सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा- १२

वेद, पवित्र परंपरा, सद्गुणी लोकांचे विचार आणि ज्यात यजमानाचा आदर आहे ते अशा चार गोष्टींनी पवित्र नियम बनतात. १२
ज्या लोकांनी संपत्ती व प्रसिद्धी ह्यांचा त्याग केला आहे व केवळ वेदांचे ज्ञान हाच ध्यास धरला आहे अशा लोकांनी वेदांचा अभ्यास करावा. १३
तसेंच जेव्हा श्रृती व स्मृती ह्यात दिलेले आदेश एकमेका विरुद्ध सांगतील तेव्हा त्या दोघांना समान (पर्यायी) समजून वागावे १४
अग्निहोत्र यज्ञ सर्वांना बंधनकारक नाही. जर ते करावयाचे असेल तर प्रात:काळी जेव्हा सूर्य अजून उगवला नाही अशा समयी करावा. असे वेदात दिले आहे. १५
ज्यांचे जीवन गर्भाधनाने सुरू होते व अंत्यष्टीने संपते (म्हणजे द्विज, म्हणजे क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य) अशानेच वेदांचा अभ्यास करावा. इतर कोणीही वेदांचा अभ्यास करू नये. १६
जी भूमि देवांनी निर्माण केली आहे व जी सरस्वती आणि दृिषद्वती ह्या दोन पवित्र नद्यांच्या खोरात आहे (हल्लीचे उत्तराखंड राज्य व हिमाचल प्रदेशाचा काही भाग) जिला ऋषी ब्रह्मावर्त असे संबोधतात तेथे ते (ऋषी) रहातात. १७
परंपरेने चार प्रमुख वर्ण आणि त्यांच्या मिश्रणांने तयार झालेल्या अनेक जाती ह्यांच्या अनंत काळापासून चालत असलेल्या परंपरांना प्रमाणित समजून वागावे. १८
कुरु, पठार, मत्स्य, पंकल आणि सुरसेन ह्यांची वस्ती असलेला प्रदेश जेथे ब्रह्मऋषी रहातात तो प्रदेश (हिमाचल प्रदेश व काश्मीर, लडाख हा भाग) ब्रह्मावर्तानंतर महत्वाचा असा समजावा. १९
ह्या पवित्र प्रदेशात जन्मलेल्या ब्राह्मणांकडून इतरांनी ज्ञान घ्यावे २०
हिमालय व विंध्य पर्वतांच्या रांगा ह्या मधील व प्रयागच्या पूर्वेस आणि विनासन (जेथे सरस्वती नदी लोप पावते) ह्यांच्या मधील प्रदेशाला मध्यदेश (हल्लीचा मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश) असे म्हणतात. २१
वर सांगितलेल्या पर्वतांच्या परिसरातील जो भाग पश्चिम व पूर्व सागरांना मिळतो तो आर्यावर्त समजावा. २२
जेथे काळवीट चरतात तो प्रदेश यज्ञासाठी उत्तम समजावा, हे प्रदेश सोडून इतर भागात म्लेश्च रहातात. २३
द्विजांनी, ब्रह्मवर्तात व ब्रह्मर्षी ह्यांच्या प्रदेशात वास्तव्य करावे. शुद्र कोठेही राहू शकतात. २४
अशारितीने मी विश्र्वाची निर्मिती व पवित्र नियमांची माहिती तुला दिली, आता विविध वर्णांची कर्तव्ये कोणती ते समजून घे. २५


मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा