मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

देवीचा कोप

हल्ली जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा विचार करतां असे वाटते किं, त्यामागे काही दैविक कारण असावे. कारण, आकाशात ढगे असूनही पाऊस पडणे हे कोणत्याही वैज्ञानिक स्पष्टीकरणाने सिद्ध होत नाही. त्या करता बराच अभ्यास केल्यावर असे दिसून आले किं, गेली काही वर्षे आपण महाराष्ट्रातील देवतांना मांसाचा प्रसाद देणे बंद केले आहे. जर देवी उपाशी तर तिचे भक्तसुद्धा उपाशी रहाणे हे अपेक्षित आहे. त्याशिवाय आणखीन काही कारणे शाक्तपंथी पंडीतांनी सांगितली आहेत, त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. ती अशी, देवी जसे, तुळजाभवानी, काळुबाई, एकवीरा, जीवदानी इत्यादी ह्यांची पुजा अर्चना केवळ क्षत्रिय पुजार्यानेच करावयाची असते तेथे हल्ली ब्राह्मण पुजारी ती करतात ते बंद झाले पाहिजे. ह्या देवतांना मांसाचा प्रसाद द्यावयाचा असतो तो दिला जात नाही. कारण, ब्राह्मण पुजारी मांसाचा प्रसाद देणे अयोग्य समजतात. जर पुजारी क्षत्रिय गुरव असेल तर तो मांसाचा प्रसाद देऊ शकतो. माझ्या माहितीनुसार गेली काही वर्षे हे असे चालू आहे. त्यामुळे देवीचा कोप झाला आहे असे सांगितले जात आहे.
आता हे मांस प्रसादाचे काय महात्म्य ते समजून घ्यावे लागेल. त्यासाठी इतर धर्मांतील काही गोष्टी पहाव्या लागतील कारण, काही बाबी तेथे अधिक चांगल्या रीतीने सांगितल्या आहेत. त्यासाठी मी संत पीटर, जो येशुचा प्रथम शिष्य होता त्याला झालेल्या एका दृष्टांताची गोष्ट पहाणार आहे. पीटर येशुच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी गावोगांवी फिरत असे. असांच फिरत असतांना तो पहातो किं, लोक प्राण्यांना मारून खात आहेत. मुक्या प्राण्यांची अशा रितीने हत्या होणे अयोग्य आहे असे त्याचे मत झाले व त्यांने सर्वांना सांगितले किं, येशुच्या भक्तांनी मांसाहार करणे बंद करावे. त्याप्रमाणे काही भक्तांनी मांसाहार करणे बंद केले. तो असांच एकदा एका जाेप्पा नावाचा गांवात वस्ती करून राहीला असतांना एका दुपारी तो ध्यानस्त असतांना त्याला एक दृष्टांत झाला. त्या दृष्टांतात तो पहातो किं, एक सफेद चादर आभाळातून खाली येते व ती खाली आल्यावर तो पहातो किं, त्या चादरीवर अनेक चतुष्पाद चरणारे, सरपटणारे प्राणी, पक्षी फिरताहेत. पीटरला त्या दृष्टांताचा अर्थ समजला नाही तेवढ्यात आकाशवाणी झाली, "मानवा, ह्या झपाट्याने वाढणार्या प्राण्यांना तू वेदनाविरहीत असे मारून खावयाचे आहे". त्यावर पीटर म्हणाला, "मी अशा अस्वच्छ प्राण्यांना कधीही खाणार नाही".
पीटर असे बोलतांच पुन्हा आकाशवाणी झाली, "अरे मानवा, मी तुला निर्माण केले ते तीन कामांसाठी, पहिले काम वाईट प्रवृत्तीचा नाश करणे, दुसरे काम झपाट्याने वाढणार्या प्राण्यांना तू वेदनाविरहीत असे मारून खावयाचे आहे, जगाच्या व्यवहारासाठी ह्या दोन गोष्टी निर्धोकपणे चालू रहाणे आवश्यक असते. जर मानव ही कर्तव्ये पार पाडणार नाही तर मी त्याचा नाश करीन". ['Peter's vision', Acts 10:9-16] तिसरे काम, मुक्ती प्राप्त करणे.
त्यावर पीटरने विचारले, जर मारतांना वेदना झाल्या तर काय हाेईल? अाकाशातून अावाज अाला, तर ताे प्रसाद सैतानाला जाईल; असे झाल्यावर मात्र, पीटर सर्व समजला व त्यांने त्याच्या मंडळींना सांगितले किं, केवळ खाण्यासाठी प्राण्यांची वेदनाविरहीत अशी हत्त्या करावी आणि पुन्हा मांसाहार करण्याचा आदेश दिला.
गीतेत श्री कृष्णांने मानवाच्या पहिल्या व तिसर्या कर्तव्यावर आख्यान दिले आहे व मनुस्मृतीत दुसर्या कर्तव्यावर मार्गदर्शन केले आहे. [पहा मनुस्मृती ५:३०-३२]
देवीला मांसाचा प्रसाद देण्याचा उद्देश, तिचा भक्त त्याचे दुसरे कर्तव्य विसरला नाही असे दाखवण्याचा असतो. परंतु हल्ली दुर्दैवांने मनुष्य ही दोनही कर्तव्ये पार विसरून भ्रामक शांति व अहिंसेच्या तत्वाच्या आहारी जाऊन मार्ग भ्रष्ट झाला आहे असे दिसते आहे. देवीचा कोप हाेण्याचे कारण, मानव त्याचे कर्तव्य विसरला अाहे. कर्तव्य विसरलेल्या मानवाचा नाश हाेणे क्रमप्राप्त हाेते. जसे काम न करणार्या नाेकरास मालक काढून टाकताे तसेच हे असते. उपनिषदात एक संवाद गुरूशिष्यांचा दिला आहे त्यात शिष्य गुरूला सांगतो, "मी हत्त्येचे पातक पदरी पाडून घेणार नाही". त्यावर गुरू सांगतो, "पातक कधीही हत्त्येचे नसते, पातक उद्देशाचे असते. जर हत्त्येचा उद्देश अतिक्रोध, मद अथवा मत्सर ह्यामुळे असा असेल तरच पातक होते एरवी नाही". जेव्हा कर्तव्य पार पाडण्यासाठी हत्त्या केली जाते तेव्हा पातक होण्याचा मुद्दाच उत्पन्न होत नाही. तसे नसते तर खाटीक व वीर योद्धे महापापी ठरले असते.
सांप्रत जी परिस्थिती आहे ती पहाता, महाराष्ट्रातील देवतांसाठी मांसाचा प्रसाद देणे पुन्हा सुरू करावे व देवीच्या कोपातून येथील मंडळींस मुक्त करणे हेंच श्रेयस्कर वाटते. त्या आधी पुजारी ब्राह्मणांची जागा क्षत्रिय गुरवांस द्यावी व सर्व व्यवस्था पूर्वी जशी होती तशी करावी म्हणजे देवीचा कोप शांत होईल व पाऊस पाणी सुधारेल असे करावे, तसे न केल्यास परिणाम भाेगण्यास तयार रहावे. उगाच ह्यात प्रतिषिठेचा प्रश्न करू नये. पुर्वी हत्त्या वेदनाविरहीत कशी करावी असा प्रश्न हाेता ताे अाता अाधुनिक ज्ञानामुळे राहिलेला नाही. पुढील पाेस्टमध्ये शाक्तपंथाच्या शिकवणूकी प्रमाणे काेठल्या देवास काेणता प्रसाद द्यावा ते दिले अाहेवेदनाविरहीत हत्त्या कशी करावी ते त्यानंतरच्या एका पाेस्टमध्ये करणार अाहे.
विषय खूप मोठा आहे परंतु तूर्तास एवढेच पुरे.

मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा