मंगळवार, १९ जुलै, २०१६

अरबांची कुत्री – ८

मागील पोस्ट पासून पुढे चालू

हे लोक महमदाच्या आदेशाचे पालन करीत नाहीत, ज्यात प्रेषितांनी स्पष्टपणे आदेश दिला आहे किं ज्या लोकांना त्यांचा धर्म आहे त्यांने त्याचेच पालन केले पाहिजे. ह्या हिंदूस्तानी लोकांना त्यांचा धर्म असतांना तो त्यांनी सोडला, ते त्यांच्या पूर्वजांना विसरले म्हणून त्यांची निर्भत्सना झालीच पाहिजे. महमदाने अनेक प्रसंगी पुनः पुन्हा सांगितले आहे किं, इस्लाम केवळ अरबांसाठी आहे अल्ला हा अरबांचा एकमेव देव आहे आणि महमद स्वतः अल्लाचा संदेश आणणारा प्रेषीत आहे. महमदाच्या अखेरच्या प्रवचनात तो सांगतो किं, इस्लाम हा माझ्या वंशजांसाठी आहे. येथे महमदाचे वंशज म्हणजे अरब लोक असा अर्थ स्पष्टपणे आहे कारण, महमदाला त्याच्यापासून असा फारसा वंश नव्हता हे त्यालासुद्धा माहीत होते. महमदाने ज्या लढाया केल्या त्या फक्त अरबांनी इस्लाम स्वीकारावा ह्यासाठी होत्या. तो कधीही अरबेतरांच्या धर्माबद्दल कांहींही बोलत नसें. त्या काळात बरेच अरब ख्रिस्ती यहुदी धर्मांचे पालन करीत होते त्यांना साम, दाम शेवटी नाहीतर दंड मार्गांने तो इस्लामकडे आणीत होता. अरबेतरांना इस्लामची दीक्षा देणे तो पाप समजत होता कारण त्याला तसा आदेश जिब्रालने दिला होता.
महमदाच्या जीवनकाळात अनेक आरेमियन काळ्या आफ्रिकी वंशाच्या लोकांनी इस्लामची दीक्षा महमदाकडून मांगितली होती पण महमदाने त्यांना तेंच सांगितले किं, त्यांनी त्यांचा परंपरागत जो पंथ, धर्म आहे तोच पाळावा कारण देवांनी प्रत्येक मानव समाजासाठी वेगवेगळा धर्म सांगितला असून त्या त्या मानव समाजांनी तोंच धर्म पाळावा. जर त्यांनी असें केले नाही तर तो देवाच्या दरबारात गुन्हा ठरतो. असें असतांना महमदाच्या पश्र्चात अबु बक्र, उथमन, उमर ह्या त्याच्या शिष्यांनी तो पवित्र नियम पायदळी तुडवून अरबेतरांना नियमबाह्य अशा प्रकारे इस्लामची दीक्षा दिली अरबाचे साम्राज्या मध्य पूर्वेत प्रस्थापित केले. त्या नंतर त्या बाटलेल्या मुसलमानांनी इस्लामचा प्रचार इतरत्र केला महमदाच्या आदेशाला पायदळी तुडवून मोठे पाप (शिर्क) केले.
एकंदर पहाता हा जो इस्लामचा विस्तार झाला आहे तो इस्लामच्या पवित्र नियमांचे उल्लंघन करून झाला आहे. आता जे अरब पेट्रोलच्या पैशाने श्रीमंत झाले आहेत त्यांना ही चुक सुधारण्याची इच्छा आहे असें बर्याचशा अरबांच्या शेखांनी ठरवले त्यात सौदी अरब अग्रणी आहेत. ही चुक कशी सुधारावयाची हा एक मोठा यक्ष प्रश्र्न आहे. कारण, आज जर ह्या चुकींने बाटवलेल्या मुसलमानांना हे सांगितले किं, ते महमदाच्या मूळ आदेशानुसार मुसलमान नाहीत तर हे खोटे मुसलमान ते सहजपणे स्वीकारणार नाहीत इतकी वर्षे ते इस्लामी वळणात रुळलेले असल्याने आता पुन्हा ते त्याच्या मूळ धर्माकडे वळणार नाहीत. असें दिसते कारण, त्यानंतर बरेच पाणी त्यावरून वाहून गेले आहे.
ह्यावर जो भयंकर इलाज अरबांनी योजला आहे ते पुढे पाहू.
पुढील पोस्ट मधून हा विषय चालू राहील. -
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या १४११६०
अपंग, गलितगात्र, अज्ञानी, म्हातारे, कुरुप, दरिद्री हीन कुळातील लोकांचा ब्राह्मण कधीही अपमान करणार नाही. १४१
ब्राह्मण पारोसा असेत तर तो गाईला, दुसर्या ब्राह्मणाला अग्निला स्पर्श करणार नाही. तो आजारी असेल तर रात्रीचे तारे पारोसा असतांना पाहिल. १४२
जर त्यांने पारोशात असतांना स्पर्श केला तर तो पाण्यांने त्याचे अवयव धुवेल बेंबीला पाणी लावेल. १४३
ब्राह्मण आजारी नसेल तर त्यानी त्याच्या शरीरातील छिद्रांना (नाकातील, कानातील, गुदद्वार इत्यादि) हात लावू नये. तसेंच गुह्येंद्रीयांवरील केंसांना (झाटे) हाताने स्पर्श करू नये. १४४
तो आग्रहपूर्वक चांगल्या रितीभाती वर्तणूक ह्यांचे पालन करील. स्वच्छता पाळेल, भोग इंद्रीयांचे संयमन करील, सतत प्रार्थना पुटपुटत राहील, आणि कटाळता पवित्र अग्नीला अर्ध्य देईल. १४५
जो ब्राह्मण असें वर्तन ठेवील त्याला कधीही संकटांना सामना करावा लागणार नाही. १४६
वेदाचे वाचन ही सर्वोत्कृष्ट जबाबदारी आहे असें जाणून तो कंटाळता योग्य वेळी ते करीत राहील. बाकी सर्व गोष्टी ब्राह्मणाला दुय्यम असल्या पाहिजेत. १४७
जो ब्राह्मण वेदांचे वाचन नियमानुसार नेमांने करील, जो स्वच्चता पाळतो, वैगाग्याचे पालन करतो, दुसर्या जीवांस त्रास देणार नाही तो पूर्वजन्माचे ज्ञान मिळवतो. १४८
जो पूर्वजन्माचे ज्ञान प्रप्त झाल्यावर पुन्हा वेदांचे पठण करीत रहातो तो चिरंतर सुखी होतो. १४९
पर्वाच्या काळात तो सावित्रीचे मंत्र पढत रहिल. त्यामुळे अनिष्ट प्रसंग टाळता येतील. अष्टकांचे अन्वष्टकांचे वेळी पितरांचे स्मरण करील. १५०
रहात्या घरापासून दूर लघवी, शौंचास, पाय धुणे, उष्टी खरकटी टाकील. आंघोळसुद्धा दूर करील. १५१ टीपः म्हणजे ह्या गोष्टी घरात करू नयेत.
शौंचास फक्त पहाटेच करावा. त्यानंतर मुखमार्जन (तोंड धुणे), स्नान केल्यावर सर्वांगाला ब्राह्मणी दर्शक भस्म, गंधाचे पट्टे रंगवावेत, डोळ्याला सुरमा लावावा त्यानंतर देवाच्या पुजेस बसावे. १५२ टीपः इतर वर्णाच्या द्विजांनी त्यांच्या दर्शक चिंहे अंगावर रंगवावीत.
परंतु, पर्वाच्या दिवशी तो त्याच्या भल्यासाठी देवांच्या प्रतिमांचे दर्सन घेईल. सद्गुणी ब्राह्मणाचे दर्शन घेईल, त्यानंतर राजाचे दर्सन घेईल, तसेंच स्वताच्या गुरूचे दर्शन घेईल. १५३
शक्यतोवर तो आदरणीय सज्जनांचा सत्कार करील, त्यांना स्वताचे आसन देईल, त्यांच्या जवळ हात जोडून बसेल, ते जेव्हां निघतील तेव्हां त्यांच्या बरोबर त्यांच्या थोडे मागून चालत जाऊन त्यांना निरोप देईल. १५४
तो कंटाळता सद्गुणी जनांचे जे त्याच्या व्यवसायातील आहेत, अनुकरण करील. तसें करण्याचे आदेश पवित्र नियमांत दिले आहेत. तसेंच स्मृतीच्या पवित्र परंपरेत दिले आहे. कारण, सर्व नियमांचे तेंच मूळ आहे. १५५
सद्गुणांच्या आचरण्यामुळे दीर्घ आयुष्य, अपेक्षित संतति, अफाट संपत्ती, त्यामुळे अशुभ लक्षणांचे परिणाम नष्ट होतात. १५६
दुर्गुणी माणूस दोषी ठरतो. तो सदैव दुर्दैवी ठरतो, त्याला अनेक व्याधी होतात तो अल्पायुषी होतो. १५७
शुभ लक्षणे अजिबात नसलेला माणूस सद्गुणी लोकांचे अनुकरण करीत असेल तर तो इतरांच्या द्वेषापासून अलिप्त राहील शंभर वर्षे जगेल. १५८
ज्या कामांसाठी त्याला इतरांवर अवलंबून रहावे लागते तशी कामे त्यांने घेऊ नयेत. परंतु, ज्या कामात यश सर्वस्वी स्वतावर अवलंबून आहे अशी कामे जरूर घ्यावीत. १५९
जेव्हां दुसर्यावर अवलंबून रहावे लागते तेव्हां त्रास सहन करावा लागतो. स्वावलंबनात आनंद असतो. म्हणून हे लक्षात असू द्यावे किं, हि त्रास (वेदना) आनंद ह्यांची थोडक्यात व्याख्या आहे. १६०

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा