रविवार, १९ जून, २०१६

अरबांची कुत्री – ५

मागील पोस्ट पासून पुढे चालू
जेव्हा महमदाने इस्लामचा संदेश सांगितला तेव्हां एकंदर अरबांची लोकसंख्या कमी होती. ते सर्व अरबस्तानात विखूरलेल्या परिस्थितीत होते. त्यांच्यात पुन्हा अनेक मतभेद भांडणे होती अशा परिस्थितीत त्यांचे सैन्य तयार करून सिसिनीड बायझेनटाईन साम्राज्ये हरवणे अशक्य होते. त्यासाठी अबु बक्रने एक नामी युक्ती योजली. ती समजण्यासाठी त्याचे आक्रमक धोरण समजून घ्यावे लागेल.

अरबांच्या प्रमाणे त्या भागात इतर लोकसुद्धा रहात होते जे सुद्धा पर्शियाच्या जाचक कारभारावर नाखूष होते. त्यांचे अरबांचे संबंध शेजार्यासारखे होते. त्यातील कितीतरी जण महमदाकडून इस्लामची दीक्षा घेऊ इच्चित होते पण महमदाच्या व्रतस्थ धोरणामुळे ते मुसलमान झालेले नव्हते. त्यांत आरेमियन, असेरियन, तूर्क, पार्थियन असें बरेच वंशाचे लोक होते. त्यांत आरेमियन लोकांची संख्या जास्त होती.

शेजारात असल्यामुळे असेल कदाचित् त्यांची अरबांची रहाणी मिळती जुळती होती. अरबी भाषा आरेमियन भाषा ह्यांमध्ये बरेच साम्य असल्याने ते एकमेकांची बोली सहजपणे समजत असत. अबु बक्रने महमदाचा नियम मोडून त्यांना इस्लामची दिक्षा देण्यास सुरुवत केली आश्र्वासन दिले किं, ते जर मुसुलमान झाले तर त्यांना अरबी साम्राज्यात मोठ्या संधी मिळतील ज्या कारणांने, ते खुप श्रीमंत होतील! अशारितीने खोटी आश्र्वासने देऊन त्यांने त्यांची भरती सैन्यात केली. त्या आरेमियन लोकांच्या जोरावर अरबांनी इराकचा मोठा हिस्सा काबीज केला इस्लामी साम्राज्याची सुरुवात केली.

जरी आरेमियन सैनिकांच्या बळावर ते राज्य कमावलेले होते तरी त्यात उच्च पदांवर मात्र केवळ अरब अधिकारी नेमले गेले. त्यामुळे थोड्याच काळानंतर त्याला लक्षात आले किं, आरेमियन सैनिक नाराज आहेत ते केव्हाही बंड करू शकतील. जर असें बंड झाले तर मात्र अरब त्याचा मुकाबला करू शकणार नाहीत. पुन्हा त्यांनी दुसरी खोटी गोष्ट पुढे आणली. त्यात त्यांने त्या नाराज आरेमियन सैनिकांना आश्र्वासन दिले किं, जर ते पूर्णपणे अरबी चालरीत अवलंबतील तर त्यांना सैन्यात मोठ्या जागा मिळतील. अशारितीने त्या अरबेतर लोकांचे अरबीकरण सुरु झाले. हे एक प्रकारचे दुसर्या पातळीवरचे बाटवणेच होते. असें झाले तरी अरबांनी त्यांना कधीही त्यांच्या बरोबरीचे मानले नाही. अरबाना ह्या नकली अरबांपासून वागळे ओळखण्यासाठी त्यांची नांवे मात्र अरबी धाटणीची असणार नाहीत ह्याची दक्षता बाळगली होती. अरब त्यांच्या नांवात मुलगा असेल तर इब्न असा अव्यय मुलगी असेल तर बिंट अव्यय वापरीत, तसें हे आरेमियन वापरीत नसत.
अशारितीने दोनदा बाटवलेल्या ह्या लोकांना मात्र अरबांनी मुसलमान बोलता मवाली असें संबोधन दिले. ह्या मवाल्यांच्या ताकदीवर अरबांनी त्यांचे साम्राज्य उभे केले.
पुढील पोस्ट मधून हा विषय चालू राहील. -
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या ८११००
जो ब्राह्मण शुद्राला तपस्या करावयास सांगेल जो त्याच्या कडून पवित्र नियमांचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करील तो त्या शुद्राबरोबर असमव्रत नांवाच्या नरकात जाईल. ८१
तो त्याचे डोके दोनही हातांनी खाजवणार नाही. पारोसा असतांना तो त्याच्या डोक्याला स्पर्श करणार नाही. आंघोळ करतांना तो त्याचे डोके पाण्यात बुडवून धुवेल. ८२
रागाच्या भरात तो दुसर्याच्या डोक्याचे केस धरून ओढणार नाही अथवा त्याच्या डोक्यावर वार करणार नाही. डोक्यावरून आंघोळ (डोके पाण्यात बुडवून) केल्यावर तो तेलाला स्पर्श करणार नाही. ८३
ब्राह्मण दान घेतांना खर्या क्षत्रिय परंपरेतील राजांकडूनच ते घेईल. खाटीक, तेली, विशीकर (वसतीगृह, हॉटेल) चालवणारा, कुंटणखाना चालवणारा, अशांकडून तो दान घेणार नाही. ८४
एक तेलाची घाणी चालवणे हे दहा खाटीकखाने चालवण्यासारखे पापकारक आहे. एक विशी चालवणे दहा तेलीपेक्षा जास्त पापकारक असते. एक कुंटणखाना दहा विशी इतका पापकारक असतो. एक (क्षत्रिय) राजा हा दहा कुंटणखान्यापेक्षा जास्त वाईट असतो. ८५
एक (क्षत्रिय) राजा हजार खाटीकखान्यांप्रमाणे असतो. म्हणून त्याच्याकडून दान घेणे भयंकर पापकारक असते. ८६
पवित्र नियमांचे पालन करणार्या राजाकडून जो ब्राह्मण दान घेईल तो पुढे नमुद केलेल्या एकवीस प्रकारच्या नरकांत खितपत पडेल. ८७
तमिश्र, अंधतमिश्र, महारौरव, रौरव, कालसुत्र, महालरक, ८८
संगीवन, महाविकी, तपन, संप्रतपन, संघत, शककोल, कुद्मल, पुत्रिमृतिका, ८९
लोहसंकू, ऋगीषा, पथीन, तप्तनदी, शलमल, असिपत्रवन आणि लोहकारक. ९०
जाणकार ब्राह्मण हे सर्व जाणतो म्हणून तो कधीही अशा राजाकडून दान घेत नाही. ९१
तो ब्राह्मण पवित्र मुहूर्तावर उठेल. अध्यात्मिक तेज संपन्नता प्राप्त करण्याचा मानस बाळगेल. त्यासाठी होणार्या शरीराच्या मेहनतीचा तो फारसा विचार करणार नाही. ९२
तो ब्राह्मण प्रातःकाळी उठून नित्याचे प्रातर्विधी उरकून स्वताला शुचिर्भूत करून पहाटेच्या उगवत्या सूर्याकडे पहात गायत्री मंत्राचे बराच काळ मनापासून स्मरण करील. तसेंच संध्याकाळीसुद्धा करील. ९३
अशारीतीने दीर्घ काळ गायत्रीचा जप केल्याने त्याला उत्तम शहाणपण, दीर्घायुष्य, प्रसिद्धी, वेदांचे उत्तम ज्ञान हे प्राप्त होईल. ९४
उपकर्मन विधी पवित्र नियमांनुसार केल्यानंतर श्रावण महिन्याच्या अथवा भाद्रपदाच्या (प्रौष्यपद) पोर्णिमेस वेदाच्या अध्ययनास सुरुवात करील. ते तो पुढील चार महिने मोठ्या मेहनतीने चालू ठेवील. ९५
पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी (प्रतिपदा) किंवा, माघ महिन्याच्या शुक्लपक्षातील प्रतिपदेस दुपारी मध्यान्हानंतर, उत्सर्गण विधी वेदांसाठी करील. ९६
उत्सर्गण विधी गांवाबाहेर जसें पवित्र नियमांत दिले आहे त्याप्रमाणे केल्यानंतर वेदाचे वाचन तो दोन दिवसांसाठी त्यानंतरच्या रात्रीसाठी थांबवेल. किंवा ज्या दिवशी उत्सर्गण विधी केला त्या दिवशी त्याच्या रात्री थांबवेल. ९७
त्यानंतर तो प्रामाणिकपणे वेदांचा अभ्यास शुक्लपक्षात करीत राहिल, तसेंच वेदांगांचा सुद्धा अभ्यास कृष्णपक्षात करील. ९८ टीपः वेदांगे म्हणजे उपनिषद, अरण्यके, ब्राह्मणके इत्यादी ग्रंथ
तो वेदांचे वाचन अशुद्धपणे करणार नाही. तो शुद्रापुढे वेदाचे वाचन करणार नाही. आणि जर तो फार रात्री वेदांचे वाचन करण्यास कंटाळत असेल तर तो झोप घेईल. ९९
वर दिलेल्या नियमानुसार त्यांने मंत्रांचासुद्धा अभ्यास करावयाचा असतो. हुशार विद्यार्थी त्याशिवाय ब्राह्मणकं (एक वेदांग) मंत्रसंहिता सुद्धा शिकेल. १००


मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा