शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान -
मागील पाेस्ट वरून चालू -
जेव्हा आपण जैन लोकांचे वागणे पहातो तेव्हा असे दिसते की, अहिंसा ह्या नियमातील कोणत्याही गोष्टीचे पालन ते करीत नाहीत. केवळ शाकाहार करणे म्हणजे अहिंसा असा अजब गैरसमज त्यांच्यात रूढ असल्याचे दिसते. केवळ शाकाहार केला म्हणजे जैन धर्माचे पालन झाले असे ते समजतात. त्याशिवाय इतर काही भाज्या जसे कांदा, लसूण, बटाट खाणे अयोग्य समजतात. परंतु मूळ जैन तत्वानुसार ह्या गोष्टींना कोणताही आधार नाही. जैन लोकांचा असा समज आहे की, मांसाहार करण्याकरतां प्राण्याला ठार मारावे लागते. ठार मारणे म्हणजे हिंसा असे ते समजतात. परंतु, जैन धर्मातील हिंसेच्या व्याख्येप्रमाणे जर पाहिले तर मारण्याच्या क्रियेत जर वेदना होत नसेल तर ते मारणे हिंसा ठरत नाही. म्हणजे, वेदनाविरहीत हत्त्या अहिंसक ठरते. पूर्वीच्या काळी अशी वेदनाविरहीत हत्त्या शक्य नव्हती. त्यामुळे त्या काळात ते कदाचित, योग्य होते. परंतु, आजच्या परिस्थितीत वेदनाविरहीत हत्त्या करणे शक्य झाले आहे. वेदना होण्याचे कारण प्राण्यास संवेदना क्षमता असते. ही संवेदनाक्षमता जर बंद झाली तर त्याला कोणतीही वेदना जाणवणार नाही. प्राण्यास बेशुद्ध केले तर त्याला वेदना होत नाहीत. जसे शस्त्रक्रिया करतांना संवेदनाक्षमता बंद केली तर ती शस्त्रक्रिया विनावेदना करता येते, हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे जर तो प्राणी बेशुद्ध करुन मारला तर ती हत्त्या अहिंसक ठरते. म्हणजे त्याप्रकारे प्राण्यास मारुन मांसाहार केला गेला तर ते जैन तत्वानुसार अहिंसक ठरते. ह्याचा अर्थ जैन तत्वज्ञाना नुसार असा मांसाहार वर्ज ठरत नाही. हे सिद्ध झाले तरी आता हा मांसाहाराचा मुद्दा एक प्रतिष्ठेचा विषय होऊन बसला आहे. अशा परिस्थितीत मांसाहाराला विरोध करणे म्हणजेच जैन धर्माचे पालन करणे असा विलक्षण गैरसमज झालेला आहे. जैन लोकांच्या मित्थ्याचारात अहिंसेच्या नांवाने बर्याच गमतीशीर गोष्टी ते करतात. नाकाला पट्टी लावून त्याद्वारा आपण हवेतील सुक्ष्म जीवाणूंना संरक्षण देतो अशा हास्यास्पद गोष्टी ते करीत असतात. बसतांना ते प्रथम कुंचल्याने जमीन साफ करतात कारण काय तर, त्याद्वारा जमिनीवरील जीवाणूंन ते बाजूला करतात जेणेकरुन त्यांच्यावर ते बसणार नाहीत, केवळ मूर्खपणा ठरतील अशा ह्या इतर बर्याच प्रथा त्यांच्यात प्रचलित आहेत. मूळ तत्वांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा सर्व खटाटोप ते करीत असतात. म्हणूनच ते दांभिक, खोटारडे, भ्रष्ट ठरतात.
जैन लोकांचे हे वागणे म्हणजे केवळ मित्थ्याचार ठरतो. एकाबाजूला स्वता, जैन धर्मात दिलेल्या एकाही नियमांचे पालन करावयाचे नाही दुसर्या बाजूस ह्यांच नियमांचे अवडंबर माजवायचे असा हा दाभिकपणा जैन लोकांचा चालू आहे. काही संभावितपणे सांगतात कीं, हे सर्व नियम त्यांच्यातील साधूंसाठी अाहेत! मग श्रमणकांनी काय करावे? तर ते म्हणतात, फक्त शाकाहार करणे म्हणजे जैन धर्माचे पालन करणे! अशा रितीने ते पळवाट काढून स्वत:ची इतरांची फसवणूक करण्यात धन्यता मानतात. ह्यावरून हे जैन लाेक किती खाेटारडे अाहेत ते स्पष्ट हाेते. एवढे करून सुद्धा स्वताला सुस्कृत म्हणवून घेण्यात धन्यता मानतात.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक १२१ – १४० वाचू या.
विद्यार्थ्याने काेणते शिष्टाचाराचे नियम पाळावेत ते येथे दिले आहेत.
जाे तरूण नेहमी वडीलांचा मान राखून वागताे ताे चार गाेष्टींने फायद्यात रहाताे, त्या अशा, दीर्घ अायुष्य, ज्ञान, प्रसिद्धी व सामर्थ्य. १२१
वडीलांना अभिवादन केल्यावर ब्राह्मणाने स्वत:चा परिचय करावा, त्यात प्रथम मी अमुक अमुक (नांव, गांव इत्यादी माहीती) आहे असे सांगावे. १२२
ज्या लाेकांना नांव सांगितले तरी समजत नाही त्याना शहाणी माणसे नीट समजावून सांगतात. तसेंच स्त्रीयांबाबत सुद्धा करावे. १२३
अभिवादन करतांना स्वत:चे नांव सांगितल्यावर भू:: असे बाेलावे. कारण, ऋषी सांगतात किं, भू:: हे काेणत्याही विशेष नांवाला पर्याय आहे. १२४
ब्राह्मणाने सुद्धा अभिवादनाला प्रतिसाद द्यावा व त्याकरतां असे बाेलावे, "आपण दिर्घायुषी व्हाल." १२५
ज्या ब्राह्मणाला यथाेचितपणे अभिवादनाला प्रतिसाद देता येत नाही त्याला जाणकार अभिवादन करीत नाहीत. तीच गाेष्ट इतर वर्णाच्या लाेकांस लागू हाेताे. १२६
ब्राह्मणाला अभिवादन केल्यावर "कुशल आहात नां?" असे विचारावे. क्षत्रियांस विचारावे, "आपण अनमय अाहात ना?" वैश्यास विचारावे, " आपले क्षेम कुशल आहे नाण?" शुद्रास विचारावे, "तुझे आराेग्य ठिक आहेनां?" १२७
श्राैत विधी करणार्या ब्राह्मणास विचारतांना ताे जरी लहान असला तरी त्याच्या पवित्र ज्ञानाचा मान ठेवून नांव न घेतां "भाे:" असे बाेलून नंतर भवेत्" (अहाे आदरणीय) असे बाेलावे. १२८
स्त्रीस अभिवादन करतांना जर ती काेणाची पत्नी असेल तर "भवती", अथवा एरव्ही "भगिनी", असे बाेलावे. १२९
वडील मानाच्या लाेकांस जसे काका, मामा, सासरे, अाजाेबा, शिक्षक वगैरे ह्यांना अभिवादन करतांना प्रथम स्वताचा परिचय, "मी अमुक अमुक", असा करावा व नंतर उठून उभे राहून नमस्कार करावा. जरी ताे गृहस्थ वयाने लहान असला तरी. १३०
घरातील सर्व वडील स्त्रीयांना माेठ्या मानाने अभिवादन करावे जसे शिक्षकाची पत्नी, आई, आजी, मावशी इत्यादी १३१
माेठ्या भावाच्या पत्नीचे पाय दरराेज धरावेत परंतु, इतर वडील स्त्रीयांचे पाय फक्त परगांवातून आल्यावर धरावेत. १३२
घरातील सर्व वडीलधार्या स्त्रीयांना आपल्या आई प्रमाणे मान द्यावा. परंतु, आपली आई नेहमी आपल्याला जास्त आदरणीय असावी लागते. १३३
सहध्यायी जरी दहा वर्षाने माेठे असले तरी त्यांना प्रेमाने, एकेरी (अरे, तुरे), बाेलण्यास हरकत नसते. १३४
ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय वयाने माेठा असला तरी त्याचे नाते बाप मुलासारखे समजावे (ब्राह्मण बाप व क्षत्रिय मुलगा असे) १३५
संपत्ति, नाते, वय, कर्मकांड, आणि पवित्र नियमांचे ज्ञान ह्या सर्व गाेष्टी चढत्या क्रमांने अादरणीय आहेत त्यात शेवटचा (पवित्र नियमांचे ज्ञान) जास्त अादरणीय असे समजावे. १३६
वर्णातील पहिल्या तीन वर्णातील इसमांत वर दिलेल्या गाेष्टी ज्याच्या कडे जास्त असतील ताे त्यांच्यातल्या त्यांच्यात श्रेष्ठ समजावा. तसेंच पन्नाशी गाठलेला शुद्र सुद्धा श्रेष्ठ समजावा. १३७
वाहनात चढतांना दिलेल्या क्रमाने अग्रक्रम द्यावा. नव्वदी गाठलेला, आजारी, आेझे वाहणारा, स्त्री, विद्यार्थी, राजा व शेवटी नवरदेव. १३८
जेव्हा विविध प्रकारची माणसे एकत्र मिळतात तेव्हा त्यात स्नातक (वेदाचा अभ्यास करणारा) व राजा ह्यांना इतरांनी मान द्यावयाचा असताे. परंतु, जेव्हा फक्त राजा व स्नातम भेटतात तेव्हा राजाने स्नातकाला मान द्यावयाचा असताे. १३९
ब्राह्मण जाे विद्यार्थ्यास वेदाची दिक्षा देताे व त्याशिवाय कल्प आणि रहस्य शिकवताे त्या ब्राह्मणाला आचार्य असे बाेलावे. १४०


पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा