गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान – ४
मागील पाेस्ट वरून चालू -
मनुष्य मेलेला प्राणी खात नाही. कारण तो कोणत्या कारणांने मेला ते समजणे आवश्यक असते, जर तो प्राणी विषबाधेने अथवा रोगराईने मेला असेल तर तो खाण्याने माणसाला त्याची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून प्राण्याला खाण्यासाठी त्या प्राण्याची नीटपणे तपासणी करुन तो सद्धृढ आहे कीं नाही ते तपासून नंतरच मारणे श्रेयस्कर असते. जर माणसाने नाही मारला म्हणून तो कायम जगत राहील अशी अपेक्षा करणे केवळ मूर्खपणाचे ठरते. खाण्या व्यतिरीक्त इतर कारणासाठी मारणे मात्र वर्ज आहे. तशी हत्त्या केली तर ती हिंसा ठरते. खाण्यासाठी जे प्राणी सांगितले आहेत ते सर्व झपाट्याने वाढणारे असतात. त्यांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी त्यांना मारणे आवश्यक असते. तसे नाही केले तर त्यांची संख्या भरमसाटपणे वाढून अनर्थ ओढवू शकतो. ह्या संदर्भात इतर धर्मांत काय अाहे ते पहावयास पाहिजे. पीटरची गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. ख्रिस्ती माणसांने काय खावे त्या बद्दल येशूचा संदेश काय होता ते पाहूया.
Act 11:4-10, मध्ये दिल्याप्रमाणे पीटर सांगतो,
पीटर येशुच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सर्वदूर फिरतांना त्याने बधितले किं, लोक प्राणी मारुन खातात. त्याला ते अयोग्य वाटले म्हणून त्याने आपल्या शिष्यांना अनुयायाना सांगितले कीं, सर्वांनी मांसाहार सोडून द्यावा. त्याप्रमाणे काही लोकांनी शाकाहार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो जोप्पा गावात असतांना दुपारी ध्यान करतांना त्याला दृष्टांत झाला. त्यात आकाशातून एक मोठी चादर जमिनीवर उतरतांना दिसली. त्या चादरीवर सर्व लहान मोठे प्राणी वावरत होते. त्याला त्या दृष्याचा अर्थ समजला नाही म्हणून तो देवाला प्रश्र्न विचारतो. तेव्हा आकाशातून आवाज आला, "माणसांनी हे सर्व प्राणी खावयाचे असा ईश्र्वरी संकेत", आहे. त्यावर पीटर उद्गारला, "मला ते अयोग्य वाटले म्हणून मी त्याला विरोध केला आहे". त्यावर आकाशातून आवाज आला,
"ईश्र्वरांनी उत्पन्न केलेले काहीही अयोग्य नसते, तसे समजणे पापकारक आहे. हे मानवा, ईश्र्वराने जसे हे प्राणी निर्माण केले तसेच त्यांना खाणारे सुद्धा उत्पन्न केले त्यातील एक आहे मनुष्य. मनुष्य सर्वात मोठा भक्षक (predator) म्हणून ईश्र्वराने उत्पन्न केला आहे हे विसरू नकोस. निसर्गाच्या निर्विध्न चालू रहाण्यासाठी "जीवोजीवस्य जीवनम्" ह्या नियमाचे पालन होणे आवश्यक आहे म्हणून माणसांने फक्त खाण्यासाठी ह्या प्राण्यांना मारणे योग्य असते. मारतांना त्यांना वेदना होणार नाहीत तेवढे पहा म्हणजे पुण्याचा मार्ग मोकळा होईल. जर माणूस ह्यांना खाणार नाही तर त्यांची संख्या भरमसाट वाढेल अनर्थ ओढवेल". ह्याचा अर्थ जर खाण्यासाठी मारले परंतु, त्यांना वेदना झाल्या तर ते मारणे पापकारक ठरते.
ह्याचा अर्थ, येशुच्या तत्वज्ञाना नुसार मांसाहार करणे त्यासाठी वेदनाविरहीत असे त्यांना मारणे हे सर्व परमेश्र्वराची सेवा करण्यासारखेच आहे.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक १६७ – १९० वाचू या.
खराेखरच द्विज, जाे वेदांत दिलेले कठाेर व्रत प्रामाणिकपणे पाळताे, वेदाचे पठण नित्य नेमाने करताे. १६७
जाे द्विज वेदांचा अभ्यास करीत नाही व उपजिविकेसाठी इतर काम करताे ताे शुद्र ठरताे. त्याचे वंशजसुद्धा शुद्र ठरतात. १६८ टीप: गीतेतील अध्याय तीन पहा, गुणकर्म विभागश:, प्रमाणे
पवित्र नियमांनुसार द्विज तीन वेळा जन्म घेताे. पहिला मातेच्या पाेटी, दुसरा उपनयन विधीने व तिसरा जन्म जेव्हां ताे श्राैत विधी शिकताे. १६९
ह्या तीन जन्मातील उपनयनाचा जन्म त्याला वेद शिकण्याचा अधिकार देताे. त्यानंतर सावित्री मंत्र त्याची माता समजावी व त्याचा शिक्षक पिता ठरताे. १७०
उपनयनाच्या विधीमुळे त्याला शिकण्याची परवानगी मिळते. म्हणून ते शिकविणारा शिक्षक त्याचा पिता ठरताे. १७१
ज्याचा उपनयन विधी झाला नाही त्याने वेदाचे वाचन करावयाचे नसते. त्यानी फक्त अंत्यविधी करावयाचे असतात कारण, उपनयन विधी हाेण्या आधी ताे शुद्रासमान असताे. १७२
उपनयन झाल्यावर बटूला सर्व संबंधित विधी व इतर साेपस्कार शिकावे लागतात. त्यातूनच ताे वेद शिकत जाईल. १७३
वेद शिकण्यास सुरुवात करण्या आधी शपथ घेण्याचा विधी हाेताे त्यासाठी बटू आपला पाेषाख, दंड, जान्हवे, कमरपट्टा, इत्यादि जे विद्यार्थ्यासाठी सांगितले आहेत ते त्यानी नेसावेत. १७४
जाे विद्यार्थी शिक्षकाच्या घरी रहाताे त्यांने त्याच्या भाेगइंद्रियांचे चांगले संयमन करून रहावयाचे असते. अशांने त्याची आध्यात्मिक प्रगति चांगली हाेईल. १७५
बटूने सकाळी स्नान करून स्वत:ला शुद्ध करावे, त्यानंतर पाण्याने अर्ध्य देऊन देव, ऋषी, पितर, ह्यांचे पुजन करावे. त्यासाठी त्यांच्या चित्र अथवा मूर्ति ह्यांचा उपयाेग करावा व पवित्र अग्नीत हवन घालावे. १७६. टीप: मनुस्मृतीला मूर्तिपुजा मान्य असल्याचा हा पुरावा.
बटू शिक्षण करीत असतांना त्यांने मध, मांस, अत्तर, हार, खाद्यपदार्थ सुगंधी करणारी द्रव्ये, आंबट पदार्थ, ह्यांचा त्याग करावा. तसेंच गरीब जीवांना त्रास देऊ नये. १७७
स्वत:च्या अंगाला अत्तर लावू नये, डाेळ्यात सुरमा, काजळ घालू नये, पायात जाेडे घालू नये आणि छत्री वापरू नये. म्हणजे, भाेग इंद्रिये उत्तेजित करणार्या सर्व गाेष्टींचा त्याग करावा. त्यांत नांच, गाणे व वाद्ये वाजवणे असे कांहीही करू नये. १७८
जुगार खेळणे, वितंडवाद घालणे, टाेमणे मारणे, खाेटे बाेलणे, स्त्रीस स्पर्श करणे, इतरांना त्रास हाेईल असे बाेलणे, हे व अशा विघातक गाेष्टी करणे वर्ज आहे. १७९
एकटे झाेपावे, स्त्रीसंग करू नये, जाे हस्तमैथून करील तर त्याचे पवित्र बंधन नष्ट हाेईल म्हणून असे काहीही करू नये. १८०
द्विज बटू जर स्वप्नावस्था झाली तर आंघाेळ करील, त्यानंतर सूर्याची प्रार्थना करील, त्यानंतर ऋग्वेदातील ऋचा तिनदा जपेल आणि अशी विनंति करील कीं, "गेलेले पाैरुष्य मला पुन्हा प्राप्त व्हावे". १८१
बटू आश्रमासाठी पाणी भरेल, फुले गाेळा करेल, शेण गाेळा करेल, माती व कुश गवत आणेल आणि भीक मागेल. १८२
हे विद्यार्थी अशा गृहस्थांकडून दरराेज भिक्षा आणतील जे वेद जाणतात व त्याचे पालन करतात आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. १८३
शक्य हाेईल तर त्यानी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून भीक मागू नये. परंतु, जर काेणी इतर नसेल ज्याच्या कडून भीक मागावी तर मग, जवळच्या नातेवाईकांकडून भीक मागावयास हरकत नसावी. १८४
असे काेणीही भीक मागण्यासाठी नसेल तर मात्र काेणाही निष्पाप गृहस्था कडून भीक मागण्यास हरकत नाही. १८५
पवित्र अग्नी आणल्यावर ताे जमिनीवर ठेवू नये. त्यात दरराेज शांत व गंभीरपणे सकाळी व संध्याकाळी हवन करावे. १८६
जाे बटू आजारी नसूनही दरराेज असे सात दिवस भीक मांगण्यासाठी जात नाही त्याला प्रायश्र्चित्त करावे लागेल, अशा प्रायश्र्चित्तास अवकिर्निन (घेतलेली शपथ माेडण्या बद्दलचे) असे म्हणतात. १८७
शपथ घेतलेल्या बटूने फक्त भिकेच्या अन्नावर उपजिविका करावयाची असते. दुसर्याचे अन्न खावू नये. अशारितीने भीक मागून अन्न खाणे उपवास करण्या सारखेच समजावे. १८८
बटूला याेग्य वाटेल तर दुसर्याने दिलेले अन्न जर ताे अंत्यष्टीस आमंत्रणाने गेला असेल तर खाण्यास हरकत नाही. तसेंच देव, पितर ह्यांना वाहिलेले अन्न वैराग्या (जाेगी) सारखे खाण्यास हरकत नसते. १८९
हे फक्त ब्राह्मण बटूस लागू आहे, इतर बटूंस (क्षत्रिय, वैश्य), ह्यानी मात्र असे करू नये. १९०

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा