शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

अरबांची कुत्री – ११

सुफी पंथ अथवा धर्म आणि इस्लाम ह्यात बराच फरक आहे तरी कांहीं मुसलमान पंडीत सुफी हा इस्लामचाच हिस्सा आहे असे सांगतात तर दुसरे कांहीं त्या विरूद्ध मत मांडतात. त्यासाठी ह्या दोनही बाजूंचे विचार काय त्यातील योग्य कोणते ते पहावे लागेल. मला भरपूर संशोधनानंतर कांहीं विचार करावयास लावणार्या गोष्टी आढळल्या त्या येथे देत आहे.
इस्लाममध्ये देवाला अल्लाह असें नांव दिले आहे त्याच नांवाने त्याला आळवणी करावी असा दंडक असतो. त्यापेक्षा वेगळ्या नांवांने जर देवाचा उल्लेख केला तर ते इस्लाम बाह्य कृत्य ठरते. तो अक्षम्य अपराध मानला जातो. त्याशिवाय, जेव्हां महमदाने इस्लामचा प्रचार केला तेव्हा कांहीं अरब टोळ्यांनी निक्षून सांगितले किं, त्यांच्या देवांच्या नांवाचासुद्धा अल्लाहला पर्याय म्हणून स्वीकार केला पाहिजे नाहीतर ते अरब टोळीवाले इस्लाम स्वीकारणार नाहीत. त्या वेळी नाईलाजाने महमदांने कांहीं इतर नांवे जसें रहमान, रहिम अल्लाहला पर्यायी म्हणून स्वीकारली होती. कालांतराने तो आग्रह संपला पुन्हा अल्लाह हेंच नांव देवासाठी वापरण्यास सुरुवात झाली ती आजतागायत चालू आहे. त्याशिवाय असे आढळते किं, इतर अरब टोळीवाल्यांचा मान राखण्यासाठी आणखीन ९७ नांवे कुराणात अल्लाहला पर्यायी म्हणून नोंदवलेली आहेत. तरी केवळ एक उपचार एवढेच त्यां नांवांचे महत्व आहे. त्या नांवांत खुदा हे नांव नाही. म्हणजे देवाचा उल्लेख खुदा म्हणून केला तर ते इस्लामच्या पवित्र नियमांच्या विरूद्ध ठरते. सुफी देवाचा उल्लेख खुदा म्हणून करतात. त्यामुळे ते इस्लामच्या पवित्र नियमांचे उल्लंघन करतात म्हणून ते मुसलमान नाहीत असा दावा सुफी विरोधी विचारवंत मांडतात. तो बरोबरच आहे.
त्याशिवाय, सुफी श्रद्धावान देवाला इतर कोणत्याही नांवाने संबोधले तर त्यात कांहीं गैर झाले असें मानत नाहीत. त्यांच्या मते तत्त्वतः देवाला मुळात नांव नसतेच. माणूस त्याला कांहीं नांव देतो ते त्या माणसाची भावना असते एवढेच. त्यामुळे ह्या एका मुद्यावरून इस्लाम सुफी ह्यात मोठा फरक असल्याचे स्पष्ट होते. हा फरक पुढे निरनिराळ्या इतर मुद्यांवरून वाढतच जातो शेवटी अशी परिस्थिती दिसते किं, कट्टरपंथी इस्लामी सुफी श्रद्धावान्यांना मारून टाकण्याच्या गोष्टी पर्यंत जातात.
त्याशिवाय, अल्लाह खुदा ह्यांच्या संकल्पनेत एक मोठा फरक दिसतो तो असा किं, अल्लाह बाहेर कोठेतरी आकाशात आहे असें समजतात खुदा माणसात आंत कोठेतरी अंतर्यामी बसलेला असें समजतात. दुसर्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, अल्लाह हे परमेश्र्वराचे स्थुल स्वरूप आहे खुदा, सुक्ष्म स्वरूप आहे. सुफी असें मानतात किं, परमेश्र्वराची भक्ती सुक्ष्मात करणे जास्त श्रेयस्कर आहे. हिंदूंमध्ये सुद्धा परमेश्र्वर आत्माराम अशी दोन रुपे भक्तीसाठी वापरली जातात. महमदाच्या आदेशानुसार मुसलमानाने अल्लाहची म्हणजे परमेश्र्वराच्या स्थुल स्वरूपाचीच केवळ प्रार्थना केली पाहिजे, सुफी ते मानत नाहीत.
त्याशिवाय, महमद सांगतो किं, मुसलमनाने दिवसातून निदान पांच वेळा नमाज पढला पाहिजे त्या उलट सुफी सांगतात किं, खुदावर केवळ आपले एकचित्त करणे पुरेसे असते. एकचित्त करणे हे हिंदूंच्या ध्यानसाधने सारखे असते. मुसलमानांना नमाज पढण्यासाठी जागा लागते त्यासाठी मशिद म्हणजे प्रार्थना मंदिर असावे लागते तशी कोठलीही व्यवस्था सुफी श्रद्धावानांना आवश्यक वाटत नाही. सुफी कोठेही बसून अथवा झोपल्या अवस्थेतसुद्धा ध्यान करून परमेश्र्वराची आळवणी करू शकतो. हिंदूंमधील अनन्यश्र्चिंतन सुफी मानतात. कांहीं गोष्टींवरून असे आढळते किं, सुफी हे इस्लामपेक्षा हिंदूंना जास्त जवळचे आहेत.
हा विषय पुढील पोस्टमध्ये चालू राहील.
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या २०२२२२
दुसर्याचे वाहन, शय्या, आसन, विहीर, बगीचा, अथवा घर त्याच्या परवानगी शिवाय वापरले तर त्यांच्या मालकाच्या पापांचा एक चतुर्थ्यांश भागाचा तो धनी होईल. २०२
अशा ब्राह्मणाने नेहमी नदी, गांवतळी, झरे, डबकी जी नैसर्गिकपणे बनली आहेत त्यांचा वापर करावा. २०३
शहाणा ब्राह्मण नेहमी प्रथम अतिमहत्वाच्या जबाबदार्या (यम) आधी उरकेल नंतर इतर सामान्य महत्वाच्या जबाबदार्या (नियम) पाहील. तसें जर तो करणार नाही तर, तो समाजातून बहिष्कृत होईल. २०४
श्राद्धाचे जेवण जे स्रोत्रीय नसलेल्या ब्राह्मणांने दिले अथवा जे अनेकांसाठी केले अथवा जे स्त्रीने किंवा नपुसकांने दिले ते तो खाणार नाही. २०५
असें लोक (अनेकांसाठी दान करणारा, स्रोत्रीय नसलेला, स्त्री आणि नपुसक) जर श्राद्ध करील तर अपवित्र ठरेल आणि त्यामुळे देव नाराज होतील म्हणून अशा श्राद्धात सामील होणे टाळावे. २०६
पायाचा स्पर्श झालेले, तसेंच दारू प्यालेल्या माणसांने दिलेले, रागावून दिलेले, आजारी माणसांने दिलेले, किंवा ज्यात केस, किंडी किटक पडलेले, असें खाद्य पदार्थ खाऊ नयेत. २०७
ब्राह्मणाची हत्त्या करणार्यांने दिलेले, मासिकपाळीत असलेल्या बाईने दिलेले, पक्षी वा श्र्वापदाने चिवडलेले असें अन्न सुद्धा खाऊ नये. २०८
शिकलेल्या विद्वान माणसांने उष्टवलेले, गाईने वास घेतलेले (हुंगलेले), अन्नछत्रात वाढलेले, नायकीणीने वाढलेले, २०९
चोरून आणलेले, गाणार्याने दिलेले, सुतारांने, सावकारांने, श्रौतविधीत भाग घेतलेल्याने, कैद्याने असें दिलेले जेवण खाऊ नये. २१०
अक्षम्य गुन्हा केलेल्यांने दिलेले, हिजड्याने, अपवित्र बाईने, पाखंडीने, पांबलेले, रात्रभर उघड्यावर पडलेले, शुद्राच्या वाटणीचे असे जेवण खाऊ नये. २११
वैद्याने दिलेले, शिकार्याने, दुष्ट माणसांने, दुसर्याचे उष्टे खाणार्याने, बाळंतीणीच्या वाटणीचे, जेथे अतिथी जेवणावळीतून मध्येच उठून जातात अशा ठिकाणचे, सुतक सुयेरतील बाईकडून आलेले, २१२
अपमान करून दिलेले, ज्या जेवणात खराब मांस आहे असें, लग्न झालेल्या बाईने दिलेले, शत्रूने दिलेले, नगराधिपतीने दिलेले, वाळीत टाकलेल्यांने दिलेले, ज्यावर कोणाची थुंकी पडली आहे असें, २१३
खबर्यांने, खोटे बोलणार्यांने, जो शिधा विकतो त्यांने दिलेले, नटांने, शिंप्याने, विश्र्वासघातक्याने, असे अन्न खाऊ नये. २१४
लोहार, निषाद (सप्तसुरात गांणारा), खुष्मस्करा (विदूषक), सोनार, टोपल्या विणणारा, चांभार, शस्त्रे विकणारा, अशांकडून जेवण घेऊ नये. २१५
शिकारी कुत्र्यांना पाळणारा, विशी (हॉटेल, वसतीगृह) सांभाळणारा, धोबी, कपडे रंगवणारा, दरिद्री, असा माणूस ज्याच्या घरात त्याच्या बरोबर त्याच्या बायकोचा प्रियकर सुद्धा रहात आहे. २१६
सुतक सुयेर ज्यांचे संपलेले नाही असे, जो त्याच्या बायकोच्या याराला दोस्त मानतो, जो पुरुष बायकोच्या आधीन आहे, अशांकडून आलेले जेवण खाऊ नये. २१७
राजाकडून आलेले जेवण ब्राह्मणाचे बळ नष्ट करते. शुद्राकडून आलेले त्याचे पावित्र्य नष्ट करते. सोनाराकडून आलेले खाल्ले तर आयुष्य कमी होते. चांभाराकडील खाल्लयाने बदनामी होते. २१८
कारागीराकडील शिधा खाल्ला तर त्याची मुलबाळ मरतील. धोब्याकडील खाल्ल्याने शरीराची ताकद कमी होईल. अन्नछत्रातील नायकिणीकडील शिधा खाण्याने त्याच्यासाठी स्वर्गाची दारे बंद होतील. २१९
वैद्याकडील जेवण पुवासारखे भयंकर असते. अपवित्र बाईने दिलेले खाण्याने वीर्य खाण्यासारखे होते. सावकाराकडील जेवण गुवासारखे (विष्ठा) असते. शस्त्र विकणार्या कडील जेवण घाण असते. २२०
इतर जे सांगितले आहेत ज्यांच्या कडून आलेले जेवण खाऊ नये असें सांगितले आहे ते खाणे म्हणजे, चामडी, हाडे केस खाण्यासारखेच असते. २२१
चुकून जर कोण्या ब्राह्मणाने असे जेवण कळत नकळत खाल्ले असेल तर त्यांने एक दिवस अनशन (निराहार) करावे. जर मुद्दाम वीर्य, विष्ठा, लघवी सेवन केली असेल तर तो क्रिख्र नांवाचे अनुष्ठान (तपस्या) करील. २२२ टीपः क्रिख्र अनुष्ठानाची माहिती पुढे सांगितली आहे.
मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा