गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान

वाद सुरु करण्या आधी मंडल मिश्राच्या पत्नीने शंकरला तिच्या काही अटी घातल्या त्या ऐकून शंकर त्याचे अनुयायी हसू लागले त्या अटी अशा, जर शंकर हरला तर त्यांने त्याच्या अनुयायांनी एकतर ब्राह्मण धर्म सोडून जैन धर्म स्वीकारावा अथवा मासाहार सोडून जैन धर्मा प्रमाणे शाकाहार स्वीकारावा. पर्युषण काळात ऋषींचा आहार करावा, ऋषी पंचमीस असा आहार केला जातो. तसेंच वादाची सुरुवात मंडन मिश्राची पत्नी करील. वादात शंकरने दुसर्या कोणाचीही मदत घ्यावयाची नाही. शेवटी एक अट घातली ती अशी किं, ब्राह्मणांनी हिंदूंमध्ये शाकाहाराचा प्रचार करावा जैनांची भलामण करावी. शंकरने सर्व अटी मोठ्या आनंदाने स्वीकारल्या; कारण त्याला खात्री हाेती कीं, ताे हरणार नाही.
त्यानंतर वादास प्रारंभ झाला. पहिलाच प्रश्र्न तिने जो विचारला तो पतिपत्नी संबंधा बाबतचा होता. शंकर त्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकला नाही. पुढे तिने दुसरा प्रश्र्न विचारला तो सुद्धा असाच संसारिक बाबीबाबतचा होता. त्याचे सुद्धा उत्तर शंकर देऊ शकला नाही. शेवटी तिसरा प्रश्र्न तिने विचारला आता जर शंकर त्याही प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकला नाही तर तो हरला असे घोषीत होणार अशी परिस्थिती उत्पन्न झाली. शेवटी मंडन मिश्राच्या पत्नीने शेवटचा प्रश्र्न विचारला. हा प्रश्र्नसुद्धा प्रपंचा बाबातचाच होता. शंकरच्या बाजूस बसलेल्या अनेक विवाहीत वेश्यागमन करणार्या ब्राह्मणांना त्या सर्व प्रश्र्नांची उत्तरे माहीत होती परंतु नियमानुसार ते शंकरला मदत करु शकत नव्हते. शेवटच्या प्रश्र्नाचे सुद्धा उत्तर शंकर देऊ शकला नाही अशारितीने मंडन मिश्राच्या पत्नीने शंकरचा वादात पराभव केला. तेथे जमलेल्या जैन लोकांनी शंकरची ब्राह्मणी विजयी नारिंगी पताका उतरवली जैनांची रंगीबेरंगी पताका फडकावली. अशारितीने शंकरचा पराजय झाल्या नंतर तो कायमचा हिंदूस्थान सोडून हिमालयात निघून गेला. त्याच्या अनुयायांनी मात्र सर्व अटींचे पालन केले ते आजतागायत करीत आहेत. जे ब्राह्मण शंकरचे अनुयायी हाेते ते शाकाहारी झाले त्याच प्रमाणे त्यांनी सर्व प्राचीन परंपरेने चालत असलेल्या ग्रंथांत फेरबदल करून जेथे जेथे गाय खाण्याचा उल्लेख आहे तेथे गौ म्हणजे गहू असा बदल केला. असे अनेक बदल करून हिंदूंचे मुळ ग्रंथ बदलून टाकले. त्याच प्रमाणे हिंदूंच्या घरी पुजा अर्चना करतांना काही वारी शाकाहार करावा असा खोटा प्रचार करून भोळ्या भाबड्या अशिक्षित हिंदूंना चुकीचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ती आजतागायत चालू आहे.
असे झाले तरी सर्व ब्राह्मण शंकरचे अनुयायी नव्हते. ऋग्वेदी यजुर्वेदी त्याचे अनुयायी होते ते शाकाहारी झाले परंतु, सामवेदी, अथर्ववादी शाक्त, अघोरी इत्यादी त्याचे अनुयायी नव्हते ते आजही मांसाहार करीत आहेत. म्हणजे एकंदर ब्राह्मणांच्या ४५% एवढेच शाकाहारी झाले. त्यातील सामवेदी जे गुजरात, राजस्थान भागात आहेत त्यांनी जैनांच्या सहवासामुळे नंतरच्या काळात शाकाहार स्वीकारला. काश्मीर मधील स्मार्त ब्राह्मण, बंगाल, अासाम, त्रिपुरा, अाेरिसा, मध्य भारत येथील मैथीली ब्राह्मण महाराष्ट्रातील स्मार्त सारस्वत, दैवज्ञ आणि शाणवी, गौडसारस्वत हे आजही मांसाहारी आहेत त्यांची संख्या एकंदर ब्राह्मणांच्या ५५% अाहे.
शाकाहार स्वीकारलेल्या ब्राह्मणांनी त्यांच्या शाकाहाराचा अशाप्रकारे बभ्रा केला आहे किं, एकाद्याचा असा समज व्हावा किं, सर्व हिंदू शाकाहारी असावेत. ह्या लोकांनी स्वताच्या हिंदूत्वाचा ब्राह्मणी हिंदूत्व असा उल्लेख केला पाहिजे. दुर्दैवांने ते तसा उल्लेख करण्याचे जाणीवपूर्वकपणे टाळतात.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक २३१ – २५० वाचू या.
खराेखरीच जन्मदाता गर्हापत्य अग्नी सारखा असताे, माता दक्षिणाग्नी व शिक्षक अहवन्य अग्नी सारखा असताे. हे तीन अग्नी अति आदरणीय असतात. २३१
जाे गृहस्थाश्रमात गेल्यानंतर ह्या तिघांना विसरणार नाही व त्यांची कदर करील ताे तीनही जगं जिंकेल. तेजस्वी काया प्राप्त झालेला असा हाेईल ब जगातील सर्व सुखं त्याला प्राप्त हाेतील. २३२
आईचा मान राखून पृथ्वीचे जग जिंकले, वडीलांचा मान राखून मध्य जग (आकाश) जिंकले आणि शिक्षकांचा मान राखून ब्रह्म जिंकले जाते. २३३
जाे ह्या तिघांचा मान राखताे ताे सर्व काही कर्तव्ये पूर्ण केल्याप्रमाणे सर्व काही मिळवताे परंतु, जाे त्यांचा अवमान करताे ताे सर्व काही (यज्ञयाग वगैरे) करूनही व्यर्थ ठरताे. २३४
जाेवर हे तिघे जीवंत आहेत ताेवर त्यांची सेवा करण्यात व त्यांच्या आज्ञा पाळण्यात, त्यांना सुख देण्यात धन्यता मानावी. २३५
परलाेकात उत्तम गति मिळाे म्हणून त्याने ह्या तिघांची परवानगी घेऊन सर्व काही (विचार, वाचा, आहार व कर्तव्य) करावे. २३६
ह्या तिघांचा मान राखून जे काही करावे, कारण, तेंच खरे कर्तव्य समजावे. त्या पेक्षा दुसरे काहीही अधिक महत्वाचे नसते. २३७
वेदांवर ज्याची अढळ श्रद्धा आहे ताे हलक्या माणसाकडून सुद्धा ज्ञान प्राप्त करू शकताे तसेंच हलक्या कुळात सुद्धा उत्तम लक्षणे असलेली पत्नी मिळवू शकताे. २३८
(वेदांवर विश्र्वास असलेला) जहरातूनही अमृत काढू शकताे, लहान मुलाकडून शहाणपण व शत्रुकडून मदत मिळवू शकताे. तसेंच अशुद्ध पदार्थांतून साेने काढू शकताे. २३९
उत्तम पत्नी, न्यायाचे नियम, शुद्धता, चांगला सल्ला आणि अनेक कला विद्या काेणाकडूनही मिळवता येतात, फक्त शाेधण्याची कला असली पाहिजे. २४०
आपद् काळी खरा विद्यार्थी वेदाचे ज्ञान अब्राह्मणाकडूनही प्राप्त करू शकताे. ताे त्या शिक्षकाच्या मागून चालेल जाेवर ताे त्याच्या कडून शिकत नाही. २४१
ज्याला स्वर्गात स्थान पाहिजे ताे कधीही अब्राह्मणाच्या बराेबर रहाणार नाही व ज्या ब्राह्मणाला वेदांचे व अंगांचे ज्ञान नाही त्याच्या बराेबरसुद्धा रहाणार नाही. २४२. टीप: वेदाची अंगे म्हणजे, उपनिषदे, अरण्यके व ब्राह्मणके हाेत.
परंतु, जर विद्यार्थी संपूर्ण आयुष्य शिक्षकाकडे रहावयाचा असेल तर त्यांने त्याची सेवा मरे पर्यंत केली पाहिजे. २४३
जाे ब्राह्मण शिक्षकाची सेवा आजन्म करील ताे त्याच्या मृत्युनंतर कायम स्वर्गात स्थान प्राप्त करेल. २४४
समावर्तन विधी (शिक्षण संपल्यावर स्वगृही जाण्याचा विधी) हाेण्याआधी विद्यार्थी शिक्षकाला काेणतीही भेट वस्तु देणार नाही. परंतु, शिक्षकाच्या परवानगीने ताे त्याच्या ऐपतीनुसार स्नानानंतर त्या शिक्षकाला भेटवस्तु देऊ शकताे. २४५
शेत, साेने, गाय, घाेडा, छत्री, जाेडे, आसन, धान्य, ताजी भाजी, असें काहीही ताे आपल्या शिक्षकांस भेट म्हणून देऊ शकताे. २४६
जाे विद्यार्थी शिक्षकाच्या घरी कायम रहाताे ताे शिक्षकाच्या मृत्युनंतरसुद्धा त्याच्या मुलाची (जर ताे मुलगा लायक असेल तर), बायकाेची अथवा शिक्षकाच्या सपिंडाची सेवा करीत राहील. २४७
जर ह्यापैकी काेणीही नसेल तर त्यांच्या पवित्र अग्निची सेवा अहाे रात्र त्याच्या मृत्यु पर्यंत करीत राहिल. २४८
जाे ब्राह्मण अशा प्रकारे आपले सेवा व्रत मरेपर्यंत पाळताे ताे त्याच्या मृत्युनंतर उच्च काेटीच्या जागी जाईल व पुन्हा जन्म घेणार नाही. २४९
मनुस्मृती भाग दुसरा संपला.

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा