बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

हिंदू कोण - ४

मागील पोस्ट पासून चालू -
. हिंदू मान्यतेतील देव परमेश्र्वर ह्यां बद्दलच्या कल्पना -

. इतर धर्म आपला हिंदूधर्म ह्यात एक मोठा फरक आढळून येतो तो हा किं, इतर धर्मांत एक परमेश्र्वर असल्याचे मानले जाते त्याउलट आपल्या हिंदूधर्मात एक परमेश्र्वर त्या बरोबर अनेक देव देवता असल्याचे मानले जाते. अशी अनेक देवता मानण्याची प्रथा कां प्रचारात आली ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावयाचे आहे. त्यासाठी प्रथम आपल्याला परमेश्र्वर देव-देवता ह्यांतील भेद समजून घ्यावा लागतो. असा संकेत आहे किं, हे विश्र्व परमेश्र्वराने त्याच्या विचारांतून उत्पन्न केले आहे. कांहीं म्हणतात किं, हे विश्र्व हे ह्या परमेश्र्वराचे एक स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा समज हिंदू इतर सर्वच धर्मांत सर्वमान्य असा आहे, असो. वस्तुतः हिंदू हा धर्म नाही जसा इस्लाम अथवा ख्रिस्ती आहेत. कारण हिंदू ही एक परंपरा आहे त्यात अनेक धर्म आहेत. ब्राह्मण धर्म, जैन धर्म, बुद्ध धर्म, शिख धर्म असे अनेक धर्म त्यात असून त्याशिवाय अनेक पंथ जसें नाथ पंथ, भक्तीपंथ, वारकरी पंथ, अघोरी पंथ, वैष्णव पंथ, शाक्तपंथ आणखीन कितीतरी पंथ हिंदूस्तानात निरनिराळ्या भागात आहेत. त्यांबरोबर आणखीन नवनवीन पंथ उत्पन्न होत आहेत. त्यामुळे इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्मांशी त्याची तुलना करणे सर्वथा चुकीचे होईल. इस्लामची अथवा ख्रिस्ती धर्माची तुलना ब्राह्मणधर्माशी अथवा जैन धर्माशी, शिख धर्माशी, बुद्धधर्माशी करता येईल पण हिंदू परंपरेशी करता येत नाही.

. मी ह्या लेखांत हिंदू मान्यता, हिंदू परंपरा, हिंदू विचार असा उल्लेख केला आहे. हिंदू हा शब्दसुद्धा आपला नाही. तो अरबांनी आपला उल्लेख करण्यासाठी वापरला तो तसांच आपण आज वापरत आहोत. असें होण्याचे कारण, अनेक वर्षे आपल्यावर इस्लामी राजवट होती त्याचा हा परिणाम आहे. प्राचीन उल्लेख पाहता ह्याचा (हिंदू) उल्लेख "मानव प्रणाली" असा केलेला आढळून येतो. ह्याकारणांने प्रत्येक गोष्टीत हिंदू परंपरांची तुलना इतर धर्मांशी करणे उचीत होणार नाही. इस्लाम मध्ये असे आहे तर हिंदूंत काय? असे प्रश्र्न विचारणे त्यासाठी सर्वथा अयोग्य होईल. येथे हिंदू विचाराबद्दल बोलतांना इतर धर्मांना कमी लेखण्याचा सुद्धा विचार नाही कारण, त्यांची तुलना करतां आपल्याला सर्व गोष्टी पहावयाच्या आहेत. हिंदूंतील वैविध्यसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. पंजाबातील हिंदू रीती महाराष्ट्रापेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत तरीसुद्धा दोघेही हिंदूच असतात. तसे वैविध्य इतर धर्मांतील रीतीरिवाजांत आढळत नाही. इतर धर्मांशी तुलना करतां हिंदूंची वैशिष्ट्ये कोणती हे समजून घेणे असा हा प्रयत्न आहे. तरीसुद्धा शेवटी इस्लाम ख्रिस्ती धर्मांच्या विचारसरणीचा उहापोह मी करणार आहे कारण तो आवश्यक आहे. इतर धर्मांत विविध रीतीभातींचे प्रमाणिकरण केलेले असतें तसे हिंदूंत करता येत नाही. कारण हिंदूंतील रीतीरिवाज त्या त्या प्रदेशाच्या गरजेनुरुप असतात. महाराष्ट्राचे रीतीरिवाज गुजरातपेक्षा वेगळे असणार त्यामुळे तेथे प्रमाणिकरण शक्य नसते. बळजबरीने जर कोणी असें प्रमाणिकरण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे इतरांवर अन्याय होईल, ते योग्य नाही म्हणून असें प्रामाणिकरण करण्याचा कोणीही प्रयत्नसुद्धा करू नये असा एकंदर विचारप्रवाह आहे.

. परमेश्र्वराच्या आधी काय? असा प्रश्र्न इतर धर्मांत कोणीही विचारलेला आढळत नाही परंतु, हिंदू विचारांत हा प्रश्र्न उपनिषदांत विचारलेला आढळतो. त्याला उत्तर म्हणून नेती...नेती... नेती असें उत्तर दिलेले आढळते. नेती, ह्याचा अर्थ "माहीत नाही", असा आहे. म्हणजे परमेश्र्वर ही माणसाच्या ज्ञानाची अंतिम मर्यादा ठरते. परमेश्र्वर हा शब्द परम् ईश्र्वर अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजे ईश्र्वराच्याही पलिकडील असा त्याचा अर्थ होतो. इतर धर्मांत ईश्र्वर परमेश्र्वर हे एकच असें धरलेले आढळते. ख्रिस्ती धर्मात गॉड हा एकच शब्द सर्व प्रकारच्या देवांसाठी वापरला जातो. हिंदूं विचारात मात्र ईश्र्वर ह्या पातळीवर ब्रह्मदेव, विष्णु शंकर असे तीन असल्याचे मानले जाते. जो ह्या तिनाहूनही पलिकडला तो परमेश्र्वर असे समजतात. हिंदूंत दोन प्रमुख विभाग आहेत त्यातील एकास वैदिक विभाग दुसर्याला शाक्त विभाग असे मानले जाते. शाक्तांमध्ये अघोर, तंत्र, मार्ग असें इतर विचार प्रवाह समाविष्ट केले जातात. शाक्त मान्यतेनुसार शक्ति परमेश्र्वराच्या बरोबरीची असें मानले जाते. मनुस्मृतीत परमेश्र्वराला स्वयंभु असे म्हंटले आहे. स्वयंभु म्हणजे स्वतःच्या प्रेरणेने स्वतःच उत्पन्न होणारे हि व्याख्या शाक्तातील शक्तिलासुद्धा लागू होते. म्हणजे शक्ति हा शब्दसुद्धा स्वयंभुला पर्यायी आहे.
हिंदू कोण? पुढे क्रमशः चालू -

मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - ५१ – ७०
जे लाेक प्राणी मारतात, जे त्याचे मांस खातात, जे विकतात, जे वाढतात, व खातात ते सर्व जण त्या प्राण्याची हत्त्या करणारे ठरतात. ५१
पितर व देवांची आराधना न करता केवळ स्वत:च्या सुखासाठी मांसाहार करतात ते माेठे पापी समजावेत. ५२
एक जाे शंभर वर्षभर दर वर्षी प्रमाणे घाेड्याचा बळी देऊन यज्ञ करताे व एक जाे संपूर्णपणे मांसाहाराचा त्याग करताे ह्या दाेघांची पाप-पुण्याच्या दृष्टीने गुणवत्ता समान समजावी. ५३
मांसाहार पूर्णतया त्याग करण्यामुळे जे पुण्य मिळते ते केवळ फळे व कंदमुळे खाऊन व संन्याशा सारखे जीवन जगूनसुद्धा मिळत नाही. ५४ टीप: मनुस्मृतीत परस्पर विराेधी मते मांडलेली दिसतात.
मांस ह्या शब्दाचा अर्थ असा आहे किं, ज्याचे मांस मी ह्या जन्मात खाईन ताे पुढील जन्मी मला खाईल. ५५ टीप: ही व अशी कवने नंतरच्या काळात घुसडली असावीत असे स्पष्टपणे दिसते. उदाहरणार्थ, जर शाकाहारी प्राणी यज्ञात अथवा एरवी खाल्ला गेला तर ताे नंतरच्या जीवनात त्या माणसाला, ताे शाकाहारी असल्यामुळे कसा खाणार? म्हणून ह्या विधानात तथ्य दिसत नाही.
मांस खाणे, दारू पिणे व संभाेग घेणे ह्यात कांहीही दाेष नाही कारण, त्यासर्व गाेष्टी नैसर्गिक आहेत. जेजे नैसर्गिक अाहे ते सर्व पाप विरहीत असते परंतु, तरीसुद्धा त्यांचा त्याग करणे पुण्यकारक समजावे. ५६
आता ह्यानंतर मी मृतांची शुद्धी कशी करावी व चार वर्णाच्या लाेकांस शुद्धी विधी काय आहेत ते सांगणार आहे. ५७
लहान मुल जर दांत आल्यानंतर मेले तर व जर त्याचा पुजस्करण विधी (मुंडण, उपनयन) झाला असेल तर मृताच्या कुटूंबाला सुतक लागते. तसेंच मुलाच्या जन्मामुळेसुद्धा सुयेर लागते. ५८
असा नियम आहे किं, सपिंडास सुतक दहा दिवसाचे असते किंवा त्याची हाडे गाेळाकरी पर्यंत म्हणजे तीन दिवसाचे किंवा एक दिवसाचे असते. ५९
सपिंड नाते सात पिढ्या वरच्या अथवा खालच्या रहाते. समानाेदक (सख्खा भाऊ, बहीण) नाते आता पाळले जात नाही. ६०
जरी सुतक मृत्यूनंतर लागू हाेत असले तरी सुयेर जन्माने लागू हाेते. जर खर्या शुद्धीचे पालन करावयाचे असेल तर. ६१
सुतक सर्व पिंडांना लागू हाेत असले तरी सुयेर फक्त एका दिवसाचे बालकाच्या माता पित्यालाच लागू हाेत असते. किंवा केवळ मातेला लागू हाेते. आणि पिता स्नान केल्यानंतर शुद्ध समजला जाताे. ६२ टीप: सुतक व सुयेर काळात देवांची पुजा करता येत नाही परंतु, पितरांची करता येते.
जन्मदाता पिता स्नान करून शुद्ध हाेताे पण पुनर्विवाहीत स्त्रीचा पति असेल तर त्याला तीन दिवसाचे सुयेर पाळावे लागते. ६३
प्रेताला स्पर्श केलेल्यास शुद्धीसाठी एक दिवस व रात्र सुतक पाळावे लागते तर प्रेतांस पाणी वाहणार्यास तीन दिवसाचे सुतक पाळावे लागते. ६४
जाे विद्यार्थी आपल्या मृत शिक्षकासाठी पितृमेध विधी करेल ताे दहा दिवसाचे सुतक पाळील. जसे प्रेत स्मशानभुमीकडे नेणार्याला लागू हाेते. ६५
गर्भपात झालेल्या स्त्रीची शुद्धी हाेण्यास तितके दिवस लागतात जितके दिवस ती गराेदर हाेती. मासिकपाळीमुळे येणारी अशुद्धी ती संपल्यावर आंघाेळ केल्याने हाेते. ६६
मुंडन विधी केलेल्या बालकाच्या मृत्यूने येणारे सुतक एक दिवस रात्रीने पूर्ण हाेते. ज्याचे मुंडन झाले आहे परंतु, पुजस्करण विधी झालेला नाही त्याचे सुतक तीन दिवस चालते. ६७
जर लहान मुल दाेन वर्षे पूर्ण करण्याआधी मेले तर त्याची सुशाेभित प्रेतयात्रा काढून गांवा बाहेर नेऊन त्याचे शव दफनभुमीत पुरावे. त्याची हाडे नंतर गाेळा करावयाची नसतात. ६८
त्या बालकाला अग्नी संस्कार द्यावयाचा नसताे. पाण्याने स्नान घालावयाचे नसते. काेणताही संस्कार करतां एकादा अाेणका जाळावा (भडाग्नी) असे दहन करावयाचे असते. तरीसुद्धा तीन दिवसाचे सुतक पाळावयाचे असते. ६९
ज्या बालकाला दांत आले आहेत परंतु, त्यानी तीन वर्षे पूर्ण केली नाहीत अशा बालकांस आंघाेळ घातली जात नाही. तसेंच बारसे झाले असेल तर आंघाेळ घातली तरी चालेल पण ते पालकांच्या मर्जीवर असेल. ७०

मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा