शनिवार, २० मे, २०१७

हिंदू कोण – २४

हिंदू कोण – १८ (२४)
. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः पुढे चालू –
३६. इतर पुजांमध्ये देवळातील पुजा येते. हिंदूंनी स्वताच्या घरातील आराध्य दैवताची पुजा करणे नेहमी श्रेयस्कर असते. शक्यतर देवळात जाऊन पुजा करणे टाळावे. कारण, देऊळ कोणी उभारले, त्यातील दैवतांची स्थापना कोणी केली, प्रतिस्थापना करतांना कोणत्या अटी घालून दैवत बसवले, देवळातील मूर्तितील दैवत प्रतिस्थापित दैवत एकच आहे कां, तेथे कांहीं इतर पापकारक शक्तिंचा वास आहे कां, अशा अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून ज्या देवळाची पुरेशी माहिती नाही अशा देवळात जाऊन पुजा करणे श्रेयस्कर नसते. दुसर्याच्या घरातील देवसुद्धा पुजू नये. कांहीं हिंदूंना कोणत्याही देवळात जाऊन पुजा करण्याची हौस असते त्यामुळे कदाचित नुकसान होण्याची शक्यता असते. बर्याच देवळांत कांहीं वाईट शक्तींचा संचार असतो अशा देवळात (रस्यावरीत, झाडाखालील, स्मशानातील इत्यादि) जाऊन पुजा करण्याने त्या वाईट शक्तिंचा विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता असते. ज्या देवस्थानाची माहिती आहे खात्री आहे अशा देवस्थानी पुजा करण्यास हरकत नसते. एक गोष्ट सर्व हिंदूंनी चांगली लक्षात ठेवली पाहिजे किं, पुजा कोठे केली हे महत्वाचे नसते तर पुजा करणार्याची भक्ति किती थोर प्रामाणिक आहे हे महत्वाचे असते. घरातील देव आपणच बसवलेला असतो त्यामुळे त्या बद्दल विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते. घरातील देवाची प्रतिस्थापना करण्यासाठी ब्राह्मण पुरोहित बोलवू नये. कारण, अशा पुरोहिताची मनस्थिती कोणालाही माहीत नसते. गृहस्थ गृहिणी ह्यांनी मिळून ती प्रतिस्थापना साधेपणे (सात्विक) प्रामाणिक भक्तिने घरच्या घरापुरती अशी करावी म्हणजे ते देवघर जास्तीत जास्त शुद्ध स्वरुपात राहील. म्हणून प्रथम सांगितल्याप्रमाणे घरीच पुजा कराव्यात. कारण, दैवते सर्वत्र असतात, ती एका ठिकाणी बांधलेली नसतात. ती फक्त देवळात अथवा तीर्थक्षेत्रीच असतात असा समज करून घेणे अज्ञानाचे लक्षण आहे. हल्ली महाजालाचा (इंटरनेटचा) काळ आहे, ज्याप्रमाणे त्यातील सुचना सर्वत्र उपलब्ध असतात त्याप्रमाणेच दैवते सर्वत्र उपलब्ध असतात. संगणकाच्या मदतीने आपण महाजालातील सुचना जागृत करतो तसेंच भक्तिने माणूस दैवतांना जागृत करू शकत असतो. पिशाच्च पुजेबाबतचे नियम मात्र थोडे वेगळे असतात कारण ती सर्वत्र उपलब्ध नसतात. मानवी दैवतांची पुजा पिशाच्च पुजेसारखी असते.

३७. अघोर शास्त्राप्रमाणे मंत्रसिद्धीने कोणतेही दैवत कशातही सिद्ध करता येते, त्यामुळे गणपतीचे मंदिर आहे म्हणजे त्या मूर्तीत गणपतीचीच स्थापना झाली आहे असे समजणे चुकीचे ठरू शकते. इतिहासात अशी नोंद आहे किं, माधवराव पेशवे ज्या गणपतीच्या मूर्तिची पुजा नित्यनेमांने करीत होते त्यात एका राक्षसाची स्थापना ती मूर्ती देणार्या कानडी ब्राह्मणांनी केली होती म्हणून त्याचा अकाली मृत्यू झाला पेशवाई बुडाली. अनेक देवळांच्या बाबत असे होऊ शकते म्हणून सावधानतेसाठी घरातच जी काय पुजा करावयाची ती करावी. हिंदूंच्या देवळात ती पहाण्यासाठी फक्त जावे पण तेथील पुजा महत्वाची मानू नये. कांहीं हिंदूंना निरनिराळ्या देवळांत जाऊन पुजा करण्याचे जणू व्यसन असते, ते प्रसंगी नुकसारकारक ठरू शकते ह्याची जाणीव ठेवावी. फक्त तेथील दैवताला नमस्कार करून अभिवादन करावे, त्याच्याकडे कांहीं मागू नये. त्यापेक्षा जास्त कांहीं करू नये. कांहीं लोकांना हा माझा सल्ला रुचणार नाही परंतु, तो अनुभवांवर शास्त्रावर आधारीत आहे हे लक्षात घ्यावे. गजानन महाराजांनी एकदा सांगितले किं, जर भक्ति असेल तर घरातच हरद्वार, काशी, रामेश्र्वर सर्वकांहीं असते. हे आपणा सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती सातवा भाग सुरू – १५१ – १७०
दुपारी अथवा मध्यरात्री जेव्हां त्याला आराम मिळ्ल तेव्हां तो स्वतःशी राजकारभारा बाबत, करमणूकी बाबत आणि इतर गोष्टींबाबत विचारमंथन करील, प्रसंगी एकाद्या मंत्र्याबरोबर तो ते करील. १५१
त्याशिवाय स्वताच्या परिवाराबाबतचे निरिणय तो आपल्या पत्नीबरोबर करील. त्यांत मुलीचे लग्न, मुलाचे णिक्षण, संरक्षण अशा बाबी येतील. १५२
राजाने कोणकोणत्या गोष्टीवर विचार करावा त्या अशा, परदेशांत प्रतिनिधी पाठवणे, हातात घेतलेल्या मोहीमा, राणी महालातील व्यवहार, हेरांच्या नेमणूका व इतर कामं. १५३
आठ मंत्र्यांची कामे, पांच प्रकारचे हेर त्यांची कामे, परराज्याशी असलेले शत्रू संबंध अथवा मित्रत्व, राजमंडळातील लोकांचे व्यवहार, वागणे, अशा गोष्टींवर जास्त गांभिर्याने विचार केला पाहिजे. १५४
राजपुत्रांचे वागणे, शेजारी राज्यावरील स्वारी, तटस्थ शेजार्यांशी संबंध, शत्रूशी संबंध, अशा बाबींचा विशेष विचार करावयाचा असतो. १५५
राज्याच्या स्थिरतेसाठी चार गोष्टी पहावयाच्या असतात. इतर आठ बाबी आहेत, ज्यांचा राजकारणशास्त्रात अभ्यास केला जातो. १५६
मंत्री मंडळ, राजधानी, किल्ला, खजिना व सैन्य अशा पांच इतर आहेत, ह्यांचा विचार आधी सांगितलेल्या बारा गोष्टींचा विचार करतांना त्या संदर्भात करावा, म्हणजे, अशा एकंदर बाहत्तर गोष्टींचा विचार त्याला करावा लागतो. १५७
राजाचे परराष्ट्र धोरण असें असावे, शेजारी राष्ट्र शत्रू समजावे, त्याच्या शेजारचे आपला मित्र समजावे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र व शत्रूचा मित्र आपला शत्रू समजावे. १५८
अशा सर्व मित्र, शत्रू, त्यांचे मित्र व त्यांचे शत्रू ह्यांवर चार युक्त्या अर्थात् साम, दाम, दंड व भेद नितीने नियंत्रण ठेवावे. कधी एकट्याने तर कधी मित्राच्या मदतीने हे साधावयाचे असते. १५९
राजा सहा डावपेंचांचा अवलंब करील. ते असें, तह, युद्ध, घुसखोरी, तटस्थ, सैन्याची व्युहरचना, आणि जास्त बलाढ्य राजाची मदत घेणे. १६०
परिस्थिती पाहून तो ह्याचार डावपेंचांचा उपयोग करील व स्वताचे राज्य सुरक्षित करील. १६१
राजाला हे माहित असले पाहिजे किं, हे सर्व डावपेंच प्रत्येकी दोन प्रकारे अमलात आणता येतात. १६२
पहिल्या प्रकारात डावपेंच एकटा खेळतो व दुसर्या मध्ये दोघे, तिघे मिळून खेळतात त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते. १६३
युद्ध निरनिराळ्या कारणांनी होतात. मोसमी युद्ध, मोसमा बाहेरील युद्ध, एकट्याने खेळावयाचे युद्ध, मिळून खेळावयाचे युद्ध, सुडाने धडा देण्यासाठी (मित्राला त्रास दिला म्हणून), असें ते असू शकतात. १६४
दोन कारणांनी चढाई करावी लागते. एक जेव्हां अचानक आणिबाणीची परिस्थिती उत्पन्न होते तेव्हां व दुसरी समजून ठरवून नियोजन बद्ध (कट कारस्थान) एकट्याने अथवा दोस्त राष्ट्रांच्या मदतीने. १६५
दुसर्या राज्याचा ताबा सावकाशपणे शिरून घेणे अथवा आर्थिक दबावाने ताबा घेऊन राज्य जिंकणे, युद्ध न करतां मित्रराष्ट्राला मदत करण्याच्या बहाण्याने. १६६
एका बाजूने सैन्य बसवून ठेवून असा आभास करावा किं, खर्या चढाईची कल्पना शत्रूस येऊ नये आणि शत्रूचे लक्ष द्विधा झाल्यावर दुसरीकडून हल्ला करणे, ह्याला सैन्य व्युहरचना बसवणे असें म्हणतात. १६७
दोन कारणांनी राजा बलाढ्य राजाच्या आधाराला जातो, जेव्हां तो कमजोर झालेला असतो व जेव्हां तो त्या बलाढ्य राजाशी मित्रसंबंध प्रस्थापित करू इच्छितो. १६८
जर राजाला लक्षात आले किं, सध्या राज्याची परिस्थिती नाजूक आहे तेव्हां थोडे नमते घेणे शहाणपणाचे आहे तेव्हां तो तह करण्याचा डाव खेळेल. १६९
परंतु, जेव्हा तो समजतो कीं, राज्य व प्रजा मजबूत आहे तेव्हां तो तह मोडून युद्ध करण्याचा डाव सुरु करतो. १७०
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा