रविवार, १८ डिसेंबर, २०१६

हिंदू कोण - ११

. देवांच्या अस्तित्वा बाबत
१४. वरील विवेचन करतांना एक गोष्ट आपण गृहीत धरली आहे ती ही किं, देव म्हणून कांहींतरी अस्तित्वांत आहे. आता आपण देवाच्या अस्तित्वा बद्दल काय समज आहेत ते पहावयाचे आहे.

इस्लाम मध्ये ह्यावर प्रश्र्न विचारणे हेंच पाप सांगितले आहे त्याप्रकारे त्यावर बोलण्यास बंदी घातलेली आहे. ख्रिस्तांत ज्यु (यहुदी) धर्मात ह्यावर थोडीफार चर्चा अधुनमधून होत असते पण कॅथोलिक पंथातसुद्धा ह्या विषयावर चर्चा करण्यास बंदी आहे. हिंदूंत मात्र ह्या विषयावर मोकळ्या मनांने चर्चा करण्यास कोणतीही आडकाठी नसते. ह्याचा अर्थ इतर धर्मांत विचार स्वातंत्र्य नाही. पाश्चात्य देशातील विद्वान त्यासाठी ख्रिस्ती अथवा यहुदी धर्माचे पालन करतां स्वतःला अनिश्र्वरवादी (Atheist) म्हणवून घेतात. कारण जर त्यानी तसें स्वतःला जाहिर केले नाही तर ते त्या धर्माच्या श्रेष्ठींकडून बहिष्कृत ठरून त्या समाजाकडून त्यांना त्रास होऊ शकतो. प्रसंगी त्यांना ठार मारले जाण्याची शक्यता असते. असें अनेक ईस्लामी विचारवंत ह्याकारणांनी मारले गेले आहेत आजही मारले जात आहेत आणि उद्याही मारले जाणार आहेत. आपल्याकडील अनिश्र्वरवादी (अश्रद्ध) जेव्हां मला भेटले तेव्हां मी त्यांना विचारले किं, ते कोणत्या देवांबद्दल बोलतात, जेव्हां तुम्ही देव मानत नाही असें सांगता? ते बोलले, आकाशातील व्यक्तीस्वरुप देव ही कल्पना त्यांना पटत नाही. हिंदूंतील देव आकाशातील व्यक्तीस्वरुप नसून निसर्गरुपी आहे, तोसुद्धा तुम्हाला पटत नाही कां? त्यावर ते निसर्गरुपी देवाच्या अभिव्यक्तीस स्वीकारतात असें म्हणाले. विश्र्वाचा विचार करतांना मनुस्मृतीत परमेश्र्वराच्याही अगोदरचा म्हणून स्वयंभु मानला आहे त्यांने त्याच्या विचारांनी ही सृष्टी उत्पन्न केली असें मानले आहे. असें असले तरी त्याची रचना कशी आहे ते जर नीटपणे पाहिले तर बर्याच गोष्टी अधिक स्पष्ट होतात म्हणून ती माहिती आता पाहुया.

१५. वेदांत नंतर विकसित झालेल्या शाक्त प्रणालितील मार्ग विचारांना जेव्हा आपण पहातो तेव्हां असें दिसते किं, आपल्या पूर्वजांनी निसर्ग हींच परमेश्र्वराची अभिव्यक्ती आहे असें मानले आहे. निसर्गाच्या अभ्यासानें परमेश्र्वराच्या गुणांची माहिती समजून घेता येते. निसर्ग आहे कां? असा सवाल कोणी विचारणार नाही कारण असा सवाल उत्पन्न होत नाही, निसर्गाचे अस्तित्व निःसंशय आहे हे कोणीही मान्य करतो. ह्या युक्तिवादांने परमेश्र्वराच्या अस्तित्वांबद्दल कोणताही वाद हिंदूंमध्ये उरत नाही. आता प्रश्र्न येतो तो परमेश्र्वराच्या स्वभावाबद्दलचा. सर्वच धर्मातील पुरोहित, ह्यांत ब्राह्मणधर्माचे पुरोहितसुद्धा आले, परमेश्र्वर दयाळू, क्षमाशिल, कृपाळु असा असल्याचा निर्वाळा देतात पण जर निसर्ग हेंच परमेश्र्वराचे वास्तविक रुप आहे असे एकदा मान्य केले तर निसर्गाच्या स्वभावावरून परमेश्र्वराचा स्वभाव समजून घेता येईल हेही मान्य करावे लागेल ह्यांत कोणाला शंका वाटायचे कारण नसावे. आता प्रश्र्न असा किं, निसर्ग दयाळू, क्षमाशिल, कृपाळु असा खरोखरीच आहे काय? दुर्दैवाने असे समजते किं, निसर्ग तसा नसतो. तो अनेक शास्त्रांच्या नियमांने शिस्तबद्ध, कठोर असतो पण जर त्याच्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले तर तो पावतो (म्हणजे बक्षिस देतो) पाळले तर पावत नाही अथवा शिक्षा करतो. म्हणजे मधील अवस्था, क्षमा करणे ही, निसर्गाला मान्य नाही. ते असें, समजा तुम्ही विमान उडवले पण विमानविद्येचे नियम पाळले नाहीत तर तुमचे विमान उडणार नाही, ते कोसळेल. मग तुम्ही कितीही प्रार्थना करा, पुजा करा, उपास तापास करा त्याचा कांहींही उपयोग होणार नाही. अनेक उदाहरणांनी हे वेळोवेळी दिसून येते. मग असा प्रश्र्न उत्पन्न होतो किं, हा जो प्रचार केला आहे किं, परमेश्र्वर दयाळू, क्षमाशिल, कृपाळु आहे तो कोणी केला कां केला? असें देवांबद्दल खोटे सांगण्यामागील उद्देश कोणता?
पुढे क्रमशः चालू -
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू – १ – १५
द्विज स्नातक ज्याने गृहस्थाश्रम नियमानुसार व्यतीत केला आहे तो आपली सर्व भोगइंद्रीये काबूत ठेवून मोठ्या निर्धाराने वानप्रस्थाश्रमाकडे जाईल. तो खालील दिलेले नियम कटाक्षाने पाळील.
जो गृहस्थ असे पाहिल कीं, त्याच्या शरीराला सुरकुत्या पडल्या आहेत, केस पिकले आहेत, मुलाचा मुलगा खेळू लागला आहे त्याने वानप्रस्थाश्रमाकडे जाण्याची तयारी करावी.
शेतातील सराव पीक व इतर ऐहीक वस्तुंचा त्याग करून तो वनात प्रवेश करील. पत्नी हयात असेल तर तिला मुलांच्या हवाली करून अथवा ती बरोबर येण्यास तयार असेल तर तिला बरोबर घेऊन तो निघेल.
बरोबर पवित्र अग्नी व इतर सामुग्री (पाटा वरवंटा, झाडू, चुल, भांडी, खलबत्ता इत्यादी) घेऊन वनीत पर्णकुटी बनवून तेथे राहील. तेथे तो त्याच्या भोगइंद्रीयांच्या संयमनात वेळ व्यतीत करील. टीपः ज्या वस्तु येथे दिल्या आहेत त्या दररोज करावयाच्या यज्ञांसाठी (जगण्यासाठी) आहेत.
तेथे तो नियमांनुसार ते यज्ञ करील व वनांत उपलब्ध असलेल्या जडीबुट्टी, कंदमुळं, फळे ह्यांचा त्यात प्रलाद देईल. ५ टीपः म्हणजे, तो वनात फक्त हे पदार्थ खाऊन राहील.
तो चामड्याचे वस्त्र परिधान करील, किंवा फाटके कपडे (जीर्ण झालेले) नेसेल, तो केस व नखे वाढवेल, केसाचा बुचडा बांधेल, दररोज सकाळी व संध्याकाळी तो स्नान करील.
तो जे खाईल त्याचाच बळी (प्रसाद) देईल, शक्य असल्यास भिक्षा (माधुकरी) स्नातकांना देईल. जे माधुकरी मांगण्यास येतील त्यांना तो त्याच्या कडील फळे, कंदमुळे व पाणी देईल.
तो त्याचा काळ वेदाच्या अध्ययनात व्यतीत करील. स्वताची सर्व कामं स्वतः करील. कोणा कडून सेवा अथवा दान घेणार नाही. येणार्या जाणार्यांशी तो प्रेमळपणांने वागेल. सर्व निरुपद्रवी प्राण्यांशी तो आपुलकीने वागेल.
तो पवित्र नियमानुसार अग्नीहोत्र सांभाळून न विसरता शुक्ल व कृष्ण प्रतिपदांचे व पोर्णिमेचे यज्ञ योग्य समयी करील.
तो वेळोवेळी नक्षत्रेष्टी, अग्रयान आणि चातुर्मास ही व्रते करील, त्याच प्रमाणे तुरायन व दक्षायन हे सुद्धा पाळेल. १०
पवित्र नियमांनुसार तो शुद्ध धान्य स्वतः गोळा करील जे वसंत व शरद ऋतुंत मिळते. त्यांपासून तो स्वतः यज्ञासाठी पुरोडास पिंड व शिजवलेल्या भाता पासून कारु पिंड तयार करून ते वाहील. हे सर्व तो एकाद्या संन्याशाला शोभेल असें करील. ११
अशारितीने ते अतिपवित्र जेवण यज्ञाच्या निमित्ताने दिल्यानंतर उरलेले तो स्वतः व त्याची पत्नी साठी स्वतः बनवलेल्या लवणा बरोबर खाईल. १२
चो वनात मिळणार्या नैसर्गिकपणे वाढणार्या झाडांपासून त्याचे सर्व खाद्य पदार्थ तयाक करील. त्यात फळांचे रस, फळे, भाज्या, बियांपासून काढलेले तेल असें पदार्थ येतील. वनात वाहणार्या झर्याचे पाणी तो घेईल. १३
तो वनात मिळणारे मध, मांस, अळंबी, अशा भाज्या, भूस्त्रीण, शिगृक, श्लेष्मंतक (भेडी) ह्यांची फळे खाणार नाही. १४
आश्विन महिन्यात तो त्याचे जीर्ण वस्त्र व जमवलेले सर्व खाद्यपदार्थ फळे, कंदमुळं फेकून देईल. १५
मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा