बुधवार, २९ जुलै, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा- ११

मागुन पुढे चालू - मनुस्मृतीचा पहिला भाग संपला असून आता दुसरा भाग आपण पहाणार आहोत.
हे पवित्र नियम जे वेदाचे ज्ञान असलेले लोक मानतात व त्याचे पालन करुन उच्च पदाला पोहोचले आहेत, जे द्वेष, वाह्यात प्रेमात फसत नाहीत,
केवळ वासनापूर्तीसाठी प्रेरीत होत नाहीत, केवळ ज्ञानासाठी वेदाचा अभ्यास करतात, त्यात दिलेल्या पद्धतीने आचरण करतात २
वासना निर्माण होण्याचे कारण ती वासनापूर्ण होईल अशी अपेक्षा असते, तेवढ्यासाठी दाने करतात, शपथा घेतात, कारण त्यांना असे वाटते किं असे केल्याने त्या वासना पूर्ण होतील.
येथे दिलेल्या सर्व इच्छा वासना पूर्तीसाठीच आसतात. मनुष्य जे काही करतो ते सर्व त्याच्या इच्छापूर्ती साठीच असते हे सर्वांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
येथे दिलेले कर्मकांड जर सचोटीने व नित्यनियमांने पार पाडतील तर ते अमर होतील अथवा जीवनात पूर्णतया यशस्वी होतील.
हे लक्षात असावे किं वेद सर्व ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे. त्याशिवाय सत्शील आचरण, संतांचे मार्गदर्शन, स्वताचे अनुभव अशांच्या एकत्रित प्रभावाने जीवनाचे मार्गदर्शन होत असते.
मनुने जो नियम सांगितला तो वेदानुसारच असतो, कारण तो मनु सर्वज्ञानी आहे.
जरी असे साधारणपणे असले तरी जाणकारांनी कालमानानुसार सारासार विचार करुन मगच त्यांचे पालन करावयाचे असते. (म्हणजे सांगकाम्याप्रमाणे करु नये.)
जो वेदातील आज्ञांचे पालन करुन त्याप्रमाणे आचरण करतो तो मृत्युलोकात ख्यातनाम होतो व मृत्युनंतर उत्तम गती प्राप्त करतो.
श्रुति म्हणजे ऐकलेले ज्ञान व स्मृति म्हणजे परंपरेने आलेले ज्ञान, अशा दोघांबद्दल कोणीही संशय बाळगून त्यांचा अवमान करु नये. त्यात दिलेल्या आदेशांचे पालन करावे करण पवित्र नियम त्यांतुनच तयार झाले आहेत १०
जे कोणी प्रत्येक द्विज (क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य हे सर्व द्विज समजले जातात) वेदांबद्दल (श्रुति, स्मृति) अनादर बाळगून वागतात त्यांना सर्व लोकांनी वेदांचा द्वेष्टा म्हणून दूर करावे. ११


मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा