शनिवार, ९ मे, २०१५

मनुस्मृती भाग पहिला (१-११९ वचने आहेत)

पहिल्या भागात विश्वाची निर्मिती आणि द्विजांची कर्तव्ये सांगितली आहेत.
) महान ऋषीमुनी भृगुच्या पुढाकारात, समाधीत बसलेल्या मनुस भेटतात व विनंती करतात,
) अहो दैविक सामर्थ असलेले महोदय, चारही वर्णाच्या लोकांचे पवित्र नियम उपनियम आम्हाला कृपया समजावून सांगा.
) अशी विनंती करण्याचे कारण त्यांची परिपूर्ण माहिती केवळ आपल्यालाच आहे.
) अमर्यादीत सामर्थ्य असलेले मनु, हि विनंती ऐकून त्यावर संतुष्ट होऊन त्या ऋषींचा सन्मान करुन बसण्यास सांगतात बोलतात, ऐका पुज्य ऋषींनो,
) हे विश्व एका अंधकारमय, अव्यक्त, समजण्यास अवघड अशा अवस्थेत असून ते समजणे फक्त तुम्हा ऋषींनाच शक्य आहे.
) त्यानंतर, तेजस्वी, स्वयंभू, सर्व व्यापक अमर अशा मनुने त्याच्या महान सामर्थ्याने तो तिमीर (अंधकार) नाहीसा केला.
) केवळ मनःचक्षूनीच दिसणारे, अनंत, सुक्ष्म, अनाकलनिय ज्यामध्ये सर्व सचेतन आणि अचेतन सृष्टी सामावलेली आहे असे मनु पुढे सरसावले, आणि सांगण्यास सुरवात केली.
) केवळ स्वताच्या विचारांने सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेले मनु, पहिला पाणी उत्पन्न करतो. नंतर त्यात बीज पेरतो. ह्याठिकणी पाणी हा शब्द वेगळ्या अर्थी वापलेला आहे. तसेंच बीज सुद्धा वेगळ्या अर्थी आहे हे लक्षात घ्यावे.
) त्या बिजाचे एका सोन्याच्या तेजस्वी अशा अंड्यात रूपांतर होते. ते सुर्यासारखे तेजस्वी झाले. त्यातच मनुने ब्रह्म म्हणून जन्म घेतला. त्यातूनच पुढील विश्व निर्माण झाले.
१०) पवित्र पाण्याला नरः असे बोलतात. त्या पाण्यातून नराची निर्मिती झाली म्हणून त्याला नारायण असे बोलतात.
११) त्या अनाकलनिय, अनंत, सत्य असत्य असे सर्व असलेल्या नरातून पुरूषाची निर्मिती झाली, त्यालाच काही ज्ञानी लोक ब्रह्म असे बोलतात.
१२) त्या सोन्याच्या अंड्यात तो नर बराच काळ राहीला. त्यानंतर त्या अंड्याचे त्याने स्वबळाने दोन तुकडे केले.
१३) त्यातील एक स्वर्ग (आकाश) झाला दुसरा पृथ्वी झाली. त्यांच्या मधील सीमेचे त्याने आठ समान भाग केले. त्या आठ दिशा झाल्या. त्या सीमेवर अथांग असा समुद्र तयार झाला. हा सागर सुद्धा त्या पवित्र पाण्याचाच आहे हे लक्षात घ्यावे.
१४) त्या नरातून केवळ विचारांने नंतर आत्मा, अहंकार, मन आणि त्यांचे विविध आविष्कार उत्पन्न झाले.
१५) आत्मा ज्यात सत्व, रजस आणि तमस हे गुण आणि पांच इंद्रिये जी सभोवारची सृष्टी समजू शकतात ती तयार झाली.
१६) अपरंपार उर्जा असलेल्या सहा कणांच्या मदतीने नंतर सर्व विश्वाची निर्मिती झाली.
१७) सर्व विश्वाची निर्मिती त्या सहा कणांतूनच झाली त्याच सहा कणांतून जीवांची काया तयार झाली. म्हणून त्याला शरीर असे म्हणतात.
१८) हे सहा कण त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेमुळे विश्वनिर्मात्याचे अविनाशी स्वरुप सिद्ध करतात.
१९) अशा अविनाशी स्वरुपातून नष्ट होणारे व नष्ट न होणारे सात पुरुष तयार झाले. ह्याना सप्तऋषी असे समजले जाते.
२०) ह्या सहा कणांतून विविध रचना होऊन सर्व गोष्टी तयार होतात.
आधुनिक विज्ञानानुसार त्यांची नांवे अशी समजावीत, इलेक्टॉन, पॉझिट्रॉन, न्युट्रॉन, प्रॉटॉन इत्यादी आहेत. हे कण विचार करु शकतात असे नवीन संशोधनात आढळून आले आहे.
२१) वेदानुसार त्या कणांची अनेक नांवे झाली. त्यांच्या कार्य कक्षा सुद्धा निष्चित केल्या गेल्या.

पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा