मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान – ५
मनुस्मृतीत काय दिले आहे ते पहावे लागेल.
मनुस्मृतीच्या पांचव्या अध्यायात २८-३१ श्र्लोकांत काय सांगितले आहे ते पाहू या.
ह्या ब्रह्माच्या निर्मात्याने, प्रजापतिने हे सर्व जे उत्पन्न केले आहे ते ब्रह्मतत्वाच्या उपजिविकेसाठी आहे असे मानले आहे. म्हणजे ह्या सर्व चर व अचर गोष्टीसुद्धा ब्रह्माच्या उपजिविकेसाठीच आहेत. २८
अचर (वनस्पती) गोष्टी चरांच्या उदरनिर्वाहासाठी असतात (म्हणजे शाकाहार), दात नसलेले दात असलेल्यांसाठी खाद्य असतात (म्हणजे पक्षी खाणे), ज्यांना हात नाहीत ते हात असलेल्यांचे खाद्य असतात (म्हणजे पशु व मासळी खाणे), जे भित्रे असतात ते धीटांचे खाद्य असतात. २९
खाणारा दररोज त्याच्या भक्षास खातो तसे केल्याने त्याला पाप लागत नाही. कारण विश्र्वनिर्मात्याने खाणारा व खाल्ले जाणारा असे दोनही त्या प्रकारेच निर्माण केले आहेत. थोडक्यात असे बोलता येते किं, जीव जीवावर जगतो. ही निसर्गाची व्यवस्था आहे त्याप्रमाणे जगण्यात कोणताही दोष नाही. ३०
यज्ञात ब्राह्मणाने मांसाहार करणे उचीत आहे, कारण ते देवांनी केलेल्या नियमांनुसार असते. त्याशिवाय उगाचच प्राणी मारणे मात्र पापकारक, राक्षसी कृत्य समजून टाळावे. म्हणजे खाण्यासाठी नसेल तर कोणत्याही प्राण्यास मारु नये. ३१
मनुस्मृतीच्या ह्या भागात शाकाहार व मांसाहार अशा दोघांचा विचार केला आहे. ते दोनही कसे ग्राह्य आहेत ते दिसते.
ह्याचा अर्थ जैनांची निर्थकपणे नक्कल करणे हिंदू मान्यतेनुसार चुकीचे ठरते. ब्राह्मणांनी कोणता आहार करावा ह्या बद्दल मनुस्मृतीच्या तिसर्या अध्यायात श्र्लोक २६६ ते २७४ मध्ये काय दिले आहे ते पहावे लागेल.
आता मी (भृगु) सांगतो, पितरांना दिलेल्या कोणत्या प्रसादामुळे कोणती चिरकाल टिकणारी फळे मिळतील. २६६
यजमानाचे पूर्वज तीळ, तांदूळ, जवस, वटाणे, पाणी, कंदमुळे, फळे, ह्यांचा रीतसर केलेल्या प्रसादाने एक महिना संतुष्ट रहातील. २६७ म्हणजे शाकाहारामुळे एक महिना
मासळीच्या प्रसादांने दोन महिने, काळवीटाच्या मांसांने तीन महिने, शेळी व मेंढी ह्यांच्या मांसाने चार महिने, आणि पक्षाच्या मांसाने पांच महिने ते संतुष्ट रहातील. २६८
डुकराच्या मांसांने सहा महिने, ठिबके असलेल्या हरणाच्या मांसांने सात महिने, काळ्या काळवीटाच्या मांसांने आठ महिने, ऋरू जातीच्या माशाच्या मांसांने नऊ महिने २६९
रानडुकराच्या व रेड्याच्या (म्हैस) मांसांने दहा महिने व सशाच्या, कासवाच्या मांसांने अकरा महिने पितर संतुष्ट रहातात. २७०
बारा महिन्यासाठी गाईचे मांस किंवा लांब कान असलेल्या बोकडाचे मांस प्रसाद म्हणून ब्राह्मणाला द्यावयाचे असते. २७१
कालसक नांवाची भाजी व महासल्क नांवाचा मांसा, लाल रंगाचा बोकड, वनात जे खाण्यायोग्य खाद्य असेल जे वनवासी खातात ह्यांच्यामुळे चिरकाल समाधान पितरांना व देवांना मिळते २७२
पावसाळ्यातील माघ नक्षत्रामधील शुक्लपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी जे काही मधाबरोबर खाण्यास पितरांना वाढाल त्याने कायम समाधान प्राप्त होईल. २७३
त्याच्या कुळात असा पुरुष जन्मो जो आम्हाला गाईचे मांस शिजवून भाद्रपद महिन्याच्या त्रयोदशीच्या दिवशी दुपारी जेव्हा हत्तीची सावली पूर्वदिशेला पडते तेव्हा वाढेल, असे नेहमी पितर अपेक्षा करतात. २७४
हा लेख पुढील पाेस्ट मध्ये चालू राहील.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक १९१ – २१० वाचू या.
शिक्षकाच्या आदेशांने व एरव्हीसुद्धा विद्यार्थी बटू सतत वेदाच्या अभ्यासात रमेल. त्याशिवाय आपल्या शिक्षकाची सेवा करील. १९१
स्वत:चे संपूर्ण नियमन करून (भाेग इंद्रिये, वाचा अाणि मन) ताे दाेनही हात जाेडून शिक्षकापुढे त्याच्या कडे पहात उभा राहील. १९२
सर्व शरीर झाकलेले असावें पण उजवा हात मात्र उघडा असावा. याेग्य वर्तणूक असावी. जेव्हा शिक्षक त्याला "बस" असा आदेश देईल तेव्हांच ताे शिक्षकाकडे ताेंड करून स्वताच्या आसनावर बसेल. १९३
शिक्षकाच्या घरात रहाणार्या विद्यार्थ्याने शिक्षकांपेक्षा कमी माेलाचे वस्त्र, दागिने नेसावेत. खातांना कमी खावे (आधाशीपणे खाऊ नये) लवकर उठावे व उशीरा झाेपावे. १९४
शिक्षकाशी बाेलतांना ताे (विद्यार्थी) बसलेला, आडवा पडलेला, खाता खाता, तसेंच दुसरीकडे ताेंड करून उभा नसावा, त्याचे हात जाेडलेले (नमस्कार मुद्रेत) असावेत. १९५
शिक्षक उभे असतील तर विद्यार्थ्यानेसुद्धा उभे रहावे. ताे (शिक्षक) चालत असेल तर चालत रहावे, बसलेला असेल तर त्याच्या परवानगीने बसावे, ताे बाेलत असतांना एेकावे, असे वागावे. १९६
शिक्षक बसले किंवा झाेपलेले असतील तर त्यांच्या कडे उभे राहून व वाकून बाेलावे, ताे लांब अंतरावर असेल तर त्याच्या कडे जाऊन (त्याला बाेलवू नये) बाेलावे. शिक्षक खालच्या पातळीवर असेल तर त्याच्याकडे जावे अथवा वाकून बाेलावे. १९७ टिप: शिक्षकांबद्दलचा आदर अशा रितीने व्यक्त करावा.
विद्यार्थी पहुडलेला असेल व शिक्षक जवळ आले तर त्याने नीटपणे पहुडावे, वेडेवाकडे लाेळू नये. १९८
विद्यार्थ्याने शिक्षकाची नक्कल करू नये. त्याच्या पाठी त्याला वाकुल्या दाखवू नयेत, शिक्षकाचे नांव घेतांना अादरयुक्त संज्ञा आधी जाेडून बाेलावे. १९९ टिप: विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल आदर असावा म्हणजे शिक्षक अधिक चांगले शिकवतील अशी अपेक्षा असते.
जेव्हां याेग्य अथवा अयाेग्य रित्या शिक्षकांची निर्भत्सना हाेते तेव्हां विद्यार्थ्याने आपले कान झाकून घ्यावेत, किंवा तेथून निघून जावे. शिक्षकाच्या समर्थनार्थसुद्धा कांहीं बाेलू नये, गपचुप रहावे. २००
शिक्षकांची टीका करणे, त्यांची चेष्टा करणे, असे केल्यांने ताे विद्यार्थी पुढील जन्मी गाढव हाेताे. जाे विद्यार्थी त्या शिक्षकाच्या पैशावर जगेल ताे किटक बनेल. जर विद्यार्थी विनाकारण शिक्षकाचे नांव बदनाम करील तर ताे कुत्रा हाेईल. जाे शिक्षकाचा द्वेष करील ताे माेठा किडा हाेईल. २०१
दुसर्याने सांगितले म्हणून शिक्षकाची सेवा करू नये, स्वेच्छेने ती करावी. सेवा रागावून करू नये. उंच जागी बसला असेल तर खाली उतरून शिक्षकाना अभिवादन करून आपला आदर व्यक्त करावा. बसल्या जागीच नमस्कार करू नये. २०२
शिक्षकाच्या आसनाजवळ बसू नये. वार्याच्या दिशेत बसू नये. असे बाेलू नये जे शिक्षक ऐकू शकणार नाही. २०३
बैल, घाेडा किंवा उंट खेचताे अशा वाहनात विद्यार्थी बसू शकेल. गवताच्या कुरणात, दगडावर, लाकडाच्या बैठकीत व नावेत बसण्यास हरकत नसते. २०४
जर विद्यार्थ्याच्या शिक्षकाचे शिक्षक भेटले तर त्यांना शिक्षकांना जसा मान देतांत तसा द्यावा. परंतु, त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या घरातील आदरणीय माणसांस अभिवादन करू नये. २०५
जे जे त्या विद्यार्थ्यास याेग्य मार्गदर्शन करतांत मग ते शिक्षणाचे असाे, वर्तणूकीचे असावे अथवा पापमुक्त रहाण्याचे असाे, त्या सर्वांचा त्या विद्यार्थ्याने आदर केला पाहिजे. २०६
बटु त्यांच्या सर्व वरिष्ठांशी तसांच वागेल जसा ताे त्याच्या शिक्षकांशी व त्या शिक्षकाच्या नातेवाईकांशी वागेल, जे त्याच्याच वर्णाचे आहेत. २०७
शिक्षकाचा मुलगा वयाने माेठा अथवा लहान असला तरी ताे वडीलांच्या ऐवजी शिकवत असेल व सर्व शास्त्रे, अंगे, शिकवत असेल तर त्याला शिक्षकच समजून त्या प्रमाणे सन्मानपूर्वक वागवावे. २०८
विद्यार्थ्याने जरी शिक्षकाच्या मुलांला सन्मानपूर्वक वागवले तरी त्याची सेवा म्हणून त्याचे पाय चेपणे, त्याला आंघाेळ घालणे, त्याचे उष्टे खाणे असे कांहीही करू नये. २०९
शिक्षकाची पत्नी जर त्याच्याच वर्णाची असेल तर तीला शिक्षकाप्रमाणेंच सन्मान द्यावा. परंतु, जर ती इतर (हलक्या) वर्णाची असेल तर फक्त उठून सन्मान देण्या व्यतिरिक्त काहीही करू नये.

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा