सोमवार, १० एप्रिल, २०१७

हिंदू कोण – २०

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
रजोगुणी पुजेत स्थळ, वेळ (मुहूर्त) सामुग्री ह्यांचे महत्व असते. तीत मूर्तिपुढे आरास, मुर्तिभोवती सजावट अशी उत्तम प्रकारे सुंदर अशी दिमाखदार असते. सर्व समाजाला समजेल अशा रीतींने ती केली जात असते. अशी पुजा देवते बरोबर इतर म्हणजे समाज वगैरेना दिसावी असा उद्देश असतो. ती पुजा सामाजिक प्रतिष्ठा, मानमरातब, प्रसिद्धी अशा बर्याच इतर गोष्टींशी निगडीत असते. प्रसंगी देवतेपेक्षा ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. देवता निमित्तमात्र असते. पुजाविधी जास्त मोठा कर्मकांडाने गुतागुंतीचा असतो. अशा पुजेत भक्त (यजमान) त्याच्या बरोबर इतर लोकांनासुद्धा सामील करून घेत असतो. पुरोहिताकडून ती केली जाते त्यात त्यामुळे खर्च फार होत असतो. पुरोहितांना दक्षिणा मिळते त्यासाठी अशा रजोगुणी पुजांचे महत्व ब्राह्मणांनी वाढवले. अशा पुजा खाजगी स्वरुपाच्या असतात. रजोगुणी पुजा नेहमीच सकाम असतात. रजोगुणी लोक बहुधा परमेश्र्वर, पितर, देवता गण ह्यात कुलदैवते येतात अशांची पुजा करतात. समाज संवर्धनार्थ अशा पुजा उपयोगाच्या असतात.
तामसी पुजेत रजोगुणीची बहुतेक लक्षणे आढळतात, त्याशिवाय कर्मकांड जास्त भडक असते. आरत्या मंत्रोच्चारण ओरडून इतरांना विशेष लक्षात राहील असे असते. नांचणे, गांणे असे त्यात असल्याने अशी पुजा बिभत्स गोंधळ करणारी वाटते. त्यामुळे बर्याच वेळा अशा पुजा वाह्यात असल्याचा समज होत असतो. सार्वजनिक पुजा ह्या प्रकारात येतात. असा बराच फरक असला तरी त्या पुजा करणार्या भक्ताची भक्ती निसंशय असू शकते, फक्त अभिव्यक्तीत फरक असतो. तामसी लोक इतर दैवतांपेक्षा पिशाच्चांची पुजा करणे जास्त श्रेयस्कर समजतात. अघोर शास्त्रात सात्त्विक तामसी अशा दोन शाखा आहेत त्यातील तामसी शाखा ह्या प्रकारच्या पुजांबद्दल विशेष चर्चेत असतात. अघोर म्हंटलं किं, तामसी असा एक गैरसमज ब्राह्मणांनी पसरवला आहे. अघोर साधनेतील ख्यातनाम संत किनाराम सात्त्विक साघना करीत असतं. रजोगुणी तामसी पुजांमुळे दैवत सोडून बाकी सर्व संतुष्ट होऊ शकतात. इस्लाम धर्मात रजोगुणी तामसी पुजा करण्यास विरोध आहे. असे असले तरी ते मशिदीत नमाज करतात, तो एक सार्वजनिक पुजेचाच प्रकार ठरतो हा एक विरोधाभास आहे.

३३. पुजेत प्रसाद द्यावयाचा असतो. पुजेचा प्रसाद चाखून पाहू नये. शाकाहारी प्रसाद तसांच द्यावयाचा असतो. मांसाहारी प्रसाद देण्याची पद्धत थोडी वेगळी असते, त्यात मांस प्रथम मीठाच्या पाण्याने धुवावयाचे असते त्यामुळे त्यावरील दोष निघून जातात असे समजले जाते. खरेतर समुद्राच्या पाण्याने असे करावयाचा संकेत आहे पण ते नेहमीच शक्य नसते. म्हणून मीठाचे पाणी वापरावे लागते. समुद्राचे पाणी सर्व पाप धुऊन टाकण्यासाठी समर्थ असते म्हणून हिंदूंनी समुद्रात स्नान करावयाची पद्धत आहे. जमिनीचे किनारे समुद्र सतत धूत असतो असे समजले जाते किं, त्यामुळे जमिनीवरील पाप धुतले जात असते. अशारितीने शुद्ध झालेले मांस नंतर शिजवून प्रसाद तयार केला जावा. आधुनिक विज्ञानाप्रमाणे मीठाच्या पाण्यामुळे मांस जंतु विरहीत होत असते. पूर्वीच्या काळी मांसासाठी प्राणी यजमान (पुजा करणारा) स्वतः मारत असें त्याला बळी असें म्हणत असत. मनुस्मृतीत ह्याचा उल्लेख ठिकठीकाणी सांपडतो. मनुस्मृतीत ब्राह्मणांनी श्राद्धासाठी बळी म्हणून स्वतः गाय कापावी असें सांगितलेले आहे. पण हे शाक्तांच्या नियमांनुसार योग्य नसते कारण, प्राण्याची हत्या विनावेदना करावी लागते ते सामान्य माणसास शक्य नसते. सवेदना हत्या झाली तर ते मांस देवतेच्या प्रसादासाठी वापरता येत नाही. कारण, असे मांस राक्षस खातात असा समज आहे. अशारितीने (विनावेदना) हत्या करण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या खाटीकानेच ते काम करावयाचे असते. त्यामुळे खाटीक वर्ग तयार झाला. दुर्दैवाने हा खाटीक विनावेदना प्राणी मारत नाही. त्यासाठी त्याचे खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल. मांसाहारासाठी प्राण्याची हत्त्या करून मगच तो खाण्यासाठी घ्यावा असा संकेत आहे त्यापाठील कारण काय ते पहावे लागेल. त्यासाठी बुद्धाने एक उदाहरण सांगितले आहे ते येथे उपयोगी येईल, उदाहरण फळाचे होते, फळ प्रथम कच्चे असते ते सावकाशपणे पिकते त्या अवस्थेत ते असतांना खावयाचे असते, जर ते आणखीन पिकले तर ते नांसू लागण्याची शक्यता असते असें खराब होण्याच्या अवस्थेत गेलेले फळ खाणे आरोग्यास हानिकारक ठरते. त्याच प्रमाणें मृत प्राणी खराब होण्याच्या अवस्थेत ताबडतोब जात असतो तसें मांस खाणे आरोग्यास हानिकारक असते, म्हणून प्राणी मारूनच खावयाचा असतो. तसेंच मेलेला प्राणी कां मेला, कसा मेला, त्याला कांहीं रोग वगैरे होते कां? असे प्रश्र्न उत्पन्न होतात ते टाळण्यासाठी मृत प्राणी खाणे हिंदूंना वर्ज आहे. त्यासाठी त्यांनी प्राणी मारूनच खाल्ला पाहिजे.
मनुस्मृती सातवा भाग सुरू – ८१ – १००
राज्यात होणार्या विविध उद्योगांचे ज्ञन असलेले हुशार निरीक्षक नेमेल व ते त्या त्या उद्योगात असणार्या वैश्यांच्या (व्यापार्यांच्या) संपर्कात राहून काम पहातील. प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवतील. ८१
तो राजा गुरुकुलातून वेदाचे शिक्षण रितसरपणे पूर्ण करून आलेल्या विद्यार्थ्यींचा सत्कार करील. त्यांना दाने करील, त्यांना दिलेली दाने राजाची एक उत्तम गुंतवणूक, एक कायस स्वरुपाची ठेव असें राजाने समजावे. ८२
असें दान कोणीही चोर अथवा शत्रू काढून घेउ शकत नाही म्हणून ते कधीही नष्ट होणार नाही हे लक्षात घेऊन राजाने अशी दाने ब्राह्मणांना नेहमी करावयाची असतात. ८३
अग्निहोत्रात आहुति देण्यापेक्षा ब्राह्मणांना अर्ध्य दान केले व ते त्याच्या तोंडात गेले परंतु, बाहेर सांडले नाही तर ते उत्तम समजावे. ८४
ब्राह्मणेतरांस केलेले दान सामान्य दान म्हणून त्याची फळे सुद्धा सामान्य असतात. परंतु, ब्राह्मणाला दिलेले दान त्याच्यापेक्षा दुप्पट फळ देते, सुशिक्षित ब्राह्मणाला दिलेले लाखपटीने जास्त समजावे. वेद व वेदांगांत प्रवीण असलेल्या ब्राह्मणाला दान केल्यास मिणारे फळ अनंत काळ टिकणारे असें समजावे. ८५
दान करणार्याच्या श्रद्धेवर व घेणार्याच्या गुणांवर ते कसे व किती मोठे ठरते ते अवलंबून असते. त्या बरहुकूम त्यांचे फळ पुढील जन्मी प्राप्त होईल. ८६
राजा रार्याचे संरक्षण करतांना शत्रूला न घाबरता, मग तो कमजोर असो अथवा समसमान असो अथवा जास्त बलवान असो, युद्धाला तोंड द्यावयाचे असते, सच्चा क्षत्रियाची तीच ओळख आहे. ८७
युद्धात माघार न घेता राज्याच्या संरक्षणार्थ लढणे व ब्राह्मणांचे आशिर्वाद घेणे ह्यामुळे राजाला खरे सुख प्राप्त होते ८८
जे राजे न डगमगता एकमेकांस त्यांच्या प्रजेच्या संरक्षणासाठी मारतात ते स्वर्गात जातात. ८९
शत्रूशी लढतांना तो लपवलेल्या हत्याराने, काटेरी शस्त्रांने, विषारी व ज्याच्या पुढे आग आहे अशा हत्याराने लढणार नाही. ९०
तपस्वी ब्राह्मण, नपुसक, ज्यांने हात जोडले आहेत, जो पाठ दाखवून पळत आहे, जो शरण येऊन जमिनीवर बसला आहे अशांवर खरा क्षत्रिय शस्त्र उचलणार नाही. ९१
जो झोपलेला आहे, ज्याचे शस्त्र पडले आहे, जो नग्न आहे, जो स्त्र धारक म्हणजे क्षत्रिय नाही, जो युद्धात सहभागी नाही, जो आधीच दुसर्याशी लढत आहे, ९२
ज्याचे शस्त्र तुटले आहे, जो दुःखात आहे, जो जबर जखमी आहे, जो घाबरला आहे, अशांवर हत्यार उचलावयाचे नाही. तरीसुद्धा आपल्या कर्तव्याचे भान सुद्धा तो हरवणार नाही. नेमके हेरून प्रतिस्पर्धावर हल्ला करील. ९३
जो क्षत्रिय युद्धात मरतो अथवा पाठ दाखवून पळून जातो तो त्याच्या राजाच्या पापाचा वाटेकरी होतो. ९४
युद्धात मेलेल्यांचे त्यामुळे जे पुण्य झाले असेल ते त्याच्या राजालासुद्धा प्राप्त होते. पुढील जन्मात ते दोघांना उपयोगी येते. ९५ टीपः बर्याच वेळा कांहीं लढाया प्रजेच्या हितासाठी न लढता स्वार्थासाठी होतात त्या परिस्थितीत (९४, ९५) हे लक्षात ठेवावयाचे असते. खरा क्षत्रिय केवळ सार्वजनिक हितासाठी लढतो अशी अपेक्षा हे नियम तयार करतांना ठेवली आहे. मनुस्मृतीच्या अशा नियमानुसार हिंदू क्षत्रिय लढले त्यामुळे ते मुसलमानांशी हरले कारण, मुसलमान हे नियम मानत नव्हते.
युद्धात जी लूट एकट्याने जिंकल्यानंतर होते त्यातील रथ, घोडे, हत्ती, छत्र्या, पैसा, धान्य, गुरढोरं, बायका, आणि जे काही इतर विकण्याजोगे आणि फालतु आहे ते त्या लुटणार्याला मिळेल. ९६
वेदातील लिखाणाप्रमाणे, एकट्याने जिंकलेल्या चीजांताल कांहीं हिस्सा तो राजाला देईल. जी जीत अनेकांनी मिळून केली त्यातील लूट राजाची होईल. त्यातील कांही नंतर राजा त्यांना देईल. ९७
असा हा निर्दोष प्राथमिक नियम क्षत्रियांसाठी असून त्याचे उल्लंघन खरा (कुलीन) क्षत्रिय करणार नाही. ९८
राजांने अधिक मिळविण्याचा ध्यास ठेवावा, जे मिळविले त्याचे जतन करावे, जे जतन केले त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करावा, आणि जे वाढवले ते त्या राजाने त्याच्या पदरी असलेल्या लायक मंडळींना वाटले पाहिजे. ९९
हे चार नियम राजांने त्याची कारकीर्द यशस्वी होण्यासाठी न कंटाळता प्रामाणिकपणे पाळले पाहिजेत. हे लक्षात ठेवावे. १००
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा