सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान

शेवटी धर्मांची संरचना कशी असते ते पहावे लागेल.
धर्माच्या रचनेत दोन भाग आसतात. मुख्य तत्व त्यावरील आवरणासारखा भाग. मुख्य तत्व सर्वच धर्मांचे सारखेच असते. त्यात माणूसकी, चांगुलपणा ही तत्वे येतात. बाह्य आवरणासारख्या भागात मात्र फरक आढळतो. ह्या बाह्य धर्मामुळे विविध धर्मांतील भेद निर्माण होत असतात. बाह्य धर्मात त्या त्या धर्मांच्या प्रार्थनेचे प्रकार, त्यातील शिष्टाचार, चालीरिती इतर संस्कृतीक मुल्ये येतात. धर्माचे पालन करणे म्हणजे मुख्य तत्वाचे पालन करणे असा अर्थ समजले पाहिजे परंतु दुर्दैवाने तसे समजले जात नाही. बर्याच वेळा बाह्य भाग म्हणजेच खरा धर्म असा अपप्रचार हाेत असताे. विषेश म्हणजे त्याला त्या धर्माचा पुराेहीत वर्ग प्राेत्साहन देताे. शाकाहाराचे विनाकारण अवास्तव महत्व वाढवले आहे, त्याबद्दल थाेडे पहावे लागेल.
आपल्या देशातील मांसाहारी लाेक फक्त २५ टक्के मांसाहार करतात व शाकाहारी लाेक १०% मांसाहार करतात हे विधान तुम्हाला आश्र्चर्यकारक वाटेल परंतु हे सत्य आहे, ते कसे ते पाहूया. जैन धरून सर्व शाकाहारी लाेक दूध व त्याचे प्रकार जसे, दही, ताक, लस्सी, लाेणी, तुप, चीज, चक्का, दुधापसून बनवलेली पेये, हे सर्व खातात. ते सर्व मांसाहारात येतात कारण ते सर्व गाय, म्हैस अशा प्राण्यांच्या पासून मिळवले जातात (प्राणीजन्य) व ते सर्व मिळविण्यासाठी त्या गाईच्या अथवा म्हैशीच्या पाडाला मारुन मिळवले जातात म्हणजे हत्त्या करून मिळवले जातात. दुधाचा आहार सामान्यपणे १०% असताे. मांसाहारी हिंदूंच्या आहारात दुधाचे पदार्थ असतात त्याशिवाय इतर मांसाहार असताे. तरीसुद्धा बहुतेक अाहार प्रामुख्याने शाकाहार असताे.
आता थाेडे आहार शास्त्रात काय सांगितले आहे ते पाहूया.
माणसाच्या पचन संस्थेत पिष्ट व शर्करा ह्यांपासून प्रथिने बनवण्याची क्षमता नसते. त्यासाठी प्रथिने त्याला बाहेरुन घ्यावी लागतात. माणसाच्या शरिरात एकंदर प्रथिने २३ असतात. त्यापैकी २१ प्रथिने ताे शाकाहारातून मिळवू शकताे. उरलेली दाेन प्रथिने त्याला मांसाहारातूनच मिळवावी लागतात. त्यासाठी दुधाचा वापर केला जाताे. जर दुध शाकाहारी लाेकांनी घेतले नाही तर त्यांच्या आहारात दाेष उत्पन्न हाेऊन अनेक विकृती त्यांच्यात उत्पन्न हाेतात. म्हणजे पूर्णपणे शाकाहारी रहाणे माणसाला निसर्गाच्या नियमानुसार अयाेग्य ठरते. शाकाहाराचा आग्रह धरणे व त्याचा प्रतिष्ठेचा विषय करणे म्हणजे अनैसर्गिक जीवन जगण्या सारखे आहे. कारण, माणूस हा निसर्गाच्या नियमांनुसार एक मांसाहारी प्राणी आहे. नैसर्गिकपणे जे प्राणी शाकाहारी असतात त्यांच्या पचन संस्थेत पिष्ट व शर्करा ह्यांपासून प्रथिने बनवण्याची क्षमता असते. त्यांना दाेन जठरं असतात. ह्या सर्व चर्चेचा अर्थ असा हाेताे किं, माणसांनी शंभर टक्के शाकाहाराचा आग्रह धरणे केवळ मूर्खपणाचे व निसर्गाला अाव्हान देण्या सारखे आहे. आपल्या देशातील शाकाहारी लाेक बहुधा कुपाेषणाचे शिकार आहेत त्याचे कारण, ते मांसाहार करीत नाहीत. रहाता राहिलं दुधाबाबतचा विषय. दुधातील प्रथीनं (केसीन) पचवण्यासाठी जे विकर (एनझाइम) आवश्यक असतात ते माेठ्या माणसाच्या पाेटात तयार हाेत नाहीत. म्हणजे जे दुध पाेटात जाते ते सर्व पचतांच बाहेर टाकले जाते. ह्याचा अर्थ, दुध पिऊनही काेणत्याही प्रकारे फायदा हाेत नाही. हे बर्याच लाेकांना माह नाही.
समाप्त -
पुढील पाेस्टमध्ये नथुराम गाेडसेने ब्राह्मण समाजाचे कसे कल्याण केले ते पाहू.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लाेक १ – २१ वाचू या.
शिक्षकांकडे राहून वेद शिकण्याचे व्रत तीस वर्षे पाळावयाचे असते. परंतु, जर ताे हुशार असेल तर ते पंधरा वर्षाचे किंवा फक्त सात वर्षाचे असावे. नाहीतर वेद शिकण्यासाठी जेवढा काळ लागेल तेवढा काळाचे असावे.
ज्या विद्यार्थ्याने तीन वेद किंवा दाेन किंवा एकच वेद रीतसरपणे शिकून पूर्ण केला आहे ताे त्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करू शकताे.
जाे वारस हक्काने वेदाचा अभ्यास करताे त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला एका सुंदर आसनावर बसवून हार घालून नंतर त्याला एक गाय दान करावी व मध आणि तुपाचा प्रसाद द्यावा.
शिक्षण पूर्ण झालेला द्विज (ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य) आपल्या शिक्षकाच्या परवानगीने स्नान करील, त्यानंतर समवर्तन विधी (शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वगृही जाण्या आधी करावयाचा विधी) करील. त्यानंतर ताे याेग्य सुलक्षणी शरीर असलेल्या त्याच्याच जातीच्या स्त्रीशी लग्न करील.
द्विजांने लग्नासाठी जी स्त्री निवडावयाची ती त्याच्या आईकडून सपिंड (कुटुंबी) नसावी. तसेंच वडीलांकडून सुद्धा प्रत्यक्ष नातेवाईक नसावी.
कितीही महान, श्रीमंत, घाेडे, शेळ्या, धनधान्य अथवा इतर मालमत्ता असलेली असली तरी त्या कुटुंबात त्याने लग्न करू नये. अशी कुटुंबे काेणती ती पहा.
पवित्र नियमांचे पालन न करणारी, ज्या घरात फक्त मुली जन्मतात, ज्या घरात वेदांचा अभ्यास हाेत नाही, ज्या घरातील पुरुषांच्या अंगावर जाड केस आहेत, ज्या घरात पिढीजात व्याधी आहेत, ज्या घरातील पुरुषांत नपुसकता आढळते, ज्या घरात वेड अहे, ज्या घरात पांढरे काेड अथवा महाराेग झालेला इसम आहे.
त्याने अशी स्त्री करू नये जिचे केस लाल आहेत, जिच्या घरात खूप माणसे आहेत, जी नेहमी आजारी असते, जिच्या शरीरावर दिसतील असे केस (पाय, हात, चेहरा वगैरे भाग) आहेत, जिच्या डाेक्यावर कमी केस आहेत. जी फार बडबडी, वाचाळ, कजाग आहे, जिचे डाेळे लाल आहेत.
जिचे नांव नक्षत्रावरून, झाडावरून, हलक्या जातीतील नांव, पक्षी, साप, दास, पर्वत, ह्यांवरून ठेवले अाहे, तसेंच भिती वाटावी असे नांव आहे अशी स्त्री लग्नासाठी निवडू नये.
शरीरात काेणतेही व्यंग नसलेली, प्रसन्न करणारे नांव असलेली, सुडाैल बांधा असलेली, डाैलदारपणे चालणारी (गजगामिनी), डाेक्यावर भरपूर केस असलेली, लहान दांत असलेली, हात व शरीर नरम, मऊ असलेली अशी निवडावी. १०
शहाणा ब्राह्मण लग्नासाठी अशी बायकाे स्वीकारणार नाही जिला भाऊ, बाप नाहीत, जिला तिचा बाप काेण ते माहित नाही, तसेंच दत्तक घेतलेली, जी कुमारिका राहीलेली नाही, कारण अशा लग्नामुळे ताे पापी ठरू शकताे. ११
द्विजाच्या पहिल्या लग्नात बायकाे त्याच्या जातीचीच असावी पण नंतर आणखीन लग्ने करावयाची असतील तर पुढे दिलेल्या क्रमांने त्या त्या वर्णाच्या स्त्रीयांस निवडावे. १२
दुसरी ब्राह्मण अथवा क्षत्रिय असावी, तिसरी क्षत्रिय अथवा वैश्य असावी, शुद्र स्त्री लग्नाशिवाय ठेवावी कारण, ती फक्त शु्द्राशींच लग्न करू शकते. १३
काेठल्याही प्राचीन साहित्यात शुद्र स्त्री ब्राह्मणाची किंवा क्षत्रियाची प्रथम पत्नी असल्याचा उल्लेख आढळत नाही. जरी कितीही अडचण असली तरी ते शुद्र स्त्रीशी लग्न करीत नाहीत. १४
दुर्बुद्धीने जर काेणी ब्राह्मणांने शुद्र स्त्रीशी लग्न केले तर त्याचा र्हास हाेऊन त्याचे संपूर्ण कुटुंब शुद्र हाेईल. १५
अत्री व गाैतम ऋषींच्या मते त्यांचा मुलगा उतथ्य ज्याने शुद्र स्त्रीशी लग्न केले त्याला बहिष्कृत केले गेले. शाैनकाप्रमाणे मुलगा झाला तर ताे शुद्र ठरताे. भृगु व मनुच्या मते पुत्र प्राप्तीने (त्या शुद्र स्त्रीपासून) ताे ब्राह्मण शुद्र ठरताे. १६
जर ब्राह्मणाने शुद्र स्त्रीसह समागम केला व त्यापासून पुत्र झाला तर ताे मृत्युनंतर नरकांत जाताे. त्याला स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेता येणार नाही. १७
त्याचे कारण, आदिदैवतांनी (पितर) व इतर देवांनी अशा ब्राह्मणांने दिलेला प्रसाद खात नाहीत. विशेष करून जर ताे प्रसाद शुद्र स्त्रीच्या हातचा असेल तर. असा ब्राह्मण स्वर्गात कधीही जाणार नाही. १८
जाे ब्राह्मण शुद्र स्त्रीचे आेठ चाटताे, जाे तिचा श्वासाेंश्वांस घेताे अाणि ज्याला त्यामुळे पु्त्र प्राप्ति हाेते त्याला क्षमा नाही. १९ टीप: आदिदैवते म्हणजे, विश्र्वाच्या प्रारंभी जन्मलेले व म्हणून प्रथम मेलेले पूर्वज. श्राद्ध विधी त्यांच्या स्मरणांने करावयाचा असताे. एकाद्या माणसाच्या मृत वडिल, आजाेबा वगैरे ह्यांचा उल्लेख पूर्वज असा करतात. असे मानतात किं, पितरांच्या मदतीने पूर्वजांचे कल्याण करतां येते.
आता आपण जे आठ प्रकारचे लग्न विधी आहेत त्यांची माहिती करून घेऊया. चारही वर्णाचे लाेक, जे ह्या जगांत पाप, पुण्य कर्मे जीवंत असतांना व मेल्यानंतर सुद्धा करतात, ते अशारितीने लग्न करतात. २०
हे लग्न विधी असे अाहेत, ) ब्रह्म विधी, जाे ब्राह्मणांसाठी सांगितला आहे. ) देव विधी, ) ऋषी विधी त्याला अर्श विधी असेसुद्धा बाेलतात, ) प्राजापत्य, ) असूर, ) गंधर्व, ) राक्षस आणि ८) पैशाची असे ते आहेत. २१

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा