सोमवार, ३० एप्रिल, २०१८

हिंदू कोण – ५१

मागील भागातून पुढे –
१०. आहारा नंतर विहाराबद्दलचे मार्गदर्शन -
संरक्षण – जगात माणसाला अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरी जावे लागत असते. त्यात स्वतःचे संरक्षण करणे हे एक महत्वाचे काम असते. जीवाला ह्या संरक्षणासाठीच्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या ह्यामध्ये येतात. शत्रुपासून संरक्षण हे एक महत्वाचे असते. रोगराई पासून संरक्षण, अपघातापासून संरक्षण, अशी अनेक संरक्षणे जीवाला हाताळावयाची असतात. सद्सदबुद्धी, म्हणजे योग्य अयोग्य हे समजण्याची बुद्धी, ही संरक्षणाचे काम करण्यात मार्गदर्शन करीत असते.
प्रजनन – देहापासून त्याच्या सारख्या देहाची निर्मिती होणे म्हणजे प्रजनन. ते जननेंद्रियांच्या व्यवहारातून जीव करून घेत असतो. ह्या प्रजनन क्रियेचा संबंध लैंगिक कामक्रिडांशी असतो व तेथे हा लिंगदेह मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करून माणसात जरुरीपेक्षा जास्त कामवासना वाढवण्याचे काम करीत असतो. लिंगदेहामुळे जीव व त्याचा देह प्रजनन क्रियेशिवाय एरव्ही लैंगिक क्रियांत देहाला गुंतवून ठेवतो व त्यामुळे अनेक इतर गुंतागुंतीच्या गोष्टी माणसाला अनुभवाव्या लागतात. हे सर्व त्या आत्म्याच्या पूर्वजन्माच्या भोगवट्यानुसार होत असते. हिंदूंमधील खरे योगी प्रजनना व्यतिरीक्त इतर कारणांसाठी लैंगिक क्रियांत स्वताला गुंतवून घेत नाहीत. ह्याबाबतचे मार्गदर्शन बहुधा हिंदूंना त्यांच्या पारंपारीक विचारांतून मिळत असते.
विश्राम – देहाला विश्रांतीची नितांत गरज असते. त्यात इतर गोष्टी जशा, विरंगुळा, करमणूक इत्यादि येतात. थकणे हे शरीराचे लक्षण असते. त्यासाठी वेळोवेळी शरीराला आराम देणे आवश्यक असते. जीव हा शरीराचाच एक हिस्सा असल्याने जीवाचे मनसुद्धा थकत असते. एका प्रकारच्या कामात कंटाळा आला तर दुसरे काम करणे हे एकप्रकारचे आराम करणे असते. संपूर्ण विश्रांती केवळ झोपण्यामुळे मिळते. मनाला आनंद देणार्या गोष्टी करण्यानेसुद्धा एकप्रकारचा आराम मिळतो. अशा विविध प्रकारच्या विश्रामाची व्यवस्था करणे हे जीवाचे काम असते. विश्रामाच्या बर्याच कामांत जीवाच्या इतर पोषण, संरक्षण, प्रजनन कामातील गोष्टींचा समावेश होत असतो. विशेषकरून प्रजनन कामातील लैंगिक व्यवहाराचा येथे उल्लेख करावा लागेल. अशाप्रसंगी मर्यादा तत्त्वाचा विशेष विचार हिंदूंने करावयाचा असतो. नाहीतर पापकर्म होण्याची शक्यता असते.
क्रमशः पुढे चालू -

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ४६ -६०
गांवाच्या सीमा स्पष्ट दिसाव्यात म्हणून राजा त्या सीमांवर दुधी चीक असणारे वृक्ष लावील. त्यात न्यग्रोध, अस्वत्थ, किमसुक, शेवरी, सालस, पालमेरी ताड, असें वृक्ष असतील. २४६
त्याशिवाय झुडपे, बांबू, समी, अनेक प्रकारच्या वेली, मातीचे बंधारे, वेताची बेटे असें सिमेवर वाढवून त्या गांवाच्या सीमा स्पष्ट करील. २४७
गांवाच्या सीमा जेथे मिळतात तेथे तलाव, विहीरी, झरे असावेत, तसेंच सीमेवर देवळे, सिमेचे खांब, वास्तुदेवाचे शिलालेख असें बांधावेत. २४८
राजाने लक्षात ठेवले पाहिजे कीं, लोकांच्या हलगर्जीपणामुळें सीमा धुरकट होतात. त्यासाठी तो राजा इतर अधिक स्पष्ट दिसणार्या खुणांची (सिमेचे खांब, वास्तुदेवाचे शिलालेख) व्यवस्था करील. २४९
त्याशिवाय दगड, हाडे, गाईच्या अथवा घोड्याचे केस, चोथा, मडक्याचे तुकडे, गाईचे सुकलेले शेण, वीटा, जळलेला कोळसा, दगडाचे गोटे, आणि वाळू २५०
अशा बराच काळ टिकून रहाणार्या गोष्टी राजा गांवाच्या सीमेवर एक हात आकारमानाचे खड्ढे करून त्यात पुरेल, त्यामुळें सीमा शोधणे सोपे होईल. २५१
ह्या व अशा अनेक प्रकारे राजा सीमेचे प्रश्र्न सोडवू शकतो. त्याशिवाय बराच काळ रहाणारे जुने स्थाईक लोक सीमा दाखवू शकतात. कांहीं ठिकाणी नदीचे पात्र सीमा ठरवते. २५२
जर अशा सीमा दर्शक खूणांच्या बाबत खात्री वाटत नसेल तर त्या भागातील जुन्या लोकांचा सल्ला घेऊन ते करावे. २५३
गांवाच्या लोकांच्या साक्षीत जाणकारांची जबानी घ्यावी. त्यात तक्रार दाखल करणारे निदान दोन असावेत. २५४
सर्वांच्या समक्ष जबानी घेतल्यावर सर्वसंम्मत सीमेबाबतचा निर्णय घेतला जाईल व त्याची लेखी नोंद त्यांच्या नावानिशी ठेवली जाईल. २५५
लाल फुलांच्या माळा गळ्यात घालून, लाल वस्त्र परिधान करून, शपथा घेऊन, खरेपणाला धरून सीमा प्रश्र्न सोडवल्याचा आनंद व्यक्त करावा. २५६
अशारितीने सर्वांच्या समक्ष सीमा ठरल्या तर ते निर्दोष ठरेल. परंतु, जर तसें नाहीं झाले व सीमा ठरल्याचे जाहिर केले तर तो गुन्हा ठरतो. व त्यासाठी त्यांना दोनशे पना दंड करावा. २५७
जर त्या गांवातील लोक साक्षी साठी आले नाहीत तर आजुबाजूच्या चार गांवांतील चांगले लोक राजाने बोलावून स्वसमक्ष सीमा निश्र्चित कराव्यात. २५८
जर तेसुद्धा जमले नाही तर राजांने त्या जवळील वनांत रहाण्यार्या मूळवासी (वनवासी) अशांच्या साक्षीने सीमा ठरवाव्यात. २५९
वनात शिकार करणारे, पक्षी पकडणारे परधी, गुराखी, मांसे पकडणारे, मुळं काढणारे, साप पकडणारे, लाकूडफाटा गोळा करणारे, असें वनवासी लोक असतात त्यांच्या साक्षीने सीमा ठरवाव्यात. २६०
क्रशः: पुढे चालू -

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा