शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

हिंदू कोण – ३५

मागील भागातून पुढे
. हिंदूंतील पुनर्जन्माच्या विचाराची माहिती –
५२. पाप-पुण्याच्या विचारांशी ही पुनर्जन्माची संकल्पना निगडीत आहे. भगवद्गीतेत चौथ्या अध्यायात, श्री कृष्णानी पुनर्जन्माचा उल्लेख केला आहे.
श्री भगवान उवाच
बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन
तान्यहं वेद सर्वाणि त्वं वेत्थ परंतप ।। ।।
अरे शत्रुतापना अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. ते सर्व मी जाणतो, जरी तू जाणत नाहीस.
पुनर्जन्मा मागील कारण असे सांगतात किं, माणसाचा जन्म त्याच्यातील आत्म्याच्या उद्धारासाठी असतो. जोवर आत्म्याचा उद्धार होऊन तो स्वयंभू (परमेश्र्वर) मध्ये विलीन होत नाही तोवर तो पुन्हा पुनः जन्म घेतच रहातो. ह्या विवरणाचा अर्थ असा होतो किं, माणसाचा जन्म उपभोग घेण्यासाठी नसून स्वतः मधील परमेश्र्वराला ओळखण्यासाठी होत असतो. उपभोग शरीराचे असतात व ते जीवांने शरीरधर्मानुसार भोगावयाचे असतात. शरीरातील आत्म्याने त्यात भाग घ्यावयाचा नसतो. परंतु, अज्ञानामुळे तसें होत नाही व शरीरातील आत्मा त्या भोगांत अडकत जातो व त्याचे अज्ञान वाढत रहाते. अशा परिस्थितीत जेव्हा शरीर निसर्गनियमानुसार जास्त जगण्यास योग्य रहात नाही तेव्हां तो आत्मा ते शरीर सोडून देतो व यथावकाश नवीन जन्म घेऊन दुसरा देह मिळवतो, अशारितीने एका जन्मा नंतर दुसरा, त्या नंतर तिसरा अशा क्रमांने तो अज्ञानी आत्मा पुन्हा पुनः जन्म घेत रहातो. गीतेच्या शब्दांत सांगावयाचे,
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णाऽन्यन्यानि संयति नवानि देही ।। २२ ।।
ज्याप्रमाणे एकादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे परीधान करतो, त्याप्रमाणे देही, म्हणजे आत्मा, जुना देह टाकून नवीन देहाशी संगम पावतो.
हे असें, जोवर तो आत्मा उद्धरला जात नाही तोवर होत रहाते. हेंच माणसाच्या पुनर्जन्माचे कारण असते असें समजले जाते. हिंदूंमध्ये पुनर्जन्माचे कारण हेंच समजले जाते. इतर धर्मांत आत्म्याचे अस्तित्व मानले जात नाही त्यामुळे, शरीरात तो असतो व त्याच्या उद्धारासाठी हें सर्वकांहीं होत आहे असें समजले जात नाही. हिंदूंत देह, जीव, आत्मा व लिंगदेह असें चार घटक माणसाचे असतात असे समजले जाते तसें इतर धर्मात मानत नाहीत, त्यांत फक्त शरीर, जीव असें दोनच घटक आहेत असें मानतात. बर्याच ठिकाणी जीव व आत्मा ह्यांत गल्लत होत असलेली दिसते. एकंदर सर्वच तर्क विसंगत असते. हे धर्म निसर्गाला ईश्र्वर मानत नाहीत, त्यांचा देव काल्पनिक असतो व त्याप्रमाणे त्या अनुषंगाने इतर तर्कसुद्धा तसेंच तर्कविसंगत अथवा काल्पनिक असतात. जगाच्या अंती न्याय परमेश्र्वर देतो, वगैरे काल्पनिक गोष्टींची त्यात भर असते. त्या सर्व धर्मांत माणसाला एकच जन्म असतो असेंच समजले जाते. हिंदूंत मात्र सर्व विचार निसर्गातील ईश्र्वराला मध्य मानून त्यानुसार असतात व म्हणून तर्कसुसंगत ठरतात. हिंदू विचारानुसार देहाचा, जीव हा एक अविभाज्य हिस्सा असतो व जसें देह मरतो तसें त्या बरोबर त्यातील जीवसुद्धा नष्ट होतो असें समजले जाते. हिंदूंमधील बुद्धधर्मात बुद्धाच्या अनेक जातक कथा प्रचलित आहेत त्यातून बुद्धाने कसा त्याचा आत्मा विकसित केला त्याची माहिती मिळते. फलज्योतिष शास्त्राप्रमाणे गेल्या जन्मांतील कर्मानुसार ह्या जन्मात कोणते भोग आपल्याला भोगावे लागतात ते दिलेले असते त्यालाच आपण नशीब समजतो. त्यात प्रत्येक जन्माला जातक असें म्हणतात म्हणून बुद्धाच्या पुनर्जन्माच्या कथांना जातक कथा असें म्हणतात. हस्तसामुद्रिक प्रमाणे आपण आपले प्राक्तन आपल्या हातात घेऊन आलेलो असतो.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ९२ -१००
यम जो विवस्वताचा मुलगा आहे, जो तुमच्चा हृदयात बसलेला आहे, त्याच्याशी तुमची मती जुळत नाही म्हणूनच तुम्हाला गंगेच्या स्नानाची गरज भासते व कुरुक्षेत्री यात्रा करावी लागते. ९२
खोटी साक्ष देणारा माणूस नागडा होऊन भुके कंगाल असा होऊन तुटक्या खापराच्या मदतीने स्वताच्या दुष्मनाकडे अन्नासाठी भीक मागेल. ९३
न्यायालयात जरी एका प्रश्र्नाला खोटे उत्तर दिले तर असा पापी माणूस आंधळा होऊन सरळ थेट नरकात कोसळतो. ९४
न्यायालयात साक्षीदार असत्य विधान करील व आग्रहपूर्वक खोटी साक्ष देईल, तो एका हाडा सकच मांसे खाणार्या आंधळ्या सारखा होईल. ९५
सद्बुद्धीने जो खरी साक्ष देईल तो देवांच्या परिचयात श्रेष्ठ ठरेल. ९६
अनेक खटल्यात खोटी साक्ष देणार्याचे त्यामुळे किती आप्तजन नष्ट झाले त्याची गणती नाही. ९७
गाईच्या चोरीबद्दल खोटी साक्ष देणार्याला त्यामुळे पांच गाई मारल्याचे पाप लागते. नातेवाईकांबद्दची खोटी साक्ष देणार्यास दहा खून केल्या सारखे पाप लागते. घोड्या बद्दल दिल्यास शंभर खून केल्याचे पाप लागते. माणसाबद्दल खोटी साक्ष दिल्यास हजार खूनाचे पातक लागते. ९८
सोन्याच्या व्यवहारात खोटे बोलल्यास लहान मुलाची हत्त्या केल्याचे पातक लागते. जमिनीबाबत खोटे बोलल्यास त्याचा सर्वनाश होते. म्हणून खोटी साक्ष देण्या आधी ह्या सर्व परिणामांचा पिचार करावा. ९९
जे जमिनीबाबतचे तेंच पाण्याबाबत, बाईबाबत, मोत्याची चोरी, हिरेमाणकांची चोरी, परिणाम असतात ते लक्षात ठेवावे. असें खटला प्रारंभ होण्या आधी न्यायाधीश सर्व साक्षीदारांना ताकीद देईल. १००

पुढे क्रमशः चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा