रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

अरबांची कुत्री – १२

इस्लाम धर्मात पांच गोष्टी करणे बंधनकारक असते. जो त्यांचे नित्यनेमांने पालन करतो तो मुसलमान असें मानले जाते. परंतु, ह्यात एक मेख आहे. ती अशी किं, हे पांच नियम पाळूनसुद्धा जर तो इसम इतर अशा गोष्टी ज्या इस्लामने वर्ज ठरवल्या आहेत त्यासुद्धा करीत असेल तर तो माणूस मुसलमान समजला जात नाही. म्हणजे असें, समजा कोणी अल्लाहच्या नांवाने पांच वेळा नमाज पढतो त्या बरोबर इतर देव अथवा साधूंनासुद्धा नमस्कार करतो अथवा व्यसनात रहातो तर त्याने पढलेले नमाज खोटे ठरतात.
आपण थोडक्यात ह्या पांच गोष्टी कोणत्या ते पाहूया.
पहिला, अल्लाहला फक्त अल्लाहलाच मानणे त्या बरोबर महमदालाच फक्त अल्लाहचा एकमेव संदेशवाहक (प्रेषित) मानणे.
दुसरा, दिवसातून पांच वेळा तेसुद्धा मक्केच्या दिशेने नमाज पढणे हे मुसलमानाला बंधनकारक आहे.
तिसरा, रमदानच्या महिन्यात तीसही दिवस दिवसाच्या काळात म्हणजे सूर्य आकाशात आहे त्या काळात निर्जळी उपवास करणे.
चौथा, आपल्यापेक्षा गरीब असलेल्यांना मदत करणे.
पांचवा, वर्षातून एकदा मक्केला तीर्थयात्रा करणे. इस्लाम फक्त अरबांसाठी असल्याने अशी तीर्थयात्रा करणे सहज होते. परंतु, जेव्हा हा इस्लाम अरबेतरांत पसरवला गेला तेव्हां त्यांत बर्याच सवलती कराव्या लागल्या कारण दरवर्षी मक्केला तीर्थयात्रा करणे सर्व बाटग्यांना केवळ अशक्य होते. हा नियम सोडून इतरांबद्दल मात्र हे बाटगे मुसलमान फार आग्रही असतात.
ह्यांतील चार गोष्टी इस्लामच्या आधीपासून अरबलोक पाळत होते त्या मूळ अरब धर्माच्या आहेत. फक्त पहिला नियम महमदाने त्यात घालून इस्लामची अरबांसाठी स्थापना केली आहे.
त्याशिवाय नशा करणे, धुम्रपान करणे, जुगार खेळणे, सावकारी करणे, वेश्यागमन करणे, नांच-गाणे ह्यात रमणे, चोरी करणे, विश्र्वासघात करणे, गरीबाला लुबाडणे, खोटे बोलणे, परस्त्री अथवा परपुरुषाशी संबंध ठेवणे अशी व्यसने करणे वर्ज्य आहे. अशामध्ये जो रमतो तो मुसलमान नाही.
आता ह्यात भेद कोठे होतो ते पहावे लागेल. समजा कोणी अल्लाहला नमाज पढतो त्याच बरोबर इतर कोण्या महंतालासुद्धा पुजतो असें असेल तर तो इसम नियमानुसार मुसलमान रहात नाही. म्हणजे असें किं, तो अल्लाहला पुजतो त्याच बरोबर अजमेरच्या चिस्तीला सुद्धा मानतो मक्काला यात्रा करतां अजमेरला यात्रा करतो तर तो माणूस सच्चा मुसलमान समजला जात नाही. कारण त्याच्या ह्या वागण्यामुळे तो इस्लामचा पहिला नियम मोडत असतो. मात्र असा इसम सुफी समजला जातो.
कोणी हे नियम कांहीं कारणामुळे अथवा विनाकारणसुद्धा पाळत नाही पण कुराणाचे नित्य वाचन करतो तरीसुद्धा तो मुसलमान समजला जात नाही. जो रमदानच्या महिन्यात उपवास करीत नाही, एकदासुद्धा नमाज पढत नाही, अल्लाह बरोबर अलीलासुद्धा मानतो तो सच्चा मुसलमान समजला जात नाही. म्हणून शियापंथी मुसलमान खरे मुसलमान नाहीत असें सुन्नीपंथी मुसलमान सांगतात.
अरबांच्या नियमानुसार कुराण सोडून इतर कांहींसुद्धा वाचावयाचे नाही. हे सर्व पहाता असें दिसते किं, आजचा कोणीही आपल्या देशातील मुसलमान खर्या अर्थांने मुसलमान नसतो. त्याशिवाय इतर कांहीं गैरसमज आहेत तेसुद्धा पाहिले पाहिजेत.
मुसलमान लहान मुलाची सुनता करतात. म्हणजे, त्याच्या शिश्नावरील चामडी कापून टाकण्याचा तो विधी असतो. तत्त्वतः सुनता ह्या विधीचा खर्या मुसलमान धर्माशी अजिबात संबंध नाही. कारण हा विधी ह्या पांच नियमात समाविष्ट केलेला नाही. म्हणजे जर सुनता केला नसेल पण वर दिलेल्या पांच गोष्टींचे काटेकोरपणे पालन करीत असेल तर तो मुसलमान ठरतो. सुनता हा विधी अरबांनी यहुदी लोकांकडून घेतला असून त्याचा संबंध अरब संस्कृतीशी आहे, धर्माशी नाही.
म्हणजे, कुराण वाचणे, सुनता करणे, अरबाच्या कपड्याची, रीतरिवाजाची नक्कल करणे, तसें दिसण्याचा प्रयत्न करणे हे केल्याने आपण मुसलमान झालो असा एक गैरसमज आहे आपल्या येथील बहुतेक मुसलमान ह्यालाच धर्म समजतात खर्या इस्लामचे कधीच पालन करीत नाहीत आणि जरी केले तरीसुद्धा महमदाच्या आदेसानुसार असा कोणीही अरबेतर माणूस मुसलमान ठरत नाही.
सुफी धर्मात असें कांहीं नियम नाहीत. त्यात फक्त खुदाला स्मरून माणूसकी पाळून रहावे एवढेच बंधन असते. ते बंधन हिंदूस्तानातील बहुतेक सर्वच मुसलमान पाळतात म्हणून हे लोक मुसलमान नसून सुफी आहेत असे समजणे जास्त योग्य ठरते. स्वताला मुसलमान सांगून अरबांची कुत्री बनण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वताला मुसलमान ऐवजी सुफी सांगणे केव्हाही श्रेयस्कर ठरते कारण तेंच सत्य आहे. सामान्य स्त्री-पुरुषांस आचरण्यास सहज असा हा धर्म आहे. तो जास्त नैसर्गिक आहे म्हणून हिंदूस्तानातील बाटग्यांनी स्वताला सुफी धर्मी समजणे सर्वांसाठी श्रेयस्कर आहे. अरबांशी लोचटपणा करतां अभिमानाने ह्या मंडळींनी रहावे असे सांगावेसे वाटते. सुफी हिंदूंत सख्य आहे त्याचाही फायदा दोनही समाजांना होईल म्हणून ह्याचा विचार सर्व बाटग्या मुसलमानांनी करावा असें मला वाटते.

पुढील पोस्ट पासून "हिंदू कोण", हे पुस्तक क्रमशः देणार आहे त्यामुळे हिंदूंच्या मनातील अनेक समज-गैरसमज ह्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा करतो. साधारण हिंदूंना आपण हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत तेच माहीत नसते त्यासाठी ही लेखमाला मी देत आहे.

मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या २२३२४५
जो ब्राह्मण शास्त्र जाणतो तो कधीही शुद्राकडचे शिजवलेले अन्न शिधा म्हणून स्वीकारणार नाही. जो ब्राह्मण श्राद्धविधी करीत नाही परंतु, अगदी नाइलाज झालातर शुद्राकडून कोरे अन्न तेसुद्धा एकारात्रीपुरते घेऊ शकतो. २२३
कंजूष श्रोत्रीय दिलदार सावकार ह्यांकडून योणारा शिधा समसमान मानून देव तो स्वीकारतात असे समजले जाते. २२४
त्यावर प्रजापति जो सर्वांचा जनक असें सांगतो किं, जे समान नाही त्याला समान समजणे अयोग्यच आहे. सावकाराने दिलेले श्रद्धेने सुद्ध करता येईल पण इतरांचा शिधा श्रद्धेशिवाय अशुद्धच रहातो. २२५ टीपः येथे देव प्रजापति ह्यांच्यात मतभेद असल्याचे दाखवले आहे.
सावकाराने थकता सदैव श्रद्धपूर्वकपणे ब्राह्मणांना दाने करीत रहावे तसेंच सत्कार्याला मदत करीत रहावे. त्यामुळे त्याची शुद्धि होईल, त्याला त्याचे चांगले फळसुद्धा मिळेल. २२६
त्या सावकारांने नेहमी जमेल तितके आनंदी मनाने आपली कामे करावीत जेव्हां लायक ब्राह्मण भेटेल तेव्हां त्याला शिधा द्यावा. २२७
ब्राह्मणांनी जर कांही वस्तु मागितली तर ती त्यांने मग ती वस्तु कितीही लहान असो मोठ्या मनाने द्यावी जर असें त्यांने केले तर त्याची पापापासून मुक्तता होईल. २२८
पाण्याचे दान करणार्याला भूक तहान ह्यांपासून मुक्ती मिळते, अन्न देणार्याला अनंत आनंद मिळतो, तीळाचे दाणे देणार्याला उत्तम संतति होते, दिवा देणार्याला उत्तम दृष्टीसुख मिळते. २२९
जमिनीचे दान करणार्याला मोठी जमीन मिळते, सोने देणार्याला दिर्घायुष्य मिळते, घर देणार्याला मोठा वाडा मिळतो, चांदी देणार्याला उत्तम सौंदर्य मिळते. २३०
वस्तराचे दान करणार्याला चंद्रलोकात स्थान मिळते, घोडा देणार्याला अश्र्वीनलोकात स्थान मिळते, नांगराचा बैल देणार्यास सूर्यलोकी स्थान मिळते. २३१
गाडी अथवा गादी देणार्यास चांगली बायको मिळते, संरक्षण देणार्यास अधिसत्ता मिळते, धान्य देणार्यास अनंत सुख मिळते, वेदाचे ज्ञान देणार्यास ब्रह्मप्राप्ति होते. २३२
वेदाचे दान इतर सर्व वर सांगितलेल्या दानांपेक्षा जास्त श्रेष्ठ असते. २३३
ज्या कांहीं उद्देशाने दाता दान करतो त्याच प्रकारचे दान त्याला त्याच्या पुढच्या जन्मी सन्मानपूर्वकपणे प्राप्त होते. २३४
सन्मानपूर्वक दान देणारा घेणारा असें दोघेही त्यांच्या मृत्यू नंतर स्वर्गात जातात परंतु, जर दान देणे घेणे तसें नसेल तर मात्र ते दोघेही नरकात जातात. २३५
ब्राह्मणाने त्याच्या तपश्र्चर्येचा अभिमान दाखवू नये. खोटेपणा करू नये. इतर ब्राह्मणांचा अपमान जरी त्यांनी त्रास दिला तरी करू नये. सावकाराने दान केल्यावर त्या गोष्टीचा धिंडोरा पिटू नये. २३६
दानाचा धिंडोरा पिटल्यामुळे त्याचे महत्व तेज नष्ट होते. तपस्येचा बोलाबाला केल्याने त्याचे सामर्थ्य नाहीसे होते. ब्राह्मणाचा अपमान केल्याने अपमान करणार्याचे आयुष्य कमी होते. घमेडखोरीमुळे दानाचे फळ मिळत नाही. २३७
कोणत्याही जीवास वेदना देणे हांच उद्देश असेल तर त्या ब्राह्मणाची अध्यात्मिक शक्ति वाढते जी त्याला परलोकात साथ देते. जसें मुंगीचे वारूळ सावकासपणे वाढत रहाते. २३८
मृत्यूनंतर ह्या जन्मातील आई, बाप, भाऊ, बहीण असें कोणीही परलोकात साथ देण्यास येणार नाही तेथे फक्त ही अध्यात्मिक शक्ति साथ देते हे लक्षात ठेवावे. २३९
मनुष्य एकटाच जन्मतो, एकटाच मरतो, एकटाच पुण्य करतो, त्याची गोड फळे चाखतो, एकटाच पाप करतो त्याची कडू फळे चाखतो. त्याला साथीदार असते ते त्याचे कर्म, चांगले वाईट. २४०
मेल्यानंतर त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी ते प्रेत एकाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे अथवा मातीच्या ढेकळाप्रमाणे तेथेच टाकून जातात, किंवा विल्हेवाट लावतात. परंतु, त्याचे कर्म त्याच्या आत्म्याला लिंगदेहाच्या रुपाने पकडून रहाते. २४१
त्यासाठी माणसांने नेहमी थोडेतरी सुकर्म करीत रहावे. ते सुकर्म हींच त्याची जीवनाची खरी कमाई असते. सुकर्माच्या साथीने तो इहलोकात परलोकात सुखाने प्रवास करू शकतो. असें सुकर्म हांच त्याचा खरा मित्र समजावा. २४२
हा अध्यात्मिक मित्र त्याला, जो प्रामाणिकपणे आपली कामे पार पाडतो तपश्र्चर्यापूर्वकपणे जगून पापनाश करतो, तो परलोकात स्वताला तेजस्वीरित्या उत्तम लिंगदेहाने (सात्त्विक) सजवतो. २४३
ज्याला त्याच्या वंशाचा उद्धार करावयाचा आहे तो उच्च वंशाशीच नातेसंबंध वाढवेल, हलक्या वंशाशी संबंध टाळेल. २४४
जो ब्राह्मण नेहमी उच्च कुळाशी संबंध ठेवतो आणि हलक्या कुळांचा संपर्क टाळतो तो अधिक उच्च होतो जो तसें करीत नाही तो त्याचे वंशज शुद्र होतात. २४५

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा