गुरुवार, १० मार्च, २०१६

आपला देश गरीब असण्याची कारणे कोणती?

पहिले कारण, भारतीय माणसें एकमेकांचा द्वेष करतात.
आपला देश सतत दरीद्री अवस्थेत कां रहातो ह्या विषयावर एक संशोधन झाले त्याबद्दलची माहिती मी येथे देत आहे. ह्या देशात अप्रतिम बुद्धिमत्ता असलेले, अतुलनीय शौर्य असलेले, कुशाग्र व्यवस्थापकीय क्षमता असलेले, कुशल कारागीर, असें सर्वच उत्तम गुण असूनही असे कां होते हा सवाल आहे. गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर अशी अनेक उदाहरणे दिसून येतात किं, त्याप्रमाणे बघितले तर दिसते किं, आपला जेव्हा, जेव्हा पराजय झाला तेव्हा, तेव्हा कांहींतरी फंदफितुरी त्यास कारणीभूत होती. आपापसातील छोटे मोठे वाद, मतभेद, आसुया, जळफळाट आणि सुडबुद्धि अशा फंदफितुरीच्या मागे होती असें दिसते. त्याशिवाय ब्राह्मणांनी क्षत्रियांना बहिष्कृत करून त्यांना शुद्र ठरविणे त्यामुळे देशातून क्षात्र तेज नाहीसे होणे अशा कांहीं गोष्टी झाल्याचेसुद्धा दिसते. मोगलांचे आक्रमण उलटण्यात उत्तर भारतातील राज्ये अयशस्वी ठरण्याचे कारण तेथील बहुतेक क्षत्रियांना ब्राह्मणांनी शुद्र ठरवले होते. त्या आधीची सर्व आक्रमणे क्षत्रियांनी यशस्वीरित्या थांबवली होती. शुद्र ठरवल्यामुळे ते क्षत्रिय शस्त्रे बाळगु शकत नव्हती. ब्राह्मणांचे हे कृत्य निःसंशय त्यांच्या द्वेषी मत्सरी प्रवृत्तीचे द्योतक आहे. क्षत्रियांचे यश त्यांना बघवत नव्हते म्हणूनच ते असें करीत होते हे स्पष्ट होते.
बाहेरून आलेले मोगल असोत अगर फिरंगी टोपीवाले असोत ह्या सर्वांनी आपल्यातील फुटीर प्रवृत्तिचा भरपूर फायदा करून येथे त्यांची सत्ता स्थापन केली.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत असे होत असल्याचे आढळते. जोवर ही मद-मत्सर प्रेरीत वर्तणूक अशीच चालू राहील तोवर हे असेंच होत रहाणार हे निश्र्चित. मद-मत्सर हे षड्रीपुंपैकी दोन दोष आहेत हे आपण सर्व जाणून आहोत. षड्रीपु माणसाच्या सर्वप्रकारच्या आध्यात्मिक विकासांत बाधा आणतात हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. अध्यात्म शास्त्रानुसार षड्रीपुंपैकी क्रोध, मद आणि मत्सर हे अधिक धोकेबाज असतात. त्यात असेंही सांगितले आहे कीं, हे सहा, माणसाच्या जीवाच्या देहाच्या संवर्धनासाठी आवश्यक असतात परंतु, आत्म्याच्या शुद्धीसाठी मात्र बाधक असतात. पण जोवर ते सुरक्षित मर्यादेत रहातात तोवर सर्वकांहीं व्यवस्थित असते परंतु जसें ते त्या मर्यादे बाहेर वाढतात तसें ते त्या माणसास, म्हणजे त्याच्या देहांस, जीवांस आणि आत्म्यास बाधक ठरतात आणि म्हणूनच त्यांना षड्रीपु म्हणजे सहाशत्रु असें म्हणतात.

असेंसुद्धा सांगितले आहे कीं, जीवाच्या संवर्धनासाठी हे सहा उपयुक्त असल्यामुळे त्यांचे असणे हे सर्वस्वी वाईट नसते. म्हणजे, त्यांना सुरक्षित मर्यादेत ठेवणे महत्वाचे असतें. परंतु, माणूस हि सुरक्षित मर्यादा नेहमीच विसरतो त्यामुळे तो ह्याचा अतिरेक करून परिणामी अडचणीत येतो. आपल्या देशातील लोक हि सुरक्षित मर्यादा सहसा विसरतात त्याच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांच्या हातून अनेक चुका होतात. जर भारतीयांनी आपले मद मत्सर काबूत ठेवले तर त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ शकणार नाही. सवाल आहे, हे कसे साध्य करावयाचे हा. जगातील सर्वच मानव समाजात हे मद-मत्सर आढळून येतात परंतु ते बहुधा त्यांच्या सुरक्षित मर्यादेत असतात कोणीतरी ते तसें मर्यादेत ठेवण्यास भाग पाडतात त्यामुळे त्यांच्यात हे दोष बाधक ठरत नाहीत.

अशी अनेक उदाहरणे आढळतात ज्यांत यशस्वी झालेला इसम स्वतःच्या मदभावाच्या आहारी जातो इतरांना खिजवून त्यांच्यातील मत्सरभाव जागृत करतो त्यानंतर हा जळणे-जळवणेचा सिलसिला सुरू होतो तो शेवटी सर्वनाश होई पर्यंत तसांच चालु रहातो. षड्रीपुंचा विशेष गुण असा असतो किं, त्याला कमाल मर्यादा नसते. तसेंच किमान मर्यादासुद्धा नसते. माणसांने जर ते मर्यादेत ठेवण्याचा शहाणपणा ठेवला नाही तर हे असेंच होत राहिल आणि परिणामतः आपला देश असांच गरीबीत सडत राहील.
पुढील पोस्टमध्ये दुसरे कारण पाहू.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक ६१ - ८० वाचू या.
अर्धांगवायु झालेला, शरीरास सुज असलेला (हत्तीरोग झालेला), पांढरे कोड असलेला, वेडा, वेदांची निंदा नालास्ता करणारा अशांना बोलवू नये. १६१
जनावरांना प्रशिक्षण देणारा, ज्योतिष सांगणारा, पक्षी पाळणारा, शस्त्रांची विद्या शिकवणारा, अशांना बोलवू नये. १६२
पाण्याचा स्वाभाविक प्रवाह बदलवणारा, स्वाभाविक प्रवाहात बाधा करणारा, शिल्पकार, पाईक (संदेशवाहक) झाडे लावून त्यावर गुजराण करणारा (माळीकाम करणारा), अशांना बोलवू नये. १६३
कुत्री पाळणारा, गरुड पाळणारा, कुमारिकांस त्रास दोणारा, पशुंना त्रास देणारा, शुद्राकडून दान घेणारा, जो गण देवतांची (अनार्य देवतां) पुजा करतो, अशांना बोलवू नये. १६४
नितीमुल्ये मानणारा, नपुसक (हिजडा), दया याचना सतत करणारा (लाचार, लोचट), शेतीने उपजिवीका करणारा, जन्मतः पायात दोष असणारा (लंगडा, लुळा), पुण्यवान लोकांनी धिक्कारलेला अशांना बोलवू नये. १६५
धनगर, म्हैस रेडा पाळणारा, पुनर्विवाह केलेल्या बाईचा पति, मृत देह वाहणारा अशांना बोलवू नये. १६६
पवित्र नियमांचे ज्ञान असणार्यांनी अशा विधीत, जे देव आणि पितर ह्यांसाठी केले जातात त्यांत, सहभाग घेऊ नये. ज्या द्विजांचे वर्तन आक्षापार्ह आहे अशांच्या बरोबर जेवणांस बसवू नये. १६७
सुक्या गवतांस आहुती दिल्यास त्याचा अन्ही (अग्नी) चटकन विझतो तसेंच अज्ञानी ब्राह्मणाला दिलेले अन्न मातीमोल होते. १६८
मी आता सांगतो, जर अयोग्य ब्राह्मणांस देव पितरांचे जेवण दिले तर त्या यजमानाचे त्याच्या मृत्युनंतर काय होते. १६९
अध्याय केलेल्या ब्राह्मणास किंवा इतर अयोग्य माणसास जेवण दिले तर ते रक्षस, परिवेत्री किंवा सामान्य माणसास देण्यासारखे असते. १७०
परिवेत्री अशा इसमांस म्हणतात ज्याने आपल्या वडीलभावाच्या आधी लग्न किंवा अग्निहोत्र विधी केला आहे. १७१
वडील भाऊ जो धाकट्या भावानंतर लग्न करतो जो धाकटा भाऊ मोठ्या भावाच्या आधी लग्न करतो, तसेंच जो बाप अशा लग्नात आपले कन्या देतो जी मुलगी असें लग्न करते, तसेंच त्या लग्नास संपन्न करणारा पुरोहितसुद्धा असें सर्व नरकांत जातात. १७२
जो पुरुष आपल्या मृत भावाच्या बायकोशी पदर लावतो तीला त्यापासून मुल झाले आहे अशा पुरुषाला दिधीशुपति असें म्हणतात. १७३
नवरा जीवंत असतांना जर पत्नी मुलाला जन्म देते तर त्या मुलाला कुंद म्हणावे नवरा मेल्यानंतर मुल झाले तर त्या मुलास गोलक असें म्हणावे. १७४
असा ब्राह्मण ज्याचा बाप त्याच्या आईचा पति नाही (भडवा ब्राह्मण) तशाला श्राद्धाचे जेवणांस बोलवल्यास यजमानाला ह्या जन्मात फायदा होत वा नंतरच्या जन्मात फायदा होत. १७५
अनेक लायक ब्राह्मणांना श्राद्धाच्या जेवणांस बोलावले त्याबरोबर एक नालायक माणूस तेथे ते ब्राह्मण जेवतांना ते बघत बसला तर ती दिलेली सर्व जेवणे व्यर्थ गेली असें समजावे. असा यजमान मूर्ख समजावा. १७६
श्राद्धाच्या जेवणांस जर एक आंधळा आला तर यजमानाचा तोटा, नव्वद ब्राह्मणांना बोलावण्याने जो फायदा एवढा असतो. एक डोळा असलेला आला तर साठ ब्राह्मणांना बोलवण्याने होणार्या फायद्या एवढा तोटा असतो. महारोगी बोलवला तर शंभर ब्राह्मणांना बोलवण्या एवढा तोटा असाध्य व्याधींने पिडीतांस बोलवल्यास हजार ब्राह्मणां एवढा तोटा असतो. १७७
शुद्राने जेवणार्या ब्राह्मणांस ते जेवत असतांना स्पर्श केला तर सर्व श्राद्धांचे फळ नष्ट होते. १७८
लोभांने जर एकाद्या वेद जाणणार्या ब्राह्मणांने शुद्राकडून भेटवस्तु घेतली तर तो ब्राह्मण कच्चे मडके जसें पाण्यात सोडल्यास नाश पावते तसा नष्ट होईल. १७९
सोम विकणार्या ब्राह्मणांस दिलेले जेवण शेण होते, वैद्यास दिलेले पुंवासमान होते, देवळाच्या पुजार्यास दिलेले व्यर्थ जाते, व्याजबट्ट्याचा धंदा करणार्यास दिलेले देवांच्या हिशोबी काडीमोल असते. १८०




पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा