सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

हिंदू कोण – १०

  1. हिंदू मान्यतेतील देव परमेश्र्वर ह्यां बद्दलच्या कल्पना - (पुढे चालू)
सर्वे (सज्जन) सुखिनासंतु, सर्वे (सज्जन) भद्राणि पश्यंतू, न कश्र्चित् (सज्जन) दुःखमाप्नुयात् ।
म्हणजे, सर्व सुखी होवोत, सर्वांचे भले होवो, कोणालाही दुःख मिळो, अशी हि प्रार्थना आहे. आपल्याबरोबर इतरांचेसुद्धा हित इच्छावे कारण जग अद्वैतात आहे. खर्या हिंदूंनी देवतेकडे जे मागायचे ते मागितल्या नंतर शेवटी ही वर दिलेली प्रार्थना करावी, हे नेहमी चांगले लक्षात ठेवावे. येथे मी सज्जन हा शब्द मूळ वचनात घातला आहे कारण जर दुर्जनांचे भले झाले तर अनर्थ होईल.
१२. हा विषय समजण्यासाठी एक उदाहरण एका मोठ्या उद्योगाचे घेऊया. मोठ्या उद्योगात मुख्य मालकाच्या हाताखाली अनेक अधिकारी असतात. त्यांच्या हाताखाली आणखीन बरेच उपअधिकारी असतात शेवटी कामगार असतो. समजा, एका कामगाराला कांहीं याचना करावयाची आहे. तर तो एकतर थेट मालकाला अर्ज करू शकतो किंवा त्याच्या ताबडतोब वरच्या अधिकार्याला अर्ज करू शकतो. त्यापैकीं कोणत्या अर्जाची लवकर दखल घेतली जाईल त्यानुसार त्याचे काम होणार असते. मालकाला पाठवलेला अर्ज शेवटी त्या कामगाराच्या ताबडतोब वरच्याच अधिकार्याकडेच जाणार असतो त्यामुळे असा अर्ज जास्त वेळ घेईल हे उघडच आहे. त्यासाठी ताबडतोब वरच्या अधिकार्याकडे अर्ज करणे हेंच श्रेयस्कर ठरते. अगदी असेंच देवाकडे केल्या जाणार्या याचनेचे असते. परमेश्र्वराकडे केलेली याचना, आराधना तडीस जाण्यासाठी बराच काळ लागतो हे जसें आपल्या पूर्वजांना समजले तसें त्यांनी पितर देवांकडे याचना करणे जास्त चांगले असे समजून थेट पितरांना विनवणी करण्याचे धोरण प्रचारात आणले त्यामुळे पितर पुजा हिंदूंत प्रचलित झाली. कार्यालयाच्या कामांत एक अर्ज वरील अधिकार्याकडे करतांना त्याची एक प्रत मालकाकडे पाठवली जाते, अगदी त्याच प्रमाणे पितरांची आराधना करतांना त्यात शेवटी ईश्र्वराची आरती करावयाची असते. हिंदूंच्या पुजापद्धतीत हे दिसून येते. पितरांचे वेळोवेळी श्राद्ध (श्राद्ध म्हणजे श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धती, विधी) करण्याची प्रथा त्यामुळे सुरू झाली. ह्या श्राद्धविधीतून पुढे आजची पुजा करण्याची प्रथा तयार झाली. सर्वच धर्मांत श्राद्ध, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केले जात असते.
१३. परमेश्र्वराची अथवा ईश्र्वराची आराधना करण्याची योग्यता प्राप्त होण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे ते आता पहावयाचे आहे. परमेश्र्वराची अथवा ईश्र्वराची आराधना करण्यासाठी याचकाला मनांने शरीरांने शुद्ध व्हावे लागते. त्यासाठी त्या माणसात पूर्ण सात्त्विक प्रवृत्ति असावी लागते. म्हणूनच मुसलमानांत हाज करण्यास जाणार्याला अनेक नियमांचे पालन आयुष्यभर करावे लागते कारण, तो मक्केला हाज करतो म्हणजे अल्लाहला म्हणजे परमेश्र्वराला अथवा ईश्र्वराला भेटण्यास जात असतो. ते नियम असें आहेत, खोटे बोलणे, प्रामाणिकपणा, कोणालाही त्रास देणे, ब्रह्मचर्य पाळणे, विवाहीतांने बायकोच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर दबाव आणणे, मनांने कोणाचेही वाईट चिंतणे, दया, सहानुभूती, खादाडपणा करणे, वाईट काम करणार्यास मदत करणे तसेंच शक्य असल्यास विरोध करणे इत्यादि नियमांचे पालन करावे लागते तसेंच तो सतत परमेश्र्वराचे चिंतन करील. मुसलमान अल्लाहला परमेश्र्वर मानतात पण हिंदूंच्या दैवतांच्या रचनेनुसार तो पितरसुद्धा आहे. म्हणून धर्म हिंदू असो अथवा इस्लाम असो, परमेश्र्वराची अथवा ईश्र्वराची आराधना करण्याची पूर्व अट एकच असते हे लक्षात घ्यावे लागेल. ह्या विवेचनाने हे स्पष्ट होते किं, धर्म कोणताही असो, परमेश्र्वराची अथवा ईश्र्वराची आराधना करण्यासाठी त्याला मनांने शरीराने शुचिर्भूत असावे लागते एरवी ती आराधना व्यर्थ ठरते. शरीराच्या शुद्धतेबाबत विवेचन ह्या पुस्तकात पुढे दिले आहे. मनुस्मृतीत भोग इंद्रियांचे संयमन करावयास सांगितले आहे. पितरांची आराधना करणार्यांस जरा कमी अटी आहेत त्या अशा, प्रामाणिकपणा, कोणालाही त्रास देणे, मनांने कोणाचेही वाईट चिंतणे, दया, सहानुभूती, ह्याचा अर्थ असा होतो किं, परमेश्र्वराला याचना करणारा पूर्णतया सात्त्विक असावा लागतो पण पितरांना याचना करणारा रजोगुणी असला तरी चालते. पिशाच्चांकडे याचना करणारा तामसी (वरीलपैकी कोणतेही नियम पाळणारा) असला तरी चालते. ह्यावरून हे लक्षात येईल किं, सत्त्व, रजस तमस अशा तिनही प्रकारच्या माणसांस सहाय्य करण्याची व्यवस्था हिंदूंत आहे तशी व्यवस्था इतर धर्मांत नाही. इतर धर्मांत याचक मनांने शुचिर्भूत आहे असें गृहीत धरलेले असते. परंतु, वस्तुतः ते तसें नसतात, त्यामुळे त्यांच्या प्रार्थना बहुधा व्यर्थ जातात. हिंदूंत आणखीन एक देवांचा प्रकार पुजला जातो जो कोठल्याच इतर धर्मांत साधा विचारातसुद्धा घेतला जात नाही तो आहे, मानवी दैवते. मानवी दैवतांत आई, पिता, गुरु अथवा जीवंत असलेले सत्पुरुष ही प्रमुख असतात त्याशिवाय आज मालक, संबंधित शासकीय अधिकारी येतात. आपली संसारी कामे ज्याच्या मदतीने होऊ शकतात अशा कोणालाही देव मानण्यास साधारण हिंदू तयार असतो असा अनुभव आहे. इतर धर्मांत असें समजण्यास सुद्धा मनाई असते. मानवी दैवताची पुजा त्याना संतुष्ट करणारी असावी लागते.
पुढे क्रमशः चालू -
मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - ५०
तिने काटकसर करून संसार करावा. नेहमी आनंदी रहावे. गृहकृत्यदक्ष असावे. चतूर असावे, तिने घरातील भांडी चांगली स्वच्छ करून ठेवावीत. १५०
तिचा बाप ज्याच्याशी तिचे लग्न लावून देईल त्या बरोबर ती प्रामाणिकपणे तो जीवंत आहे तोवर संसार करील आणि जर तो मेला तर त्याचा कधीही अपमान करणार नाही. १५१
वधूला उत्तम भवितव्य प्राप्त व्हावे म्हणून स्वास्थ्ययान वाचावे आणि प्रजापतिला दान करावे. पण मागणी विधी (लग्नाची) तिचा बाप अथवा भाऊ करतो त्यानंतर ती तिच्या पतिची मालमत्ता होईल. १५२
जो नवरा विधीयुक्तरित्या तिच्याशी लग्न करतो तो तिला ह्या जगात नंतरच्या जगात सर्व काळ सर्व सुख देण्यास बांधलेला असतो. १५३
जरी नवरा नालायक असला तरी तिने सदैव त्याची पुजा करीत रहावयाचे असते. त्याला देवासमान मानून रहावे. १५४
नवर्याला सोडून ती कोणतेही व्रत कोणताही उपवास करणार नाही. जरी ती सदैव पतिच्या आज्ञेत राहीली तरी ती केवळ त्याकारणांनी मरणानंतर स्वर्गात जाईल. १५५
प्रामाणिक पत्नी ती, जी आपल्या पति बरोबर सदैव राहू इच्छिते ती कधीही असें करणार नाही ज्यामुळे तिचा पति नाराज होईल, मग तो जीवंत असो अथवा मेलेला असो. १५६
पति निधनानंतर ती फक्त फुलं, फळ कंदमुळ ह्यांचा आहार करील. त्यामुळे जरी ती कृश झाली तरी ते तिला आवडले पाहिजे. कोठल्याही परिस्थितीत ती परपुरुषाचा साधा विचारसुद्धा करणार नाही. १५७
एका माणसाच्या अनेक बायकांनी शांत चित्ताने मेहनतपूर्वक स्वताचा संयम राखून पावित्र्य राखून त्याची बायको म्हणून त्या एकाच पतिशी एकनिष्ठ राहून आपली कर्तव्ये पार पाडावीत. १५८
अनेक ब्राह्मण तारुण्यापासून पवित्र संयमी जीवन जगून वंश वाढवता मेले तरी ते स्वर्गात गेले आहेत. १५९
पुण्यवान ती स्त्री जी आपल्या नवर्याच्या मृत्यू नंतर पावित्र्य राखून जगली संतति झाली नाही तरी ती त्या अनेक ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्गात गेली. १६०
परंतु, जी स्त्री मातृत्वाच्या अभिलाषेने आपल्या मृत पतिला विसरून परपुरुषा कडून आई बनते ती स्वताच्या नावाला समाजात काळिमा फासते स्वर्गातील तिच्या नवर्याच्या बाजूची जागासुद्धा घालवते. १६१
परपुरुषापासून झालेली संतति अनौरस समजली जाते. परस्त्री पासून मिळालेली संततिसुद्धा अनैतिक समजली जाते. दुसरे लग्न करून त्यापासून झालेली संततिसुद्धा पुण्यकारक मानली जात नाही. १६२
जी बाई वरच्या वर्णाच्या पुरुषाशी पाट लावते ती परपूर्वा समजली जाते. स्वताच्या वर्णातील पुरुषास टाकून जर ती असें करीत असेल तर ती समाजात तुच्छ समजली जाईल. १६३
जी बाई आपल्या नवर्याची प्रतारणा करील तीचा समाज तिरस्कार करील. ती मेल्यावर कोल्ह्याच्या पोटी जन्म घेईल. अनेक व्याधींनी ती जर्जर होईल, तीच तिची शिक्षा असेल. १६४
जी स्त्री सर्व संयमाने जगेल आपले शब्द, कार्य ह्यांने नवर्याला दुखवणार नाही ती स्वर्गात त्याच्या बाजूस बसेल तिचा उल्लेख पुण्यवती म्हणून होईल. १६५
तिच्या संयमी वर्तणुकीमुळे ती सर्वांच्या स्तुतीस पात्र होईल आणि स्वर्गात नवर्याच्या बाजूस दिमाखाने बसेल. १६६
द्विज त्याच्या गुणी पत्नीस तिच्या मृत्यूनंतर विधीपूर्वक सर्व साधनाने युक्त असा अग्नीसंस्कार करील त्यासाठी अग्नीहेत्रातील पवित्र तेजाचा तो उपयोग करील. १६७
अशारितीने आपल्या पतिव्रत पत्नीला अग्नीसंस्कार केल्यावर तो दुसर्या विवाहासाठी योग्य होतो. आणि तो पुन्हा अग्निहोत्र सुरु करू शकतो. १६८
पवित्र नियमांनुसार राहून तो द्विज पांच यज्ञ करील. स्नताच्या घरात राहील आणि उर्वरीत जीवन दुसर्या बायकोबरोबर आनंदात राहील. १६९

मनुस्मृतीचा पांचवा भाग संपला
मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा