बुधवार, १९ एप्रिल, २०१७

हिंदू कोण – २१

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
जैनांच्या प्रभावाखाली ब्राह्मण, आदि शंकराचार्याच्या काळात, आले त्यामुळे ते अर्ध शाकाहारी झाले. एवढेच नव्हे तर हिंदूंनासुद्धा निरनिराळ्या वारी शाकाहार करण्याचा आग्रह करू लागले. वस्तुतः एकाद्या वारी कां शाकाहार करावयाचा ह्याचे कोणतेही पटण्यासारखे कारण मात्र सापडत नाही. परंतु अशिक्षित हिंदू समाज ब्राह्मणांच्या चुकीच्या खोडसाळ मार्गदर्शनाखाली तसें विनातक्रार करीत असतो. आता परिस्थिती बदलत आहे. हिंदू प्रश्र्न विचारू लागले आहेत. त्यांना अशा अनेक निरर्थक चालींचा पुनर्विचार करावा लागणार आहे. वस्तुतः हिंदूंच्या सर्व देवता मांसाहारी आहेत म्हणूनच वेदांत शाक्तांच्या आणि अघोर तंत्रात सर्वत्र मांसाचाच प्रसाद देण्याचे संकेत आहेत. मनुस्मृतीत पितरांच्या नैवेद्यात शाकाहारी प्रसाद निकृष्ट ठरवलेला आहे मांस आणि मांसळीचे प्रसाद उत्तम म्हणून सांगितलेले आहेत. आपल्या येथील शाकाहारी, अर्ध शाकाहारी आहेत असे म्हणण्याचे कारण, ते सर्व लोक दुध त्यापासून बनणारे अनेक खाद्य पदार्थ त्याच्या आहारात ठेवतात. दुध हे गाईपासून तिच्या रक्तातून बनत असल्याने तो गोमांसाहार ठरतो. एक लिटर दूध हे दोनशे ग्राम गोमांसा इतके असते. म्हणजे त्यावरून हे शाकाहारी लोक दिवसाला किती गोमांस खातात ते समजू शकते. ह्यांत जैन धर्माचे लोकसुद्धा येतात. त्यामुळे शाकाहार हा केवळ मिथ्याचार ठरतो. मनुस्मृतीच्या आदेशानुसार ब्राह्मणांनी गोमांस खाणे शिष्टसंमत आहे असे असले तरी आज हे लोक शाकाहाराची भलामण करतांना दिसतात मांसाहाराचा द्वेष करतात. हे वागणे पवित्र नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे मनुस्मृतीच्या आदेशानुसार पाहिले तर आजचे ब्राह्मण शूद्र ठरतात. हिंदूंतील सनातन धर्माची व्याख्या अशी आहे किं, मनुस्मृतीच्या पवित्र नियमानुसार वागणारा तो सनातनी. हे पहातां आजचे ब्राह्मण सनातनी नाहीत, आणि वैदिकही राहीलेले नाहीत. तरी ते सनातन धर्माच्या वैदिकतेच्या गोष्टी करीत असतात. एकापरीने पाहिले तर असे दिसते किं, हे ब्राह्मण जैन धर्माचेच छुप्या रीतीने पालन करतात.

३४. पुजा करण्याच्या पद्धतीत जे मुख्य सुत्र असते ते आपण पहावयाचे आहे. पुजा करण्याचे साम्य असते त्या विधीशी, जेव्हा आपण एकाद्या सन्माननीय पाहुण्याचे घरात स्वागत करतो. त्या स्वागत सोहळ्यात ज्या कांहीं मुलभूत गोष्टी केल्या जातात त्यासर्व देवाच्या पुजेत होत असतात. पुजा करण्याचा कांहीं उद्देश असतो. सामान्य माणसाच्या पुजा सकाम असतात. त्याबद्दल विनवणी करणे हे महत्वाचे काम देवतेला प्रसाद दिल्यानंतर करावयाचे असते. पुजाविधीचा क्रम असा असतो. कांही चुक झाली, कांहीं राहून गेले असल्याल त्या बद्दल माफी मागणे हे शेवटच्या विधीत करावयांस विसरता कामा नये. पुजेतील आठ विधी येथे दिल्या आहेत तशा असतात
क्रमशः चालू –
मनुस्मृती सातवा भाग सुरू – १०१ – ११५
जे राज्य त्याला मिळालेले नाही ते तो त्याच्या सैन्याच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करील. ते प्राप्त झाले आहे ते तो राजा संरक्षित करील, जे संरक्षित झाले आहे ते तो वाढवेल. त्याचा योग्य मंत्र्यांच्या मदतीने विकास करील. ज्यांचा विकास झाला आहे ते तो पुढील व्यवस्थेसाठी सत्पात्र लोकांच्या हातात सुपूर्द करील. १०१
राजा सदैव त्याची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करील. तो त्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करील. तो स्वताचे दोष उघड होऊ देणार नाही. परंतु, शत्रूचे दोष उघड करण्याचा, शोधून काढण्याचा, प्रयास करील. १०२
जो हल्ला करण्यास नेहमी तयार असतो त्याला जग घाबरते, म्हणून राजा सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमते ठेवण्यासाठी सैन्याचा वापर करील. १०३
तो राजा नेहमी दक्ष राहील, विश्र्वासघाताचे सर्व प्रयोग तपासून काम करील. चटकन कोणावरही भाबडेपणाने भरोसा करणार नाही. शत्रूच्या गुप्त कारवायांवर त्याची करडी नजर असेल. १०४
त्याच्या शत्रूस त्याचे दोष समजणार नाहीत अशी दक्षता त्यांने व त्यांच्या आमात्याने घ्यावयाची असते, त्या उलट शत्रूचे दोष हुडकण्याचे प्रयास सदैव असला पाहिजे. १०५
बगळ्याप्रमाणे (लुच्चेपणे) तो ध्यानस्थ राहून सर्व गोष्टींचे निरीक्षण करील, सिंहासारखा हल्ला करील, कोल्ह्यासारखा सावज प्रसंगी चोरून घेऊल आणि सशासारखा (प्रसंग पाहून) पळून जाईल. १०६ टीपः हार पत्करण्यापेक्षा पळणे चांगले असे धोरण.
जेव्हां तो जिंकण्यासाठी स्वारीवर निघेल तेव्हां तो सर्व प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारील. त्यासाठी तो चार युक्त्या उपयोगात आणील. त्यासाठी तो मंत्र्यांचा सल्ला घेईल. १०७ टीपः साम, दाम, भेद व दंड अशा त्या चार युक्त्या आहेत.
पहिल्या तिनानी काम केले नाही तर अखेरीस तो शेवटचा म्हणजे दंड अथवा युद्धाचा मार्ग अवलंबेल. १०८
चार युक्त्यापैकीं सामचा वापर प्रथम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. दंडाचा सर्वात शेवटी असतो. राज्याच्या भल्यासाठी हे धोरण उत्तम समजले आहे. १०९
शेतात जसें तण काढले जाते पण धान्याचे पीक ठेवले जाते तसेंच राज्याच्या भल्यासाठी विरोधकांचा नाश केला जातो. इतर चांगली उपयोगाची माणसे सुरक्षित असतात. ११०
जो राजा मूर्खपणे प्रजेचा छळ करतो तो लवकरच स्वताच्या व त्याच्या सत्तेचा र्हास करत असतो. १११
जसें शरीराच्या छळांने प्राणाचा नाश होतो तसेंच प्रजेच्या छळाने राजाचासुद्धा नाश होतो. ११२
राज्याचा उद्धार व्हावा असें राजाला वाटत असेल तर त्यांने येथे दिलेले नियम पाळावेत. ११३
दोन, तीन पांच किंवा शंभर गावांसाठी राजाने सैन्य तैनात ठेवावी. त्या सैन्याचा प्रमुख राजाशी प्रामाणिक असला पाहिजे. ११४
राजाने प्रत्येक गांवासाठी एक पाटील नेमावयाचा असतो, दहा गांवांसाठी मामलेतदार, वीस गांवांसाठी कुलकर्णी, शंभर गांवांसाठी ठाकूर, हजार गांवांसाठी देसाई नेमावेत. ११५ टीपः ही व्यवस्था संरक्षणासाठी असते. महसुल (कर) गोळा करण्यासाठी खोत नेमावयाचे असतात.

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा