रविवार, २८ जून, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-८


मागुन पुढे चालू -
अखेरीस पायातून आलेले शुद्र ज्याना कोणतेही कार्य दिलेले नाही ते वर दिलेल्या तीन वर्णाच्या लोकांना मदत करावयाचे कार्य दिले आहे, आणि त्याद्वारा त्यानी स्वताची उपजिविका करावी. ९१
मनुष्य त्याच्या देहाच्या वरच्या भागात शुद्ध स्वरुपात असतो म्हणून त्यातील स्वयंभु (परमेश्वर) तेथे असतो, आणि त्याचे स्थान आहे मुख. ९२
ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न झाले, ते वेदाचे रक्षक असल्यामुळे ते ह्या जगाचे मालक झाले. ९३
स्वयंभुने ब्राह्मण त्याच्या मुखातून तयार केले व त्यांनी वैराग्य पालन करुन, देव आणि पितर ह्यांचे पुजन करुन विश्र्वाचे संरक्षण करावे असे योजले. ९४
ब्राह्मणांच्या मुखातून देव व पितर त्यांना दिलेला प्रसाद ग्रहण करतात म्हणून ते सर्व श्रेष्ठ ठरले. ९५
सृष्टीतील स्वताहून हालचाल करणारे अचलांपेक्षा श्रेष्ठ असतात, त्याहून जास्त श्रेष्ठ असतात बुद्धि असलेले, त्याहून श्रेष्ठ असतात त्यात मानव, ज्याना अधिक श्रेष्ठ समजले जाते व त्यात ब्राह्मण सर्वश्रेष्ठ मानले जातात. ९६
ब्राह्मणात जे वेदाभ्यास करतात, आपले कर्तव्य करतात, अध्यात्म साधना करतात व स्वयंभुला समजतात ते त्यांच्यात श्रेष्ठ असतात. ९७
ब्राह्मणांचा जन्म म्हणजेच पवित्र नियमांचा जन्म असे समजावे. पवित्र नियमांचे रक्षण व पालन करणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य असते. जे ब्राह्मण अशारीतीने आपले कर्तव्य पार पाडतात ते ब्रह्मात विलीन होतोत. ९८-९९
जे काही ह्या जगात आहे ते ब्राह्मणांची मालमत्ता समजावी व त्यांच्या आज्ञांचे सर्वांनी पालन करावे. १००
ब्राह्मण स्वताच्या हाताने स्वताचे अन्न शिजवून खाईल. स्वताचे वस्त्र वापरेल, सर्व स्वताची कामे स्वताच करील, सर्व मर्त्य जग त्यांच्या कृपेवर जगतात असे समजून वागावे. १०१
ब्राह्मणांना त्यांची कामे करणे सहज व्हावे म्हणून ह्या पवित्र नियमांची रचना मनुने केली आहे. १०२

मनुस्मृती पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा