शुक्रवार, २९ जुलै, २०१६

अरबांची कुत्री – ९

मागील पोस्ट पासून पुढे चालू
एकंदर पहाता हा जो इस्लामचा विस्तार झाला आहे तो इस्लामच्या पवित्र नियमांचे उल्लंघन करून झाला आहे. आता जे अरब पेट्रोलच्या पैशाने श्रीमंत झाले आहेत त्यांना ही चुक सुधारण्याची इच्छा आहे असें बर्याचशा अरबांच्या शेखांनी ठरवले त्यात सौदी अरब अग्रणी आहेत. ही चुक कशी सुधारावयाची हा एक मोठा यक्ष प्रश्र्न आहे. कारण, आज जर ह्या चुकींने बाटवलेल्या मुसलमानांना हे सांगितले किं, ते महमदाच्या मूळ आदेशानुसार मुसलमान नाहीत तर हे खोटे मुसलमान ते सहजपणे स्वीकारणार नाहीत इतकी वर्षे ते इस्लामी वळणात रुळलेले असल्याने आता पुन्हा ते त्याच्या मूळ धर्माकडे वळणार नाहीत. असें दिसते कारण, त्यानंतर बरेच पाणी त्यावरून वाहून गेले आहे.

ह्यावर जो भयंकर इलाज अरबांनी योजला आहे तो आता आपल्याला पहावयाचा आहे. अरबांच्या स्वाभाविक क्रूरपणाला शोभेल असाच हा आहे. त्यासाठी अरबांनी हिंदूस्तानात लष्करे तोयबा, तालेबान आणि अशा अनेक अतिरेकी संघटना निर्माण करण्यासाठी मोठे अर्थसहाय्य केले त्यांच्या मदतीने येथील मुसलमान्यांची कत्तल करण्याचा सपाटा सुरु केला. ह्याचे उदाहरण आपल्याला विशेषकरून पाकिस्तानात आढळते. तेथे जिहादच्या सबबीखाली मुसलमान्यांचीच कत्तल सरसकट होत असतांना आढळते. त्यात सुन्नी लोक स्वताला प्रेषिताचे सच्चे रखवाले समजतात त्यासाठी ते शियापंथींची कत्तल करतांना आढळते. अशा खून खराब्यात कोठेही धर्म आढळत नाही. तेथे असे खूनशी हल्ले मशीदींवर मुसलमान वस्तीतच होत असतात. आणि त्याला ते जिहाद असें नांव देतात. एका मुसलमानाने दुसर्या मुसलमानाला मारण्यात आणि त्यांची मशिद मोडण्यात कसा काय जिहाद साध्य होतो ते समजण्यासारखे आहे. भारतात मात्र हिंदूंची संख्या जास्त असल्यामुळे मुसलमानांबरोबर कांहीं इतर लोकसुद्धा मरतात पण तो अरबांचा उद्देश नसतो. सर्व अतिरेकी कारवायांना अरब देशांकडून अर्थसहाय्य होत असते हे आता सिद्ध झाले आहे. विशेष असें किं, अरब लोक येथील मुसलमानांना त्यांच्याच भाईबंदांची कत्तल करण्यास भाग पाडतांना त्यामागील अरबांचा उद्देश ते कधीही सांगत नाहीत. कारण तसे सांगणे धोक्याचे आहे. येथील बाटक्यांना बेसावध ठेवूनच असे काम करावे लागणार हे ते अरब ओळखून आहेत. ईस्लामच्या संवर्धनासाठी ते ही सर्व कत्तल करीत आहेत असें अजब तर्कट ते मांडतात येथील मूर्ख बाटगे त्यावर विश्र्वास ठेवतात!
जे हिंदूस्तानात होत आहे त्यापेक्षा जास्त भयंकर प्रमाणात मध्यपूर्वेकडील देशांत होत असतांना दिसते. तेथे सुद्धा अरबेतर मुसलमान जे आरेमियन, असेरियन, तुर्क, अशा जमातीचे आहेत. त्यासर्वांची कत्तल अरब पैसे खर्च करून घडवत आहेत. आणि हे सर्व करतांना ते आवर्जून सांगतात किं, हे सर्व अरब इस्लामच्या संवर्धनासाठी करीत आहेत. विशेष लक्षात घेण्यासारखी बाब अशी किं, ही कत्तल अरब त्या अरबेतर मुसलमानांकडूनच करीत आहेत. एक अरबेतर मुसलमान दुसर्या अरबेतर मुसलमानांस मारत आहे आणि त्याला ईस्लामची सेवा असे म्हणतात. म्हणजे असे म्हणावे लागेत किं, त्या अरबेतर मुसलमानांना ते काय करतात त्याची कल्पनासुद्धा नाही. एका दृष्टीने हे बरोबरच आहे कारण हे अरबेतर मुसलमान अल्लाहचे नांव घेतात इतर रिवाज पाळतात जे महमदाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे म्हणून असे लोक मारून टाकून हे अरब परस्पर घडवत आहेत. त्यांना विचारले कीं, असे तुम्ही कां करता तर त्याला अरब उत्तर देतात किं, ह्या लोकांना जर सांगितले किं, तुम्ही इस्लामचा त्याग करून तुमच्या मूळ धर्माकडे जा तर ते तसें करण्यास नकार देतात. त्यासाठी त्यांचा नाश करणे हाच एकमेव मार्ग उरतो. अशारितीने अरबेतर मुसलमानांची कत्तल करण्यात अरबांना यश आल्यामुळे हा अरब आता आणखीन एक आणखीन भयंकर प्रयोग करण्यास धजावले आहेत. त्याबद्दल आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहू.

पुढील पोस्ट मधून हा विषय चालू राहील. -
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या १६११८१
ज्या कामात, ते करतांना आनंद होतो ते काम करावे ज्यात आनंद मिळत नाही ते करू नये. १६१
ब्राह्मणांने कधीही आपल्या शिक्षकांचा अपमान करू नये. जे वेद शिकवतात त्यांचा अपमान करू नये. त्यांच्या आई, बाप, गुरू, ब्रह्मण अशांचा सुद्धा अपमान करू नये. तसेंच जे लोक तत्त्वशिलतेने आपले जीवन व्यतित करतात अशा कोणाचाही अपमान करू नये. १६२
ब्राह्मणांने कधीही अनिश्र्वरवादी (वेद मानणारा) होऊ नये. देवांचा तिरस्कार करू नये. अपल्या व्यवहारात द्वेष, उद्धटपणा, घमेंड, क्रोध आणि क्रौर्य टाळावेत. १६३
राग आला तरी दुसर्यावर काठी उगारू नये वा मारू नये. परंतु, विद्यार्थ्याला सुधारण्यासाठी काठीचा उपयोग करण्यास हरकत नाही. १६४
जर द्विजांने एकाद्या ब्राह्मणाला जीवे मारण्याची नुसती धमकी दिली तरी तो द्विज त्याच्या मृत्यूनंतर तमिश्र नांवाच्या नरकात हजारो वर्षे खितपत पडेल. १६५
ब्राह्मणाला जर द्विजांने एका निरुपद्रवी गवताच्या पात्यांने हलकेसे मारले तरीसुद्धा तो पुढच्या जन्मी अशा योनीत जन्म घेईल जेथे पाप करणारे जन्मतात. १६६
जो मनुष्य एकाद्या ब्राह्मणास त्याला मारले नसतांना त्या ब्राह्मणांस जराशी ईजा करील ज्यामुळे त्याचे रक्त निघेल तो मृत्यूनंतर अतिशय वेदनामय अवस्थेत खितपत पडेल. १६७
त्या ब्राह्मणाचे रक्त जितके मातीवर सांडेल त्यात जितके मातीचे कण भिजतील तितकी वर्षे त्याला पुढच्या अनेक जन्मांत मांस खाणारे प्राणी खात रहातील. १६८
त्यासाठी कोणीही शहाणा माणूस कधीही ब्राह्मणाला मारण्याची साधी धमकीसुद्धा देणार नाही. मारणे त्याचे रक्त सांडणे दूरची गोष्ट. १६९
दुष्कर्मांने जगणारा, खोटे बोलून श्रीमंत होणारा, दुसर्याला त्रस देण्यात आनंद मानणारा हे कधीही जूवनांत सुखी होत नाहीत. १७०
दुष्कर्म्याचा झपाट्याने होणारा र्हास पाहून कोणीही सद्गणी माणूस सत्कर्मांने जरी कामे झाली नाहीत तरी म्हणून दुष्कर्माकडे वळत नाही. १७१
दुष्कर्म सावकाशपणे माणसाच्या नाशाची रचना करीत असते. १७२
पापाचे वाईट फळ त्याला नाहीतर त्याच्या वंशजांना भोगावे लागते, शेवटी ते पापकर्म वाईट फळाच्या रुपांने त्याच्या कुटुंबाकडे परत येत असते. १७३
दुष्कर्मांने एकादा समृद्ध होईलही, संपन्न होईलही, शत्रूला नामोहरम करीलही, तरी शेवटी ते दुष्कर्म त्याला मारून टाकल्याशिवाय रहात नाही. हे लक्षात असू द्यावे. १७४
त्यासाठी ब्राह्मणांने नेहमी सत्यव्रती असावे. पवित्र नियमांचे पालन करावे. सज्जनांसारखे (आर्य) रहावे. त्यांने त्याच्या विद्यार्थ्याला चांगले वळण लावावे. चांगली वाणी, रहाणी, मिताहार (पोट वाढेल इतके खाऊ नये) असें रहावे. १७५
आपल्या कामना (वासनेमुळे उत्पन्न होणार्या) पूर्ण करण्यासाठी पवित्र नियमांचे उल्लंघन करू नये. जरी एकादे कार्य नियमानुसार असले तरी ते चांगल्या माणसांस त्रास देणारे असेल तर ते करू नये. १७६
फालतु कामात त्यांने त्याचा काळ व्यर्त घातू नये. फालतु बडबड करू नये, आपल्या वाणीने वा कर्मांने कोणाही चांगल्या माणसांस त्याने दुखवू नये. चांगल्या माणसांस गंमत म्हणूनही त्रास देऊ नये. १७७
आपल्या पूर्वजांनी ज्या सत्शील मार्गांने जगण्याचा परिपाठ घातला त्याच मार्गांने त्याने जगावे म्हणजे त्याला दुर्दैवाला सामना कावा लागणार नाही. १७८
गरी येऊन पुजापाठ करणारा पुरोहीत, शिक्षक, मामा, पाहुणा, पाल्य (अवलंबून असणारा), अर्भक, वयोवृद्ध, आजारी माणूस, विद्वान, वडिलांकडील नातेवाईक, लग्नामुळे जोडलेले नातेवाईक, १७९
माता, पिता, स्त्री नातेवाईक, मुलगी, नोकर, दास, अशां सर्वांशी तो कधीही भांडणार नाही असे राहील्यामुळे तो पुढे दिलेली जगं जिंकू शकतो. १८१
मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.

माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा