मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

हिंदू कोण – ३१

मागील भागातून पुढे
. चार वर्णांची माहिती -
४६. हिंदू समाजाच्या इतिहासानुसार हिंदू समाजाचे वर्णव्यवस्थेनुसार दोन प्रकार आढळून येतात.
पहिला प्रकार वैदिक काळातील असून त्यानुसार वर्ण व्यवस्था माणसाच्या गुण कर्मानुसार ठरवली होती. त्यानंतरचा काळ आहे ज्याला ब्राह्मण काळ म्हणतात, त्यात ही वर्ण व्यवस्था जन्मानुसार ठरवली जाऊ लागली.
भगवद्गीता वैदिक काळातील असल्यामुळे तीत वर्णव्यवस्था गुणकर्मानुसार धरून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निरुपण केले आहे असें दिसते. मनुस्मृतीचा काळ, हा ब्राह्मण काळ असावा कारण त्यात वर्ण व्यवस्था जन्मानुसार धरलेली आढळून येते. असे साधारणपणे समजतात किं, वैदिक काळ सत्य युगापासून द्वापारयुगाच्या शेवटच्या सत्रापर्यंत असून नंतर कलीयुगात ब्राह्मण काल सुरू होतो. म्हणजे, मनुस्मृती कलीयुगाच्या प्रारंभ काळातील आहे असे दिसते. मनुस्मृतीत ब्रह्मदेवाच्या शरीरातील निरनिराळ्या भागांतून हे चार पुरुष (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र) उत्पन्न झाले असे जे दिले आहे ती ब्राह्मणकाळातील संकल्पना, ब्राह्मणांचे वर्चस्व दाखवण्यासाठी आहे असें दिसून येते. तिला खर्या हिंदूंनी (असें हिंदू, जे ब्राह्मणधर्माला मानत नाहीत) फारसे महत्व देण्याची आवश्यकता नाही. खर्या हिंदूधर्मानुसार दलित हा शब्द वापरणे गैर आहे कारण खरा हिंदूधर्म गीतेतील गुणकर्मशः असे जे चार वर्ण दिले आहेत ते मानतो, ब्राह्मणधर्माचे जन्मानुसार ठरणारे चार वर्ण मानत नाही.
४७. असें असले तरी फलज्योतिष शास्त्रानुसार माणसाचा वर्ण अजूनही वैदिक काळानुसारच म्हणजे, गुणकर्मानुसार सांगितला जातो. म्हणून जन्मपत्रिकेत अबकहडा चक्रा च्या तक्त्यात वर्ण त्यानुसार दिलेला आढळतो. तो तुमचा खरा वर्ण आहे असें समजावे. जर तुमचा वर्ण विप्र किंवा ब्राह्मण असेल तर तुम्ही बुद्धिची कामे व अध्यात्मविद्येत काम करण्यास योग्य असे समजले जाते. क्षत्रिय वर्ण असेल तर तुम्ही व्यवस्थापकीय कामं व त्यासंबंधित निर्णय घेण्यास योग्य आहात, पुढाकार घेण्यात समर्थ आहात असे समजावे. वैश्य वर्ण असेल तर तुम्ही व्यापारउदीम, शेती, कारकुनी इत्यादि कामं करण्यास व त्यासंबंधित निर्णय करण्यास योग्य आहात आणि जर तुमचा वर्ण शुद्र असेल तर त्याचा अर्थ तुम्ही कष्टाची व ज्याला पुढाकार (ज्या कामांत निर्णय घ्यावे लागत नाहीत अशी कामे) लागत नाही अशी कामं करण्यास योग्य आहात असे समजावे. फलज्योतिष शास्त्राप्रमाणे पाहिले तर एकाच मातेच्या पोटी असे विविध वर्ण असलेले चार मुलगे जन्मू शकतात.
४८. मनुस्मृतीत हे चार वर्ण असें दिलेले आहेत ते असें, पहिला वर्ण आहे ब्राह्मण वर्ण, ह्याचा कर्ता अर्थातच ब्रह्मदेव म्हणजे प्रजापति असे समजतात. ह्या वर्णातील पुरुष बुद्धिजीवी समजला जातो. सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या शाखांत तो प्रवीण होणारा असावा अशी अपेक्षा असते. त्याशिवाय अध्यात्म साधनेत तो प्रवीण असावा लागतो. असें समजतात किं, वेद अशा ब्राह्मणांनी दिले आहेत. ही झाली मनुस्मृतीच्या काळातील परिस्थिती. कलीयुगात मात्र परिस्थिती तशी राहीलेली नाही. कलीयुगातील ब्राह्मण जातीचा माणूस बुद्धिजीवी असेलच असें नाही. बहुधा तो वैश्यप्रवृत्तिचा असल्याचे आढळते. वैश्य वर्णातील पुरुष व्यवहार चतुर व त्याप्रकारच्या बुद्धिचा (स्मार्ट) असतो तसेंच आजचे ब्राह्मण आहेत. ते तरीसुद्धा स्वताला ब्राह्मण जातीचे म्हणून सर्वोच्च असे समजतात. थोडक्यात कलीयुगातील ब्राह्मण वस्तुतः वैश्य असतो. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो किं, कलीयुगात वैदिक योग्यतेचे ब्राह्मण नसतात. म्हणजे वस्तुतः कलीयुगात वैदिक योग्यतेचा ब्राह्मण वर्ण उरलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे कलीयुगात फक्त तीन वर्ण आहेत व जे स्वताला ब्राह्मण म्हणून सांगतात ते खोटे ब्राह्मण असतात हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. पौरोहित्य हा एक व्यवसायच आहे असें समजले पाहिजे. म्हणजे पौरोहित्याचा धंदा करणारे ब्राह्मण वैश्य समजले गेले पाहिजेत.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ४१ -६०
जो राजा पवित्र नियम जाणतो तो त्या त्या इसमांची जात विचारून, प्रांताची रुढी पाहून, कुळ पाहून, खटले सोडविल. ४१
माणसाचे काम, कर्तव्ये, ह्यावरून तो ओळखला जातो. मग तो कोठेही रहात असला तरी, ४२
राजा व राजाचे सेवक कोणत्याही प्रजाजनांवर स्वतःहून खटला करू शकत वाहीत. तसोंच कोणताही खटला दाबून ठेवू शकत नाहीत. ४३
जखमी हरणाच्या जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबांचा मागोवा घेत जसें सिंह त्याला शोधून काढतो तसेंच राजा साक्षी, पुरावे खरे काय व खोटे काय ते शोधून काढेल. ४४
न्यायदानाच्या कामात तो काम करतांना सत्य काय ते, वादाचा मुद्दा, तो स्वतः, नंतर साक्षीदार, पुरावे, गुन्ह्याची जागा, वेळ, असें सर्व दृष्टीकोन लक्षात घेऊन काम करील. ४५
देशाच्या चालीरीती, कुटूंबाची परंपरा, जातीच्या परंपरा, ह्यांना विरोध न करतां असें जे नियम असतील ते तयार करण्याचा अधिकार सद्गुणी, ज्ञानी द्विजांना आहे. ४६
राजाकडे जेव्हां धनको, ऋणको कडून रकमेच्या वसुलीसाठी मांगणी करील तेव्हां, जर ती मांगणी योग्य आहे किं, कसें ते पाहून ऋणकोला ती रकम धनकोस परत करण्याचे आदेश तो देईल. ४७
असा आदेश मिळाल्यावर तो धनको त्या ऋणकोकडून ती रकम कशाही मार्गाने वसुल करू शकतो. ४८
त्यासाठी कोणत्या मार्गांचा उपयोग तो करील ते असें, साम (समजावण्याचा), भिती दाखवून, चतुराईने, धाक-दडपशाही करून, असें सर्व नैतिक मार्ग विफल ठरले तरच मग जबरदस्तीने. ४९
धनको त्याची रास्त रकम वसुल करण्यासाठी जे करेल त्याला राजाची मान्यता असेल. ५०
पण जर ऋणको सतत सांगत राहीला कीं, तो धनकोला कांहीं देणे लागत नाही तर त्या ऋणकोला त्या रकमाबरोबर दंडसुद्धा भरावा लागेल. ५१
ऋणकोने जर रकम घेतल्याचे साफ नाकारले तर धनकोला साक्षीदार आणावे लागतील ज्यांच्या समोर तो व्यवहार झाला होता. अथवा दुसरा योग्य पुरावा सादर करावा लागेल. ५२
दावेदारांने योग्य साक्षीदार, पुरावे (कागद पत्रांच्या आधारे) सादर केले नाहीत तर किंवा त्याची विधाने परस्पर विरोधी असतील तर किंवा, एकदा बोललेले शब्द फिरवतो, स्वताचे विधान खोटे ठरवतो, साक्षीदाराशी अयोग्य जागी बोलणी करतो, विचारलेल्या प्रश्र्नाचे उत्तर द्यायला टाळाटा करतो, राजाने उत्तर देण्याचे आदेश दिल्यावर सुद्धा गप्प बसतो, केलेले दावे सप्रमाण सिद्ध करण्यात कमी पडतो, न्यायालयात काय बोलावे व काय बोलू नये ते समजत नाही असा दावेदार त्याचा खटला हरेल. ५३-५६
जर दावेदार न्यायालयात साक्षीदार आणतो असें बोलून सुद्धा साक्षीदार आणी शकला नाही तर तो खटला हरेल. ५७
दावेदार जर न्यायालयात बोलला नाही तर त्याला नियमानुसार दंड अथवा फाशीची शिक्षा होईल. प्रतिवादी जर त्याची बाजू मांडण्यात तीन पंधरवड्यात आला नाही तर तो ङरला असें समजले जाईल व त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. ५८
खोटा खटला दाखल करणार्याला रकमेच्या दुप्पट दंड आकारला जाईल. तसेंच आरोप नाकारण्यास, जेव्हां तो आरोप योग्य असतो, तर त्या आरोपाच्या रकमेच्या दुप्पट रकमे एवढा दंड भरावा लागेल. राजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असा त्यावर आरोप होउन ती कारवाई होईल. ५९
दावेदार जेव्हां आरोपीला न्यायालयात खेंचतो तेव्हां तो जर न्यायालयात खोटे बोलेल तर त्याच्या (दावेदाराच्या) समर्थनार्थ तो (दावेदार) तीन साक्षीदार न्यायालयातील ब्राह्मण पुढे आणेल. ६०
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा