गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

हिंदू कोण – १५

३० जानेवारी २०१७
हिंदू कोण
. देवांच्या अस्तित्वा बाबत
२३. देवाला समजणे म्हणजे निसर्गाला समजणे हे लक्षात आले. म्हणून आता आपण निसर्गाचे स्वरुप पाहुया. हिंदूंतील अघोर तंत्रात जी माहिती सांगितली आहे त्यानुसार निसर्ग दोन भागांत वाटलेला आहे. एक भाग दृष्य असतो व दुसरा अदृष्य असतो. दृष्य निसर्ग जो आपण आपल्या ज्ञानेंद्रियानी जाणू शकतो परंतु, अदृष्य निसर्ग तसा आपण जाणू शकत नाही, फक्त मनाच्या विचारांनी जाणवू शकतो.
दृष्य निसर्ग अदृष्य निसर्गाच्या तुलनेने खुपच लहान असतो त्याचे नियंत्रण फार मोठा व्याप असलेला अदृष्य निसर्ग करतो. आपण ज्या आणखीन देवतांचा येथे विचार करणार आहोत त्या सर्व ह्या अदृष्य निसर्गाचा भाग असतात. विज्ञानाचे सर्व नियम दोनही भागांस सारखेच लागू होतात. अदृष्य निसर्गाबद्दल थोडी आणखीन माहीती करून घेतली पाहिजे. दृष्य निसर्गात ज्याप्रमाणे अनेक प्राण्याच्या जाती-प्रजाती आढळतात त्या प्रमाणे अदृष्य निसर्गातसुद्धा अदृष्य अशा चेतनामय (म्हणजे विचार करू शकणारी) शक्तींच्या जाती प्रजाती असतात. दृष्य निसर्गातील प्राणी जसें जन्मतात मरतात त्या प्रमाणे ह्या चेतनामय शक्तीसुद्धा जन्मतात मरतात किंवा सुप्तावस्थेत जातात. प्रसंगी त्या दृष्य निसर्गात माणसाच्या पोटीसुद्धा जन्म घेऊ शकतात. कारण, माणूससुद्धा एक चेतनामय शक्तीचेच रुप आहे. प्रसंगी सात्त्विक माणूस त्याच्या मृत्युनंतर, अशा अदृष्य निसर्गात जन्म घेत असतो. ह्या चैतन्यमय शक्तींकडे कांहीं विलक्षण सिद्धी असतात असें आपल्या पूर्वजांना समजले होते त्याप्रमाणे ते त्या चेतनामय शक्तींना अनुकूल करून निसर्गातील पंचमहाभुतांना नियंत्रित करण्याची विद्या प्राप्त करीत होते. ही माहिती शाक्त, अघोर तंत्राच्या अभ्यासांने मिळते. पाऊस पाणी, वादळे, पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महालाटा (सुनामी) अति थंडी अथवा अति उष्मा, वातावरणांत कमी दाबाचा पट्टा अथवा जास्त दाबाचा पट्टा उत्पन्न करणे त्या द्वारा पावसाचे नियंत्रण करणे, रोगराईचे नियंत्रण अशा अनेक गोष्टींचे व्यवस्थापन त्यामुळे शक्य करतां येते असा दावा केला जातो. ह्या चेतनामय शक्तींचा उल्लेख देवतां असा साधारणपणे होतो. दृष्य निसर्गातील ऊर्जा (प्रकाश, वीज, उष्णता, ध्वनी, जोर, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय जोर इत्यादि) सचेतन नसतात, त्यासाठी त्यांचे व्यवस्थापन कोणत्या तरी सचेतन प्रेरणेस करावे लागते. दृष्य निसर्गाचे अशारितीने अदृष्य निसर्गातील सचेतन शक्तींच्या सहाय्याने नियमन होत असते. म्हणून ह्या शक्तींना प्रसन्न करावे लागते त्यासाठी कांहीं तपस्या करावी लागते हेसुद्धा आपल्या पूर्वजांना माहीत होते. ह्या शक्तींना माणसाच्या भक्तीची (त्यांचे खाद्य म्हणून, जेवढे जास्त भक्त तेवढी त्यांची ताकद मोठी अशी व्यवस्था असते.) आवश्यकता असते त्याचा माणूस चतुराईने उपयोग करू शकतो. अदृष्य निसर्गाला समजणे हे एक विज्ञान आहे आज आपल्याला ह्या विलक्षण विज्ञानाची नितांत गरज आहे कारण, आज पंचमहाभुते अनियमितपणे काम करीत आहेत. ह्या अदृष्य निसर्गातील चैतन्यमय शक्ति पंचमहाभुतांचे नियमन करू शकतात हे आपल्या पूर्वजांना समजले. हे ज्ञान होण्याचे कारण, अशा चेतनामय शक्ती, जसें त्यांना माणसाच्या भक्तीची भूक लागते तसें त्या कोण्या एका, त्यांच्या दृष्टीने योग्य अशा, माणसास त्यांच्या पद्धतीने जाणीव देतात त्यानुसार तो इसम त्याची भक्ती करू लागतो त्यांने संतुष्ट झालेली ती देवता त्या भक्ताची इच्छा पूर्ण करते. अशाप्रकारचा अनुभव वेळोवेळी येत गेल्यामुळे त्यातून त्या देवतांना प्रसंन्न करण्याचे तंत्र विकसित होत गेले. त्यातून आजच्या अघोर तंत्राचा विकास झाला आहे. ह्याला कोणी अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्षिल पण हे एक विज्ञान आहे असे हिंदू मानतात त्याप्रमाणे ते त्या देवतांची भक्ती करीत असतात. आधुनिक विज्ञानाला आत्ता आत्ता असा अदृष्य निसर्ग असल्याचा सुगाव लागला आहे. हल्ली पश्र्चिमेकडील वैज्ञानिक ह्या अदृश्य शक्तिंना एलियन (Alien) म्हणून सांगतात. कारण ते असें समजतात किं, हे एलियन परग्रहावरून येतात. वस्तुतः ते येथीलच आहेत हे आपण जाणतो. हे मोठे शास्त्र असून ह्या लेखाच्या आवाक्या बाहेरचे असल्याने ह्यावर जास्त चर्चा मी करीत नाही. तंत्रात दिलेली अशा देवतांच्या जाती प्रजातींची नांवे अशी, देव, दैत्य, दानव, यक्ष, गंधर्व, नागदेवता, राक्षस, सूपर्ण आणि किन्नर आहेत. येथे त्यांची नांवे त्यांच्या सामर्थ्याच्या उतरत्या क्रमाने दिली आहेत. ह्या "देवता गण", म्हणून ओळखल्या जातात. ह्यांशिवाय आणखीन एक प्रकार देवतांचा आहे तो, गणदेव अथवा चांगली भूते, हि चांगल्या माणसांची भूतं असतात. असें लोक, जे आयुष्यभर निष्पाप जीवन जगले सात्त्विक प्रवृत्तीने परिपूर्ण होते. असें लोक, जे दुसर्यास निष्काम (कांहीं अपेक्षा ठेवता) मदत करीत होते. असें लोक, ज्यांच्या आत्म्याने त्यांच्या जीवाच्या दैहिक कारभारात कधीही ढवळाढवळ केली नाही. असें लोक, जेव्हां मरतात तेव्हां ते लोक अदृष्य निसर्गातील ह्या लोकांत जातात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात किं, जर ते एकाद्या वरील श्रेणीच्या देवतेचे भक्त असतील तर ते त्या देवतेच्या गणांत समाविष्ट होतात. जर असा इसम देव मानणारा असेल तर तो तसांच स्वतंत्रपणे तेथे रहातो. गणदेव ही चांगली पिशाच्च असतात ती सर्वच प्राणिमात्रांना त्यांचे जीवन सुखरुप करण्यात मदत करण्याची भूमिका बजावतात. जे गणदेव उच्च स्थराच्या देवतेचे गण असतात त्यांना त्यांच्या ह्या चांगल्या कामात ती उच्चस्थरीय देवता मदत करते. त्यांना त्या देवतेचे इतर गणदेवसुद्धा मदत करतात त्यांची शक्ति मोठी होत असते. हा फायदा देव मानणार्या माणसाच्या गणदेवांस होत नाही. असें असले तरी बरेच पितर अशावेळी त्यांना सहाय्य करतात त्यांचे चांगले काम तडीस जाते. गणदेव संतुष्ट असतात म्हणून त्याच्यामुळे जे फळ प्राप्त होते त्या बदल्यात ते कांहींही अपेक्षा करीत नसतात. आपल्या पूर्वजात जर कोणी असा गणदेव असेल तर तो त्या कुटूंबाला संरक्षण देत असतो. त्यासाठी त्याला पितृपक्षात पिंडदान करणे चांगले असते. जर कोणी अशारितीने आपल्या पूर्वज गणदेवांस पिंडदान करीत असेल तर इतर गणदेवसुद्धा तेथे जमतात म्हणून त्यांनासुद्धा पिंडदान करावे असा संकेत आहे. असे होण्याचे कारण, असें सांगतात किं, ह्या गणदेवांना अशा पिंडाची भूक असते. अशा सेवेमुळे हे गणदेव माणसांस त्याच्या जीवनात मदत करीत रहातात असे समजले जाते.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू
जसे हिणकसातील अशुद्ध पदार्थ भट्टीतून भाजून वेगळे करून धातु शुद्ध केला जातो तसेंच दीर्घ श्वासांने शरीरातील दोष नाहीसे होतोत. ७१
शरीरातील दोष दीर्घ श्वासाने नाहीसे करावेत, पाप सुक्ष्म निरीक्षणाने, वासना संयमाने, इतर हट्टी दोष ध्यानाने नाहीसे करावेत. ७२
ध्यानाच्या सवयीने तो स्वताची प्रगती ओळखू शकतो. महापाप्याला तसें ओळखता येत नाही. ७३
जो दीव्य दृष्टीने जगाची रीत ओळखतो त्याला कशाचेच बंधन नसते परंतू, ज्याला ती नसते तो जन्म मरणाच्या बंधनात अडकून पडतो. ७४
कोणत्याही प्राण्याला इजा करतां वासनेच्या बंधात अडकता वेदांचा अभ्यास करून आणि घोर तत्त्वशिलता आचरून तो ह्या जन्मात मोक्ष प्राप्त करू शकतो. ७५
ज्या घरात पांच पापे आहेत, जेथे हाडे घराच्या तुळ्या (वासे) असतात, त्या स्नायूच्या वाखांने बांधलेले असतात, जेथे मांस रक्त जोडण्याचे काम करतात, ज्यावर चामडी छपराचे काम करते, जेथे सुत्र मळाची दुर्घंधी असते, जे यथावकाश वृद्ध होते, जेथे दुःख असते, आजार, वेदना, नैराश्य असते आणि जे शेवटी नष्ट होते असें घर म्हणजे आपले शरीर त्याने त्याच्या मोहात पडून पकडून ठेवू नये. त्याने ते घर कायमचे सोडून द्यावे. ७६-७७
नदीच्या किनारी असलेला वृक्ष उन्मळून पडावा, झाडावर बसलेले पक्षी उडून जावेत, असे ह्या दुःख देणार्या जगातून तो निघून जातो. ७८
आपल्या मित्रांना आपले चांगले ते देऊन, वाईट तेवढे शत्रूला देऊन तो अनंत ब्रह्मात विलीन होतो. ७९
तो उदास वृत्तिने सर्व गोष्टींबद्दल त्रयस्थभावाने (प्रेमळ परकेपणाने) वागत रहातो. त्यातूनच त्याला अनंत सुख मिळते जे कधीही त्याला सोडत नाही. ८०
अशारितीने जो साधक अथवा बाधक ह्यांतून सावकाशपणे मुक्त होतो तो अखेरीस ब्रह्मात विलीन होतो. ८१
हे सर्व ध्यान साधनेवर अवलंबून असते. कारण, जो त्यात पटाईत नाही तो ह्यात पूर्ण फळ प्राप्त करू शकत नाही. ८२
तो सदैव वेदांतील यज्ञाबाबतच्या ऋचा वाचत राहील. देवतांबद्दलच्या ऋचा वाचत राहील आणि ज्यात आत्मा आणि वादांचा अभ्यास आहे ते वाचत राहील. ८३
वेदाचा अभ्यास, अज्ञानी लोकांपासून ज्ञानी लोकांपर्यंत तसेंच स्वर्गात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांपासून अनंत सुखाची इच्छा असलेले अशा सर्वांना उपयोगाचे आहे. ८४
द्विज ज्याने येथे दिल्या प्रमाणे वर्तन ठेवून सन्यस्त जीवन स्वीकारले आहे तो त्याच्या सर्व पाप फळांपासून मुक्त होऊन ब्रह्मांत विलीन होतो. ८५
अशारितीने स्वसंयमाचे नियम तुम्हाला सांगितले. आता ऐका, ज्याने वेदात दिलेले विधी करण्याचे सोडून दिले आहे त्यांनी काय करावयाचे. ८६
गृहस्थाच्या वर्गातून चार मार्ग उत्पन्न होतात. ते असें, विद्यार्थी, गृहस्थ, जोगी संन्यासी आहेत. ८७
ह्या चार मार्गातील कोणत्याही मार्गाने जाणारा शेवटी पवित्र नियमांचे (खाली दिलेले) पालन करील तो ब्राह्मण अति उच्च स्थानी पोहोचेल. ८८
वेदांत स्मृतित दिल्याप्रमाणे, घर चालवणारा गृहस्थ त्या चारांत सर्वश्रेष्ठ असतो. ८९
जसें लहान मोठ्या नद्या शेवटी समुद्राला येऊन मिळतात तसेंच हे सर्व चार मार्ग चोखाळणारे शेवटी घर चालवणार्या गृहस्थास मिळतात.


मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा