देश ती अशुद्ध असते हे ठरवणे हांच असू शकतो. मासिकपाळीच्या काळात ती अशुद्ध कशी ठरते ते पहावे लागेल. ह्या सर्व गोष्टी फार प्राचीन (अज्ञान) काळात ठरवल्या गेल्या होत्या, आज विज्ञान काळात त्या घेऊन बसणे कितपत शहाणपणाचे होईल हा प्रश्र्न आहे. मासिकपाळीत जे द्रव्य स्त्रीच्या शरीरातून स्त्रवते ते खरोखरच अशुद्ध द्रव्य असतें का? तत्त्वतः ते द्रव्य अतिशय शुद्ध स्वरुपाचे असते. जर त्या काळात गर्भधारणा झाली असती तर त्या द्रव्यातून एक नवीन जीव पोसला गेला असता, असें द्रव्य अशुद्ध कसे असेल? उद्या माणसाचे रक्त अशुद्ध आहे असे जर म्हंटले तर ते कितपत मान्य केले जाईल? बर्याच लोकांना माहीत नसेल पण हे सत्य आहे किं, कोंबडीचे अंडे हे त्या कोंबडीची पाळी असते. कोणत्याही प्राण्याचे असे द्रव्य अशुद्ध कसे असेल? कोंबडीचे अंडे एक उत्तम अन्न असते. म्हणजे स्त्रीचा मासिकपाळीचा काळ अशुद्धतेचा निश्र्चित नसतो. केवळ स्त्रीस अपमानीत, जलील करणे, तिचा अभिमान दुखवणे एवढाच पुरुषी उद्देश असावा असे वाटते. ह्या मागे पुरुषाचा अहंकार हेंच कारण असू शकते. पुरुषी समाज व्यवस्थेचा हा परिणाम आहे असें म्हणावे लागेल. सनातनी (म्हणजे मागांसलेल्या) ब्राह्मणांत अजूनही हा स्त्रीचा अवमान करणे चालूच आहे. हे सनातनी म्हणजे मागांसलेले ब्राह्मण स्वतः हे करतात इतर हिंदूंनासुद्धा तसे करण्याचा आग्रह करीत असतात. एकवीसाव्या शतकातील उत्क्रांत होणार्या हिंदूंने ते मान्य करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ऋतुच्या काळात खर्या हिंदू बायकांनी देवाची पुजा स्वताच्या हाताने करण्यास हरकत नसावी. उत्क्रांत होणारा हिंदू धर्म म्हणजे जो सनातन, मागासलेला नाही असा हिंदू धर्म असे समजावे.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती सातवा भाग सुरू १७१ १९०
जेव्हां तो पहातो कीं, त्याचे सैन्य पूर्ण तयारीत आहे, तोव्हां तो शेजारील राष्ट्रावर स्वारी करील. १७१
जेव्हां त्याची बाजू नाजूक असते तेव्हां तो शेजारशी मित्रत्वाचे धोरण स्वीकारेल आणि शांतता पाळेल १७२
जेव्हां तो पहातो प्रतिस्पर्धी सर्व प्रकारे बलाढ्य आहे तेव्हां तो त्याचे सैन्य दुभागून काम करतो. १७३
परंतु, जर त्याने हेरले कीं, प्रतिस्पर्धी सहजपणे आपल्यावर स्वारी करून येऊ शकतो तर तो त्वरीतपणे दुसर्या मित्र राजाच्या मदतीची हाक मारतो. १७४
जो राजपुत्र आपल्या प्रजेतील घातकी लोक व शत्रू ह्यांना दाबून टाकतो त्याची गुरूची करावी तशी पुजा करावी. १७५
एवढे करूनही जर वाईट लोकांच्या कारवाया चालूच राहील्या तर त्यांने त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारावे. १७६
चार युक्त्या वापरून शहाणा राजा सर्व मित्र, शेजारी, तटस्थ अशा सर्वांपेक्षा वरचढ रहाण्याचा प्रयत्न करील. १७७
तो राजा सर्व परिस्थितींचा मग त्या ताज्या असतील अथवा जुन्या वा भविष्यातील होणार्या असतील, त्यांच्या चांगल्या व वाईट बाजूंचा नेमका अंदाज घेईल. १७८
जो राजा आपल्या चुका समजून त्या सुधारण्याचे धोरण अवलंबून त्वरित काम करतो तो कधीही दुसर्या राजाकडून हरत नाही. १७९
राजकीय चातुर्याचे गमक अशात असतें किं, तो असा काम करील किं, कोणत्याही दोस्तास, तटस्थास, आणि शत्रूस अशी संधी देणार नाही कीं, ते त्याला धोका करू शकतील. १८०
जेव्बां राजा एकाद्या आगाऊ शत्रूवर स्वारी करतो तेव्हां तो सावधपणे त्याच्या राजधानीवर चाल करतो. त्यासाठी कोणती पावले त्यांनी उचलावीत ते पहा. १८१
राजा त्याच्या सैन्याच्या परिस्थितीनुसार मार्गशिर्षात अथवा फाल्गून महिन्यात वा चैत्रात स्वारी करील. १८२
एरवीसुद्धा तो स्वारी करूं शकतो जर शत्रूची परिस्थिती त्यावेळी बिघडलेली असेल. म्हणजे त्याप्रमाणे त्याला विजयाची खात्री असेल. १८३
स्वताचे राज्य सुस्थितीत असेल अशी खात्री करून स्वारीची सर्व तयारी करून आणि हेरांचे जाळे त्या राज्यात पसरवून मग तो स्वारीस निघेल. १८४
तिन तर्हेने रस्ते मोकळे करून सर्व सैन्याची सहा दले सज्ज करून तो राजा निवांतपणे स्वारीला निघेल. १८५
गुप्तपणे शत्रूला मिळालेला मित्र व सोडून गेलेले सैनिक जे पुन्हा सामील होण्यासाठी येतात त्यांच्या पासून सर्वात जास्त धोका संभवतो हे त्या राजांने लक्षात ठेवले पाहिजे. १८६
तो त्याच्या सैन्याची व्युह रचना करून तसा निघेल. त्यांत दंडासारखी, पाचरीसारखी, हिर्यासारखी, मकर रचना (ह्यात दोन त्रिकोण त्यांचे टोक जोडल्या अवस्थेत असते) सरळ रचना, गरूड रचना अशा बर्याच रचना ज्या युद्ध शास्त्रात दिल्या आहेत त्या वापराव्यात. १८७
ज्या दिशेने हल्ला होईल असें वाटते त्या धिशेला तो कूच करील. त्यांने मात्र सैन्याच्या आतल्या कमळ रचनेत संरक्षित रहावयाचे असते. १८८
तो त्याच्या सैन्यातील अधिकार्यांना त्यांच्या हाताखालील अधिकार्याला, ठिकठिकाणी नेमून तो स्वतः जेथे सर्वात जास्त धोका संभवतो तेथे राहील. १८९
तो त्यांच्या निष्ठावंत योद्ध्याच्या तुकड्या सर्व बाजूस पसरून सज्ज ठेविल, ते हल्ला करण्यास तसेंच हल्ला झेलण्यास पटाईत असतील. १९०

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा