बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक व त्यांचे तत्वज्ञान
जैन लोकांचे जीवन कसे असते ते समजून घेण्यासाठी आपण आता थोडा अभ्यास करणार आहोत. जैन तत्वज्ञाना प्रमाणे तीन नियमांचे पालन करावयाचे असते. ते आहेत अस्तेय, अपरिग्रह आणि अहिंसा. ह्यांचा अर्थ समजून घेऊया. शांती हा अहिंसेचाच परिणाम स्वरूप असल्यामुळे त्याचा वेगळा विचार करीत नाही.
अस्तेय म्हणजे चोरी न करणे. चोरी म्हणजे काय? चोरी म्हणजे विश्र्वासघात. विश्र्वासघातात येणार्या सर्व गोष्टी अस्तेय मध्ये येतात. त्या अशा, भ्रष्टाचार, साठेबाजी, भेसळ करणे, लाच देणे आणि घेणे, खोटे आश्र्वासन देणे, खोटे बोलणे, कर बुडवणे, पैशाच्या जोरावर विरोधी साक्षीदार विकत घेणे, ब्लॅकमेल करणे, प्रतिस्पर्ध्यास घाबरवणे अाणि चाेरी इत्यादी. जैन लोक व्यापार उदीम करणारे असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना करणे ही नित्याची गोष्ट असते. ह्या गोष्टी केल्याशिवाय ते व्यापार करूच शकत नाहीत. म्हणजे जैन लोक जैन धर्माचा पहिला नियम पाळत नाहीत. कारण, जर त्यानी ह्या अस्तेय नियमाचे पालन केले तर ते व्यापार करू शकणार नाहीत. व्यापारात स्पर्धा असतेच, त्या स्पर्धेत जर जिंकावयाचे तर हे सर्व स्तेय कृत्य (चोरीची कृत्ये) करण्याशिवाय काम करणे केवळ अशक्य असते. एकतर अस्तेय तत्त्वाचे पालन करावे अथवा व्यापार करावा. दोनही गोष्टी एकाच वेळी करणे शक्य नसते. जैन लोकांनी व्यापार निवडला व अस्तेय तत्वाकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे अशा खोट्या कामात त्यांना त्यांच्या महंतांची, जैन साधुंची, साथ असते. कित्येक जैन मुनी अशा कृत्यात सामीलसुद्धा होतात असे आढळते.
दुसरा नियम आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे धन संपत्तिचा संचय न करणे. ह्या नियमाचे पालन जैन लोक बिलकूल करीत नाहीत. व्यापार करून मिळवलेली संपत्ति ते साठवून ठेवतात. एवढेच नाही तर तिचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. एकमेकांना आपली संपत्ति दाखवून ते इतरांना खिजवण्यात धन्यता मानतात. त्याबद्दल त्या जैन लोकांना आपण काही अयोग्य करतो असे वाटत नाही. म्हणजे हा दुसरा नियमसुद्धा ते पाळत नाहीत.
तिसरा नियम आहे अहिंसा. अहिंसा हा एक फसवा नियम आहे. त्याचे अनेक अर्थ दाखवले जातात. ह्या ठिकाणी आपण फक्त जैन अर्थ विचारात घ्यावयाचा आहे. कोणालाही दुखवणे म्हणजे हिंसा असे त्यात समजले आहे. 'कोणालाही', ह्यात इतरां बरोबर आपण स्वतासुद्धा येतो. दुखवणे ह्यात शारिरीक, मानसिक, आर्थिक व नैतिक अशा चारही प्रकारचे दुखवणे येते.
शारिरीक दुखात मारणे, छळणे, ठार मारणे, त्रास देणे अशा गोष्टी येतात.
मानसिक दुखात अपमान करणे, नांव बदनाम करणे, बहिष्कार टाकणे, दुर्लक्ष करणे, मनस्ताप देणे अशा गोष्टी येतात.
आर्थिक दुखात नुकसान करणे, फसवणे, विश्र्वासधात करणे, चोरी करणे, शब्द न पाळणे, पैसे न देणे इत्यादी येतात.
नैतिक दुखात अनैतिक कृत्यास प्रवृत्त करणे. म्हणजे, दुसर्याशी खोटे बोलणे, चुकीचा सल्ला देणे, दुसर्याचे वाईट होत असतांना त्याची मजा बघणे, वाईट करणार्यास मदत करणे अथवा विरोध न करणे, दुसर्याचे वाईट चिंतणे, खोट्यानाट्या कंड्या पिकवणे, मत्सर करणे, द्वेष करणे, आपल्या पेक्षा जास्त यशस्वी लोकांशी स्वताची तुलना करणे, सदैव दुखात रहाणे, विनाकारण काळजी करणे, जीवनाकडे नकारात्मक दृष्टीने पहाणे अशा बर्याच गोष्टी येतात.
पुढील पाेस्ट मध्ये पुढे चालू –

आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक ९५ – १२० वाचू या.
जाे ह्या इच्छा पूर्ण करीत रहाताे व जाे ह्या इच्छा साेडून सन्यस्त जीवन जगताे त्या दाेघात सन्यस्त जीवन जगणारा अखेरीस जास्त सुखी हाेताे. ९५
अंतिम ज्ञानात रमलेला व म्हणून भाेग इंद्रियांकडे दुर्लक्ष करणारा, अापली भाेग इंद्रिये जितकी सहजपणे नियंत्रित करू शकताे तितक्या सहजपणे भाेगी माणूस करू शकत नाही. ९६
जाे माणूस भाेग इंद्रियांत रमला अाहे ताे वेदाच्या अभ्यासांने, दानाने, त्यागाने, तत्वशिलतेने, असे काेणतेही दिव्य केले तरी ब्रह्मपदी जाऊ शकत नाही. ९७
जेव्हा भाेग इंद्रियांच्या उत्तेजनाने त्या माणसाला काेणताही आनंद किंवा दु:ख हाेत नाही तेव्हा त्या माणसाने त्याची भाेग इंद्रिये काबूत ठेवली आहेत असे समजले जाते. ९८
परंतु, जेव्हा भाेग इंद्रियांच्या आहारी ताे जाताे तेव्हा त्याचा विवेक नष्ट हाेताे व ताे भरकटत जाताे जसे, गळक्या भांड्यातून पाणी गळते. ९९
ज्यांने आपली सर्व अकरा इंद्रिये काबूत ठेवली आहेत त्याला हट्टयाेग करून शरिराला त्रास द्यावयाची गरज नसते. १००
उष:काली सावित्री मंत्र, तद् सवितू:, सूर्य उगवे पर्यंत उभे राहून एक चित्ताने मनात जपावा व संध्याकाळी बसून रात्री नक्षत्रांना उगवे पर्यंत एक चित्ताने मनात जपावा, ह्यामुळे त्याची आध्यात्मिक प्रगति हाेत जाते. १०१
उष:काली सावित्री मंत्र वर दिल्याप्रमाणे जपल्याने त्या आधीच्या रात्री केलेल्या पापा पासून त्याची मुक्ती हाेते व संध्याकाळी जपल्याने त्या दिवशी केलेल्या पापा पासून मुक्ती हाेते. १०२
जाे अशारितीने एक चित्ताने उष:काली व संध्याकाळी जप करणार नाही ताे, शुद्र समजला जाईल व त्याला स्वत:ला आर्य म्हणवून घेण्याचा अधिकार रहाणार नाही. १०३
ज्याला सावित्री मंत्र जपण्याची इच्छा आहे त्याने नदीकिनारी, वनात, जाऊन परंतु, स्वत:च्या भाेग इंद्रियांना काबूत ठेवून ताे करावा. १०४
हवन करून वेदाचे पठण करणारा, दरराेजचे इतर नैमित्तिक वाचन करणारा व पवित्र नियमांचे पालन करणारा अशांना बर्याच गाेष्टी माफ असतात. १०५
वेद वाचनास काेणताही दिवस वर्ज (सुतक, सुयेर) नसताे. कारण, हे ब्रह्मास्त्रा सारखे असते. त्या वेळी असे वाचन हे हवन करण्यासारखेच असते. वेद वाचन सदैव स्तुत्य असते. १०६
जाे वेदाचे वाचन भाेग इंद्रियांचे नियंत्रण करून नित्यनेमाने करील त्याला गाेड व आंबट दही, लाेणी, मध नेहमी सहजपणे मिळेल. १०७
पुरस्कृत विद्यार्थी जाे स्वत:ला आर्य म्हणवून घेण्यास याेग्य झाला आहे त्याने जर पवित्र हाेमात संविधा देणे, भिक्षा मांगणे, आपल्या शिक्षकाची सेवा करणे, हे सर्व नित्यनेमाने समवर्तन (गुरुच्या गृहातून स्वगृही जाण्याचा विधी) वेळे पर्यंत केले तर ताे जीवनात यशस्वी हाेईल. १०८
पवित्र नियमांच्या आदेशानुसार काही दहा प्रकारचे पुरुष ते नियम शिकण्यास याेग्य ठरतात. ते असे, जाे गुरुची सेवा करण्यात उत्सुक, जाे शिक्षकाचा पुत्र, जाे ज्ञान देऊ व घेऊ शकताे, जाे पवित्र नियमांचे पालन करण्यास तयार आहे, जाे पवित्र जीवन जगताे, जाे विवाह बंधनाने जाेडला गेला आहे, जाे मैत्रीने जाेडला गेला आहे, जाे शिक्षकाचा नातेवाईक आहे, जाे शिक्षणाची प्रामाणिक इच्छा बाळगताे, जाे दान करताे व एरव्ही प्रामाणिक आहे. १०९
अयाेग्य रित्या विचारलेल्या प्रश्नाकडे ज्ञानी माणसांने दुर्लक्ष करावयाचे असते. ११०
न विचारता माहिती देणे, उद्धटपणे विचारणा करणे, अशा प्रश्र्नांना उत्तर देणे हे सर्व क्राेधास कारणीभूत हाेण्याची शक्यता असते. म्हणून ते टाळावे. १११
ज्या देशात सत्य व मेहनत ह्यांची कदर हाेत नाही अशा ठिकाणी शहाण्या माणसाने ज्ञान देऊ नये. असे करणे म्हणजे उलट्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे. ११२
अतिवाईट परिस्थितीत सुद्धा वेदाचे ज्ञान शिक्षकांने चुकीच्या माणसाला देऊ नये. त्यापेक्षा मरण पत्करावे. ११३
पवित्र ज्ञानाने ब्राह्मणाला सांगितले अाहे किं, मी तुझी संपत्ती आहे, कृपया मला अयाेग्य लाेकांना शिकवू नकाेस, फक्त याेग्य लाेकांना शिकवं, जर असे केलेस तर मी सर्व शक्तिमान हाेईन. ११४
जाे ब्राह्मण पवित्र जीवन जगताे, आपल्या भाेग इंद्रियांचे नियमन करताे, प्रामाणिकपणे अभ्यास करताे अशाल्च पवित्र ज्ञान द्यावे. ११५
जाे वेदपाठाचे वेद वाचन चाेरून ऐकताे व त्याद्वारा वेद शिकताे ताे नरकात खितपत पडेल. ११६
चर्चा अभ्यास इत्यादी करण्या आधी विद्यार्थ्याने प्रथम शिक्षकास नम्रतापूर्वक अभिवादन करावयाचे असते. ११७
पूर्ण संयमी असा ब्राह्मण जाे सावित्री मंत्र जाणताे ताे वेदाचे सर्व ज्ञान असलेल्या परंतु, व्यभिचारी जीवन जगणार्या ब्राह्मणापेक्षा अथवा अभक्ष्य भक्षण करणार्या पेक्षा तसेंच खाेट्या गाेष्टींचा व्यापार करणार्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रेष्ठ ठरताे. ११८
ज्या जागी श्रेष्ठी बसतात तेथे जाऊन बसू नये, तसेंच बसलेले लाेक श्रेष्ठी आल्यावर उठून त्यांना अभिव्दन करतील. ११९
गर्विष्ठ तरुणाने वडिल माणसे आल्यावर उठून त्यांना नमस्कार करावा व असे केल्याने त्याचा गर्व मर्यादेत राहिल. १२०

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा