मंगळवार, २२ मार्च, २०१६

आपला देश सतत गरीब असण्याचे दुसरे कारण –

मागील पोस्टमध्ये आपल्या देशाच्या कायम गरीब असण्याचे पहिले कारण, एकमेकांबद्दल मत्सर द्वेषाची भावना असणे हे पाहीले. आता दुसरे कारण पहावयाचे आहे.
दुसरे कारण आहे आपल्या देशाची वाढती लोकसंख्या. हे कारण चांगले समजण्यासाठी आपण आपल्या कुटुंबाचे उदाहरण पहावे. जर आपण जास्त मुलांना जन्म दिला तर त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बिघडते, नेमके तसेंच देशाच्या अर्थव्यवस्थेचे असते.
तसें पाहिले तर आपल्या देशानी बरीच प्रगती केलेली आहे. पण ज्या वेगांने प्रगती होत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेगांने आपल्या देशाची लोकसंख्या वाढत आहे.
ज्या काळात अण्णा हजारे तेजीत होते तेव्हां मी एक पत्र लिहून त्यांना विनंती केली होती किं, त्यांनी त्याचा तरुण भारतीयांवर जो प्रभाव आहे त्याचा वापर करून त्या सर्व तरुण मंडळींत कुटुंब नियोजनाचा संदेश रुजवावा. मला मोठी आशा होती किं, अण्णा हजारे त्याप्रमाणे तरुणांत कुटुंब नियोजनाचा संदेश पुन्हा नव्याने नेतील. परंतु, दुर्दैवांने तसे झाले नाही. कांहीं दिवसांनी मला उत्तर आले किं, अण्णा कुटुंब नियोजना बद्दल तरुणांत कांहीही बोलणार नाहीत. त्यांना त्यांच्या जनाधाराची जास्त फिकीर होती.
एका दृष्टीने बरोबरच आहे कारण, कांहीं वर्षांपूर्वी काँग्रेस शासनाने उत्तर भारतात संजय गांधीच्या पुढाकारात अशीच एक कुटुंब नियोजनाची मोहीम राबवली होती. त्यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी झाला होता. ह्याचा अर्थ साधारण भारतीय लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्व समजलेले नाही असे समजावे लागेल. असें असले तरी एक गोष्ट आपण पहातो किं, वरच्या वर्णाचे सुशिक्षित हिंदू मोठ्या प्रमाणांत कुटुंब नियोजन करतांना दिसतात. त्या उलट खालच्या वर्णातील हिंदू तसे करीत नसल्याचे दिसून येते. ह्याचा एक वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सुशिक्षित हिंदूंची संख्या कमी होत असून खालच्या वर्णाच्या अशिक्षित हिंदूंची संख्या भरमसाटपणे वाढत आहे. जर असेंच चालू राहिले तर कालांतराने अशी एक वेळ येईल किं, सुशिक्षित हिंदूंची संख्या नगण्य होईल अशिक्षित हिंदूंची संख्या वाढून हिंदू समाज एक मूर्ख लोकाचा समाज अशी परिस्थिती निर्माण होईल. अशा अशिक्षित समाजाला कोणीही धूर्त प्रतिस्पर्धी सहजपणे बरबाद करू शकेल.
एका सर्वेक्षणानुसार जरी आज पासून सर्व भारतीयांनी कुटुंब नियोजन अमलांत आणावयाचे अगदी प्रामाणिकपणे ठरवले तरी आत्ताच जी भरमसाटपणे जनसंख्या वाढलेली आहे त्याचा परिणाम स्वरूप विकासाचा दर निदान येत्या पंचवीस वर्षांत कमी होणार नाही. म्हणजे, कुटुंब नियोजन करूनही देश असाच गरीबच राहील. त्यानंतर सावकाशपणे गरीबी कमी होत असल्याचे दिसू लागेल.
त्यात भरीत भर म्हणून किं काय, कांहीं धर्माच्या पुरोहीतांनी त्याच्या अनुयायांनी कुटुंब नियोजन करू नये असा सल्ला देण्यास सुरुवात केलेली आहे.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक ८१ - २०० वाचू या.
वाईट उद्योगांत असलेल्या ब्राह्मणास दिलेले जेवण जो ब्राह्मण पुनर्विवाहीत स्त्रीच्या पोटी जन्मलेला आहे त्याला दिलेले जेवण ही दोनही जेवणे राखेत आहुती देण्यासारखी असतात. १८१
वर उल्लेख केलेल्या अयोग्य ब्राह्मणांना जेवण दिले तर त्याचे शेण, पू, चरबी, मूत्र, खराब रक्त, असें होते. १८२
आता सांगतो, अयोग्य प्रकारच्या ब्राह्मणांमुळे जर श्राद्धविधी बिघडला असेल तर त्याचे शुद्धीकरण कसें करावयाचे. १८३
त्यासाठी श्रोत्री परंपरेतील विद्वान ब्राह्मण जे वेद अंगे ह्यांच्यात पारंगत आहेत, तेंच असें शुद्धीचे काम करू शकतात. १८४ टीपः श्रोत्री म्हणजे वेद पठणाची परंपरा असलेल्या घरातील.
श्रोत्रीतील त्रिनाकीकेत, जो पांच अग्नी सांभाळतो, त्रिसुपर्ण, जो सहा अंगांत (वेदांची अंगे) प्रवीण आहे, ब्रह्म विधीने लग्न झालेल्या स्त्रीचा मुलगा असा ब्राह्मण, आणि जो वेद गातो. १८५
वेदाचा अर्थ ज्याला माहीत आहे, जो वेदांवर भाष्य करू शकतो, वेदांचा अभ्यासक, ज्याने हजार गाईंचे दान केले आहे, आणि ज्या ब्राह्मणाचे वय शंभर झाले आहे. हे ब्राह्मण शुद्धी करू शकतात. १८६
श्राद्धाच्या दिवसा आधी किंवा त्याच दिवशी वर दिल्याप्रमाणे तीन ब्राह्मण सन्मानपूर्वकरित्या बोलवावेत. १८७
आदिदैवतांच्या (पितरांच्या) स्वागतासाठी जो ब्राह्मण बोलावला असेल त्यांने भोगइंद्रियांचे संयमन करावे तेथे वेदांचे पठण करू नये. १८८ टीपः भोगइंद्रियांचे संयमन म्हणजे त्यांने स्त्रीशी आदल्या काळात संग केलेला नसावा.
यजमानाने पितरासाठी बोलवलेल्या ब्राह्मणाचे अनुकरण त्याच्या जवळ राहून करावयाचे असते. १८९
श्राद्धासाठी बोलवलेल्या ब्राह्मणांने जर गैरवर्तन केले तर तो पुढील जन्मी डुक्कर होईल. १९०
श्राद्धास बोलवलेल्या ब्राह्मणांने जर शुद्र स्त्री बरोबर संग केला तर तो असा दोषी ठरते किं, त्याच्या यजमानाच्या सर्व पापांचा तो धनी होतो. १९१
आदिदैवते (पितर) अतिप्राचीन आहेत ती क्रोधमुक्त असतात. ती अतिशुद्ध चारित्र्याची विघ्नविरहीत असतात. ती पुण्यवान असतात. १९२
आता सांगतो, ह्या आदिदैवतांचे म्हणजेच पितरांचे मूळ कोणते आणि कोणत्या विधीनीं त्यांचे पुजन करावे. १९३
अनेक प्रकारचे हे आदिदेव थोर ऋषींची (मानस) लेकरे असतात. त्यांत मरिकी इतर बरेच आहेत. त्यांत मनुची मुलं, हिरण्यगर्भाची मुलं येतात. १९४
सोमसद् विरागाची मुलं, ही साध्य अग्नीश्र्वत्त ह्यांची आदिदैवते असें समजले जातात. मरिकीची मुलं देवांची दैवते आहेत असें समजले जाते. १९५
बृहीषद् अत्रीची मुले, ही दैत्य, दानव, यक्ष, गंधर्व, नागदेवता, राक्षस, सूपर्ण आणि किन्नर ह्यांची दैवते आहेत असे मानले जाते. १९६
ब्राह्मणांसाठी सोमप, क्षत्रियासाठी हर्विभोग (हविश्मत), अग्यप वैश्यांसाठी आणि सुकलिन शुद्रांसाठी आहेत. १९७
सोमप भृगुची मुलं आहेत, हविश्मत ही अंगिरसाची, अग्यप पुलस्त्याची परंतु, सुकलिन ही मात्र वशिष्ठाची आहेत. १९८
इतर आदिदैवते (पितर) जसें अग्नीदग्ध, अनग्नीदग्ध, कवी, बर्हीषद, अग्नीश्वत आणि सौम्य ही केवळ ब्राह्मणांची आहेत. १९९
आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी किं, ह्या जगात असंख्य उपदैवते कार्यरत असून ती ह्या पितरांची अपत्ये आहेत. २००

पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com
आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा