सोमवार, २० जुलै, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-१०

मागुन पुढे चालू - मनुस्मृतीचा पहिला भाग संपला असून आता दुसरा भाग आपण पहाणार आहोत. त्या आधी काही माहिती पाहू या.
एकंदर भाग बारा आहेत.
) पहिल्या भागात विश्र्वाची निर्मिती आणि द्विजांची कर्तव्ये सांगितली आता
) दुसर्या भागांपासून नंतरच्या पांच भागांत आपण दैनंदीन कामे व इतर विधी, विवाह जीवन, कुटूंबाची व गृहस्थाश्रमाची कर्तव्ये, नंतरच्या वानप्रस्थाश्रमातील जीवन ह्याबद्दल सुचना दिल्या आहेत.
) सातव्या व आठव्या भागात राजाची व सैन्याची व्यवस्था, कर्तव्ये ह्याबद्दल दिले आहे.
) नवव्या भागात कायदा कानु आणि न्यायनिवाडे ह्या बद्दल सांगितले आहे.
) दहाव्या भागात जाती व्यवस्था, समाज व्यवस्था आणि राज्य व्यवस्था ह्या बद्दल सांगितले आहे.
) अकराव्या व बाराव्या भागात व्यक्ती आणि समाजाची नैतिक कर्तव्ये कोणती ते दिले आहे. त्याशिवाय अध्यात्म, तत्वज्ञान ह्याचा विचार केला आहे. त्यात पाप, पुण्य, पश्चात्ताप, तत्वशिलता, संन्यास आणि तपस्या ह्याची माहिती दिली आहे.
) बाराव्या भागात मनुस्मृतीतील पवित्र नियम बदलण्या बाबात मार्गदर्शन केले आहे. म्हणजे हे नियम कालमानानुसार बदलण्याची मुभा आहे व ते नित्य नाहीत असे दाखवले आहे.
हिंदू मान्यता उत्क्रांत होतात म्हणजे, कालाच्या अनुसराने बदलतात. तसे ईस्लाम व इतर मध्यपूर्वेतील धर्मांत होत नाही. म्हणून शंभर वर्षापूर्वीची हिंदूमान्यता व आजचा ह्यांच्या चालीरीतीत बराच फरक आढळतो. (उदाहरणार्थ, शंभर वर्षापूर्वी विधवा विवाह होणे शक्य नव्हते आज ते होऊ शकतात.) तसे ईस्लाम अथवा ख्रिस्ती धर्मात होत नाही. हिंदू परंपरा एकाद्या वृक्षाप्रमाणे नेहमी ताज्या असतात. इतर धर्माच्या परंपरा एकाद्या पुतळ्या प्रमाणे न बदलणार्या असतात. म्हणजे जरी वृक्ष अनेक वर्षाचा जुना असला तरी त्याच्या फांद्या, पाने, डाहळ्या अगदी ताज्या असतात. त्या उलट पुतळ्याचे सर्व भाग त्या पुतळ्या इतकेच जुने असतात. जर वृक्षाची फांदी मोडली तर लवकरच त्या जागी नवीन फांदी उगवते तसे पुतळ्या बाबत होत नसते. जर एकादा भाग मोडला तर तेथे नवीन भाग येत नाही. हिंदू मान्यता उत्क्रांत होणार्या आहे तर इतर धर्म जडवादी आहेत. एकदा कोणी संस्थापकानी काही सांगितले कीं त्यात कोणताही बदल होत नाही. हा महत्वाचा फरक इतर धर्म व हिंदू मान्यता ह्यात आहे. दुर्दैवाने नंतरच्या काळात ब्राह्मणांनी त्याला जड करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला त्याला पुन्हा उत्क्रांत करावा लागेल. त्यासाठी मनुस्मृतीचा अभ्यास होणे आवश्यक ठरते म्हणून हा प्रपंच मांडला आहे.
उपलब्ध माहितीनुसार मनुस्मृती इसवी सन पूर्व १५०० वर्षे लिहीली गेली.
पुढील पोस्ट पासून दुसर्या भागाचा विचार करावयाचा आहे.
मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा