मंगळवार, ९ मे, २०१७

हिंदू कोण – २३

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
३५. सात्त्विक पुजा साधी असते त्याचा एक नमुना उदाहरण म्हणून आपण येथे पहाणार आहेत. सात्त्विक पुजा यजमानाने स्वतःच करावयाची असते. सात्त्विक पुजा करतांना कोणासही आमंत्रण देऊन बोलवायचे नसते. अशा पुजेत फक्त देवता तिचा भक्त एवढेच हजर असतात. शांतता पाळावयाची असते. आराध्य देवतेची मूर्ती अथवा तसबीर समोर ठेवून पुजेचा आरंभ होतो. भाविक मनातल्या मनात देवतेला येण्याचे आवाहन करतो. त्यावेळी तो (ती) मनातल्या मनातच देवतेची आळवणी करीत असतो. कांहींवेळ आळवणी झाल्यावर दैवत आले असें समजून तो पुढील विधी () सुरु करतो. सर्व स्तुती, कौतुक, इत्यादि आळवणीत येतात ते सर्व मनातल्या मनातच करावयाचे असते. कोणी पाहिलं तर त्याला कांहीं पुजा होत आहे ते समजणार सुद्धा नाही असे सर्व असते. त्यात फुलं, फळं, हार वाहणे हे सर्व तो (ती) त्या मुर्ति पुढे करतो. कांहींच नसेल तर निदान पाणी वाहणे आवश्यक समजले जाते. प्रसाद दिल्यानंतर तो (ती) शांतपणे () ध्यानस्थ राहून देवतेचे स्मरण करतो, हे स्मरण पुजेतील फारच महत्वाचे असते. देवतेच्या मुर्तिवर अथवा तसबीरीकडे त्राटक करणे सात्त्विक पुजेत महत्वाचे असते. पुजेसाठी जो समय लागतो त्यातील अर्ध्याहून जास्त समय अशा त्राटकांत दिला पाहिजे. सात्त्विक पुजा कोणालाही दिसणार नाही अशा बेतांने करावयाच्या असतात. जर राजसी अथवा तामस् पुजा सकाळी केली तर संध्याकाळ पर्यंत अथवा दुसर्या दिवशी सकाळ पर्यंत ती पुजा तशीच ठेवून नंतर सर्व आवरावयाचे असते. त्यासाठी पुरोहित विशेष विधीचे (उत्तर पुजा) आयोजन करतात. पण सात्त्विक पुजेत असे कांहीं करता त्या देवतेचा जप करीत आवरण्याचे काम करावे. सात्त्विक पुजा दहा ते पंधरा मिनीटात उरकणे चांगले पण जर त्राटक करण्याचे असेल तर त्यासाठी जो जास्तचा समय लागेल तो द्यावा. पूर्वी पुजाविधी संस्कृत भाषेतील ऋचा, साम, श्र्लोक अशांनी पुरोहित करत असत पण साधारण हिंदू संस्कृत भाषा जाणत नसल्यामुळे त्यांनी त्याच्या नेहमीच्या भाषेतच तो करावा. पुजाविधीतील मुख्य भाग असतो, भक्तिचा. जर खरी भक्ति असेल तर ती पुजा सिद्ध होतेच. हिंदू साधारणपणे पितर गण वर्गातील दैवते पुजेत आळवतात, ती सर्व समजूतदार असतात असे समजले जाते. जर भाविकाला देवतेची स्तुतीपर आळवणी जमत नसेल तर त्यांनी केवळ त्या देवतेच्या नांवाचा जप करीत पुजाविधी संपन्न केला तरी चालते. समजा गणपतीची पुजा करावयाची आहे पण मंत्र माहीत नाहीत तर "नमो गणपती", असा जप करीत पुजा करावी. आता आपण जी सात्त्विक पुजा पाहिली ती तुलनेने स्थुल स्वरुपाची होती. त्याशिवाय एक आणखीन पुजा सांगितली आहे. ती अतिसुक्ष्म स्वरुपाची असते. अतिसुक्ष्म पुजा अध्यात्म साधना करणारा मोक्षार्थी हिंदू करतो. त्यात सोऽहम् साधना, विपश्यना अशा काही येतात. सामान्य हिंदूसुद्धा ती करू शकतो. गौतमबुद्धाने ही सुक्ष्म साधना त्याच्या अनुयायांना प्रथम शिकवली असे समजले जाते. अतिसुक्ष्म पुजेसाठी दैवत असण्याची आवश्यकता नसते. कारण अशा अतिसुक्ष्म पुजेत आत्माराम म्हणजे आपल्यात असलेल्या परमेश्र्वराला (खुदा) स्मरण्याची विधी असते. वस्तुतः ही सर्वश्रेष्ठ पुजा पद्धती आहे. हिंदू कोण भाग , मध्ये हिंदूंच्या आध्यात्मसाधनेच्या भागात ह्या बद्दल विशेष सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. सुफी पंथातील साधकसुद्धा हि पद्धत वापरतात.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती सातवा भाग सुरू – १३६ – १५०
अशा ब्राह्मणाने त्या राजाचे राज्य आणि तो स्वतः राजा, ह्यांचे कल्याणार्थ मोठे काम करून राजाची सेवा करावी. १३६
राजा त्याच्या राज्यात रहाणार्या अतिसामान्य लोकांवर सुद्धा थोडा कर लावू शकतो कारण, ते त्याच्या राज्यात रहातात. १३७
यंत्रकार, कारागीर, शुद्र, जे मोलमजूरी करून रहातात त्यांनी एक दिवस राजासाठी काम करून तो कर भरावा. १३८
राजाने स्वताचे स्थान कर न लावून खराब करू नये. तसेंच जबरी कर लावून इतरांचे जीवन खराब करू नये. जर असें केले तर राज्य लवकर लयास जाईल. १३९
राज्याचा कारभार राजाने करड्या नजरेने व तितक्याच प्रेमळपणे करावयाचा असतो. असा राजा सर्वांना आवडतो. राजाने त्याच्याकडे येणार्या खर्या खोट्या तक्रारींची योग्य दखल घ्यावयाची असते. १४०
जेव्हां राजाला विश्रांतीची गरज भासेल तेव्हां त्याने जाण्याआधी उच्च कुलीन, अनुभवी, कार्यतत्पर, योग्य जाणकार, असा आमात्य त्याचे काम पहाण्यासाठी गादीवर तात्पुरता बसवावा. १४१
अशारितीने सर्व व्यवस्था करून तो राजा त्याच्या प्रजेचे पालन व संरक्षण मोठ्या हिकमतीने करील. १४२
ज्या राजाची प्रजा चोर, लुटारू लुटत आहेत व राजा व त्याचे कारभारी नुसते पहात आहेत अशा राज्याला मृत राज्य व त्या राजाला मृत राजा असें समजावे. १४३
क्षत्रियांची मुख्य जबाबदारी दुर्जनांपासून जनतेचे संरक्षण करण्याची असते. ते करणारा क्षत्रिय राजा कौतुकास पात्र असतो. १४४
भल्या पहाटे उठून स्वताचे शुद्धीविधी उरकून एकाग्र मनाने चिंतन करून होमात देवांना अर्ध्य देऊन (आराध्य देवतेची पुजा करून) ब्राह्मणांचा सत्कार करून तो आपल्या दरबारी प्रवेश करील. जेथे शुभ लक्षणे आहेत. १४५
दरबारात तो तेथे जमलेल्या प्रिय प्रजेशी हितगुज करीत फिरेल, सर्वांना अभिवादन करेल, त्यांचे म्हणणे ऐकून घेईल, त्यानंतर ती सभा संपेल. तो राजा आपत्या मंत्रीमंडळास भेटण्यास तयार होईल. तेथे तो राज्यकारभाराच्या इतर गोष्टींवर चर्चा करील. १४६
मंत्र्यांबरोबरची बैठक एकांत असलेल्या ठिकाणी होईल. मग ती जागा एकाद्या डोंगराचा उतार असेल, निवांत अरण्य असेल अथवा राजवाड्यातील गुप्त जागा असेल. १४७
ज्या राजाचे खलबत गुप्त असेल तो राजा सर्व जगावर राज्य करील जरी त्याचा खजिना लहान आहे. १४८
राजा प्रजेतील मूर्ख, अडाणी, अंध, बहिरे, फार वृद्ध, बायका, न्हावी, आजारी माणसें, बडबडे आणि अपंग ह्यांचे, गुप्त कामात ऐकणार नाही. १४९
कारण, असें लोक गुप्तता राखू शकत नाहीत असा अनुभव आहे. विशे, करून बायका कधीही गुप्तता पाळू शकत नाहीत. १५०
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा