बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५

देवीचा काेप - २

काही प्रश्र्न देवीच्या काेपाबाबत मांडले गेले त्याचे निराकरण येथे दिले अाहे.
विज्ञानाच्या प्रेमी लाेकांनी ते मांडले अाहेत. ते म्हणतात, पावसाचे निदान करतांना उच्च दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा अशा कारणांमुळे तसेंच उत्तरे कडील वारे, पूर्वे कडील वारे अशा मुळे पाऊस पडण्याचा अथवा पडण्याचा संभव असताे. त्याशिवाय हल्ली नँनाे परिणाम म्हणून अाणखीन एक नवीन कारण सांगितले जाते. त्यात देवतांचा संबंध नसताे; वगैरे वगैरे...
हे मान्य अाहे परंतु, हे सर्व वातावरणातील बदल कां हाेतात? त्यामागील कर्ता काेण? असे विचारले तर हि मंडळी गप्प बसतात.
शाक्त पंथाच्या शिकवणी नुसार ह्या जगात दाेन प्रकारच्या चेतना अाहेत. एका प्रकारातील चेतना दृष्य असतात दुसर्या प्रकारातील अदृष्य असतात. अापण माणसे पहिल्या प्रकारात येताे; तसेंच इतर सर्व दृष्य चेतना त्यात येतात. अदृष्य प्रकारात येणार्या चेतना देवता अाणि पिशाच्च ह्या प्रकारात गणल्या जातात. पृथ्वी वरील सर्व नैसर्गिक क्रिया ह्या देवता नियंत्रित करतात असे मानले जाते. एका प्रकारे ते पृथ्वीचे चालक समजले जातात. माणसे मेल्यावर त्यांची पिशाच्च हाेतात. ती पुन्हा जन्म मिळे पर्यंत तशीच रहातात. हि पिशाच्चे काही प्रमाणात इतर माणसांच्या जीवनात ढवळा ढवळ करू शकतात परंतु त्यापेक्षा जास्त काही करु शकत नाहीत. देवतां पिशाच्चे हि अदृष्य असतात त्याचे कारण त्यांना जाे देह असताे ताे अतिसुक्ष्म असताे. अाधुनिक विज्ञानाने सिद्ध केले अाहे कीं, ह्या अदृष्य चेतना त्यांच्या सुक्ष्म देहातून लालातीत (इंफ्रारेड) किरण विशिष्ट क्षिप्रतेचे (फ्रिक्वेंसी) साेडतात ते किरण कॅमेर्याने टिपता येतात.
अापण जेव्हा म्हणताे कि देवीचा काेप झाला अाहे तेव्हा त्याचा संबंध ह्या अदृष्य देवतांशी असताे. परमेश्र्वर अाणि ह्या देवतां ह्यांत काही संबंध नसताे.
जर माणूस परमेश्र्वराची अाराधना करील तर ताे त्याला मिळताे जर ताे अशा देवतांची अाराधना करील तर ताे ह्या देवतांना मिळेल असे भग्वद्गीतेत कृष्णाने अर्जुनांस सांगितले अाहे हे सर्वांना ठाऊक अाहेच.
अापण जेव्हा देवळात जाऊन अशा देवींची पुजा करताे तेव्हा ती पुजा त्या देवीला मिळते, परमेश्र्वराला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. परमेश्र्वर एकच अाहे कारण, परमेश्र्वर म्हणजेच निसर्ग, निसर्ग एकच अाहे असे शाक्त पंथात मानले जाते. देवतां मात्र अनेक अाहेत.
ब्राह्मणी वैदिक शिकवणूकीत परमेश्र्वर देवतां ह्यांत फरक केला जात नाही हा महत्वाचा फरक वाचकांनी लक्षात घेतला पाहिजे. काही तज्ञ मानतात किं, देवतेची अाराधना करणे साेपे असते म्हणून, प्रथम देवतेला प्रसन्न करावे अाणि नंतर तिच्या मदतीने परमेश्र्वराला मिळवावे. देवतेची अाराधना हि एक पायरी म्हणून वापरावयाची असे ते सांगतात. सिद्धि प्राप्त करण्यासाठी देवतेची अाराधना करावी लागते माेक्ष प्राप्तीसाठी परमेश्र्वराची अाराधना करावयाची असते. सिद्धि मिळवून माणूस ह्या देवतांच्या मदतीने पृथ्वीवर चमत्कार करु शकताे. परमेश्र्वराची ताकद सर्व विश्र्वात चालते परंतु, देवतांची ताकद फक्त पृथ्वी पुरती मर्यादीत असते.
मला अाशा अाहे किं, वरील विवेचन वाचकांचे समाधार करील. हा विषय फार गहन अाहे, म्हणून जास्त खाेलात तुर्तास अापण जाऊ नये हेंच उत्तम. द्रष्टाच केवळ हा विषय व्यवस्थितपणे समजू शकताे.

आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक ६२ – ७७ वाचू या.
ब्राह्मणास पुनीत हाेण्यासाठी तीर्थाचे पाणी त्याच्या पाेटात गेले पाहिजे, क्षत्रियासाठी ते तीर्थाचे पाणी त्याच्या घशात गेले पाहिजे, वैश्यासाठी ते ताेंडात राहिले पाहिजे, शुद्रासाठी ते त्याच्या आेठाला लागले तरी पुरते. ६२
द्विजाच्या उजव्या हाताखालून जर त्याचे जान्हवे किंवा वस्त्र जात असेल तर त्याला उपवितीन असे संबाेधले जाते, जर ते डाव्या हाताखालून गेले असेल नंतर मागून उजव्या खांद्यावर आले असेल तर त्याला प्राकिनवितीन असे संबाेधले जाते. आणि जर ते गळ्यातून खाली असे ठेवले असेल तर निवितीन असे म्हणतात. ६३
जर ब्राह्मणाचे वस्त्र, दंड, कमंडलू जान्हवे खराब झाले असेल तर ते त्याने नदीत अथवा समुद्रात विसर्जित करावयाचे असते. त्यानंतर नवीन स्विकारावयाचे असते. ६४
केशांत विधी (केस कापण्याचा विधी) ब्राह्मणाने त्याच्या वयाचा साेळाव्या वर्षी, क्षत्रियाने बाविसाव्या वैश्याने चाेवीसाव्या वर्षी करावयाचे असते. ६५
जे सर्व विधी पुरुषांसाठी दिले आहेत ते सर्व स्त्रीयांना सुद्धा लागू हाेतात फक्त फरक एवढाच किं, त्यांचे विधी करतांना पवित्र मंत्रांचे उच्चारण करण्याची आवश्यकता नसते. ६६
स्त्रीसाठी विवाह विधी पुरुषाच्या दिक्षांत विधी प्रमाणे महत्वाचा असताे. पतिची सेवा ही स्नातकाने गुरूची सेवा करण्यासारखेच असते असे समजून घ्यावे. घरची कामे, दरराेज पवित्र अग्निची पुजा करणे, पतिच्या तपस्येत त्याला मदत करणे अशी सर्व त्यात येतात. (स्त्री गुरुकुलात जात नाही ती तिच्या पित्याच्या घरातच सर्व कामे आपल्या माते कडून शिकते म्हणून माताच तिची गुरू समजली जाते.) ६७
द्विजाला कसे पुरस्कृत करावयाचे त्याची माहिती पाहिली. आता त्याने आपली कर्तव्ये कशी पार पाडावीत ते सांगताे. ६८
अशा रितीने स्नातकाचा दिक्षाविधी संपंन्न झाल्यावर शिक्षकाने त्यास स्वताची शुद्धता कशी राखावी, याेग्य वर्तणूक अग्निपुजा कशी करावी, संध्या विधी कसा करावयाचा ते सांगावयाचे असते. ६९
वेदाचा अभ्यास करण्यास सुरुवात करण्या आधी विद्यार्थी शुचिर्भूत वस्त्र नेसेल. पवित्र जलाचे आचमन करील आपली सर्व इंद्रिये काबूत ठेविल. ७०
पाठाच्या आरंभी शेवटी विद्यार्थी शिक्षकाच्या पायास स्पर्श करील, अभ्यास करतांना दाेनही हाताची बह्यांगली (उलटा नमस्कार) मुद्रा करावी. ७१
शिक्षकाचे दाेनही पाय हाताने पकडावेत. डाव्या हाताने शिक्षकाचा डावा पाय उजव्या हाताने शिक्षकाचा उजवा पाय असे पकडावेत. ७२
जाे विद्यार्थी नवीनच शिकण्यास प्रारंभ करणारा असेल त्याला शिक्षक समजूतदारपणे अावाहन करील, "अहाे, वाच", ताे वाचण्यास सुरुवात करील शिक्षक जेव्हा थांबण्यास सांगेल तेव्हा ताे थांबेल. ७३
जरी वेदाच्या पाठाच्या प्रारंभी अखेरीस आेम्, , नसेल तरी त्याचा उच्चार त्याने वेदाच्या प्रत्येक पाठाच्या प्रारंभी शेवटी करण्यास विसरू नये. ७४
उच्चारण्यासाठी विद्यार्थ्यास शुद्ध करावे लागते त्यासाठी कुश गवताच्या पातीने ते करावे नंतर तीन वेळा दीर्घ प्राणायाम करून शुद्ध व्हावे. ७५
प्रजापति जाे विश्र्वाचा निर्माता आहे त्याने वेदातून तीन ध्वनि, आणि तीन शब्द, भू: - भूव: - स्व: पिळून काढले जसे गायीचे दूध काढतात. ७६
त्याच प्रमाणे प्रजापतिने, जाे उच्च स्थानी स्थिर अाहे, वेदातून ऋक् हे कवन जे सावित्रीस अति पसंद आहे ते काढले, ज्याची सुरुवात तद् धातूने हाेते. ७७

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.

माझा इमेल ashokkothare@gmail.com आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा