गुरुवार, ९ जुलै, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-९

मागुन पुढे चालू -
खर्या ज्ञानी ब्राह्मणाने हे नियम शिकून त्याचे व्यवस्थितपणे पालन करून ते दुसर्या योग्य ब्राह्मणास शिकवून त्याची परंपरा पुढे चालू ठेवावी. १०३
जो ब्राह्मण असे करतो तो कधीही पाप कर्मात (जे आचार, विचार आहार ह्यांच्यामुळे घडतात) अडकत नाही. १०४
तो त्याच्या आधीच्या नंतरच्या अनेक पिढ्यांचे कोटकल्याण करतो त्याला ह्या सृष्टीचा मालक समजावे. १०५
ह्या पवित्र नियमांचे पालन करणारा त्याच्या जीवनात सुखी, संपन्न समाधानी होईल. १०६
ह्या संहितेत पवित्र नियमां बरोबर इतर नैतिक नियम दिले आहेत, ज्याच्या पालनाने माणसाचे जीवन सुखी संपन्न होईल. १०७
नैतिकतेचे नियम सामान्य अकलेचा भाग असतात, ते कोठेही लिहून ठेवलेले नसतात, ते समजणे त्यांचे पालन करणे साधारण सत्प्रवृत्त माणसास अवघड नाही, म्हणून स्वाभिमानी सत्प्रवृत्त माणसाने त्यांचे पालन करावे कमी बुद्धी असलेल्यांना ते समजावून सांगावयाचे असतात. १०८
जो ब्राह्मण त्यांचे पालन करणार नाही तो जरी वेद जाणत असला तरी तो कोरडाच रहातो, जो त्यांचे पालन करतो तो जरी वेद शिकलेला नसला तरी यशस्वी ठरतो. १०९
ज्या ऋषीनी ओळखले कीं, पवित्र नियमांचे मुळ ह्या नितीनियमांत आहे ते ह्या नितीनियमांचे पालन उत्तम रीत्या करतात तत्वशिलता प्राप्त करतात. ११०
विश्वाच्या निर्मितीचे नियम, पुजेचे नियम, विद्यार्थ्याच्या बाबतचे नियम, गुरू बाबतचे नियम, गुरूकडून आल्यावर स्नान करण्याचे नियम, १११
विवाहाचे नियम, विवाह विधीचे नियम, ज्ञानाविषयीचे नियम, अंत्यविधीचे नियम, ११२
विद्यार्थी अवस्थेत राहतांना काय खावे काय खाऊ नये, माणसाचे तसेंच इतर गोष्टींचे शुद्धीकरण कसे करावे, ११३
तत्वशिलतेचे स्त्रियांनी पालन करण्याचे नियम, अंतिम मुक्ती त्याबाबतचे नियम, ज्ञान मिळविण्याबाबतचे नियम, राजाने त्याचे काम कसें करावे, ११४
साक्षीदाराची तपासणी कशी करावी, पति-पत्नी ह्यांच्या संबंधाबाबतचे नियम, वारसा हक्काबाबतचे नियम, द्युत खेळाचे नियम, नको असलेल्या लोकांचा काटा काढण्याचे नियम, ११५
वैश्याने शुद्राने आपली कामे कशी करावीत, मिश्रवर्णाच्या लोकांनी पाळावयाचे, सर्व जातीजमातीने पाळावयाचे नियम, ११६
देशांतराचे नियम, अंतिम ज्ञानाच्या अवस्थेची माहिती, चांगले वाईट वागण्याबाबतचे नियम त्याचे नियमन कसे करावे त्याची माहिती, ११७
देशातील जाती, प्रांत ह्या बाबतचे नियम, व्यापार तत्सम बाबींचे नियम अशी सर्व माहिती मनुने ह्या संहितेत दिली आहे. ११८
भृगुच्या विनंतीनुसार मनुने हे सर्व नियम तयार करून दिले आहेत ते सर्व आता तुम्ही शिकावेत. ११९


मनुस्मृती भाग पहिला पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा