शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

भारतातील जाती व्यवस्था
भारतात जात पद्धत अथवा जातियता फार प्राचीन काळापासून प्रचलित अाहे. लाेक त्यांच्या जातीवरून अाेळखले जातात. हि पद्धत हल्ली विशेष महत्वाची ठरली अाहे कारण अापल्या शासनाची धाेरणे ह्या जाती व्यवस्थेवर अवलंबून असतात. ह्या जातींमध्ये अापल्या घटनेने काही प्रकार ठरवले अाहेत. एक प्रकार असताे साधारण दुसरा अाहे शिड्युल्ड क्लास. शिड्युल्ड क्लास मध्ये अप्रगत जाती येतात. अापल्या शासनाने ह्या सर्व जातींच्या विकासासाठी काही सवलती दिल्या अाहेत. साधारण (general category) समजला गेलेला वर्ग प्रगत अाहे असे समजले जाते. अप्रगत जातींमध्ये पुन्हा अाणखीन काही उपवर्ग तयार केले अाहेत. अापली घटना इंग्रजीत लिहीली अाहे, इंग्रजीत शिड्युल्ड क्लास असे लिहीले अाहे. त्याचा अर्थ हाेताे, कालमर्यादीत अशा सवलतींचा फायदा. म्हणजे ह्या सवलती काही काळासाठी मर्यादीत आहेत. घटनेनुसार ह्या सवलती ज्या काळासाठी दिल्या हाेत्या ताे काळ केव्हाच संपला अाहे. तरी त्या सवलती अजून चालू अाहेत नवनवीन जाती जमाती अशा सवलतीसाठी भांडत अाहेत. मराठीमध्ये आपण त्या सर्व सुरक्षित जातिंसाठी दलित असा शब्द वापरताे. ह्या सुरक्षित (वर्गिकृत, अनुसुचित वर्ग) वर्गांत चार भाग केले आहेत. इतर मागसवर्गी (OBC), दलित वर्ग (SC), दलित जमाती (ST), आणि इतर दलित जमाती (OT). ह्या वर्गात येणार्या जातीतील लाेकांना शिक्षणात, शासकीय नाेकर्या मिळण्यात बर्याच सवलती मिळतात. ह्या सवलतींसाठी आज माेठ्या प्रमाणात लाेक रस्त्यावर उतरून आंदाेलने करीत आहेत. मुख्य म्हणजे ह्या सर्व जाती हिंदू धर्मिय आहेत. इतर धर्मात अशाप्रकारची वर्गवारी हाेत नसते. घटनेचा उद्देश फक्त पन्नास वर्षांसाठी ह्या सवलती असाव्यात असा हाेता. काही काळानंतर ह्या सवलती काढून टाकाव्यात सर्व जाती समान पातळीवर आणल्या जाव्यात परंतू, ते शक्य झाले नाही आजही ह्या सवलतींच्या मागण्या चालूच आहेत. हिंदू समाजातील उच्च वर्गातील जातींना ह्या सवलती मिळत नाहीत. हल्ली काही इतर धर्मातील लाेकसुद्धा अशा सवलती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सवलतींचे आकर्षण बिलकूल कमी झालेले नाही उलट ते वाढत जात आहे. ह्याचे कारण, वाढती लाेकसंख्या व त्याबराेबर वाढणारी बेकारी हे आहे.
जातींचा अभिमान कमी हाेत नाही त्याच वेळी सवलतीचे आकर्षण सुद्धा जात नाही अशा परिस्थितीत काही लाेकांना वाटते कीं, अशा सवलती सर्वच जाती जमातीतील गरीब लाेकांना मिळाल्या पाहिजेत. परंतु, घटनेनुसार ती व्यवस्था मान्य नव्हती. कारण, ह्या सवलतींचा संबंध जातीच्या आर्थिक परिस्थितीशी नव्हता. जाती हिंदूंमध्ये निर्माण झाल्या त्यांचे कारण समजून घेणे आवश्यक अाहे.
हिंदू मान्यतेनुसार माणसाची जात त्याच्या गुणकर्मावर अवलंबून असते. पुढे ही व्यवस्था ब्राह्मणानी बाद ठरवून जन्मनिहाय व्यवस्था प्रचारात आणली. असा बदल केल्यामुळे काही लाेक कायमचे उच्च ठरले व इतर काही कायमचे हलके ठरले. डाॅ. आंबेडकर ह्या विरुद्ध बाेलत हाेते. ह्या बदलामुळे काही लाेक अनेक जन्माने हलके म्हणजे शुद्र ठरले. अनेक जन्म ते अशिक्षित राहीले. त्यांच्या बुद्धिचा विकास हाेण्याचे थांबले. ते लाेक आज दलित म्हणून ओळखले जात आहेत. हा दाेष हिंदू समाजातून काढून टाकावयाचा असेल व जाती जर नष्ट करावयाच्या असतील तर सर्व समाज समान गुणी हाेणे आवश्यक आहे. गरिबी हा गुणहीन असण्याचा परिणाम आहे. हे समाज गूणहीन असण्याचे कारण आपण पाहीले. ह्याचा अर्थ, भारतात जाती व्यवस्था चालूच राहील कारण अशिक्षित रहाण्याची सवय ह्या समाजांतून काढून टाकणे साेपे नाही. मग विचारवंत लाेक काहीही म्हणाेत. माणसाचे गुण त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असतात. शिक्षणांने माणसाची बुद्धिमत्ता सुधारते आणि म्हणून दलितांचे शिक्षण हाेणे अगत्याचे हाेते म्हणून ह्या सवलती घटनेने दिल्या हाेत्या. परिस्थिती आणखीन बिघडण्यास आपल्या शासनाच्या परीक्षा न घेता वरच्या वर्गात पाठविण्याच्या धाेरणाचा उल्लेख करावा लागेल. भारतीय समाजाचा ७०% हिस्सा दलित समाजाचा आहे. एवढा माेठा समाज सुधारणे वाटते तेवढे साेपे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. सवलती असणारे समाज गुणवत्ता नसतांना उच्च पदावर हक्क मांगतात व ते त्याना मिळतात. ह्या करतां ते युक्तिवाद मांडतात कि, लाेकशाहीत बहुजनांचे राज्य असले पहिजे! अर्थात ७०% लाेक अनाडी असल्यामुळे अनाडी लाेकांचे राज्य असले पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे किं, ज्या लाेकांना सवलती मिळतात त्यांना वाटते किं, ह्या सवलती अशाच चालू रहाव्यात. आपण गुणहीन आहाेत हे एकपरीने चांगलेच आहे असा त्यांचा समज झाला आहे. सवलतींमुळे माणसे सुधारण्या ऐवजी जास्त बिघडली आहेत. ह्याना सुधारण्या ऐवजी आणखीन बिघडवण्याचे काम करण्यासाठी जणू काय प्रगत व ह्या दलित समाजातील स्त्री पुरुषांचे आंतर जातिय विवाह व्हावेत म्हणून अशा विवाहाला उत्तेजन देण्याचे सरकार याेजते आहे. अशा याेजनांमुळे दलित, दलित अाहेत त्याबराेबर प्रगत लाेकसुद्धा दलित हाेणार अाहेत. आज जी परिस्थिती आपल्या देशाची आहे त्याचे कारण अनाडी लाेक आज देशावर राज्य करीत आहेत.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक ७८ – ९४ वाचू या.
वेदाचा अभ्यास केलेले ब्राह्मण दरराेज संध्याकाळी "तद् सवितू:", असे बाेलताे त्याला सर्व वेद बाेलण्याचा फायदा हाेताे. ७८
जाे ब्राह्मण दरराेज हे वचन गांवा बाहेर जाऊन एक हजार वेळा एक महिनाभर जपेल ताे माेठ्या दाेषापासून सुद्धा मुक्त हाेईल, जसे चिखलात अडकलेला साप त्यातून बाहेर यावा. ७९
जे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे वचन उच्चारणार नाहीत व त्याबराेबर सांगितलेले विधी करणार नाहीत ते सद्गुणी समजले जाणार नाहीत. ८०
ओमच्या नंतर तीन पाय असलेल्या सावित्रीच्या आधी येणारे अविनाशी महाव्यहृती, वेदाचे दरवाजे समजले जातात व त्यातूनच ब्रह्माचे ज्ञान प्राप्त हाेते. ८१
जाे काेणी हा मंत्र (तद् सवितू:) न कंटाळता तीन वर्षे जपेल ताे नंतर उच्च ब्रह्मात प्रवेश करील, ताे हवे प्रमाणे सर्वत्र संचार करेल आणि अद्भूत स्वरूप धारण करील. ८२
एकाक्षरी ॐ हे ब्रह्माचे उच्च स्वरुप आहे, तीन वेळा प्राणायाम करणे ही सर्वाेच्च दर्जाची तत्वशिलता समजली जाते.
सावित्री ची सर कशालाही नसते. गुपचुप बसण्यापेक्षा सत्य सांगणे जास्त चांगले असते. ८३
एक गाेष्ट लक्षात ठेवावी कीं, वेदात सांगितलेले सर्व विधी, यज्ञात दिलेली आहुती, हे सर्व विसरले जातात परंतु, ॐ व त्यातील ब्रह्म हे ह्या विश्र्वाचे प्रजापति समजावेत, ते कधीही विसरले जात नाहीत. ८४
यज्ञात आहुति देण्यापेक्षा ताेंडातल्या ताेंडात जप करणे जास्त चांगले असते, त्याशिवाय मनात केलेला जप पुटपुटलेल्या जपापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असताे. ८५
हा मंत्र पुटपुटण्याने जे पुण्य प्राप्त हाेते ते चार पाकयज्ञ व त्याबराेबर वेदानुसार केलेल्या दानापेक्षा शंभरपट महान असते. ८६
जाे इसम सर्व प्राण्यांना प्रेमाने वागवताे व वरील मंत्र मनात स्मरुन जप करताे, ताे खरा ब्राह्मण समजावा. ताे अति उच्च स्थानी जाऊन बसताे. ८७
शहाणा माणूस अापली भाेग इंद्रिये काबूत ठेवताे व त्यांच्या आहारी जाऊन बिघडत नाही, जसे रथ चालवणारा त्याच्या रथाचे घाेडे आवरताे. ८८
मी आता ह्या अकरा इंद्रियांची माहिती देण्र आहे. ज्यांचा उल्लेख हाेऊन गेलेल्या ॠषींनी केला आहे. ८९
कान, त्वचा, डाेळे, जिभ, नाक, गुदद्वार, जनन इंद्रिय, हात, पाय, स्वरयंत्र ही दहा आहेत. ९०
ह्यातील कान, त्वचा, डाेळे, जिभ, नाक ही पांच इंद्रिये ज्ञानेंद्रिय म्हणून समजली जातात. उरलेली नंतरची पांच इंद्रिये कार्य इंद्रिये समजली जातात. ९१
अकरावे इंद्रिय आहे मन, ते ह्या दाेनही प्रकारच्या इंद्रियांचे नियंत्रण करते. जर हे अकरावे इंद्रिय माणसाच्या काबूत राहिले तर इतर दहा सुद्धा नियंत्रणात येतात. ९२
पहिला दिलेल्या दहा इंद्रियांना भाेग इंद्रिये असे समजले जाते. ती ज्या माणसांना नियंत्रित करता येत नाहीत ते ह्या इंद्रियांच्या भाेगात अडकतात; आणि मग सर्व प्रकारच्या चुका हाे रहातात. ९३
त्यामुळे मनात इच्छा उत्पन्न हाेते ती कधीही कितीही वेळा पूर्ण केली तरी ती पूर्ण हाेत नाही. उलट जितक्या वेळा इच्छा पूर्ण हाेईल तितक्या वेळा ती वाढत जाते. जसे अग्निमध्ये तूप घातल्यास ताे कमी हाेत नाही उलट वाढत जाताे. ९४

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.

माझा इमेल ashokkothare@gmail.com आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा