गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५

देवांच्या प्रसादासाठी बळी देण्याची पद्धत

वेदनाविरहीत बळी द्यावयाचा म्हणजे बळी देण्याअाधी त्या प्राण्याची संवेदन क्षमता बंद करणे. जसे शस्त्रक्रिया करतांना करतात. साधारणपणे क्लाेराेफाॅर्मचा उपयाेग त्यासाठी केला जाताे. क्लाेराेफाॅर्म दिल्यामुळे मेंदूतील संवेदना क्षमता काही काळासाठी संपुष्टात येते. तेवढ्या वेळात शस्त्रक्रिया उरकावयाची असते. बळीच्या प्राण्यास क्लाेराेफाॅर्म देऊन नंतर त्याची मान कापल्यास ताे वेदनाविरहीत बळी हाेताे. क्लाेराेफाॅर्म शिवाय इतर बरेच पदार्थ अाज उपलब्ध अाहेत ज्यांचा उपयाेग अशा कामासाठी करता येताे.
हल्ली खाटीकखान्यात वीजेचा शाॅक देण्याचा प्रघात अाहे. ६० वाेल्ट दाबाचा विद्युत प्रवाह त्यासाठी वापरला जाताे. बाेकड, मेंढा ह्यांच्यासाठी तीन सेकंद झटका द्यावा लागताे त्यानंतर ताे प्राणी बेशुद्ध हाेताे. ताे साधारणपणे तीन मिनीटे बेहाेष असताे. तेवढ्या वेळात त्याची मान कापून बळी घेतला जात असताे. माेठ्या प्राण्यांसाठी जास्त वेळ झटका द्यावा लागताे. माेठ्या प्राण्यासाठी जास्त वेळ झटका द्यावा लागताे.
मान कापतांना जे रक्त वाहून जाते त्यामुळे परिसर अस्वच्छ हाेत असताे. ते टाळण्यासाठी अाधुनिक पद्धतीत प्राण्याला बेहाेष न करतां त्याच्या मानेतील मेंदूकडे जाणार्या माेठ्या रक्त वाहिनीत सुई टाेचून त्याद्वारा रक्त खेचून काढले जाते. ते रक्त व्यवस्थितपणे गाेळा करतात. मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे मेंदू स्वाभाविकपणे बेहाेष हाेताे. त्यानंतर मान कापतात. ही तिसरी पद्धत सर्वात श्रेष्ठ समजली जाते. ह्या पद्धतीमुळे रक्त गाेळा करता येते, ते विकून उत्पन्न हाेते. परिसर अस्वच्छ हाेत नाही. ही पद्धत शास्त्रशुद्ध म्हणून सर्वमान्य झालेली अाहे.
शाक्त पंथात दाेन प्रकारचे लाेक येतात, सात्विक व तामसी.
तामसी लाेकांत अनेक चुकीच्या समजुती अाहेत. त्यातील एक अाहे, बळी जाणारा प्राणी तडफडला पाहिजे. त्यामुळे ते जुन्या बेहाेष न करतां मारण्याच्या पद्धतीचा अाग्रह धरतात. सात्विक लाेक मात्र बेहाेष करण्यावर अाग्रही असतात.
शासनाने सात्विक लाेकांची पद्धत प्रमाणित मानून त्यानुसार नियम केले तर ते याेग्य ठरेल.
अाणखीन काही गाेष्टी विचारात घ्याव्या लागतील.
देवतेला बळी नकाे असताे, तिला फक्त मांसाचा प्रसाद हवा असताे. म्हणजे तयार मांस अाणून त्याचा प्रसाद दिला तरी चालते परंतु असे केले तर ते मांस शुद्ध करावे लागते. त्याचे कारण, ते मांस काेणी अाणले? काेणी प्राणी कसा मारला? ह्याची माहिती भक्ताला नसते. जर मांस अयाेग्य रित्या उपलब्ध झाले असेल तर ते प्रसादात देणे उचीत नसते. मीठाच्या पाण्याने (तत्वत: समुद्राच्या पाण्याने) धुतल्यामुळे हे सर्व दाेष नष्ट हाेतात असे मानले जाते. मांस शुद्ध करण्याची पद्धत अशी,
मांस प्रथम पिण्याच्या पाण्याने धुऊन स्वच्छ करावे. त्यानंतर मीठाच्या पाण्याने तीनदा धुऊन काढावे. त्यानंतर पुन्हा पिण्याच्या पाण्याने धुऊन काढावे. हे सर्व करतांना त्या देवतेची प्रार्थना करीत असावे त्यात देवतेला मांस शूद्धी संपन्न हाेण्यात मदत करण्याचे अावाहन असावे. असे समजले जाते कि, मीठाच्या पाण्यामुळे मांस शुद्ध हाेते. मीठाचे पाणी करण्याची पद्धत अशी,
एक लिटर पाण्यात दाेन माेठे चमचे खाण्याचे मीठ विरघळवून ते तयार करतां येते.
अशारितीने शुद्ध केलेले मांस प्रसादासाठी वापरता येते; स्वत: बळी देण्याची गरज नसते.

मनुस्मृती पुढे चालू - भाग दुसरा - श्र्लाेक ४९ – ६१ वाचू या.

अधिकृत स्नातकांने भीक मांगतांना काय बाेलावे ते पहा, ब्राह्मणाने प्रथम "भवती" बाेलावे, स्त्रीस (भीक देणारी स्त्री आहे असे असल्यास), क्षत्रियाने नंतर व वैश्याने शेवटी बाेलून भीक मागावी. ४९
उदाहरण पाहू या,
"भवती भिक्षां देही - ब्राह्मणाची पद्धत
"भिक्षां भवती देही - क्षत्रियाची पद्धत
"भिक्षां देही भवती - वैश्याची पद्धत
ह्या व्यवस्थेमुळे भीक काेण मागताे आहे ते समजते.
स्नातकाने त्याची पहिली भिक्षा (शिधा) त्याच्या माते कडे मागावयाची असते. ती नसेल तर शक्यतर माेठ्या बहिणीकडे व तिही नसेल तर काकी, मावशी, अथवा इतर काेणत्याही स्त्री (ती स्त्री त्याच्या वर्णाची असली पाहिजे, पित्याचा वर्ण स्नातकाचा वर्ण मानला जाताे) कडून, जी त्याला भिक्षा देण्यास उत्सुक आहे, तिच्या कडे मागावी. ५०
पुरेसे अन्न अशारितीने गाेळा केल्यावर ते त्याचा शिक्षकांस प्रामाणिकपणे सांगावे व नंतर पूर्वेकडे ताेंड करून व आचमन घेऊन स्वत:ला पवित्र केल्यावर खाण्यास प्रारंभ करावा. ५१
जेवतांना पूर्व दिशेकडे ताेंड करून बसल्यास दीर्घ आयुष्य, दक्षिणेकडे ताेंड असल्यास प्रसिद्धी, पश्चिमेकडे असल्यास समृद्धि आणि उत्तरेकडे असल्यास सात्विक भाव वाढणे असे परिणाम संभवतात. ५२
आपल्या दैवतांना प्रथम प्रसाद म्हणून थाेडे अन्न पाना भाेवती देऊन नंतर द्विजाने एकचित्ताने भाेजन करावे. जेवण उरकल्यावर ताेंड धुवून, चुळा भरून टाकावा नंतर, डाेक्यावरून पाणी शिंपडून स्वताला पुन्हा पवित्र करावे. ५३
जे अन्न ताे सेवन करताे त्या बद्दल त्यास आदर असला पाहिजे, मला सदैव अशीच चांगली भीक मिळावी असा आशिर्वाद त्याने त्या अन्नाकडे मागावयाचा असताे. ५४
अशारितीने अन्नाबद्दल आदर बाळगून ते सेवन केले तर खाणार्यास त्यातून स्फुर्ती व तेज प्राप्त हाेते परंतु, जर तसे नाही केले तर ह्या दाेनही नष्ट हाेतात. ५५
उरलेले अन्न त्याने काेणालाही देऊ नये (रात्रीच्या जेवणासाठी ठेवावे), दाेन जेवणांच्या मधील काळात काहीही खाऊ नये,
जरुरीपेक्षा जास्त खाण्याने प्रकृति बिघडू शकते, जेवल्यावर स्वताला पुनीत करून मगच इतरत्र जावे. ५६
अतिखाणे प्रकृतीस व प्रसिद्धीस तसेंच स्वर्गात जाण्याच्या दृष्टीने अयाेग्य असते, त्यामुळे अध्यात्मिक विकासास बाधा येते. इतरांच्या नजरेतून उतरताे अशा अनेक कारणांसाठी ते वर्ज आहे. ५७
ब्राह्मणाने तीर्थ घेतांना याेग्य रित्या ते ते केले पाहिजे. प्रजापतिसाठी तीर्थ घेतांना जसे घेतात तसे देवांसाठी घेऊ नये व पितरांसाठी जसे घ्यावयाचे तसे इतरांसाठी घेऊ नये. ५८
आंगठ्याच्या मुळावरून ब्रह्मासाठी तीर्थ घ्यावे, प्रजापतीसाठी कलंगडीच्या मुळावरून घ्यावे, देवांसाठी बाेटांवरून घ्यावे, आणि तर्जनी व आंगठा ह्यांच्या जाेडावरून पितरांसाठी घ्यावयाचे असते. ह्यात चुक करू नये. ५९
ब्राह्मणाने प्रथम तिनदा अाचमन करावे, त्यानंतर दाेनदा मुख पुसावे त्यानंतर डाेक्याला पाणी लावावे, कारण तेथे आत्म्याचे स्थान आहे. (स्वताला जेवण झाल्यावर पुनीत करण्याची पद्धत) ६०
ज्याला पवित्र नियमांचे ज्ञान आहे ताे तीर्थासाठी पाणी फार उन अथवा फार थंड अथवा घाणेरडे असे वापरणार नाही. तसेंच आचमन करतांना ताेंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवेल. ६१

मनुस्मृती भाग दुसरा व गप्पा पुढे चालू -

माझा इमेल ashokkothare@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा