गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान
मागील पाेस्टवरून चालू -
वरील (मागील भागात दिलेल्या) श्र्लोकांवरून असे स्पष्ट होते किं, गाईचे मांस सर्वाधिक योग्य असल्याचे दिसून येते. जर गाय हा प्राणी देवांना पितरांना प्रसाद म्हणून देण्याचे संकेत आहेत तर असा प्राणी त्याच देव पितरांची माता कशी होऊ शकते? तिच्या उदरात सर्व देव कसे काय राहू शकतात? गाय देवांची माता ही कल्पना कोणी केव्हा आणली ती पुरोहीत वर्गामध्ये सर्वमान्य कशी झाली हे एक गुढ आहे. ही अशा अनेक भाकड कल्पना पुरोहीत वर्गाने आपले हिंदू समाजावरील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सुरु केल्या असाव्यात असा एक विचार प्रवाह आहे. असे करण्याचे कारण पौरोहित्य करणार्या ब्राह्मणांस त्यांची संपत्ती म्हणून गाई सांभाळण्याची प्रथा होती, त्या काळात अशा भाकड कथा सर्व लोकांत पसरवून ते त्यांच्या गोधनाला संरक्षण मिळवून देत होते. आपल्या गोधनास कोणीही चोरू नये एवढ्या एका उद्देशांने हे थोतांड ब्राह्मणांनी लोकांत पसरवले ते आजवर चालू आहे. साधारण हिंदू अशिक्षित राहील्यामुळे अशा थोतांडांना पसरवणे ब्राह्मणांना शक्य झाले. आज परिस्थिती बदललेली आहे. आज पुरोहीत वर्ग गाईंवर अवलंबून नाही तरी हे थोतांड कां चालू ठेवले आहे ते मात्र समजत नाही. गाय खाणे हे अनेक धार्मिक विधींसाठी (ऋग्वेद आणि यजुर्वेदातील यज्ञांत) आवश्यक असते जर तसे नाही केले तर ते यज्ञ त्या विधी निरर्थक ठरतात. कारण, ज्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी ते यज्ञ केले जातात त्या देवता गाईचीच आहुती स्वीकारतात. आजसुद्धा असे यज्ञ होत आहेत आणि त्याद्वारा यजमानांची फसवणूक होत असते.
आधीच्या एका पोस्ट मध्ये आपण पाहिले आहे किं, सर्व हिंदू देवता मांसाहारी आहेत त्याप्रमाणे पाहिले तर हे सर्व योग्य ठरते.
आता आपल्याला पहावयाचे आहे कीं, आजचे ब्राह्मण जैनांची एवढी भलामण कां करतात? आणि इतर हिंदूंना त्यांची नक्कल करावयास कां लावतात?
त्यासाठी आपण थोडे इतिहासाकडे जाणार आहोत.
आठव्या शतकात शंकर नांवाचा दैवज्ञ ब्राह्मण (त्याला सर्व ब्राह्मण आदि शंकर म्हणतात) ब्राह्मण धर्माच्या प्रचारार्थ हिंदूस्थानभर फिरत होता. त्या काळातील बहुतेक जैन बौद्ध विद्वानांचा त्याने वादात आणि त्यापेक्षा जास्त वितंडवादात (भांडखाेरपणा) पराभव केला आणि ब्राह्मण धर्माचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे शंकर त्याचे अनुयायी बेफाम झाले अशा परिस्थितीत गुजरातेतील एक जैन विद्वान मंडन मिश्र, ह्याने शंकरला आव्हान दिले. त्याप्रमाणे शंकर मंडन मिश्र ह्यांच्यात वादासाठी बैठक झाली. त्याबद्दलचा वृतात, जो जैैन साहित्यात उपलब्ध आहे तो असा, मंडन मिश्र शंकर ह्यांच्यात तब्बल आठ दिवस वाद वितंडवाद होत राहिला. त्या अखेरीस मंडन मिश्र हरल्याचे धोषित होणार असे ठरले. शंकर जेव्हा वादात जिंकत असे तेव्हा त्यानंतर त्याचे खुनशी अनुयायी हरलेल्या पंडीतांस जीवंतपणीच चितेवर घालून जाळीत असत. त्याप्रमाणे मंडन मिश्रास जीवंत जाळण्यासाठी ते पुढे सरसावले असतांना आयत्या वेळी मंडन मिश्राच्या धर्मपत्नीने सांगितले किं, शंकरने फक्त अर्ध्या मंडन मिश्रास हरवले असून ती म्हणजे उरलेले अर्धांग अजून हरलेले नाही. त्यासाठी शंकरने त्याला हरवणे आवश्यक आहे. हे ऐकून शंकराचा अभिमान डिवचला गेला त्याने ते, त्या मंडन मिश्राच्या पत्नीचे, आव्हान बिनशर्त स्विकारले.
हा लेख पुढील पाेस्टमध्ये चालू राहील -
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक २११ – २३० वाचू या.
विद्यार्थ्याने शिक्षकाच्या पत्नीस आंघाेळ घालणे, तिचे पाय चेपणे, तिला तेल लावून मर्दन करणे, अथवा तिचे केस विंचरणे अशी कामे करणे वर्ज आहे. २११
वीस वर्षे वय झालेला विद्यार्थी जाे याेग्य व अयाेग्य ह्याची जाण राखताे त्यांनी आपल्या शिक्षकाच्या पत्नीचे पाय पकडून तिला अभिवादन करावयाचे नाही. २१२
स्त्रीचा स्वभाव असताे किं, ती पुरुषास उत्तेजित करीत असते, त्यासाठी पुरुषांने बेसावध हाेऊन तिच्या आहारी जाऊ नये. २१३
स्त्रीची स्वाभाविक क्षमता असते किं, ती केवळ मूर्खालाच नाही तर सावध व बुद्धिमान माणसालाही वासनेच्या आहारी घालून भ्रष्ट करू शकते. २१४
स्वत:च्या आई, बहीण, भावाची पत्नी अथवा मुलगी ह्यांच्याबराेबर एकांतात राहू नये. कारण, माेठ्या माेठ्यांना वासना भ्रष्ट करू शकते. २१५
असें असले तरी लहान वयाचा बटू जमिनीवर लाेळत राहून आपल्या शिक्षकाच्या पत्नीस अभिवादन करू शकताे, "माते, मी तुला नमस्कार करताे", अशा प्रकारे. २१६
लांबचा प्रवास करून आलेला विद्यार्थी, घरी (शिक्षकाच्या) आल्यावर, प्रथम शिक्षकाच्या पत्नीचे पाया पडेल व अभिवादन करेल. कारण ते त्याचे कर्तव्य असते. २१७
जसे जमीन खाेदून त्यातून पाणी काढताे तसें, विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञानरूप पाणी काढून घेऊन ते मिळवू शकताे. २१८
विद्यार्थी केस कापून टाकू शकताे तसेंच केसाची बट ठेवू शकताे किंवा, डाेक्यावर केसाची शेंडी ठेवू शकताे. सूर्य आकाशात तळपत असतांना विद्यार्थी झाेपणार नाही. २१९
जर विद्यार्थी सूर्य आकाशात तळपत असतांना झाेपून राहिला (जाणीव पूर्वक अथवा अज्ञानाने) तर प्रायश्र्चित्त म्हणून त्यानें दुसर्या दिवशी उपवास करावा व त्या बराेबर सावित्री मंत्र जपावा २२०
अशा रितीने सूर्य उगवतांना व मावळतांना झाेपून रहाणे हा माेठा दाेष आहे, त्यासाठी प्रायश्र्चित्त करणे आवश्यक आहे. २२१
दिलेल्या नियमांनुसार ताे प्रथम आचमन करून सकाळी व संध्याकाळी अशा दाेनही संधीप्रकाशाच्या समयी शुद्धमनाने पवित्र ठिकाणी बसून वेदाचे वाचन करेल २२२
एकादी स्त्री अथवा खालच्या वर्णातील माणूस (शूद्र) स्वताच्या मनाच्या आनंदासाठी शास्त्राभ्यास करीत असेल तर त्या बद्दल आक्षेप घेऊ नये. २२३
काही जण म्हणतात किं, आध्यात्मिक सामर्थ्य व संपत्ती श्रेष्ठ, इतर काही समजतात किं, संपत्ती श्रेष्ठ, इतर काही समजतात, वासनापूर्ती व संपत्ती श्रेष्ठ, काही समजतात केवळ आध्यात्मच श्रेष्ठ, काही समजतात, केवळ संपत्ती श्रेष्ठ, वास्तविक पहाता आध्यात्म व संपत्ती दाेनही महत्वाचे आहेत. उत्तम जीवनासाठी हे सर्वच (तिनही, अध्यात्म, संपत्ती व वासनापूर्ती) याेग्य प्रमाणांत आवश्यक असतात. २२४
जरी फार वाईट रित्या शिक्षक, आई, बाप, माेठा भाऊ वागले तरी ब्राह्मणाने त्यांचा तिरस्कार करू नये. २२५
त्यांने शिक्षकात ब्रह्म पहावे, बापात प्रजापति, मातेत भूमाता व वडील भावात स्वताला पहावे व त्यांना माफ करावे. २२६
मुलाला जन्म देणे व त्यानंतरची काळजी घेणे ह्या कामाची परतफेड मुलं कधीही करू शकत नाहीत. २२७
ह्यासाठी शिक्षकाचे मन जिंकून व आई बापाची सेवा करून जे त्याला प्राप्त हाेईल ते माेठे तप करूनही मिळणार नाही. २२८
ह्या तिघांची सेवा करणे माेठ्या तपस्येपेक्षा जास्त चांगले असते. तेवढे करणार्याला इतर दुसरी काेणतीही तपस्या करण्याची आवश्यकता नसते. २२९
हे तिघे (शिक्षक, आई व बाप) म्हणजे ते तीन तत्त्वे, तीन जगं, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत असे समजून वागावे.
पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा