सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

अरबांची कुत्री – १०

अरब लोक अशारीतीने इतर बाटग्यांची कत्तल करीत असतांना कांहीं येथील मूर्ख बाटगे जिहादच्या नांवांने हिंदूंचा खुनखराबा स्वतःचे पैसे खर्च करून करतांना दिसते. अशा मूर्खापणाला अरबांचा आधार नसतो. त्यात भरीसभर म्हणून किं काय कांहीं हिंदूसुद्धा त्यात सामील होऊन बाटग्यांचा खुनखराबा करण्याच्या योजना आखतांना आढळतात. एकंदर सर्वच गोंधळ झाला आहे. आज आपल्या शासनाने ह्या सर्व स्वयंप्रेरीत जिहाद वाल्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत हे एकापरीने चांगलेच आहे.
ह्यासर्वांत पाकिस्तानातील बाटग्यांच्या कत्तलीत अशा अतिरेक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास अरब अधिकारी पाकिस्तानात ठाण मांडून बसलेले असतात. तसें ते भारतात येत नाहीत परंतु, कांहीं मुसलमान कुत्री सौदी अरबांनी तयार केली आहेत. त्यात नांव घेण्यासारखा आहे, झकिर नाईक. झकिर नाईक भडकावू भाषणे करून भारतातील बाटग्यांना अतिरेकी हालचाली करण्यास उद्युक्त करतो आहे हे आता सिद्ध झाले आहे. ह्यासर्वातून एकच गोष्ट स्पष्ट होते किं, अरबांचा उद्देश कोणाच्याच लक्षात आलेला नाही. जर तो भारतातील हिंदूंच्या मुसलमानांच्या सुद्धा लक्षात आला तर बरे होईल. पण ते होतांना दिसत नाही.
ह्या ठिकाणी आपल्याला पहावयाचे आहे ते हे किं, हिंदूस्तानात इस्लामचा प्रचार कोणी केला? खरोखरच इस्लामचा प्रचार केला होता कां? कां इस्लामच्या बुरख्याखाली आणखीन कांही आले?
इस्लामचा इतिहास पहाता असें दिसते किं, हिंदूस्तानात अरब आले नाहीत. मग कोण आले? आणि त्यांनी इस्लामचा किंवा इतर कशाचा तरी प्रचार केला त्याला कारण काय?
इतिहासातील नोंदीप्रमाणे इराण जिंकून अरब इराणातील बलुचिस्तानापर्यंत आले होते. त्यापुढे त्यांना येता आले नाही कारण राजपुतान्यातील प्रतिहारा राजांनी त्यांना सिंधच्या पुढे येऊ दिले नव्हते. त्यानंतर अरबांची ताकद कमी पडली आहे ते साम्राज्य सांभाळणे त्यांना अंतर्गत मारामार्यांमुळे शक्य झाले नाही. कांहींच्या मते इस्लामच्या शिरीया ह्या नियमावलीची मूळं हिंदूंच्या मनुस्मृतीत आहेत. महमदाच्या मृत्यूनंतर तब्बल शंभर वर्षे हे नियम तयार करण्याचे कार्य चालू होते. अरबांचे भारतातील व्यापार्यांशी चांगले संबंध होते त्यांच्या कडून कदाचित अरबांना मनुस्मृतीचा परिचय झाला असावा त्यांच्याकडून मनुस्मृतीतील पवित्र नियमांना अरबांनी उचलले असावेत. असे सांगण्याचे कारण, शिरीयाच्या बर्याच नियमांत मनुस्मृतीतील पवित्र नियमांत कमालीचे साम्य आहे. जणूकाय मनुस्मृतीतून ते सरळ उचलले असावेत. अशा परिस्थितीत मुळातच अरबांना भारतातील धर्माबद्दल आदर होता त्यामुळे अशा देशावर चाल करून जाणे त्यांना कदाचित अप्रस्तूत वाटले असावे.
जरी राजपुतान्यातील बडाढ्य प्रतिहारा राजांनी अरबांना अडवले तरी पंजाबातून येणार्या पठाण हल्लेखारांना ते थांबवू शकले नाहीत. त्यांच्या स्वार्या थेट दिल्लीपर्यंत झाल्या त्या मार्गांने इस्लाम भारतात आला. त्या बरोबर आणखीन एक पंथसुद्धा आला. तो मुळचा तुर्कस्तानातील होता पण त्याच्या नेमस्त स्वभावगुणांमुळे तो इस्लामशी मिळतेजुळते घेऊन हिंदूस्तानात स्थिर झाला. त्या पंथाचे नांव आहे, सुफीपंथ. हिंदूंच्या सामवेदाशी मिळताजुळता विचार असलेला असां हा पंथ अथवा धर्म, हिंदूंना सुद्धा मानवणारा होता. सुरुवातीच्या सर्व मोगल राजांच्या दरबारात ह्या सुफीसंतांना फार महत्व होते. येथे साैदी अरबस्तानातील एका प्राचीन मशिदीचा फाेटाे दिला आहे. त्यात शिवलिंग व नंदी मनाेर्यावर काेरलेले स्पष्ट दिसत आहेत. ह्यावरून हिंदू विचारांचा इस्लामवर किती प्रभाव हाेता ते दिसते.
 
हा विषय पुढील पोस्टमध्ये चालू -
मागील पोस्ट पासून पुढे चालू
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या १८२२०१
शिक्षक ब्राह्मणांच्या जगाचा प्रतिनिधी असतो. वडील प्रजापतीच्या प्रतिनिधी असतो. पाहुणा इंद्राचा प्रतिनिधी असतो. पुरोहित देवांचा प्रतिनिधी असतो. १८२
स्त्री अप्सरांची प्रतिनिधी असते. आईकडील नातेवाईक विस्वदेवांचे प्रतिनिधी असतात. लग्नाच्या नात्यातील लोक पाण्याचे प्रतिनिधी असतात. आई मामा कडील लोक पृथ्वीचे प्रतिनिधी असतात. १८३
अर्भक, आजारी गरीब, वृद्ध लोक मधल्या जगाचे प्रतिनिधी असतात. वडील भाऊ हा पित्याचा पत्नी आणि मुलगा स्वताचे प्रतिनिघी असतात. १८४
नोकर दास हे त्यांच्या सावलीचे प्रतिनिधी असतात. मुली अत्यंत नाजुकतेचे प्रतिनिधी असतात. म्हणून ह्यांपैकी कोणीही त्याला त्रास दिला तरी तो त्यांने निमूटपणे सहन करावयाचा असतो. १८५
जरी त्याच्या योग्यतेमुळे यजमानाकडून भेटवस्तू स्वीकारणे हे योग्य असले तरी तशी सवय स्वताला त्याने लावून घेऊ नये कारण, त्यामुळे त्याची दैविक शक्ति सावकाशपणे नष्ट होत असते. १८६
त्याला अत्यंत गरज असली तरी तो कोणती भेट घ्यावयाची कोणती घेऊ नये ह्याचे पुरेसे ज्ञान (पवित्र नियमांनुसार) नसेल तर ती वस्तु घेऊ नये. १८७
असे केल्यास तसा अज्ञानी ब्राह्मण त्या भेटवस्तू (सोने, चांदी, गाय, घोडा, खाद्य, वस्त्र, तीळाचे दाणे, साजुक तूप) घेतल्यास त्याची राख होईल. १८८
सोने खाद्य त्यांचे आयुष्य कमी करतात. जमीन गाय ह्यांच्यामुळे शरीर व्याधीमय होते, डोळ्याची दृष्टी जाते (कमी होते), वस्त्रामुळे त्वचा बिघडते, साजूक तुपामुळे त्याची उर्जा तीळदाण्यामुळे त्यांची संतति बरबाद होते. १८९
जो ब्राह्मण तत्त्वशिलता वेदांचा अभ्यास असें दोनही करीत नाही तो जर दान, भेटवस्तू स्वीकारत असेल तर तो त्याला दान करणारा असें दोघेही नरकात जातात. जसें दगडाच्या बोटीतून प्रवास करणारा पाण्यात बुडतोच. १९०
म्हणून अज्ञानी ब्राह्मणांनी कधीही भेटवस्तू घेऊ नयेत. कारण, अगदी मामुली भेटवस्तूसुद्धा त्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकते. १९१
थोडेशी जाण असलेला माणूस, वेदाचा अभ्यास करणारा, मांजरासारखा, बगळ्यासारखा वागणारा अशा ब्राह्मणांस पाणीसुद्धा पाजणार नाही. १९२
जो अशा वेदाचा अभ्यास करणारा, मांजरासारखा, बगळ्यासारखा वागणारा अशा ब्राह्मणांस दान करील तो मोठ्या अडचणीत पडेल. १९३
दगडाच्या नांवेतून प्रवास करम्याचा प्रयत्न करणारा जसें पाण्यात निश्र्चितपणे बुडणार तसा अशा ब्राह्मणाला दान करणारा अधोगतीस जातो. १९४
दुसर्याच्या कामाचे श्रेय खाणारा, दुसर्याच्या यशाबाबत मत्सर करणारा, आपण विद्वान असल्याचा बहाणा करणारा, दुसर्यास फसवणारा, इजा करणारा, अशा ब्राह्मणाला मांजरासारखा असे म्हणतात. १९५
जो ब्राह्मण अतिस्वार्थी, आतल्या काळजाचा, क्रूर, विश्र्वासघातकी, संभावितपणा करणार्याला बगळ्यासारखा असें संबोधतात. १९६
मांजरासारखा बगळ्यासारखा ब्राह्मण त्याच्या शेवटी त्याच्या कर्माने अंधतमिस्र नांवाच्या नरकात जातो. १९७
एकादा पाप केल्यानंतर खोट्या तपस्येचे सोंग करून अथवा अध्यात्माच्या गोष्टी करून स्वताचे पाप लपवण्यचा प्रयत्न करून खोट्या शपथा घेऊन स्त्रीयांना शूद्रांना फसवून जीवन जगला तर, १९८
तसा ब्राह्मण ह्या जन्मी अथवा नंतरच्या जन्मी वेदशास्त्र जाणणार्या ब्राह्मणाकडून फैलावर घेतला जाईल. ज्या खोट्या शपथा, आणाभाका घेतल्या त्या राक्षसास मितात. १९९
जो सच्च्या विद्यार्त्याचे सोंग घेऊन भिक्षा मागतो त्यावर उदरभरण करतो तो पुढच्या जन्मी पशुच्या योनीत जन्म घेतो २००
अशा खोट्या ब्राह्मणाने दुसर्याच्या तलावात स्नान केले तर ज्याने तो तलाव बांधला त्याच्या पापांचा तो धनी होतो. २०१

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा